लग्नाच्या "बाजार'गप्पा...(भाग 3)

आपला अभिजित's picture
आपला अभिजित in जनातलं, मनातलं
16 Apr 2009 - 11:49 am

लग्नाच्या "बाजार'गप्पा...(भाग १)

लग्नाच्या "बाजार'गप्पा...(भाग २)

बिबवेवाडीतला पत्ता शोधत, भल्या पहाटे 11 वाजता एका "कार्यक्रमाला' गेलो जाण्याचा प्रसंग गुदरला होता. मुलगी एका संस्थेतून, कुणाच्या तरी ओळखीने सांगून आलेली. पदवीधर वगैरे असावी. (म्हणजे, आता आठवत नाही. सध्या अस्मादिकांचा "गजनी' झालाय!) फोनवरून प्राथमिक बोलणी (सॉरी..."बोलणी' नव्हे, बोलणं! "बोलणी' फक्त पैशांची असतात!) झाली होती.

मी नेहमीप्रमाणे वेळेवर त्यांच्या दाराचं दार ठोठावलं. ऐन वामकुक्षीच्या काळात कुणी झुरळ मारण्याचं औषध घेऊन आलेला सेल्समन असावा, अशा थाटात माझं दुर्मुखलेलं स्वागत झालं. मुलीच्या मेव्हण्यानंच दार उघडलं. स्वतःची ओळख वगैरे करून दिली. मी घरात आल्यावर मान मोडेपर्यंत मागे वळूनवळून पाहत होता. शेवटी न राहवून "तुम्ही एकटेच आलात?' असं पचकलाच! मी "हो' म्हटल्यावर त्याच्या चेहऱ्यावरचे भाव पाहण्यासारखे होते.
हवा-पाणी, तापमान, पुण्यातलं ट्रॅफिक, वाढती धूळ-कचरा, युगोस्लाव्हियातला वांशिक संघर्ष, इथिओपियातला दुष्काळ वगैरे विषयांवर चर्चा झाली. माझी संभाव्य वाग्दत्त वधू दर्शन देण्याचं काही नाव घेईना. हेही तिचा विषय काढेनात. बरं, हा मेव्हणा म्हणजे लहानपणापासून तिला अंगाखांद्यावर खेळवल्यासारखाच तिचं पालकत्व स्वीकारून बोलत होता. तिला आईवडील नव्हते आणि आपणच तिचे तारणहार असल्याचा या उपटसुंभाला गर्व झाला होता बहुधा.
शेवटी बहुप्रतीक्षेनंतर आमची ती संभाव्य वाग्दत्त वधू आली बाहेर. आली ते एकदम पोह्यांचा ट्रे घेऊनच! मला तर साठ-सत्तरच्या दशकातला मराठी चित्रपटातला सीन पाहिल्यासारखाच अंगावर काटा आला! व्यवस्थित साडी वगैरे पोषाख, लांब वेणी, असा वेश. थरथरत्या हातांनी मला पोहे दिले. (नशीब, वाकून नमस्कार नाही केला!) मला वाटलं, चला, एकदाची गाडी रुळावर आली! आता मस्त गप्पाबिप्पा हाणू हिच्याबरोबर! समजून घेऊ तिचं व्यक्तिमत्त्व वगैरे. पोहे ओरपायला सुरवात केली. (बाहेर कुणाकडे गेलं, की माझी जाम पंचाईत होते. माझं पटापट खाऊन होतं. दुसरी "खेप' आहे की नाही, याचा आधी अंदाज येत नाही. मागायचं, तरी पंचाईत. नाही मागितलं आणि डिश ठेवून दिली, तरी पुन्हा न मिळण्याची भीती! सगळीच बोंब! असो!!) त्या मेव्हण्यानंही पोहे हादडले. मग पुढची सात-आठ मिनिटं नुसते वचावचा पोहे खाण्याचं मचक-मचक आवाज येत राहिला. बाकी भयाण शांतता! एखाद्या दुःखद प्रसंगाला गेल्यासारखी स्थिती!
माझ्या संभाव्य वाग्दत्त वधूचा "तारणहार' तिच्या आणि माझ्या मध्ये पहाडासारखा बसला होता. म्हणजे इकडे दिवाणावर मी, पलीकडे काटकोनात खुर्चीवर तो आणि त्याच्या पलीकडच्या खुर्चीवर ही बया! बरं, ती आल्यावर "ही माझी मेव्हणी अमूक अमूक' वगैरे ओळख करून द्यायची दूरच राहिली! "पोहे घेऊन आली, तीच ती' असा समज मी स्वतःच करून घ्यायचा!
काहीतरी निमित्तानं मग तो दोन-तीन मिनिटांसाठी आत गेला. बहुधा, आम्हाला "एकांत' देण्याचा हेतू असावा! मग मी तिच्याशी दोन शब्द बोललो. प्रथमच मला खटकलेल्या गोष्टी तिला सांगितल्या. "एकतर तुझी अधिकृत ओळख करून कुणी दिली नाही आणि तूही नीट बोलली नाहीस,' हे न आवडल्याचं सांगितलं. तिचा मेव्हणा दाराआड दबाच धरून बसला होता बहुधा. लगेच पुढे येऊन, "तुम्हीसुद्धा घरच्या कुणाला सोबत घेऊन न आल्याचं आम्हाला आवडलं नाही, हेही सांग ना,' असं तिला म्हणाला.
मग पुढे काही बोलणं झालंच नाही. म्हणजे, बोलण्यासारखं काही नव्हतंच.
मी आपले उरलेले पोहे हादडले आणि कन्नी कापायच्या मार्गाला लागलो. "तुम्ही कळवताय की आम्ही फोन करू दोन दिवसांनी?' वगैरे औपचारिक बोलण्याची गरजही नव्हती. दोन्ही पार्ट्यांनी आपल्या "बॉडी लॅंग्वेज'मधून "ये हृदयीचे ते हृदयी' घातले होते.
मी घरी आलो आणि नव्या जोमानं पुढच्या मोहिमेला तोंड देण्याच्या तयारीला लागलो...

(`कर्म'श:!)

मुक्तकप्रकटनअनुभव

प्रतिक्रिया

अमोल खरे's picture

16 Apr 2009 - 12:12 pm | अमोल खरे

त्या मेव्हण्यापुढे काही बोलता येत नसेल हो.........तिला आई वडील पण नव्हते म्हणालात ना तुम्ही......असो.

बाकी लेख नेहमीप्रमाणे मस्तच झालाय.

परिकथेतील राजकुमार's picture

16 Apr 2009 - 12:15 pm | परिकथेतील राजकुमार

मी आपले उरलेले पोहे हादडले आणि कन्नी कापायच्या मार्गाला लागलो.
हे उत्तम. उगा पोटाची आबाळ नको ;)
अभिजितदा जरा काहि चांगले , आश्वासक घडलेले प्रसंग सुद्धा लिहि बाबा. येत्या काहि महिन्यात आम्हाला सुद्धा ह्या 'चहापोहे' कार्यक्रमाला जुंपायची घरच्यांनी तयारी केली आहे :(

परादास
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

घाशीराम कोतवाल १.२'s picture

16 Apr 2009 - 12:24 pm | घाशीराम कोतवाल १.२

;) ;) ;) येत्या काहि महिन्यात आम्हाला सुद्धा ह्या 'चहापोहे' कार्यक्रमाला जुंपायची घरच्यांनी तयारी केली आहे

आला अजुन एक बकरा कापायला तयार झाला मजा
ये ये परा तुझीच वाट पाहात होतो ;) ;) ;)

**************************************************************
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??

llपुण्याचे पेशवेll's picture

16 Apr 2009 - 3:38 pm | llपुण्याचे पेशवेll

अभिजितदा जरा काहि चांगले , आश्वासक घडलेले प्रसंग सुद्धा लिहि बाबा
हाहा. चांगला आश्वासक प्रसंग एकदा घडला असेल तर त्यात ठरले असेल ना! वारंवार कसे घडतील बुवा असे प्रसंग? ;)
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984

प्रकाश घाटपांडे's picture

16 Apr 2009 - 1:19 pm | प्रकाश घाटपांडे

स्वतःची ओळख वगैरे करून दिली.

म्हजी अशी का?
हॅहॅहॅ! मी आपला अभिजित . अमुकतमुकच्या वळखीचा.
आन ते पोहे कशे झाल्ते?
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

परिकथेतील राजकुमार's picture

16 Apr 2009 - 1:36 pm | परिकथेतील राजकुमार

हॅहॅहॅ! मी आपला अभिजित . अमुकतमुकच्या वळखीचा.

लग्नाआधीच 'आपला' अभिजित ? काय हे घाटपांडे काका =))

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

प्रकाश घाटपांडे's picture

16 Apr 2009 - 1:45 pm | प्रकाश घाटपांडे

लग्नाआधीच 'आपला' अभिजित ?

हा ते बी खरच म्हना. आदुगरच आपला म्हन्ल की समोरचा मानुस मंग कोपला. नीस्त वळखीच कनीक्षन देउन चालत नाई. पन काही मान्स तुपला -मपला करन्याच्या आदुगरच आपला होउन जात्यात. कनीक्षन नस्ल तरी बी चाल्तय.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

अवलिया's picture

16 Apr 2009 - 6:09 pm | अवलिया

काही मान्स तुपला -मपला करन्याच्या आदुगरच आपला होउन जात्यात. कनीक्षन नस्ल तरी बी चाल्तय.

खरे आहे काका !

--अवलिया

पंचम's picture

16 Apr 2009 - 2:30 pm | पंचम

छान पुढच्या भागाची वाट पाहतोय!

रेवती's picture

16 Apr 2009 - 6:29 pm | रेवती

बापरे!
तुम्ही जर असे प्रसंग लिहायला सुरुवात केलीत तर उपवधू मिपाकर घाबरून जातील.
अश्याप्रकारच्या दोनेक प्रसंगांनंतर एक बरा कार्यक्रम लिहा (म्हणजे जिवात जीव येइल सगळ्यांच्या.).

रेवती