पाप येवढे आहेत डोक्यावर...

दशानन's picture
दशानन in जनातलं, मनातलं
17 Apr 2009 - 9:04 pm

कर्म, आराध्य व मी ह्यात सध्या गुरफटलो आहे मी काय शेवटचे लिहू तुझ्यासाठी काही असेच शब्द, जे माझ्या मनातून उमटत आहेत. काय नाही दिलेस तु मला जिवनामध्ये ? जेवढे जगलो सुखाने जगलो, काही क्षण दुखाचे तर काही क्षण सुखाचे ! माझे कर्मभोग तरी ही तु साथ होतीस, दुखात ही तु सुखी होतीस... पण तुझे अश्रु देखील मी कधी फुसले नाही, जेव्हा जेव्हा तुला माझी गरज होती तेव्हा देखील मी तुझ्या जवळ नव्हतो, कष्टांना तु आपलसे केलेस, माझ्यासाठी कधी तरी रक्त देखील सांडलेस.

जेव्हा तुला मी उमजलो तेव्हा देखील मी असाच होतो आज ही असाच आहे, सध्या वयाच्या बाबतीत मी अश्वथामा आहे, मरण नाही पण सुखाचा मणी कोणी तरी, कोणी तरी काय ज्याने दिला त्यानेच काढून घेतला आहे, भळभळती जख्म अशीच उघड सोडून दिली आहे त्याने माझ्यासाठी, एकच शब्द जगणे सोडला आहे माझ्यासाठी, पण का व कुणासाठी ह्याचा काही आधार ? मागे पाहतो तो काही शव माझ्या खांद्यावर आहेत असेच आपल्याचे, कोणी आपलं होतं, कोणी रक्ताचे तर काहींचे ऋणानूबंध. पण सध्या शव उचलून उचलून दमलो आहे, काल जे शव श्मशानामध्ये पोहचवले त्याचा चेहरा पण नाही पाहीला.. कारण ते शव देखील माझेच होते मरत कोणीही असो, पण क्षणा क्षणाला चिता माझीच जळते.. असेच अगणीत वेळा मी जळलो आहे. कधी तरी एक शव माझा ही असेल असेच निपचित पडलेले. सुखासुखी जगामध्ये अवचितपणे कोठेतरी हरवलेले.. कोणाला काय पडले आहे दुस-याच्या खांद्यावर कोणाचे वजन आहे ह्यांची ? कोणी गाते आहे कोणी हसत आहे कोणी जगाचे रंगबिरंगी रुप पाहात आहे..समोरुन गेलेल्या यात्रे मध्ये कधीतरी मी पण असेल ह्याची कुणाला चाहूल आहे ? हे शब्दजाल आहेत मला ही माहीत आहे कधी तुझ्या समोर मी हे लिहलेले बोलेन ह्यांची खात्री मला ही नाही तरी ही..

पण जाण्याआधी काही वचने आहेत काही संस्कार आहेत त्यांना पुर्ण करणे आहे, नांदत आहे ती दुस-यांच्या घरी तीचे देखील पहावयाचे आहे मला माहीत आहे त्यामुळे मी सध्या जिवंत आहे, एकुलती एक असली तरी काय झाले तीच्यासाठी देखील मी एकुलता एकच आहे, दुखःची काय कमी ह्या जगामध्ये, पण सध्या मी तुमच्या बरोबर सुखात ही नाही, किती घाव होत असतील तुझ्या मनावर ह्याची थोडीफार कल्पना आहे पण माझा ना-इलाज आहे, तु जी आहेस ते मी शत जन्मी देखील होऊ शकत नाही, तु जे भोगले ते सहन करण्याची शक्ती माझ्यात कधीच येणार नाही, पण मी तुझ्या पोटी आलो हे भाग्य माझे पण मी तुझ्या पोटी आले हे दुर्भाग तुझे आहे ..

तु जगलीस माझ्यासाठी, मी पण मी ? माझा अहंम, माझा मी व दुस-यांचे अधिकार, हक्क ह्यांना संभाळात मी तुझा हक्क कधी हिरावून घेतला हे कळालंच नाही, आज उमजलं आहे पण... ती वेळ निघून गेली आहे, तो काळ, ती वर्षे ते तप मागे पडले आहेत... तु माझ्यासाठी वेचलेल्या कष्टांना, तु माझ्या आठवणीमध्ये सांडलेल्या प्रत्येक अश्रुंचा मी देणेदार आहे, कर्ज आधीच तुझे माझ्या अंगावर होते... सध्या मी कर्जामध्ये दबलेला आहे...

किती स्वप्ने असतील व किती कल्पना तुझ्या माझ्यासाठी... भांडी घासलीस दुस-या घरची तर कधी कपडे धुतले.. नशेचा कहर तु झेलला जन्मभर.. मी देखील असाच अडाणी राहिलो, किती प्रयत्न केलेस तु मला शिकवण्यासाठी पण मी मुर्ख असाच शिकण्यापासून पळत राहिलो... माझ्यासाठी कधी पाटल्या विकल्या तर कधी मंगळसुत्रातील सोने.. तुला काय वाटले मला आठवत नाही ते दिवस, मी लहान होतो पण असाच निगरट होतो.. , माझ्यापुढे मी कुणालाच पाहत नाही, माझा गर्व माझा अहंम म्हणजेच माझे सर्वस्व आहे असेच समजत होतो पण एक एक करुन सगळे सोडून गेले कधी देवाची करणी तर कधी नशीबाची खेळी... कधी जिंकलो तर कधी हरलो पण ह्या खेळामध्ये मी तुला काही क्षण विसरलो.. त्याच कर्मांची फळे मी भोगली आहेत... ज्यांच्यासाठी जगलो तेच गेले.. आपल असं कोणीच राहिले नाही जवळपास, अमर नात्यांच्या ग्वाही देणारे आज पलिकडे बसले आहेत, मला ह्या जगात एकटेच सोडून... कोणी येतं काही क्षण मध्येच पण नाते न जपता फायदा जपून..पुढे निघून जातात असेच नेहमी प्रमाणे मला एकटे टाकुन !

आज तुझ्यापासून दुर आहे, हजारो किलोमिटर पण मनाने तुझ्या चरणावरच लोटांगण घातले आहे.. तु मला एकदा माफ कर, ह्या जन्माची कसर नक्कीच भरुन काढेन, पुढील जन्मात तुझ्या पोटी येईन !
पण ह्याची खात्री नाही, पाप येवढे आहेत डोक्यावर...

मुक्तकप्रकटनअनुभव

प्रतिक्रिया

क्रान्ति's picture

17 Apr 2009 - 10:25 pm | क्रान्ति

खूप खूप आतल्या, मनाच्या तळातल्या भावना उफाळून आल्यात लेखात. गहिवरून आलं! अप्रतिम लिहिलंय.
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com

सँडी's picture

12 May 2009 - 6:48 am | सँडी

.......................................................................

विनायक प्रभू's picture

18 Apr 2009 - 5:12 am | विनायक प्रभू

छान

अवलिया's picture

18 Apr 2009 - 5:16 am | अवलिया

वा! मस्त !!

--अवलिया

अनिल हटेला's picture

18 Apr 2009 - 6:00 am | अनिल हटेला

काय लिहु!!
डोळे भरुन आले !!! :-(

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

जागु's picture

18 Apr 2009 - 1:00 pm | जागु

खुपच छान.

परिकथेतील राजकुमार's picture

18 Apr 2009 - 1:26 pm | परिकथेतील राजकुमार

ह्म्म्म्म्म राजे.
जोरदार एकदम, आजकाल लेखणीनी काहि वेगळीच दिशा पकडली आहे.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

अवलिया's picture

18 Apr 2009 - 1:30 pm | अवलिया

अहो लेखनाचेच काय घेवुन बसलात?
नियतीने दशा केली की आयुष्याची दिशा बदलते...
पण आयुष्यात एकच दिशा धरुन राहिले की दशा होते हा भाग त्याहुन निराळा.

परासेठ... अजुन फार लहान आहात... कळेल जस जसे मोठे व्हाल तसे. असो.

--अवलिया

दशानन's picture

11 May 2009 - 4:44 pm | दशानन

>>>नियतीने दशा केली की आयुष्याची दिशा बदलते...
पण आयुष्यात एकच दिशा धरुन राहिले की दशा होते हा भाग त्याहुन निराळा.

१००% सहमत.

नियतीनेच दशा केली आहे राव.. !
येथे दिशाच काय स्वतः मीच बदललो आहे.... !

थोडेसं नवीन !

मनीषा's picture

18 Apr 2009 - 5:37 pm | मनीषा

लेख आवडला .

पर्नल नेने मराठे's picture

18 Apr 2009 - 5:59 pm | पर्नल नेने मराठे

दोल्यत पनि आले
चुचु

टारझन's picture

19 Apr 2009 - 11:05 am | टारझन

आपला प्रतिसाद वाचून आमच्याही "दोल्यत पनि आले"

बाकी राजे हल्ली फॉर्मात आहेत .. णेमीप्रमाणे छान लेख ...

शितल's picture

18 Apr 2009 - 6:12 pm | शितल

राजे,
मस्त, खुप छान लिहिले आहे.:)

प्राची's picture

18 Apr 2009 - 8:13 pm | प्राची

राजे,
लेखन मनाला भिडले.

हर्षद आनंदी's picture

18 Apr 2009 - 9:22 pm | हर्षद आनंदी

मागे पाहतो तो काही शव माझ्या खांद्यावर आहेत असेच आपल्याचे, कोणी आपलं होतं, कोणी रक्ताचे तर काहींचे ऋणानूबंध. पण सध्या शव उचलून उचलून दमलो आहे, काल जे शव श्मशानामध्ये पोहचवले त्याचा चेहरा पण नाही पाहीला.. कारण ते शव देखील माझेच होते मरत कोणीही असो, पण क्षणा क्षणाला चिता माझीच जळते.. असेच अगणीत वेळा मी जळलो आहे. कधी तरी एक शव माझा ही असेल असेच निपचित पडलेले.

वाचता वाचता डोळ्यातले अश्रु गालावर ओघळले... पुन्हा पुन्हा वाचुन पुन्हा पुन्हा ओघळले.... ओघळतच राहीले.

विषण्ण मनाचे निव्व्ळ अप्रतिम शब्दांकन !!

सागर's picture

11 May 2009 - 5:02 pm | सागर

शाबास राजे

थेट काळजालाच हात घातलात की ... :)
सुंदर लेख

- सागर
अवांतर: तुमच्या पापांची यादी तर द्या ... बघू आम्हाला त्यात भागीदार होता आले तर ;)

मिंटी's picture

11 May 2009 - 5:04 pm | मिंटी

नि:शब्द !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! :|

डोळ्यात पाणी आणलंस राज !!

आनंदयात्री's picture

11 May 2009 - 5:12 pm | आनंदयात्री

मस्त लिहिले आहेस राजे. आवडले.
छान शब्दांकन केले आहेस मनस्थितीचे

सहज's picture

11 May 2009 - 5:19 pm | सहज

हे वाचले नव्हते. छान लिहले आहेत राजे.

स्वाती दिनेश's picture

12 May 2009 - 11:18 am | स्वाती दिनेश

हे वाचले नव्हते. छान लिहले आहेत राजे.
हेच म्हणते,
स्वाती

उमेश__'s picture

11 May 2009 - 5:52 pm | उमेश__

छान....................

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 May 2009 - 7:01 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुरेख शब्दांकन.......

चतुरंग's picture

11 May 2009 - 7:33 pm | चतुरंग

फारच उचंबळून आलेले लिहिणे. कशानेतरी मनाची खपली निघालेली दिसते. आपल्या आयुष्यात कित्येक गोष्टी आपल्या हातात नसतात.
माफी मागितलीत ना? ही मागणेच फार महत्वाचे असते ते तुम्ही केलंत, आता भार हलका होईल.
स्वतःला जाळू नका, मिपाकरांबरोबर वाटून घ्या. दु:ख वाटल्याने कमी होत जाते.

चतुरंग

दशानन's picture

13 May 2009 - 2:44 pm | दशानन

:)

धन्यवाद.

थोडेसं नवीन !

What makes all Mothers special –

ANSWER :

When I came home drenched in the rain my brother said –

“Why don’t you take an umbrella with you !”

My sister said –

“Why didn’t you wait till the rain stopped !”

My father angrily said –

“You will only learn after getting a cold !”

But my mother while drying my hair said –

“Stupid rain !”

(from Amitabh Bachchan's blog)

(अवांतर -- मिपाच्या नियमांत बसत नसल्यास प्रतिसाद उडवावा पण याहून जास्त चांगला प्रतिसाद देणं आत्ता तरी सुचत नाही)

माया's picture

12 May 2009 - 11:41 am | माया

खुप छान शब्दांकन!

पाषाणभेद's picture

12 May 2009 - 11:54 am | पाषाणभेद

अगदी विचार करण्यासारखा लेख आहे.
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव)

दशानन's picture

13 May 2009 - 2:45 pm | दशानन

सर्वांचे आभार.

__/|\__

थोडेसं नवीन !