जयंती स्मरण - श्री श्री चार्ली चाप्लिन

टायबेरीअस's picture
टायबेरीअस in जनातलं, मनातलं
16 Apr 2009 - 6:31 pm

१६ एप्रिल . चार्ली चाप्लिन यांची जयंती.
पु. लं. चे दैवत याहून काही अधिक लिहिणे आहे काय?

परंतु यानिमित्ताने चार्ली च्या कलाकृतींचा रसास्वाद मिपा वर व्हावा ही इच्छा!

चित्रपटआस्वाद

प्रतिक्रिया

नितिन थत्ते's picture

16 Apr 2009 - 7:38 pm | नितिन थत्ते

सहमत
खराटा
(रंग माझा वेगळा)

मदनबाण's picture

17 Apr 2009 - 12:06 am | मदनबाण

चार्ली चाप्लिन यांचा मी सॉलिइइइ पंखा आहे.
या महान नायकाला माझा मानाचा मुजरा.

मदनबाण.....

I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.

भाग्यश्री's picture

16 Apr 2009 - 9:27 pm | भाग्यश्री

:) मध्यंतरी चार्लीचे आत्मचरित्र वाचले होते.(त्याबद्दल इथे लिहीले आहे..) तेव्हा झपाटून त्याचे सगळे मुकपट पाहीले होते.. सिटी लाईट्स, द डिक्टेटर,मॉडर्न टाईम्स वगैरे बरेच.. बरेच युट्युबवर सापडतील.. चार्ली चॅप्लीनसारखा कलाकार होणे नाही..

www.bhagyashree.co.cc

विसोबा खेचर's picture

16 Apr 2009 - 10:01 pm | विसोबा खेचर

दं ड व त...!

तात्या.

प्राजु's picture

16 Apr 2009 - 11:15 pm | प्राजु

पण असा होणे नाही.. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

ऋषिकेश's picture

16 Apr 2009 - 11:18 pm | ऋषिकेश

आज मिपावर चार्ली अवतरलेला बघुन आनंद झाला.
त्या महानायकाला मानाचा मुजरा!

ऋषिकेश

सिटीलाईट्स हा माझा अत्यंत आवडता चित्रपट आहे. कामधंदा नसलेल्या एका बेरोजगार 'ट्रँप' ची ही प्रेमकहाणी आहे. स्वतः च्या पोटाची खळगी भरण्यासाठी कुठलं काम न करणारा ट्रँप जेव्हा एका गरीब आंधळ्या फुलवालीला पहातो तेव्हा तिच्या प्रेमात पडतो. तिच्यावर 'इंप्रेशन' मारण्यासाठी तो पैसेवाला असल्याचा बहाणा करत असतो. ती भाबडी पण त्याला श्रीमंत समजून 'माझ्याकडची फुलं घ्या ना साहेब!' असं नेहेमी करत असते. केवळ तिच्या कडून फुलं घेता यावीत म्हणून हा ट्रँप इथून तिथून पैसे जमवत असतो.. ते करत असतानाच त्याची गाठ एका दारुबाज कोट्याधीशाशी पडते. गंमत म्हणजे दारुच्या नशेत असताना हा कोट्याधीश ट्रँप ला अगदी मित्रा सारखा वागवत असतो , घरी नेऊन उंची दारु पाजत असतो , आपल्या जोडीने त्याची उठबस करत असतो.. हाच कोट्याधीश सकाळी शुद्धीवर आल्यावर ट्रँप् ला धक्के देऊन हाकलवून देत असतो.

हे असे चालले असताना ट्रँप ला एके दिवशी समजतं की पैसे न भरल्यामुळे त्या आंधळ्या फुलवाली ला आणि तिच्या आजी ला घर सोडावे लागणार आहे! तो रस्ते काय साफ करतो, बॉक्सींग काय खेळतो, फुकटचा मार काय खातो पण पैसे जमवतो. अर्थात ते पुरणार नसतात.. कोट्याधीश त्याला दारुच्या नशेत १००० डॉलर देतो. सकाळी तोच कोट्याधीश त्याला 'चोर' समजून पोलीस मागे लावतो. कसाबसा जीव वाचवत तो ट्रँप त्या आंधळ्या फुलवाली ला पैसे देतो आणि 'तु तुझं घर वाचीव' सांगतो. पोलीस त्याला पकडून नेतात आणि आंधळी फुलवाली त्याला 'कृपाळू' श्रीमंत समजते...

..काही महिने जातात. ट्रँप तुरुंगातून सुटतो आणि परत त्याच रस्त्याच्या कोपरावर येतो.. बघतो तो त्या मुलीने दिलेल्या पैशातून छान फुलांचं दुकान थाटलेलं असतं.. एवढंच नाही तर तिच्या डोळ्याचं ऑपरेशन होवून तिला दृष्टी पण आलेली असते. तो तिला लगेच ओळखतो पण अर्थातच ती त्याला ओळखत नाही. . रस्त्यात पडलेलं एक फूल जेव्हा तो तिला देतो तेव्हा ती त्याला त्याच्या बदल्यात तिच्याकडचं ताजं फूल देऊ करते. त्यांच्या हातांचा स्पर्श होतो मात्र..,
..., ती त्याला ओळखते.. तिच्या कल्पनेपेक्षा वेगळा 'कोट्याधीश' तिला धक्का देऊन जातो.. " तो , तू?" ती त्याला विचारते... डोळ्यात पाणी, घाबरत, गरीबी मुळं लाजत, फाट़का मळकट सूट आणि बूट लपवत तो तिला म्हणतो .."हो, तुला दिसायला लागलं का?"....
"हो मला आता सगळं स्वच्छ दिसायला लागलं आहे " ती हसून म्हणते आणि त्याच्या मिठीत विसावते... .!!!
----------------------------------------------------------------

चार्ली ने या चित्रपटातून काय म्हणून दिलं नाहीये? चित्रपटाचा प्रत्येकन प्रत्येक सीन 'रुपक' घेऊन येतो.. Symbolism ची परमोच्च उंची चार्ली साधतो.. त्याच्या विनोदाला कारुण्याची इतकी घट्ट झालर आहे की आपण हसता हसता कधी डोळ्यातून आसवं वहायला लागतात कळत नाही....चार्ली चा तो ट्रँप, त्याचं रस्त्यातला बेवारस कुत्र्याशी जुळणारं रुपक... पु.ल. नी फार सुंदर वर्णन केलय 'जावे त्यांच्या देशा'त...

कुणीसं म्हंटलं आहे "उत्तम संगीतातून दु:ख आणि सुख या भावना वेगळ्या करता येत नाहीत.. म्हणूनच बरेच वेळा एकदम हृदयाला भीडणारं संगीत ऐकलं की घळाघळा अश्रु वहायला लागतात.. "

चार्ली च्या प्रत्येक कलाकृतीचं असं आहे. आपल्या आयुष्यात चार्ली, पु.ल. या सारखी लोकं लाभावीत या सारखे भाग्य नाही!

"ईफ देअर इस रीअली अ गॉड, ही वील बी हॅवींग "हेल" ऑफ अ टाईम!" :)

चार्ली, तुला सलाम!

-टायबेरीअस

मै तो अकेले ही चला था जानिबे ए मंझील मगर, लोग साथ आते गए और कारवां बनता गया"

भाग्यश्री's picture

17 Apr 2009 - 3:12 am | भाग्यश्री

मस्त लिहीलंत हो सिटीलाईट्स वर..
सगळं परत आठवलं! :)

www.bhagyashree.co.cc

आनंदयात्री's picture

17 Apr 2009 - 12:17 pm | आनंदयात्री

हेच म्हणतो !!

नितिन थत्ते's picture

17 Apr 2009 - 7:34 am | नितिन थत्ते

चार्ली च्या ट्रॅम्प रूपाचे गारुड अनेक कलाकारांवर होते.
परंतु त्यांनी मुख्यत्वे त्या बाह्य रूपाची केवळ नक्कल केली.

मॉडर्न टाइम्स मधील 'असेम्ब्ली लाईन'वरील नेमून दिलेले तेवढेच काम करणे भाग असलेल्या कामगाराची मानसिक स्थिती आणि केवळ वाढीव नफ्यासाठी कन्व्हेअरचा वेग वाढवू पाहणार्‍या मालकांचे आणि जेवणासाठीसुद्धा कामगाराने आपली जागा सोडू नये असा प्रयत्न करणार्‍या इंजिनिअर्सचे चित्रण लाजवाब.

सिटीलाईट मधील आंधळ्या फूलवालीचे गाडीवाल्याच्या मागे जाण्याचा प्रसंग (माझ्याही) डोळ्यात पाणी आणणारा.

खराटा
(रंग माझा वेगळा)

लिखाळ's picture

17 Apr 2009 - 4:00 pm | लिखाळ

वा सिटीलाईट बद्दल छान लिहिले आहेत. अजून काही चित्रपटांबद्दल सुद्धा लिहावे.

चार्लीने विनोदी भूमीका करुन लोकांना हसवले. विनोदाच्या माध्यमातून समाजचित्रण, समाजातल्या विरोधाभासाबद्दल, सुख-दु:खाबद्दल त्याने काही चित्रपटाच्या माध्यमातून मांडले. अश्या वेळी त्याच्या हसण्यामागे दु:ख असते असे अनेकांना का वाटते असा मला प्रश्न पडतो. 'हसता हसता डोळ्याच्या कडा ओल्या' करण्याचा चार्लिचा हेतू होता का? या बद्दल त्याने कुठे काही म्हटले आहे का?
-- लिखाळ.

भाग्यश्री's picture

17 Apr 2009 - 9:34 pm | भाग्यश्री

मी पुस्तकात वाचले होते की, चार्लीचा तो स्वभाव होता.. हळवा म्हण्ता येईल असा.. कुठलीही सुंदर गोष्ट दिसली.. की आवडली की त्याचे डोळे पाण्याने भरायचे.. कदाचित त्याचं रिफ्लेक्शन त्याच्या विनोदांतही पडले असावे..

www.bhagyashree.co.cc

गणा मास्तर's picture

17 Apr 2009 - 4:54 am | गणा मास्तर

सिटिलाईट्समधला शेवटचा सीन हा कदाचित चित्रपटसृष्टीतला आजवरचा सर्वात उत्तम सीन असावा.
चार्लीने डोळ्यामधुन सगळे भाव व्यक्त केले आहेत. केवळ अप्रतिम.....
- गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)

विनायक प्रभू's picture

17 Apr 2009 - 5:30 am | विनायक प्रभू

असेच म्हणतो.
अगदी बरोबर बोल्लात मास्तर.

नितिन थत्ते's picture

17 Apr 2009 - 7:37 am | नितिन थत्ते

चार्लीच्या चित्रपटातून आम्हाला हे कळले की अमेरिका आपल्याला वाटते तितकी स्वप्ननगरी नाही (किंवा काही वर्षांपूर्वी तरी नव्हती)

खराटा
(रंग माझा वेगळा)

मराठी_माणूस's picture

17 Apr 2009 - 12:36 pm | मराठी_माणूस

(किंवा काही वर्षांपूर्वी तरी नव्हती)
आताही नाही.

मनीषा's picture

17 Apr 2009 - 12:07 pm | मनीषा

हा सुद्धा चॅप्लीन च्या उत्कृष्ठ चित्रपटापैकी एक आहे .. यात स्वतः अनाथ असलेला चार्ली एका अनाथ मुलाला सांभाळतो ...
तसे त्याचे सर्वच चित्रपट सुंदर आहेत ... ग्रेट डिक्टेटर मधील त्याचा डबलरोल पण छान आहे .
त्याचे मराठीत अनुवाद केलेले चरित्र वाचले " हसरे दु:ख " त्यात त्याच्या लंडन ते हॉलीवुड प्रवासाचे सुरेख चित्रण आहे .
त्याच्या आईची शोकांतिका , त्याने भोगलेले दु:ख, आणि हे सर्व सोसून -- त्याने आपल्या चित्रपटातून केलेली निखळ आणि निर्मळ विनोद निर्मिती - हे वाचून तो किती महान होता हे परत एकदा पटते ..

सागर's picture

17 Apr 2009 - 12:45 pm | सागर

सहमत आहे... १००%

"हसरे दु:ख" वाचल्यावर जगाला हसवणारा हाच चार्ली चॅप्लीन खाजगी आयुष्यात किती हाल-अपेष्टांना सामोरे गेला होता हे वाचून डोळ्यांत पाणी न आले तर नवलच... या महान अभिनेत्याचे आयुष्य म्हणजे एक शोकांतिकाच होते... म्हणूनच कदाचित चार्लीच्या बहुतेक सगळ्या चित्रपटात एक दु:खाची आणि गरिबीची देखील झालर पहावयास मिळते...

(चार्लीप्रेमी) सागर

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

17 Apr 2009 - 12:15 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

कोणाचं वाक्य आहे आठवत नाही, पण चार्लीचे मूकपट जेव्हा बोलपट झाले त्याबद्दल एक प्रतिक्रिया, "चार्ली आता फक्त इंग्लिश समजणार्‍यांपुरताच मर्यादित झाला."

या महान माणसाने खूप काही दिलं जगाला!

अदिती
स्वाक्षरीत प्रत्येक वेळी 'पंच' असावा असं थोडीच आहे?

हसता हसता डोळ्यांच्या कडा भिजवणारा चार्लीचा सिटिलाईट्स ८वी ईयत्तेत पाहीला होता .. ती आंधळ्या फूलेवाली अजूनही आठवते ... त्याची कार्टूनगीरी अन अन त्याचे ते निरागस प्रेम ! किती जणांनी copy केली तरीही
Charlie is Charlie:-)

मराठी_माणूस's picture

17 Apr 2009 - 2:42 pm | मराठी_माणूस

किती जणांनी copy केली तरीही

आरके ची बनावट नक्कल आठवली

हा विचार चार्लीने दिला. चार्लीचे मूकपट हे अभिनयाचा मूर्तिमंत आविष्कार आहेत. त्यात येणारी सबटायट्ल्स ही तुम्हाला फार काहीच सांगत नाहीत जे चार्लीच्या देहबोलीनं आधीच सांगितलेलं नसतं. आपल्या बोलक्या डोळ्यातून, अतिशय लवचिक चेहेर्‍यातून, हात, पाय, वेताची छडी ह्यातून एकेक प्रसंग चार्ली आरपार नेतो. त्याच्या सिनेमातली दृश्यं ही चार्लीची म्हणून अशी एक खास सिग्नेचर घेऊन येतात.
कुत्र्याच्या पिलाला आपल्यातला अर्धा ब्रेड देणारा चार्ली, त्या कुत्र्याच्या पिलाचे शेपूट दुधाच्या बाटलीत घालून त्याच्याच तोंडात परत देऊन त्याला दूध पाजण्याचा प्रयत्न करणारा चार्ली असे प्रसंग आपल्या मनावर फक्त कोरले जात नाहीत तर एक दुखरा, लसलसणारा चरा मागे ठेवून जातात. आयुष्यात ज्याने अपार दु:ख भोगलेले आहे असाच माणूस अशी दृश्य कल्पू शकतो.
रोजच्या जगण्यात दिसणारे मानवी स्वभावातले वैचित्र्य, पोशाखी आधुनिकतेच्या नादाला लागून आटत गेलेली माणुसकी, यंत्रयुगाच्या अतिध्यासाने माणसालाच यंत्र बनवायला निघालेली अतिरेकी भांडवलशाही, सत्तेच्या महत्वाकांक्षेने जगालाच वेठीला धरायला निघालेला 'द डिक्टेटर' ही फक्त एकाच व्यक्तीची चित्रे नाहीयेत ती माणसातल्या गुणावगुणांची चित्रणे आहेत.
एकच सांगतो माझ्या वयाच्या दहाव्या-बाराव्या वर्षी बघितलेल्या सिनेमातली दृश्ये अजूनही माझ्या लक्षात त्यातल्या अभिनयासकट आहेत एवढा जबरदस्त परिणाम करणारी व्यक्ती किती सामर्थ्यवान असेल?
माझ्या सात वर्षाच्या मुलालाही चार्लीचे सिनेमे अत्यंत आवडतात. त्यातल्या प्रत्येक दृश्याला तो खळखळून हसतो आणि गंभीर दृश्याला तो अस्वस्थ होऊन "बाबा हे पुढे ढकलूयात, मला कसं तरी वाटतं" हे त्याला जाणवतं हे मला चार्लीचं मोठं यश वाटतं.
जगातल्या असंख्य लोकांना पिढ्यानपिढ्या रिझवणारे; देश, भाषा, धर्म, प्रांत, स्त्री-पुरुष, वय ह्यातल्या कुठल्याही सीमा ज्याला नाहीत असे, निखळ आणि निर्विष सिनेमे देणारा हा महान कलाकार संपूर्ण जगावर एक फार मोठे कर्ज कायमचे ठेवून गेला आहे!
त्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ आपण रडणं हे बरोबर नाही कारण तो त्याचा अपमान ठरेल. चला हसूयात, डोळ्यातून आपोआप पाणी येईलच पण ते हसताना आलंय असा बहाणा तरी करता येईल!

चतुरंग

नाटक्या's picture

17 Apr 2009 - 11:14 pm | नाटक्या

त्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ आपण रडणं हे बरोबर नाही कारण तो त्याचा अपमान ठरेल. चला हसूयात, डोळ्यातून आपोआप पाणी येईलच पण ते हसताना आलंय असा बहाणा तरी करता येईल!

हे वाक्य मात्र डोळ्यांच्या कडा भिजवून गेलं. ___/\___

- नाटक्या

टायबेरीअस's picture

17 Apr 2009 - 9:56 pm | टायबेरीअस

मनातले बोललात..

मदनबाण's picture

18 Apr 2010 - 10:21 pm | मदनबाण

(चार्लीच्या असंख्य चाहत्यांपैकीच एक...)
मदनबाण.....

There is no need for temples, no need for complicated philosophies. My brain and my heart are my temples; my philosophy is kindness.
Dalai Lama