२१ - परीक्षण

विकास's picture
विकास in जनातलं, मनातलं
9 Apr 2009 - 12:27 am

काही आठवड्यांपुर्वी 21 नावाचा एक २००८ साली काढलेला चित्रपट अचानक पहाण्यात आला. त्या कथेचे मूळ असलेली सत्य घटना बॉस्टनशी म्हणजे एम आय टी शी संबंधीत असल्याने कधीतरी ऐकली होती. केवीन स्पेसी हा आवडता नट असल्याने बघुया तरी म्हणत आम्ही बघायला बसलो आणि बर्‍याच दिवसांनी मनोरंजनासाठी काहीतरी नवीन पहायला मिळाले असे वाटले. (आता बॉलीवूड कधी कॉपी करेल ते पाहूया.) तर याची कथा खालील प्रमाणे:

बेन कँबेल नावाचा एक बुद्धीवान पण गरीब घरातील मुलगा हा एम आय टी या विख्यात विश्वविद्यालयात शिकणार्‍या मुलाला बाजूच्याच दुसर्‍या विख्यात विश्वविद्यालयात म्हणजे हार्वर्ड युनिव्हर्सिटीत मेडीकल च्या पदवीसाठी प्रवेश घेयचा असतो. अर्थात त्याला लागणारे $३००,००० त्याच्याकडे नसतात. म्हणून तो एका अतिशय अवघड अशा "रॉबिन्सन शिष्यवृत्ती"साठी अर्ज करतो. सर्वच शैक्षणिक रेकॉर्ड मोर दॅन परफेक्ट असल्याने कुठेतरी आशा असते की, ही शिष्यवृत्ती मिळेल जेणेकरून एक कवडी कशासाठीपण खर्च करावी लागणार नाही. मात्र जेंव्हा मुलाखतीसाठी जातो, तेंव्हा लक्षात येते की अशीच सर्व मुले आहेत. त्यामुळे प्रश्न विचारला जातो यात आम्हाला आश्चर्य वाटण्यासारखे काय आहे? आधीच्या वर्षात एका कोरीअन मुलाला ही शिष्यवृत्ती दिलेली असते कारण तो एक पाय असून देखील हुषार असतो. म्हणजे याला दोन पाय आहेत हा जणू काही याचा अपराधच ठरतो. अर्थातच पदरात नैराश्य येते आणि दुकानातील काम करत एम आय टी किमान रहाण्याचा खर्च करत पुढे शिकत राहण्याची वेळ येते.

त्याच वेळेस एका गणिताच्या वर्गात त्याचा प्राध्यापक (केवीन स्पेसी) मुलांना एक न्यूटनच्या गणिती सिद्धांतावरून प्रश्न विचारतो ज्याचे पूर्ण अनपेक्षित उत्तर हा बेन देतो. त्याच सुमारास या प्रसंगानंतर, त्याला त्या प्राध्यापकाच्या एका गुप्त क्लबमधे बोलावले जाते. ज्यात त्याच्यासारखीच असामान्य मुले असतात. प्राध्यापकपण स्वतः असामान्यच असतो. मात्र तो या सर्व बुद्धीचा ए़कत्रीत फायदा गुप्तपणे विकेंड्ला लास वेगास ला कॅसिनो मधे जाऊन पैसे मिळवायला करत असतो. त्याने ही विद्या मुलांना शिकवलेली असते आणि तो आता केवळ "मॅनेज" करत त्यातील अर्धे पैसे स्वत:ला आणि उरलेले इतरांना वाटून देत असतो.

सर्वप्रथम बेन याला नाही म्हणतो. मात्र नंतर परीस्थिती त्याला ओढून नेते. प्राध्यापकाचा त्याच्यावर विश्वास असतो की हा भावनेच्या आहारी जाऊन काही करणार नाही. आणि तसेच होत असते. मात्र एके दिवशी हे सर्व बदलते आणि हा हरत असताना देखील जुगारापासुन लांब जात नाही आणि नुकसान होते. प्राध्यापकाचे भांडण होते. तो याचे सर्व पैसे जे त्याने त्याच्या खोलीत लपवून नीट ठेवलेले असतात ते घेऊन जातो. इतर प्राध्यापकांकडून याला चांगल्या ग्रेड्स मिळण्याची केलेली व्यवस्था काढून नापास होण्याची वेळ आणतो...हे सर्व चालू असतानाच"घी देखा लेकीन बडगा नही देखा" प्रमाणेच कॅसिनोमधील सुरक्षा कर्मचारीपण बेन वर लक्ष ठेवून असतात...त्यांना त्याच्या "गँबलींग"च्या पद्धतीवरून काहीतरी भानगड आहे याची कल्पना आलेली असते...

नंतर बेनला ते पकडतात का, पकडल्यास त्याचे काय होते आणि हा "ग्रेट गँबलर" काय करतो हे या सत्यघटनेवर आधारीत असलेल्या चित्रपटात पहा. मी सांगितले तर मजाच निघून जाईल!

चित्रपटआस्वादविरंगुळा

प्रतिक्रिया

नाटक्या's picture

9 Apr 2009 - 1:01 am | नाटक्या

बघीतला पाहीजे हा चित्रपट..

- नाटक्या

टिउ's picture

9 Apr 2009 - 1:02 am | टिउ

अतिशय वाईट चित्रपट...चुकुनही बघु नये!

हा चित्रपट बघुन मी ब्लॅकजॅकमध्ये इतके पैसे वाया घालवलेत काही विचारु नका!!!

अनामिक's picture

9 Apr 2009 - 1:09 am | अनामिक

तुमचे पैसे वाया गेलेत म्हणून चित्रपट वाईट ठरत नाही. तुम्ही ब्लॅकजॅकमधे वाया घालवलेले पैसे हा तुमचा प्रश्न आहे. शिवाय ब्लॅकजॅक कसे खेळावे या बाबतीत हा चित्रपट मार्गदर्शन करत नाही. माझ्या मते हा चित्रपट प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन करतो. मिळाल्यास एकवेळ नक्कीच बघण्यासारखा आहे.

-अनामिक

विकास's picture

9 Apr 2009 - 1:27 am | विकास

हा चित्रपट बघुन मी ब्लॅकजॅकमध्ये इतके पैसे वाया घालवलेत काही विचारु नका!!!

तिथे कुणाचे हातवारे बघत तुम्हाला तुमच्यासाठी तर खाणाखुणा वाटल्या नव्हत्या ना? :-)

"ब्लॅकजॅकसहीत कुठल्याही पद्धतीचा जुगार खेळणे हे पाकीटास हानीकारक आणि मनस्ताप देणारे ठरू शकते" असा "डिसक्लेमर" लिहायचा विसरलो होतो. पण आता आपल्या प्रतिसादानिमित्त लिहीत आहे.

टिउ's picture

9 Apr 2009 - 1:33 am | टिउ

प्रतिसाद गमतीत लिहिला होता...चित्रपट छानच आहे.

धनंजय's picture

9 Apr 2009 - 2:09 am | धनंजय

वाटतो - बघायला पाहिजे.

प्राजु's picture

9 Apr 2009 - 4:17 am | प्राजु

बघायला हवा.
शो केस सिनेमाला आला की बघेन.. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

विसोबा खेचर's picture

9 Apr 2009 - 6:33 am | विसोबा खेचर

नंतर बेनला ते पकडतात का, पकडल्यास त्याचे काय होते आणि हा "ग्रेट गँबलर" काय करतो हे या सत्यघटनेवर आधारीत असलेल्या चित्रपटात पहा.

ओक्के सर! :)

तात्या.

स्वाती दिनेश's picture

9 Apr 2009 - 11:19 am | स्वाती दिनेश

'बघायलाच पाहिजे ' ह्या यादीत नोंदवून ठेवला, लवकरच मिळवून पाहते.:)
स्वाती

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

9 Apr 2009 - 11:28 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

'ब्लॅकजॅक' वर कुठलासा माहितीपट कुठल्याश्या वाहीनीवर पहाताना (काय पण माहिती आहे माझी!) हे पाहिलं होतं की स्टॅनफर्ड (का एम.आय.टी, का कुठल्याश्या प्रसिद्ध) विद्यापीठातली हुशार मुलं अशी गणितं, हातवारे इत्यादी प्लॅन करून कसिनो 'लुटतात'. पुढे कसिनोवाल्यांना यांचा संशय येतो म्हणून क्लुप्त्या थोड्या बदलतात त्यामुळे नफा होत रहातो पण कमी! पुढे या पोरांना 'कसिनोबंदी' केली जाते.

नक्कीच पहाणार हा चित्रपट.

अदिती
स्वाक्षरीत प्रत्येक वेळी 'पंच' असावा असं थोडीच आहे?

निशिगंध's picture

9 Apr 2009 - 2:55 pm | निशिगंध

आम्ही पाहीला...
ईतका काही खास नाही.....

_______ निशिगंध_________

मी शोधत आहे स्वत:हाला!!!!
सापडलो की कळवेन सर्वांना!!!!

फारएन्ड's picture

10 Apr 2009 - 4:08 am | फारएन्ड

टाईमपास आहे. एकदा बघायला हरकत नाही. मी ही केविन स्पेसी मुळे पाहिला.

विकास's picture

10 Apr 2009 - 4:26 am | विकास

तेच म्हणणे आहे. केवीन स्पेसी, थोडीफार सत्यघटना आणि मनोरंजन यामुळे एकदा पहीला तर नक्की आवडू शकतो. मला आवडलेल्या पहील्या प्रतितील तो आहे असे मी वर लेखात पण म्हणून म्हणले नाही...:-)