पुस्तक परिचय!

पिवळा डांबिस's picture
पिवळा डांबिस in जनातलं, मनातलं
31 Jan 2008 - 7:03 am

मित्रहो,

आज एका मराठी कादंबरीच्या विषयी लिहिणार आहे. कादंबरी तशी जुनी आहे पण त्याविषयी कुठे फारसे लिहुन आलेले वाचले नाही. माझ्या एका साहित्यिक मित्राने मला भेट म्हणून दिली होती.

"वेगळी आहे, वाच", म्हणाला.

म्हटले तर ही एक प्रेमकथा आहे, म्हटले तर एक शोकांतिका! प्रेमकथा म्हटली तरी प्रचलित विवाहसंस्थेत न बसणारी!!

विशेष म्हणजे भारताच्या पूर्णपणे बाहेर घडलेली, किंबहुना जगाच्या सगळ्याच किनारयांपासून दूर घडणारी ही कथा. एक विलक्षण पार्श्वभूमी लाभलेली! एका निराळ्याच विश्वात घेऊन जाणारी!!

लेखकाची प्रतिभा ज्वलंत आहे आणि शब्दांची निवड अचूक. त्याची अर्पणपत्रिका सुद्धा एकदम वेगळी,

"त्या कोसळत्या आभाळाला

बेगुमान सागराला

तरंगत्या पोलादी चेतनेला

आणि

त्यांच्या जीवघेण्या खेळात

सामावण्याची ताकद मला देणारया

केवळ बापाएवढ्या

माझ्या बापाला!"

...

केवळ रसभंग होईल या भीतीने मी कथानक इथे देत नाही पण जमल्यास अवश्य मिळवून वाचा. मी वाचत असतांना माझ्यापुरता तरी काळ थांबला होता!

...

"एम. टी. आयवा मारू"

लेखक - अनंत सामंत

प्रकाशक - अशोक कोठावळे, मॅजेस्टिक प्रकाशन

साहित्यिकशिफारस

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

31 Jan 2008 - 9:50 am | विसोबा खेचर

केवळ रसभंग होईल या भीतीने मी कथानक इथे देत नाही पण जमल्यास अवश्य मिळवून वाचा. मी वाचत असतांना माझ्यापुरता तरी काळ थांबला होता!

अहो कथानक नको परंतु परिक्षणवजा थोडेबहुत लिहिले असतेत तरी चालले असते!

असो, पुस्तक नक्की वाचेन..

आपला,
(वाचनोत्सुक) तात्या.

आनंदयात्री's picture

31 Jan 2008 - 1:19 pm | आनंदयात्री

ही कादंबरी कशी मिळवावी (विकत घ्यावी) ? कृपया जाणकारांनी अधिक मार्गदर्शन करावे.

आभारी
-आनंदयात्री

मनिष's picture

31 Jan 2008 - 1:37 pm | मनिष

कुठल्याही पुस्तकांच्या दुकानात किंवा वाचनालयात मिळेल. अप्पा बळवंत चौकात विचारा - "अनंत सामंत" तसे बेस्ट सेलर आहेत. :)

आनंदयात्री's picture

31 Jan 2008 - 2:59 pm | आनंदयात्री

धन्यवाद मनिष.

बापु देवकर's picture

31 Jan 2008 - 2:06 pm | बापु देवकर

ही एक सुन्दर कथा आहे एका खलाशाची.....राजाजी

ऋषिकेश's picture

31 Jan 2008 - 11:37 pm | ऋषिकेश

एम. टी. आयवा मारू ही फार मस्त कादंबरी आहे. कॉलेजमधे असताना हातात पडली होती आणि एका दमात वाचून काढल्याचे आठवते. त्यावेळी मी भारावून गेलो होतो (तसा मी बर्‍याच पुस्तकांनंतर भारावलो आहे हि गोष्ट अलाहिदा;) ):)
प्रत्येक मनाने तरूण असणार्‍याने वाचावी अशी कादंबरी आहे!
बाकी परिक्षणात कथा सांगितली नाहि तरी (शेवट न सांगता) गाभा सांगाल अशी अपेक्षा होती . असो या कादंबरीची आठवण करून दिल्या बद्दल आभार

-ऋषिकेश