मागील आठवडा असाच झोपून घालवला, खुप कंटाळा येतो नाही असं बेड वर पडून राहणे, पण ह्या रविवारची सकाळ जरा वेगळीच होती मस्त पैकी अंगात तरतरी जाणवत होती व शक्ती आली आहे असे वाटत होते, त्यामुळे विचार केला चला आज जरा बाहेर पडू, थोडा वेळ बागेत फिरलो, हिरवळीचा आनंद घेतला. रविवार होता त्यामुळे सर्वत्र आनंदी आनंद होता, , युवक-युवती मस्त पैकी सकाळाच्या कोवळ्या उन्हात गप्पा मारत होते, दोनचार आजोबा टाईप व्यक्तीमहत्वे त्यांच्या कडे चोरून चोरुन पाहत गप्पा मारत होते... पण हे सर्व बघून मी लवकरच कंटाळलो व परत घरी आलो, इकडे तिकडे करताना दिवाळीच्या वेळेस आणलेला डिस्टेंपरचा डब्बा दिसला व मनात एक विचार चमकला की चला आज आपली रुम पेंट करु या. दहा लिटरचा डिस्टेंपरचा डब्बा घेऊन मी आपल्या रुम मध्ये आलो व कुठली भिंत रंगवावी ह्याचा विचार चालू केला, बेडच्या समोरची भिंत स्काय ब्ल्यु रंगाने रंगवायचे मनात ठरवले व रुम मधील सामान एक एक करुन बाहेर काढायला सुरवात केली !
सर्व सामान जेव्हा मी बाहेरील हॉल मध्ये काढले तोच आमचा गडी किचन मधून बाहेर आला व म्हणाला " क्या कर रहे हो भाई ?"
मी म्हणालो " कुछ नही, जा तु रोटी बना" मी असे म्हणून बाथरुम मधील बाल्टी घेऊन आलो व दिड एक लिटर डिस्टेंपर बाल्टी मध्ये ओतले, तोच लक्ष्यात आले की ब्रेश नाही आहे व ब्ल्यु पिडीडिंन्ट तर नाहीच आहे, मग हळूच प्रेमाने गड्याला हाक दिली व म्हणालो " सतबीर, एक काम कर यार, मार्केट से ब्रेश तथा ब्ल्यु पिडीडिंन्ट ले के आजा यार.. बाईकले के जा." त्याने मला खाऊ का गिळू नजरे ने बघत म्हणाला " मै रोटी बना रहा हूं ! आप को भी कुछ काम नही है.. रुको अभीला के देता हुं! " चरफडत तो सामान घेऊन येण्यासाठी कसाबसा गेला, आजकाल शोधायला गेले तर देव भेटेल पण गडी भेटणार नाही, त्यामुळे ह्यांचे भाव जरा वाढलेलेच असतात, असो.
तो येऊ पर्यंत जरा आपलं कपाट साफ करु ह्या विचाराने कपाट साफ करायला घेतले, कपाट उघडताच समोर चार्-पाच सिग्नेचर च्या बाटल्या डोळ्यासमोर चमकल्या... अत्यंत दुखःने मी त्या बाटल्या उचलून आपल्या नजरे आड करत हॉल मधील कपाटमध्ये ठेवले ! व परत रुम मधील कपाटाकडे वळलो, खालचा कप्पा साफ करताना फोस्टर बियर च्या कॅनचा सरळ सरळ बॉक्सच हाती लागला जो मागच्या महिन्यात केलेल्या कॅकटेल पार्टी साठी आणला होतो, पण सर्वांचाच व्हिस्की व व्होडका मध्ये टांगा पलटी झाल्यामुळे बियर पण आहे हे जवळ जवळ सर्व जण विसरले होते व ती पेटी कपाटात राहिली होती, मी अत्यानंदाने वेडा व्हायचा तेवढा राहिलो.. चला डॉक्टर ने व्हिस्की सांगितले आहे घेऊ नको, बीयर ला थोडीच ना आहे... हा विचार करुन मी लगेच त्यातील दोन्-चार कॅन फ्रिज मध्ये लावल्या व निवांत पणे सोफ्यावर हुडपलो... आता काही वेळात बियर थंड होणार व मी त्या सर्व च्या सर्व गटकणार.. आठवडाभर पिली नाही त्याचा वचपा आज काढणार म्हणून मी खुषीत होतो, तोच माझ्या डोक्यात विचार आला च्यामायला त्या उमेश ला (माझा मित्र + डॉक्टर) विचारुन घेऊ या एकदा की बियर चालेल का नाही, नाही तर बियरच्या नादात मला स्वर्ग मिळायचा फुकटात...
मी त्याला फोन लावला " उमेश, क्या हाल है भाई ?"
तो " मजे में, हॉस्पिटल में हुं बोल, ठीक है अब. कोई तकलिफ ?"
मी " नही यार, ठीक हुं, मेरे पास व्हिस्की है... "
तो जवळ जवळ ओरडलाच " राज, हात तोड डालूंगा, साले व्हिक्सि को हात भी लगा या तो"
मी नर्वस होत म्हणालो " अबे, पुरी बात तो सुन. मेरे पास तीन-चार बोतले पडी हुंई है, जो मेरे काम की तो फिलाल है नहीं, तु ले जा." मी त्याला लालच + मस्का लावत म्हणालो.
तो " अच्छा ! चल कोई बात नहीं, दोस्त कब काम आएगें, शाम को ले जाऊंगा"
मी " तुझ्या आवशीचा घो, फुकट म्हणजे दे"
तो " क्या बोला बे ? समज में नही आया"
मी सावरासावरी करत म्हणालो " अबे तुझे नही, मुझे बियर चल सकती है क्या ?"
तो म्हणाला " चलेगी... जल्दी उपर जाना है तो पी , तेरे पास बियर का भी स्टॉक पडा है क्या ?"
मी गडबडीने म्हणालो " नही, नही. मंगाने वाला था, अब नहीं "
तो " अब आया लाईन पें, शाम को घर आ रहा हूं "
मी " ठीक. आ जाना !"
म्हणजे, पिण्याचा मार्ग संपला होता, पण येवढं होऊ पर्यंत सतबीर ब्रेश व बाकीचे सामान घेऊन माझ्या समोर उभा राहिला,मी त्याच्या हातातून सामान घेतले व सरळ आपल्या रुम मध्ये गेलो व आतातून दरवाजा बंद करुन घेतला.
बाल्टी मध्ये हलकेसे पिडीडिंन्ट टाकुन मी त्याला कश्याने घुसळायचा हा विचार करु लागलो काहीच सापडले नाही म्हणून शेवटी सरळ हात घातला व घुसळू लागलो .. थोड्या वेळा ने फिकट निळा रंग दिसू लागला पण त्या रंगाने माझे समाधान झाले नाही म्हनून अजून जरा पिडीडिंन्ट ओतले पण जरा जास्तच पडला पिडीडिंन्ट त्यामुळे तो एकदम निळा पेंट तयार झाला हे पाहून मी त्यात अजून थोडे डिस्टेंपर घातले अर्धा एक लिटर तर तो रंग परत हलका निळा झाला... थोडा पिडीडिंन्ट थोडा डिस्टेपर असे करत करत सरते शेवटी मला हवा तो निळा रंग तयार झाला, पण तो पर्यंत बाल्टी आर्धी भरली होती जवळ जवळ सहा एक लिटर रंग तयार झाला होता.. आता काय करायचे हा विचार करता करता मला ती सैफ अली खान ची पेंट ची जाहिरात आठवली ज्यामध्ये तो रंग ब्रेश ने भिंती वर झाडतो, हवे तसे ब्रेश फिरवतो व एक सुंदर कला कृती निर्माण होते, माझ्या डोळ्यात एक वेगळीच चमक आली व मी ती कल्पना प्रत्यक्षात आपल्या भिंती वर उमठवण्याची तयारी सुरु केली.
पहिला ब्रेश रंगात बुडवला व झपाक करुन भिंती वर उडवला, पण भिंती वर थोडा व माझ्या चेह-यावर जास्त उडाला... मी सद-याच्या बाही ने तोंड फुसत आपले काम नेटाने चालू ठेवले, कधी तलवारी सारखा ब्रश चालव तर कधी, गाडीचे स्टेरिंग फिरवत आहे तसा चालव, कधी उड्या मारत चालव तर कधी आडवा तिडवा जसा हवा तसा फिरव... तास भराच्या महनती नंतर अर्धी भिंत माझ्या कलाकृती ने भरली होती, माझी छाती एक इंच भर फुलली व मी परत नेटाने काम चालू केले, सपासप ब्रेश चालवत राहिलो व पुर्ण सहा लिटर पेंट भिंत वर अक्षरशः ओतून मी एकदम कौतुकाने ती माझी भिंत पहात उभा राहिलो !
टक टक, टक टक.
"भाई, क्या कर रहे हो अंदर ?" सतबीर म्हणाला बाहेरून.
"रुक जा पाच मिनिट" मी म्हणालो.
पुन्हा एकदा आपल्या कलाकृती वर नजर टाकुन मी विजयी आवेशा मध्ये दरवाजा उघडला तोच सतबीर तोंड वासून उभा माझ्या समोर.
"हे भगवान, कलर से नहा लिया है क्या ?" असे म्हणून तो अक्षरशः पोट धरुन हसू लागला.. मी त्याच्या कडे रागाने बघत हॉल मधील आरसा समोर उभा राहिलो, ७०% मी रंगात भिजलो होतो, केसं, तोंड, कपडे... चप्पल सर्व काही निळा / आकाशी रंग झाला होता, मी हसत म्हणालो, " अबे, कुछ काम करते करते गंदे हो गये तो उस में हसने वाली कोणसी बात है ?, चल चाय बना ! "
मी माझ्या हातातला ब्रश तलवारी सारखा फिरवत परत आपल्या रुम मध्ये गेलो व आपली कलाकृतीला आपल्या नजरेत साठवत उभा राहिलो, तोच सतबीर चहा घेऊन आत आला व भिंती कडे बघत म्हणाला " ए क्या है सब ? बाल्टी फेक दी क्या दिवार पें ?" मी कपाळाला हात लावत म्हणालो " अबे, ढक्कन. यह नया टाईप का डिझाईन है... अच्छा लग रहा है ना ? " मी त्याला डोळ्याने वटारत म्हणालो... त्याला समजले होयच म्हणायचे आहे ते. तो म्हणाला " बहोत बढियां, यह सब ठीक है... पर आपने फर्श क्युं रंग दिया.. अब इसे धोयेगा कोन ?" तेव्हा मी खाली बघितले, जवळ जवळ सर्व रुम ची फर्श निळ्या रंगात रंगली होती.. मी ब्रेश जसे हवे तसे चालवले त्यावेळी अर्धा रंग भिंती वर व अर्धा रंग सर्व रुम मध्ये पसरला होता.. मी आपली जिभ चावत त्याला म्हणालो " कोण साफ करेगा मतलब. दो घंटे के अंदर साफ कर रुम. मै अभी घुम के आता हूं बाहर से. तब तक एकदम ठीक ठाक होणी चाहीए रुम."
असे म्हणून मी जवळ जवळ पळतच बाथरुम मध्ये गेलो व अंघोळीला उभा राहिलो, आत मन भरुन हसून घेतल्या वर मी अंघोळ करुन बाहेर आलो तोच सतबीर चे एक वाक्य कानावर पडले जो फोन वर बोलत होता आपल्या कुठल्या तरी जाणकाराशी " रे यार, हमारे साहब भी पगला गये है, पुरा घर गंदा कर दिया.. मेरा संन्डे बरबाद कर दिया यार... ! " अरे रे मला खुप वाइट वाटले म्हटले ह्याचे पण काही प्लान असतील... आपल्या मुळे राहिलेच. त्याला बोलवले व म्हणालो " फ्रिज में चार बियर की कॅन रखी है, कल छुट्टी ले लेना, साथ में बियर भी लेके जा. लेकिन आज रुम साफ कर फटाफट." तो म्हणाला " ठिक है साब, पर फिर मत करना पेंन्ट का काम.. आप के बस की नहीं है.... पेंट करना.. दिवार खराब कर दी." माझ्या महान कलाकृतीला खराब म्हणाल्या म्हणाल्या मला खुप राग आला त्याचा पण.. हा गेला तर उपासमार होईल व अजून एक भुकबळी म्हणून आपली पण सरकार दप्तरी नोंद होईल ह्या भविष्यकालीन विचार करुन मी त्याला काहीच म्हणालो नाही.....
पण,
उद्या सुट्टी दिली आहे त्याला... उद्याची उचापत आताच माझ्या मनात रेंगत होती.. उद्या सतबीर ला सुट्टी दिली आहे.. मिपावर पाककृती दालन मध्ये डझनाने कलाकृती पडल्या आहेत त्यातील एक उचलणे व स्वयंपाक घरात आपली तलवार चालवणे.... ढ्णठढड्याण !!!!!!! ढ्णठढड्याण !!!!!!! ढ्णठढड्याण !!!!!!!
प्रतिक्रिया
23 Mar 2009 - 4:55 pm | कुंदन
येउ देत अशाच एकेक कलाकृती....
अवांतर : ते मागे फरसबी च्या भाजीबद्दल बोलणे झाले होते , केलीस की नाही भाजी?
23 Mar 2009 - 4:57 pm | दशानन
>>ते मागे फरसबी च्या भाजीबद्दल बोलणे झाले होते , केलीस की नाही भाजी?
नको रे त्याची आठवण काढूस फणसबी ची =))
23 Mar 2009 - 7:27 pm | विजुभाऊ
रंग होळीच्या दिवशी द्यायचा म्हणजे लोकांच्या लक्षात चुका येत नाहीत
आज तेरी नजरों से नजरे मिलाने की इजाजत चाहता हुं
जीनेसे पहले मरने की इजाजत चाहत हुं.
ये मुमकीन नही के खामोंश चला जाऊं
तुम्हे अल्फाजों मे बसाने की इजाजत चाहता हुं........विजुभाऊ सातारवी
23 Mar 2009 - 4:59 pm | सुप्रिया
तुमच्या उचापती वाचायला मजा आली. आता किचनमधल्या प्रयोगांबद्दल एक
लेख येऊ दे.
-------
(देहरुप गावाहून रामरुप गावाच्या प्रवासात रामनाम हीच उत्तम शिदोरी होय.)
23 Mar 2009 - 5:00 pm | mamuvinod
काम नाहि न धंदा नाहि.
बहूतेक आपण रिकामटेकडे आहात.
बाकि पाककृती मध्ये काय उद्दयोग केला ते वाचायला आतुर आहे. लवकर टाका.
ले़खन छान होते आहे.
धन्यवाद
23 Mar 2009 - 5:04 pm | बिपिन कार्यकर्ते
राज्या... च्यायला तू काय माणूस आहेस का कोण? ५ दिवसांपूर्वी झोपला होतास हास्पिटलात. आणि आता डायरेक्ट घर रंगवायला बसलास?
___||___
सध्या लिखाण जोरात आहे!!! :)
बिपिन कार्यकर्ते
23 Mar 2009 - 5:08 pm | दशानन
अरे बिपिनदा,
घरात बसून खुप कंटाळा येतो त्यामुळे.. हा टिपी !
23 Mar 2009 - 5:04 pm | लिखाळ
राजे,
तुमच्या कलाकृतीचा फोटो कुठे आहे? फोटो टाका लवकर :)
पुढल्या प्रयोगासाठी शुभेच्छा !
-- लिखाळ.
23 Mar 2009 - 5:07 pm | दशानन
कॅमेरा मागवला आहे, मित्र घेऊन गेला होता आज रात्री नाही तर उद्या सकाळी टाकतो ;)
23 Mar 2009 - 5:17 pm | परिकथेतील राजकुमार
छान आपण लिहिलेल्या वर्णनावरुन आपण तयार केलेल्या 'कलाकृतीचा' अंदाज आला ;) दोन घोट मारायला मिळाले असते तर आपण भवतेक सगळे शहरच रंगवले असते.
आपण बाहेरच्या ऑर्डर स्विकारता का ?
©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी
एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
23 Mar 2009 - 5:28 pm | छोटा डॉन
>>दोन घोट मारायला मिळाले असते तर आपण भवतेक सगळे शहरच रंगवले असते.
=)) =))
फु-ट-लो ...
माझ्या ओळ्यासमोर तो नजारा आला की राज एकदम टल्ली होऊन दिसेल त्या वस्तुला रंग फासत सुटला आहे, खत्तरनाक ..!!!
राज्या, लेख लै भारी रे ...
आणि तुझा उत्साह लै लै लै भारी, लगे रहो ...
------
छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
23 Mar 2009 - 5:45 pm | निखिल देशपांडे
दोन घोट मारायला मिळाले असते तर आपण भवतेक सगळे शहरच रंगवले असते.
हा हा हा.... राजे कलाकृतिचा फोटो येवुद्यात ईकडे....
काय उत्साह आहे हा??? घर रंगवणे अरे आजरी होतास ना मागच्या आठवड्यात....
बरे आता ते किचन मधे काय केले ते टाक लवकरच
23 Mar 2009 - 5:17 pm | अनिल हटेला
आपले महान प्रयोग वाचण्यास उत्सुक आहोत !!
(उचापत्या)
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
23 Mar 2009 - 5:22 pm | सँडी
=)) एक णम्बर!
प्रत्यक्ष प्रसंगच समोर उभा रहातो!
रंगलेखन एकदम झ्याक!
सतबीर, नशिबवान आहेस लेका!
- तुम्चा फ्यान!
23 Mar 2009 - 5:23 pm | शेखर
उद्या सुट्टी दिली आहे त्याला... उद्याची उचापत आताच माझ्या मनात रेंगत होती.. उद्या सतबीर ला सुट्टी दिली आहे.. मिपावर पाककृती दालन मध्ये डझनाने कलाकृती पडल्या आहेत त्यातील एक उचलणे व स्वयंपाक घरात आपली तलवार चालवणे.... ढ्णठढड्याण !!!!!!! ढ्णठढड्याण !!!!!!! ढ्णठढड्याण !!!!!!!
हॉस्पिटलचा नंबर घेऊन ठेवला आहे का?
23 Mar 2009 - 5:29 pm | भडकमकर मास्तर
मस्त लेखन..
मलाही मी भिंत रंगवली होती त्याची आठवण झाली..
जगाला आपल्या कलेची किंमत नसते हेच खरं... ;)
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
23 Mar 2009 - 5:46 pm | परिकथेतील राजकुमार
मास्तर तुमच्या दोघांकडे बघुन तुम्ही भिंत रंगवली नसेल तर 'चालवली' असेल असे म्हणायला सुद्धा हरकत नाही. तुम्ही दोघेही महान आत्मे आहात ;)
परुरंग
©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी
एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
23 Mar 2009 - 5:35 pm | मृगनयनी
राजे... स्टोरी मस्त आहे!
पण याचा अर्थ / निष्कर्ष एकच निघतो....
१. तुम्हाला पेन्टिन्ग येत नाही... त्यासाठी तुमच्याकडे "पेन्टिन्गवाली"ची १ वेकन्सी आहे.
२. तुम्हाला स्वयन्पाकासाठी आचार्याचा माज नको आहे. त्यासाठी एका शालीन, मनमिळाऊ "स्वयंपाकिणी"ची वेकन्सी तुमच्याकडे आहे.
३. तुम्ही सकाळी सकाळी बागेत कोवळे ऊन खायला जाता... सुन्दर युवक-युवतींना बोलताना बघता.... पण तुमच्याशी बोल्ण्यासाठी एका सुन्दर "युवती" ची वेकन्सी आहे.
:)
आणि या सगळ्याचा अर्थ एकच निघतो....की..........." राजे'ला एका सुशील, हरहुन्नरी, सुन्दर, सर्व कलागुण अवगत असलेल्या, मनमिळाऊ जोडेदारिणी' ची गरज आहे.
युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
23 Mar 2009 - 5:38 pm | श्रावण मोडक
राजे काय म्हणतात ते पहायचे (म्हणजेच वाचायचे) आहे...
23 Mar 2009 - 5:40 pm | दशानन
राजे काय कप्पाळ बोलणार !
ह्या सगळ्या जणींनी मिळून मला फासावर देणे नक्की केले आहे... मला वाटत आहे .. मी माझ्या लग्नात जरी हजर नसलो तरी माझा पुतळा उभा करुन ह्या भगिणी माझे लग्न लावून देणार =))
23 Mar 2009 - 6:40 pm | मिंटी
नयनीशी १०००००००००००००००००००० % सहमत.
अगदी खरं बोललीस बघ नयने...... राज घे मनावर आता काहितरी....... ;)
बाकी भगिनींमधे कोण कोण येतं ????????? ;)
24 Mar 2009 - 9:33 am | दशानन
>>बाकी भगिनींमधे कोण कोण येतं ?????????
तु आहेसच, बाकी ती स्पृहा आहे....
बिचारी आजकाल खुप बिझी आहे... त्यामुळे वाचलो आहे नाही तर... सकाळी एकदा दुपारी एकदा व संध्याकाळी एकदा लग्न कर लग्न कर म्हनून ढोस देत असते =))
23 Mar 2009 - 6:44 pm | बिपिन कार्यकर्ते
सुशील, हरहुन्नरी, सुन्दर, सर्व कलागुण अवगत असलेल्या, मनमिळाऊ
बाप रे!!! राज्या, हे सगळे गुण एकत्र असणारी एकच मुलगी कशी भेटणार रे तुला? ५ तरी लग्नं करावी लागतील तुला. ~X(
बिपिन कार्यकर्ते
23 Mar 2009 - 6:50 pm | परिकथेतील राजकुमार
राजे आनंदाने तयार होतील.
उगाच आजकाल कृष्णाच्या कवितांवर येव्हडे भरभरुन प्रतिसाद देत असतात का ?
©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी
एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
23 Mar 2009 - 6:52 pm | शितल
>>बाप रे!!! राज्या, हे सगळे गुण एकत्र असणारी एकच मुलगी कशी भेटणार रे तुला? ५ तरी लग्नं करावी लागतील तुला.
मग राजे तुम्ही सतयुग आल्यावर लग्न करा. ;)
23 Mar 2009 - 7:02 pm | श्रावण मोडक
बिपिनराव. मघाशी हेच म्हणणार होतो. पण थांबलो. तुम्ही म्हणालात त्याला मम म्हणतो.
पण महत्त्वाचा मुद्दा हा की, अशी मुलगी मिळणे शक्य नसल्याने राजे 'तसेच' राहणार.
आता हीच मुळात मृगनयनी आणि मिंटी यांची इच्छा आहे का हे मात्र सांगता येणार नाही... ;)
23 Mar 2009 - 7:06 pm | बिपिन कार्यकर्ते
मला पण हेच वाटते. ;)
बिपिन कार्यकर्ते
23 Mar 2009 - 6:05 pm | प्राची
>>मी त्याच्या कडे रागाने बघत हॉल मधील आरसा समोर उभा राहिलो, ७०% मी रंगात भिजलो होतो, केसं, तोंड, कपडे... चप्पल सर्व काही निळा / आकाशी रंग झाला होता :))
राजे,आता पुन्हा तुमच्या न्हाव्याकडे जाऊन फेशियल करून घ्यावं लागणार बहुतेक..... =))
स्वयंपाकातले दिवेपण उजळू द्या आता 8}
23 Mar 2009 - 6:10 pm | सहज
राजे तुम्ही महान, तुमचे प्रयोग महान.
कृपया काळजी घ्या.
23 Mar 2009 - 6:14 pm | स्वाती दिनेश
राजे तुम्ही महान, तुमचे प्रयोग महान.
कृपया काळजी घ्या.
सहजरावांसारखेच म्हणते.
स्वाती
23 Mar 2009 - 6:15 pm | शितल
राजे,
तुम्ही तुमच्या डॉ. मित्राला तुम्हाला बिअर प्यायची परवानगी मागितली तेव्हा जरा कल्पना दिली असती त्यांना की बिअर पिणार नाही तर आज भिंत रंगवणार हे दोन पैकी आज माझ्या डोक्यात आहे तेव्हा त्याने लगेच तुम्हाला बिअर पी असे ही सुचवले असते . ;)
बाकी एकदम भारी लिहिले आहे.
गडी अजुन ठिकुन आहे तुमच्याकडे हे मात्र लै भारी. :)
23 Mar 2009 - 6:28 pm | विनायक प्रभू
तु सुधरणार नाहीस ह्याची आता मला खात्री झाली आहे.
23 Mar 2009 - 6:36 pm | चंद्रशेखर महामुनी
लेख छान !
23 Mar 2009 - 7:19 pm | रामदास
घननिळा लडीवाळा
सावळाच रंग तुझा
रंग तुझा सावळा दे मला
निळा सावळा ...
वगैरे वगैरे
मैने रंगली आज चुनरीया हे गाणं तो म्हणत नव्हता...
23 Mar 2009 - 7:23 pm | मराठमोळा
मजा आली रंग सांडताना. म्हणजे,, लेख वाचताना.
येऊ द्या अजुन..
आपला मराठमोळा
-----------------------------
काले म्रुदुर्यॊ भवति काले भवति दारुण:!!
स: साध्नॊति परमश्रॆयम विघ्नांचाप्यधिष्टति!!
23 Mar 2009 - 7:33 pm | सूहास (not verified)
सुहास..
(द गुड)
23 Mar 2009 - 7:41 pm | क्रान्ति
:)) भन्नाट!
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
23 Mar 2009 - 7:56 pm | सोनम
लेख मस्त लिहिला आहे. :) :) :)
आता पाककृती मध्ये काय उद्दयोग करणार आहे त्याचा विचार करत आहे. :? :?
मलाही मी भिंत रंगवली होती त्याची आठवण झाली..
जगाला आपल्या कलेची किंमत नसते हेच खरं
+१ सहमत :)] :)] :)]
23 Mar 2009 - 8:13 pm | प्राजु
लवकर येऊद्या नवी पाकृ.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
23 Mar 2009 - 10:38 pm | भाग्यश्री
हेहे भारी!! त्या भिंतीचा फोटो नक्की टाका इथे !!
23 Mar 2009 - 10:45 pm | सुक्या
राजे .. धन्य तुम्ही .. आणि तुमचा तो गडी.
तुमच्या अजरामर (??????) कलाक्रुतीला " ए क्या है सब ? बाल्टी फेक दी क्या दिवार पें ?" असे म्हणुन हिणवणार्याचा निषेध करायला हवा. बाकी ते 'रिकामा न्हावी भिंतीला . . ' खरच की. म्हण जरा चेंज करावी म्हनतो. (ह. घ्या)
सुक्या (बोंबील)
चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो.
23 Mar 2009 - 10:50 pm | मदनबाण
आपली प्रयोग करण्याची इस्टाईल आवडली... ;)
मदनबाण.....
"If debugging is the process of removing software bugs, then programming must be the process of putting them in." --- Unknown.
24 Mar 2009 - 6:50 am | लवंगी
आणि मजेशीरपण.. लेखासोबत आपली निळी भिंत आणि आपले नीळे "थोबाड" पहायला आवडले असते.
24 Mar 2009 - 8:43 am | दशानन
जे उबडखाबड दिसत आहे तो सर्वात आधी गाढा रंग सपासपा मारल्यामुळे.. ते एक डिझाईन आहे, भिंतीवर खड्डे आहेत असे समजू नये. जास्त माहीती साठी संपर्क साधा. ;)
24 Mar 2009 - 9:05 am | अवलिया
राजे तुम्ही पुरुष नाही, महापुरुष आहात. :)
__/\__
आजपासुन मी तुमचा शिष्य !!!
आशीर्वाद द्यावा!!
--अवलिया
24 Mar 2009 - 9:18 am | सँडी
हिच का ती निळी? :? भिंत?
बिचारीचे खुपच हाल केलेले दिसतहेत आपण! अगदी हिरवी-निळी झालीय बिचारी... ;)
24 Mar 2009 - 9:22 am | दशानन
ती निळीच आहे, आकाशी कलर पण उजव्या बाजूच्या भिंतीचा रंग डार्क निळा आहे व दरवाजा उघडा होता त्यामुळे प्रकाश सरक आत येत होता त्यामुळे जरा हिरवट दिसत आहे पण मनात शंका नको, तुम्ही इकडे आल्यावर तुम्हाला दाखवून =))
* माझ्या साठी हाच निळा कलर आहे.. मी म्हणतो आहे ना... सुर्य आज पश्चिमेकडून उगवला... फोटो बघा आताच टाकले आहेत =))
25 Mar 2009 - 9:31 am | दशानन
सर्व प्रतिसाद देणा-या मित्रांचे / मैत्रीणींचे / शत्रुचें / दुरुन मित्र असलेल्यांचे / दुरुन शत्रु असलेल्यांचे / ज्यांनी वाचले पण प्रतिसाद नाही दिला त्यांचे / ज्यांनी वाचले नाही पण प्रतिसाद दिला त्यांचे / ज्यांनी वाचलेच नाही त्यांचे ही अनेकानेक आभार.
उदंड प्रतिसादा बद्दल धन्यवाद ;)
25 Mar 2009 - 11:24 am | स्पृहा
नयनीशी १००००००००००००००००००००००००००००००० % सहमत.
नयने एकदम सही...... ;)
अरे दा घे आता मनावर ........... अजुन किती छळणार आहेस त्या सतबीरला........;)