हिंदी-इंग्रजी चित्रपटांची मराठी नावे

इनोबा म्हणे's picture
इनोबा म्हणे in जनातलं, मनातलं
2 Feb 2008 - 2:43 am

हिंदी किंवा इंग्रजी चित्रपट भाषांतर करुन, त्याचा रिमेक करुन मराठीत प्रदर्शीत करायचा आमचा विचार आहे. आमच्या 'शिमगा प्रॉडक्शनला' अशा पटकथांची गरज आहे. इच्छूक पटकथा लेखकांनी(भट्ट कँप छाप) त्वरीत प्रस्ताव मांडावा.

तूर्तास पटकथा सांगायची गरज नाही;केवळ शिर्षक सांगावे. आम्हाला आवडल्यास आम्ही प्रतिसाद देऊ. (नाहीतर आधीच चोरलेली पटकथा पुन्हा चोरीला जायची)

सध्या आमच्या डोक्यात घोळत असलेले काही चित्रपट:
(हिंदी- बालेवाडी)
लावारिस - बिन बापाचा ...
फना -सत्यानाश
कुछ कुछ होता है - कसतरी होतंय
माचिस - काडेपेटी
वो कौन थी - ती कोण होती रे?
दिवार-भिंत
चल मेरे भाई-चल रे दादा
डरना मना है - घाबरायच काम नाही
खिलाडी - खेळाडू
हुम से है मुक़ाबला - आमच्याशी आहे गाठ
चीनी कम- साखर कमी

(इंग्रजी-हालेवाडी)
Dia another day - नंतर कधीतरी मर....
Ghost rider -भूत चालक
lady in the water- पाण्यातली बाई
The Mummy- आई
Mummy returns - आई परत आली...
spiderman-कोळी मानव(समद्या मासोलींचा कर्दनकाल)
hollow man - पोकळ माणूस
gone with the wind - गेलास उडत
superman - लय भारी माणूस
Lord OF The Rings- अंगठीचा मालक
scorpion king -(तात्या)विंचू राजा
Gone in 60 second- ६० सेकंदात सटकला
Batman- फलंदाज(वटवाघूळ मानव)
Rush Hour- गर्दीतला तास किंवा गडबडीतला तास
Scary Movie- घाबरवणारा चित्रपट

कळावे,
इनोबा स्पिलबर्ग (निर्माता-दिग्दर्शक)
शिमगा प्रॉडक्शन, चिपळूण

मौजमजाचित्रपटविरंगुळा

प्रतिक्रिया

इनोबा स्पिलबर्ग...

मजा आया!
और भी आने दो!

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

प्राजु's picture

3 Feb 2008 - 12:33 am | प्राजु

जीना तेरी गलीमें - तुझ्या गल्लीत जीना(चढायचा)
हंगामा - धुसगूस
अनारकली - डाळींबी

- प्राजु

ऋषिकेश's picture

3 Feb 2008 - 12:35 am | ऋषिकेश

जीना तेरी गलीमें - तुझ्या गल्लीत जीना(चढायचा)
अनारकली - डाळींबी

हा हा हा हा :))))))) ह. ह. लो. पो. :)) भन्नाट प्राजू :)

इनोबा म्हणे's picture

3 Feb 2008 - 12:48 am | इनोबा म्हणे

तुमच्या पटकथा पाठवून द्या....

शूटआऊट ऍट लोखंडवाला- लोखंडवाल्यापाशी गोलीबार
हम आपके है कौन- मी तुझा हाय तरी कोण
दिवाना- येडा कुठचा
वेलकम- सुस्वागतम
दिल दोस्ती एटसेट्रा- हृदय दोस्ती वगैरे

आय नो व्हॉट यू डिड लास्ट समर- मला म्हायती तू मागच्या उन्हाळ्यात काय केलं व्हतंस (आयला...एवढं लांबलचक)

प्राजु's picture

3 Feb 2008 - 12:49 am | प्राजु

बस एक पल - बास एक्..पळ! (चल पळ..)
कोई है - कोण आहे रे (तिकडे)?
वास्तव - वासाचा तवा..

प्राजु's picture

3 Feb 2008 - 1:04 am | प्राजु

शूटआऊट ऍट लोखंडवाला- लोखंडवाल्यापाशी गोलीबार

असे नाही..
शूटआऊट ऍट लोखंडवाला- भंगारवाल्यापाशी गोलीबार

- (फिल्मी)प्राजु

इनोबा म्हणे's picture

3 Feb 2008 - 2:02 am | इनोबा म्हणे

शिमगा प्रॉडक्शनचा पहिलाच चित्रपट.... लवकरच प्रदर्शीत होतोय.

http://farm3.static.flickr.com/2202/2237513562_2845b33f3b.jpg?v=0