मुक्ती

क्रान्ति's picture
क्रान्ति in जे न देखे रवी...
22 Mar 2009 - 9:01 am

रोमरोमात जागली तुझ्या मुरलीची साद
दाही दिशा ओलांडून घुमे आज अंतर्नाद

भल्या पहाटे प्राणांत जणु काकडा पेटला
तिन्ही जगांचा नियंता अंतरंगात भेटला

आसावल्या पावलांना वाट दिसे पंढरीची
सावळ्याच्या भेटीसाठी नेते ओढ अंतरीची

द्रौपदीच्या दारी उभा चराचराचा हा स्वामी
भुकेल्याची तृप्ती इथे जाणवते अंतर्यामी

दूर भौतिकापासून भक्तिमार्गाला निघाले
अंतर्बाह्य बदलले, मन विश्वरूप झाले

लक्ष चौर्‍यांशीचे फेरे किती काळ आता साहू?
मुक्ती देई मायबापा, आता अंत नको पाहू

कविताप्रकटनविचार

प्रतिक्रिया

प्रमोद देव's picture

22 Mar 2009 - 9:09 am | प्रमोद देव

:)

आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)

नरेश_'s picture

22 Mar 2009 - 10:09 am | नरेश_

नको वाजवू श्रीहरी मुरली.. ची सय आली !

सही /-

आगरी बोली - आगरी बाना.

खरा डॉन's picture

22 Mar 2009 - 11:05 am | खरा डॉन

क्रांती बै कविता छान पण आता थोडा ब्रेक घ्या बॉ!
अहो बाकिच्यांनाही लिहु द्या की...

खरा डॉन

विसोबा खेचर's picture

22 Mar 2009 - 4:20 pm | विसोबा खेचर

छान आहे हो कविता!

तात्या.

प्राजु's picture

22 Mar 2009 - 6:31 pm | प्राजु

एकदम लयबद्ध आणि सुंदर शब्द योजून लिहिलेले काव्य. मस्तच.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

राघव's picture

23 Mar 2009 - 9:29 am | राघव

मस्त!!

आसावल्या पावलांना वाट दिसे पंढरीची
सावळ्याच्या भेटीसाठी नेते ओढ अंतरीची

लक्ष चौर्‍यांशीचे फेरे किती काळ आता साहू?
मुक्ती देई मायबापा, आता अंत नको पाहू

हे अगदी खास!

राघव

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

23 Mar 2009 - 9:32 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुंदर कविता..आवडली !

खूप छान ...
कविता आवडली !