होळी विशेष वृत्तांत ..

बामनाचं पोर's picture
बामनाचं पोर in जनातलं, मनातलं
19 Mar 2009 - 3:50 pm

होळीच्या निमित्ताने आमचा विशेष वृत्तांत... सर्व वाचकांना होळीच्या मनापासुन शुभेच्छा !!

१) चांद्रयानला अभुतपुर्व प्रतिसादामुळे भारतात सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. देशापूढील सर्व प्रमुख प्रश्न आता जवळपास सुटल्यात जमा आहेत. चंद्रावरील खड्ड्यांचे फोटो पाहुन कृतकृत्य झालेल्या काही बांधकाम व्यवसायीकांनी स्वता:हुन मुंबईतल्या सर्व रस्त्यावरचे खड्डे बुजवले आहेत. चांद्रयानने पाठवलेल्या चित्रफीत भारतात खेड्या-पाड्यात सामुदायीकपणे दाखवल्या गेल्या. यावेळी गावकरयांनी अभुतपुर्व एकी दाखवुन आपसातले सर्व तंटे मिटवले ( चंद्राच्या साक्षिने) . " तंटमुक्त गाव" योजना एका रात्रीत पुर्णत्वास गेली आहे. अश्या अनेक बातम्या देशाच्या कानाकोपरयातून येत असून , सरकारने मंदी संपल्याची घोषणा केली आहे.

" चांद्रयानचे ३०० कोटी हे लोकोपयोगी कामात खर्च करावेत " असा विरोध करणारयांची तोंडे गप्प झाली असून ; सरकार दर २ वर्षानी असे एक यान पाठवायचा विचार करत आहे.

२) डाउ केमिकल्सला नुकतीच महाराष्ट्रातील एका संप्रदायाची ओळख झाली. संप्रदायाचा प्रभाव , परंपरा व ईतिहास पाहुन डाउचे संचालक मंडळ अत्यंत प्रभावित झाले असून त्यांनी आपल्या कंपनिचे नाव बदलुन ’ देहू केमिकल्स’ असे करायचे ठरवले आहे. कंपनिचे मुख्य कार्यालय व सर्व संचालक मंडळ देहू येथे स्थायिक होणार आहेत. संप्रदायातील काही महत्वाच्या व्यक्तिंना देखिल कंपनिच्या मुख्य पदावर घ्यायची बोलणी सुरु आहेत.

३) कार्याध्यक्षांच्या सभांना मिळणारया प्रतिसादामुळे, मुंबईतल्या एका पॉवरफुल राजकीय घरामधे सर्व रिमोट कंट्रोल व ऎटेना बदलण्याचे काम जोरात सुरु झाले आहे. सध्याचे रिमोट कंट्रोल ९५ ते ९९ या काळात ६ व्या मजल्यावरची प्यादी हलवण्या साठी वापरले होते . नजिकच्या काळात काही मुख्य प्यादी रिमोट कंट्रोलच्या कक्षेबाहेर निसटली होती. त्यामुळे आता संपुर्ण प्रणालिचे उर्ध्व- श्रेणिकरण सुरु आहे. बारामतीच्या विषेश सल्लागारांचेही या कामात मार्गदर्शन घेतले जात आहे.

४) मालवणच्या आमच्या खास वार्ताहराने अत्यंत गुप्तपणे मुद्रित केलेला एक संवाद. दादा व त्याचे डॉक्टर चिरंजीव यातला हा संवाद दिड महिन्यापुर्विचा आहे. खास होळीच्या निमित्ताने जाहीर करीत आहोत.

फोन आला काय रे ! दिल्लीवरुन त्या हायकमांडचा ??
--->> नाही अजून आला दादा.. ! २ महिने झाले उगाच झुलवत ठेवल आहे ; आता बास झाले दादा , कोकणांतल पाणी दाखवूया यांना
ह्म्म्म्म .. एक काम कर.. आपल्या सगळ्या हॊटेल / पेट्रोलपंप वरचे हिशोब मागव.. काय जूळणी आहे बघु..
--->> आत्ता करतो लगेच..
आणि आपल्या सगळ्या प्रमुख कार्यकर्त्यांना कळव .. " घड्याळ आणि हत्ती मधला तुलनात्मक फरक " लिहुन आणायला सांग. अगदि खास कार्यकर्त्यांना " घड्याळ , हत्ती आणि आंबा " असा तिन्ही मधला लिहायला सांग.
--->> दादा , घड्याळ म्हणजे बारमतीवाले आणि हत्ती यू.पी तला हे कळलं पण हे "आंबा" काय ??
अरे , आंबा म्हणजे आपला स्व:ताचा ब्रँड.. आपला जोर कोकणात म्हणून आंबा हे चिन्ह. जावा आता , कामाला लागा !

दोन दिवसानंतर ..

काय म्हणतात रे कार्यकर्ते.
--->> दादा, माजलेत सगळे !! काही म्हणाले " आम्ही हाताला धरुन बसणार " , बाकीचे म्हणाले " तूम्हाला काय करायचे ते करा, आम्ही चाललो पुन्हा धनुष्य-बाण घेउन नेमबाजी करायला "

५) साहेबांनी अखेर पक्षाध्यक्ष व कृषीमंत्री पदाचा राजिनामा दिला आहे. येथून पुढे आता त्यांनी क्रिकेटमंत्री म्हणून शेतकरयांचा विकास करायचे ठरवले आहे. संसदेत झालेल्या गौरव समारंभात सर्व व्यक्त्यांनी साहेबांनी कृषीमंत्री असताना केलेया क्रिकेटच्या विकासाचा आढावा घेतला व कौतुक केले. समारोप करताना साहेबांनी आता येथून पुढे क्रिकेटच्या माध्यामातून शेतकरयांपर्यंत विकासाची गंगा पोहचवायचे ठरवले आहे. विदर्भात शेतकरयांच्या विकासाची अत्यंत गरज असल्याने साहेबांनी सगळे लक्ष विदर्भ क्रिकेट असोसीएशन वर केंद्रित केले आहे.

शेवटची बंपर बातमी...

६) . प्रादेशीक पक्षांच्या दादागिरीला कंटाळून शेवटी भा.ज.प व काँग्रेसने युती केली अहे. पंतप्रधान पदाचा वाद नको म्हणुन त्या खुर्चिवर महात्मा गांधीच्या नुकत्याच परत आलेल्या वस्तु ठेवल्या आहेत. यातून रामायण व धर्मनिरपेक्षता दोन्ही साधले गेल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. दोन्ही पक्षाचा एक-एक उप-पंतप्रधान नियुक्त झाला आहे व इतर मंत्रीपदेही समान वाटली आहेत. या युतीचे शिल्पकार नरेंद्र मोदी व राहुल गांधी यांचे सर्वत्र कौतुक होत आहे..

;) :) :> बुरा ना मानो ; होलि है !!

विनोदराजकारणविरंगुळा

प्रतिक्रिया

मराठी_माणूस's picture

19 Mar 2009 - 3:54 pm | मराठी_माणूस

सगळे रंग मस्त आहेत

परिकथेतील राजकुमार's picture

19 Mar 2009 - 4:01 pm | परिकथेतील राजकुमार

संप्रदायाचा प्रभाव , परंपरा व ईतिहास पाहुन डाउचे संचालक मंडळ अत्यंत प्रभावित झाले असून त्यांनी आपल्या कंपनिचे नाव बदलुन ’ देहू केमिकल्स’ असे करायचे ठरवले आहे.
ज ह ब र्‍या रे भावा !
लेख वाचुन ह ह पु वा. येउदे अजुन असेच रंग. सर्व रंगांची उधळण आवडली.

रंगीला
©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी
एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

घाशीराम कोतवाल १.२'s picture

20 Mar 2009 - 10:14 am | घाशीराम कोतवाल १.२

देहू केमिकल्स’
=)) =)) =))

ह.भ.प. परिकथेतील राजकुमार C.E.O.
देहू केमिकल्स’

**************************************************************
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??

विकास's picture

19 Mar 2009 - 4:41 pm | विकास

एकंदरीत गंमतशीर कल्पना आवडली पण होळी विशेष आता का? (का टिळक पंचांग वगैरे पणे होळी आता आहे? ;) )

हा लेख १ एप्रिलला जास्त शोभू शकेल :)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

19 Mar 2009 - 4:44 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

कल्पना आवडली. आणि विकासचा प्रतिसादही.

अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.

अनिल हटेला's picture

19 Mar 2009 - 5:15 pm | अनिल हटेला

एकदम सहमत !!

:-)

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

अनामिका's picture

19 Mar 2009 - 4:59 pm | अनामिका

जबर्‍या कल्पनाविलास.............. ;;)
"अनामिका"

राजा's picture

19 Mar 2009 - 5:11 pm | राजा

लै भारि !

सुनील's picture

19 Mar 2009 - 5:35 pm | सुनील

लेख मस्तच! पण आठवडाभर उशीरा का? शिमगा सरला परंतु कवित्व उरले हा वाक्प्रचार असाच आला काय?

जाताजाता - विषेश नव्हे, विशेष. तेव्हा शीर्षकात योग्य तो बदल करावा.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

बामनाचं पोर's picture

20 Mar 2009 - 3:52 am | बामनाचं पोर

होळीच्या दिवशी छापखान्याला सुट्टी होती . होळी एकदम जोरदार झाली , भांगेचे किती "बंटे" घशाखाली गेले काही कळलच नाही. डायरेक्ट " बम भोले " बरोबरच होळी खेळलो आम्ही. ;)

दुसरया दिवशी छापखान्यात draft चे खिळे जुळता जुळेनात. :S #:S .. ८ दिवस लागले भांग पुर्ण उतरायला.. म्हणुन उशीर झाला वृत्तांत प्रकाशीत करायला..(तरी "विशेष" चे "विषेश" झालचं )

पुढील वर्षी बंटा मारायच्या आगोदर खिळे जुळवेले जातील... :)

-- प्रतिसादा बद्द्ल सर्वांचे आभार...

बामनाचं पोर's picture

20 Mar 2009 - 4:14 am | बामनाचं पोर

कोणाचीही टिंगल करायचा अजिबात हेतु नाही . वारकरी संप्रदाया बद्द्ल मला अत्यंत आदर असुन मी स्व:त अनेक वेळा वारीला जाउन रिंगण धरले आहे. पुण्याहून चालत आळंदीला गेलो आहे..

विंडबन किंवा शालजोडीतले मारणे हे साहित्याचा एक भाग आहे ( मटा चे जाता-जाता , लोकसत्ता- एक फुल दोन हाफ इ ) .. त्याला व्यक्तीगत टिका समजु नये ही विंनती. ...

अमोल केळकर's picture

20 Mar 2009 - 9:32 am | अमोल केळकर

मस्त जमले आहे
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

अर्चिस's picture

20 Mar 2009 - 11:28 am | अर्चिस

लेख आवड्ला

अर्चिस