खोया खोया चांद.... (अर्थात गिफ्टची देवाणघेवाण) माझ्या एका दीर्घांकातला भाग

भडकमकर मास्तर's picture
भडकमकर मास्तर in जनातलं, मनातलं
15 Mar 2009 - 11:11 pm

( मनीष आणि माधवी मैदानावरती गप्पा मारत बसले आहेत)

माधवी : ( एकदम उठत) चल निघूया..
मनीष : पण कुठे?
माधवी : मला कॉफ़ी प्यायचीय..
मनीष : मग मागवूयात की इथेच...
माधवी : नको..
मनीष : खरंच.. अगं या अण्णाची कॉफ़ी कसली उच्च असते , तुला माहित नाही...
माधवी : काय रे तू? कॉफ़ी म्हणजे अगदी कॉफ़ी नकोय मला..
मनीष : अरे आत्ता पाहिजे म्हणतेस , मग नाही म्हणतेस..
माधवी : मला ना खरंतर शॉपिंगला जायचंय..
मनीष : कशाला?
माधवी : आज काय आहे सांग?
मनीष : म्हणजे?
माधवी : आज काय घडलं होतं?
मनीष : २७ जून... ( विचार करत पुटपुटतो)..
माधवी : काय आठवतोय्स?
मनीष : तुझा वाढदिवस नाहीये ना ते आठवून पाहिलं.. गेल्या वर्षी विसरलो होतो तर केवढा दंगा केलास ...
माधवी : मग काय करणार? तू म्हणजे ना काहीही लक्षात ठेवतोस, या दिवशी अमकं घडलं आणि ढमकं घडलं..पण माझा वाढदिवस तुला...
मनीष : यापुढे वाढदिवस नाही विसरणार... दुसरं काहीतरी विसरेन..
माधवी : ते दिसतंच आहे... आज काय झालं होतं सांग...
मनीष : आज... ( विचार करत ) आज अनुष्का पहिल्यांदा दिसली होती..
माधवी : कोण?
मनीष : होती एक..माझी चाइल्डहूड क्रश म्हण हवं तर...
माधवी : असं? .. कितवीतली रे?
मनीष : सेकंड इयर असेल...
माधवी : याला तू चाईल्डहूड क्रश म्हणतोस?
मनीष : हो, मी लहानच होतो तेव्हा..
माधवी : कशी होती रे ती?
मनीष : जाउदे ना... कशाला आता तो विषय?
माधवी : सांग ना..
मनीष : सद्गुणी, विचारी आणि सुंदर होती.
माधवी : आधी कधी बोलला नाहीस ते?
मनीष : तू तरी कुठे विचारलंस?
माधवी : आता कुठे असते ती?
मनीष : जाउदे ना...
माधवी : ( ती आता वैतागलीय)... एकदा सांगूनच टाक सगळं..
मनीष : काही नाही लग्न झालंय तिचं... तिचा नवरा अदिस अबाबाला असतो .. कधी ताहिती, झैरे, मोझांबिक .. फ़िरतीची नोकरी आहे...बोटीवरची. आणि ती इकडेच असते एकटी...
माधवी : ( खूप अपसेट होत) आठवण येत असेल ना खूप तिची?
मनीष : खरं सांगू?... खूप...
माधवी : ( तिला आता हे सहन होत नाहीये... डोळ्यांत पाणी...ती उठून जायला लागते...तो तिचा हात धरतो...).
मनीष : बरोबर एका वर्षापूर्वी एका मूर्ख मुलीनं मला प्रपोज केलं... २७ जूनला... विसरणं कसं शक्य आहे? पहिल्यांदा मला खोटंच वाटलं..आपली लायकी आहे का ही असंही वाटलं...मलाच काय कॊलेजातही पुष्कळ लोकांना खोटंच वाटलं.. एखाद्याची इतकी थट्टा बरी नव्हे असंही कोणी म्हणाले. पण तिला खरंच तसं वाटत होतं.. मनापासून... मलाच समजायला उशीर झाला.... मला गिफ़्ट वगैरे काय घ्यावं ते कळत नाही.. पण आज मात्र आठवणीने तुझ्यासाठी हे आणलंय... ( गुलाबाचं फ़ूल काढतो)...
माधवी : ( हात सोडवून घ्यायचा प्रयत्न करत ) दे जा तुझ्या अनुष्काला..
मनीष : दिलंही असतं पण प्रॊब्लेम असाय की ती अस्तित्त्वात नाहीये...
माधवी : खरं??
मनीष : मग? तुला काय काहीही खरं वाटतं का गं?( हसत ) बोटीवर फ़िरतीची नोकरी.... अदिस अबाबा...
माधवी : नेहमी असंच करतोस...
मनीष : तरी तू गंडतेस नेहमी... हे घे...
माधवी : थॆंक्स ... चल आता
मनीष : कुठल्या मॊलमध्ये?
माधवी : तू चल तर खरं..
मनीष : मग तू मला एक सरप्राईज गिफ़्ट घेशील आणि मी खरंच आश्चर्यचकित झाल्याची ऎक्टिंग करेन..
माधवी : ऎक्टिंग काय रे? चल ना.. काय घेउयात तुझ्यासाठी?
मनीष : नको ..तू मला अमुकअमुक किंमतीचं गिफ़्ट घेणार आणि मग मला त्याच किंमतीचं गिफ़्ट तुला परत द्यावं लागणार.
जरी मला कल्पना असणार की आपल्या प्रेमाची इमारत या गिफ़्टच्या अदलाबदलीच्या तकलादू पायावरती उभी नाहीये..पण हे तुझ्यासारखीला मान्य नसणार... म्हणून मग मी माझ्या गर्ल्फ़्रेंडसाठी एक खास गिफ़्ट घेऊन येणार..( खिशातून एक गिफ़्ट रॆपिंगवाली लाल डबी काढतो आणि तिला देतो...)कानातले आहेत..(ती खुश)
माधवी : खरंच तू...?
मनीष : करेक्ट... तुझ्यासारखीचा तर विश्वासच बसणार नाही...कोणी विचारेल, " कितीचे आहेत ?" मग मी म्हणेन, " हे तर अमूल्य आहेत कारण मी हे खास तुझ्यासाठी आणले आहेत.
माधवी : ( ती उघडून पाहते) डायमंड्स?
मनीष : ( हसत) समजा मी तुला हे सांगितलं की हे २५ रुपयांना जोडी असं लोकलमध्ये मिळालेलं आहे.
माधवी : ( संशयाने) खरंच?
मनीष : अगं मी समजा म्हणालो.. पण बघ ना... तुला संशय आला.. एखादीला रागच येईल.. कोणी तर हे गिफ़्ट तोंडावर फ़ेकून मारेल... आहे की नाही?म्हणजे बघ हं... गिफ़्ट तेच पण परसेप्शन बदललं की रीऎक्शन बदलली.
माधवी : पण म्हणून काय झालं? तू मला असलं पपलू गिफ़्ट देणार?
मनीष : पपलू? अगं पपलू म्हणू नये..सूज्ञ माणसं म्हणतात, गिफ़्ट देण्यामागची भावना महत्त्वाची, तो काही व्यवहार नव्हे.
माधवी : मी नाहीये सूज्ञ वगैरे
मनीष : पण मी आहे ना...म्हणून तर गिफ़्ट घ्यायला मी नको म्हणतोय... गिफ़्टच्या या खतरनाक अर्थकारणाचा पुढचा बळी नाही व्हायचंय मला..
माधवी : काही बळी जात नाहीये रे तुझा...चल रे...
मनीष : (!)
माधवी : प्लीज चल...
मनीष : (तिच्या हातात हात देत ) चल....

( पार्श्वभागी गाणं ऐकू येतं...)( गीतकार : स्वानंद किरकिरे)
आज शब जो चांद ने है रुठने की ठान ली
गर्दिशोमें है सितारे बात हमने मान ली
अंधेरी स्याह जिंदगी को सुझती थी नहि गली
के आज हाथ थाम लो की के हाथ की कमी खली

blackout
क्युं खोएं खोएं चांद की फिराक मे तलाश मे उदास है दिल्
क्युं अपने आप से खफा खफा ज़रा ज़रा सा नाराज़ है दिल
ये मंज़िले भी खुद हि तय करें, ये फासलें भी खुद हि तय करें
क्युं तो रास्तों पे फिर सहेम् सहेम् संभल संभल के चलता है ये दिल
क्युं खोएं खोएं चांद की फिराक मे तलाश मे उदास है दिल

कलानाट्यप्रकटन

प्रतिक्रिया

श्रावण मोडक's picture

15 Mar 2009 - 11:52 pm | श्रावण मोडक

एकाच दिवशी एकदम पोतडी उघडू नका. आणि अशा पोस्ट रात्रीच्या वेळी तर अजिबात टाकू नका. उगाच आजूबाजूला जाग येते. :)
पुन्हा वाचून हसलो. मघाशी न सुचलेले - ताहिती वगैरेची फिरती... बोट... माधवीचं अपसेट होणं... कहर आहे हा.
ती अस्तित्त्वात नाही म्हटल्यावरचं खर्रं... अगदी अगदी.
आणि तू गंडतेस.. हे घे यानंतरचं थँक्स!!!!!!!!!! =))

बिपिन कार्यकर्ते's picture

16 Mar 2009 - 12:57 am | बिपिन कार्यकर्ते

मास्तर!!! हुच्च. म्हणजे तुम्ही हुच्च नाही हो... हे लेखन हुच्च आहे. =)) ए१.

पण तुम्ही असं 'रामदासी' पंथात जाऊ नका ब्वॉ!!! ;) त्या पंथातले लोक दहा मस्त गोष्टी अर्धवट अर्धवट सांगून दसपटीने छळ करतात. आधी ते "मी-ती" पूर्ण करा!!!!

बिपिन कार्यकर्ते

नंदन's picture

16 Mar 2009 - 1:20 am | नंदन

वरील दोन्ही प्रतिक्रियांशी सहमत, एकदम हुच्च लेखन!

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

कालिन्दि मुधोळ्कर's picture

16 Mar 2009 - 2:21 am | कालिन्दि मुधोळ्कर

बापरे!

आपण करण जोहर वगेरे काकूबाई लो़कांचे अनुयायी दिसता. गोड-गोड लाडीक- लाडीक. मुली म्हणजे भावूकतेने वाढदिवस लक्षात ठेवणार्र्या; गिफ्ट माग्णारया, मुलगे म्हणजे विनोदी, खोड्साळ इ. इ.

वास्तवतेचं भान असुद्या.

पुलेशु.

भडकमकर मास्तर's picture

16 Mar 2009 - 9:06 am | भडकमकर मास्तर

मुली म्हणजे भावूकतेने वाढदिवस लक्षात ठेवणार्र्या; गिफ्ट माग्णारया, मुलगे म्हणजे विनोदी, खोड्साळ इ. इ.

हे चुकलंच आमचं...
आम्ही जुने झालो ना आता... सध्याचं माहिती नाही... आमच्या काळी असं होतं बुवा...
कालिन्दीताईंच्या भावना दुखावल्याबद्दल माफी मागतो... एक उपाय आहे,
हाच संवाद उलटा वाचा... म्हणजे मनीषचे संवाद माधवी म्हणतेय आणि माधवीचे मनीष म्हणतोय असे ... तुमचा प्रश्न सुटेल... :)
आणि मुली विनोदी खोडसाळ होतील आणि मुलगे गिफ्ट गिफ्ट करणारे होतील...

करण जोहर वगेरे काकूबाई लो़कांचे अनुयायी

हा शब्द फार आवडला... =)) =))

:W आता काहीतरी दाहक जळजळीत वास्तव शोधायला हवे.... :?
उदा. घरेलू हिंसा, हुंडाबळी,विवाहबाह्य संबंध,घटस्फोट, एड्सोत्तर विवाह,जातीबाह्य विवाहातील ताणतणाव,वैवाहिक बलात्कार, समलिंगी संबंधांचे उदात्तीकरण / समाजमान्यता, नक्षलवादामध्ये स्त्रियांचा वाढता सहभाग, रेव्ह पार्टी-पबसंस्कृती आणि स्त्रीस्वातंत्र्य, मनुवादाच्या उदात्तीकरणाचा पुरुषी कावा,४९८-अ कलमाचा वापर / गैरवापर, राजकारणातली गुन्हेगारी, बेकारी, नर्मदा बचाओ आंदोलन, स्त्रियांमधील मधुमेह, बिबट्याची मादी शहरात येणे, दहशतवादी स्त्रियांना मानवी बाँब बनवणे - एक अन्याय ,आदिवासी स्त्रियांमधील विविध आजार आणि वनौषधी,ग्रामस्वच्छता अभियानात स्त्रियांची मदत, एक गाव एक पाणवठा, दारूबंदी आणि स्त्री, भटक्या स्त्रियांच्या हाल-अपेष्टा... :? :? :? :? :? :? :? :? :? :? :? :?

असे काही विषय डोक्यात आहेत ...

कालिन्दीताई,आपल्या शुभेच्छा पाठीशी आहेतच,
त्यामुळे मी जरूर यशस्वी होईन अअसा विश्वास वाटतो...
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

16 Mar 2009 - 10:01 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

वरच्या सर्वांशी (श्रावण, बिपीन, नंदन, कालिंदीताई आणि मास्तर) सहमत. मास्तर, तुम्ही यशस्वी व्हालच, यात सौंषयच नाही.

पण आणखी एक दाहक आणि जळजळीत विषय राहिलाच, कंपूबाजी! ;-)

अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.

छोटा डॉन's picture

16 Mar 2009 - 10:07 am | छोटा डॉन

>>पण आणखी एक दाहक आणि जळजळीत विषय राहिलाच, कंपूबाजी!
अगदी अगदी, असेच म्हणतो ...
सध्यातरी मला ह्याला सहमत असण्याशिवाय पर्याय नाही ...

मास्तरांच्या पुढील "वास्तविकतेच्या जवळ जाणार्‍या जळजळीत" लेखनाला शुभेच्छा ...!!!

------
छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)

आंबोळी's picture

16 Mar 2009 - 6:24 pm | आंबोळी

करण जोहर वगेरे काकूबाई लो़कांचे अनुयायी
मास्तर, करण जोहर, काकुबाई.... =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))

आता काहीतरी दाहक जळजळीत वास्तव शोधायला हवे....
उदा. घरेलू हिंसा, हुंडाबळी,विवाहबाह्य संबंध,घटस्फोट, एड्सोत्तर विवाह,जातीबाह्य विवाहातील ताणतणाव,वैवाहिक बलात्कार, समलिंगी संबंधांचे उदात्तीकरण / समाजमान्यता, नक्षलवादामध्ये स्त्रियांचा वाढता सहभाग, रेव्ह पार्टी-पबसंस्कृती आणि स्त्रीस्वातंत्र्य, मनुवादाच्या उदात्तीकरणाचा पुरुषी कावा,४९८-अ कलमाचा वापर / गैरवापर, राजकारणातली गुन्हेगारी, बेकारी, नर्मदा बचाओ आंदोलन, स्त्रियांमधील मधुमेह, बिबट्याची मादी शहरात येणे, दहशतवादी स्त्रियांना मानवी बाँब बनवणे - एक अन्याय ,आदिवासी स्त्रियांमधील विविध आजार आणि वनौषधी,ग्रामस्वच्छता अभियानात स्त्रियांची मदत, एक गाव एक पाणवठा, दारूबंदी आणि स्त्री, भटक्या स्त्रियांच्या हाल-अपेष्टा...

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))

प्रो. आंबोळी

विनायक प्रभू's picture

16 Mar 2009 - 10:13 am | विनायक प्रभू

लै भारी

सहज's picture

16 Mar 2009 - 3:36 pm | सहज

खोया खोया चांद.... (अर्थात गिफ्टची देवाणघेवाण)

मास्तर तुम्ही भेटवस्तु देवाणघेवाणीवर दीर्घांक लिहीत आहात? :-)

एवढाच ट्रेलर आहे का मास्तर का अजुन येणार आहे? कधी होईल प्रयोग?

शुभेच्छा!!

धनंजय's picture

16 Mar 2009 - 11:46 pm | धनंजय

पात्रनिर्मिती छान झाली आहे.

(म्हणजे मला पात्रे विशेष आवडली नाहीत, तरी अशा पात्रांमधील पुढील संघर्ष पाहाण्यास मी उत्सूक आहे. म्हणून पात्रनिर्मिती यशस्वीच म्हणावी.)

पण दीर्घांकाच्या शेवटीची अंधार पडतानाची हिंदी कडवी (चांद हरवल्या-हरवल्याचे मिठ्ठे दु:ख) पटण्याइतपत कथानक-निर्मिती झाल्यासारखे वाटत नाही.

सँडी's picture

16 Mar 2009 - 4:42 pm | सँडी

एकदम मस्त! आठ्वणींना उजाळा मिळाला!

स्वगत : मला वाटलं चांद आणि फिजा ची लवस्टोरी लिवली की काय? ;)

परिकथेतील राजकुमार's picture

16 Mar 2009 - 6:58 pm | परिकथेतील राजकुमार

यकदम रापचीक मास्तर ! तुमचे अवैचारीक लिखाण आवडले बॉ आपल्याला.
आणी हो असेच येउद्यात रापचीक २/४ लेख अजुन

©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी
एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

टिउ's picture

16 Mar 2009 - 8:28 pm | टिउ

स्त्रियांमधील मधुमेह, बिबट्याची मादी शहरात येणे(...)

=)) =)) =))

लिहा लिहा...आम्ही वाचु!

अवांतरः नाशकात बिबट्या एका इमारतीच्या तिसर्या मजल्यावर चढुन गेला. सकाळी त्या फ्लॅटमधल्या मुलाने शाळेत जायला म्हणुन दरवाजा उघडला.
मुलगा: मम्मी वाघ!
बाबा: माहिती आहे. चल पळ आता शाळेत...

सँडी's picture

17 Mar 2009 - 7:27 am | सँडी

नाशकात बिबट्या एका इमारतीच्या तिसर्या मजल्यावर चढुन गेला. सकाळी त्या फ्लॅटमधल्या मुलाने शाळेत जायला म्हणुन दरवाजा उघडला.
मुलगा: मम्मी वाघ!
बाबा: माहिती आहे. चल पळ आता शाळेत...

8}

प्रमेय's picture

18 Mar 2009 - 6:23 am | प्रमेय

नाशकात बिबट्या एका इमारतीच्या तिसर्या मजल्यावर चढुन गेला. सकाळी त्या फ्लॅटमधल्या मुलाने शाळेत जायला म्हणुन दरवाजा उघडला.
मुलगा: मम्मी वाघ!
आई: अहो, जरा बघता का? ते शेजारचे वाघ आले वाटतं परत... त्यांना सांगा आमचीपण साखर संपलीय...
बाबा: (दाराशी जात जात) काही कळत नाही बघं तुला; किती जोरात बोलतेसं..(असे म्हणत दार पूर्ण उघडतात आणि) निशब्दः