गंभीर विनोदी चर्चा : ३ -टिव्हीचा अनर्थ

निमिष सोनार's picture
निमिष सोनार in जनातलं, मनातलं
15 Mar 2009 - 7:15 pm

गंभीर विनोदी चर्चा : ३ -टिव्हीचा अनर्थ
प्रेषक क्षणाचा सोबती (रवि., १५/०३/२००९ - १९:०६)
विरंगुळा विनोद
टिव्हीचा अनर्थ

विनोद आणि चर्चा घरी परतले. विनोद सोफ्यावर बसला. चर्चा किचनमध्ये जावून कॉफी बनवू लागली.

विनोदने टी. व्ही. सुरू केला. प्रथम एक न्यूज चॅनेल लागले- "मीच खरा बातमीदार- परसो तक- टुमारो टाईम्स" नावाचे. हे चॅनेल हींग्लीश्मराटी होते.

ब्रेक झालेला होता. ब्रेकींग न्यूज देवून देवून बातमीवाचकांचा घसा दुखल्यामुळे थोडा ब्रेक त्यांनी घेतला होता. ब्रेक मध्ये जाहीराती लागल्या होत्या. मात्र खाली बातम्या सरकत होत्या.

एक बातमी सारखी परत परत येत होती- विरोधकांचा चहापानावर बहिष्कार आणि सोबत जाहिरात होती- "काका टी - चाय पियो और जागो, सब लोग जागो. "

आणखी एक मातमी आली- विरोधकांना सत्ताधाऱ्यांनी कोंडीत पकडले. आणि वर दुसरी एक जाहीरात सुरू झाली- "केसांचा कोंडा आणि त्यामुळे होणारी कोंडी? - नो प्रोब्लेम - डोकेबाज खांदे शांपू लावा. "

बातमी - मंदी मुळे लाखो लोक बेकार. जाहीरात- बेकार हुये तो क्या? कार तो ले सकते हो. मॅनो कार. सस्ती कार. कार मे जाओ, इंटरव्ह्यू दो. लकी कार, इंटरव्ह्यू पास.

तेवढ्यात चर्चा कॉफी घेवून आली आणि विनोदला एक कप देत सोफ्यावर बसली.

चर्चा : "अरे, विनोद. आपल्या गंभीरला बरे व्हायला किती वेळ लागेल रे? "

विनोदः "का? काय झाले त्याला एवढे? "

चर्चा : "अरे बघितेले नाहिस का? आता आपल्याला भेटला होता तो? गजिनी मॅनिया झालाय त्याला. अरे, बरा होईल ना रे तो? "

विनोद : "अगं सोड गं. लग्न झाल्यावर, सगळ्यांचीच अशी स्थिती होते. सोड ती चिंता आणि कॉफी पी. "

चर्चा : "चॅनेल बदलव बरं. ब्रेक काय बघतोस? "

विनोदने चॅनेल बदलवले. "मीच माझा" नावाचे चारोळ्यांना वाहीलेले चॅनेल लागले.

हे चॅनेल चारोळ्यांना 'वाहीलेले" असल्याने एकेक कवी चारोळी वाचून झाल्यावर त्याची होडी बनवून चॅनेल-प्रायोजीत तळ्यात त्या होड्या "वाहावत" होते.

त्यात एक कवी एक गहन चारोळी हा प्रकार सादर करत होता,

"मी म्हणजे मी म्हणजे मीच!

माझा मीच अन मी माझा,

तू तुझा अन ती त्याची,

मग त्याचा तो तीचा कसा? "

या गहन चारोळीने सगळे श्रोते संमोहीत होऊन संभ्रमीत झाले आनी समाधिस्थ झाले.

त्या चारोळीचा अर्थ लावता लावता चर्चाला भोवळ आली.

विनोद : "चला थोडी झोप होवू देत हिची. तोपर्यंत निवांत चॅनेल बघतो. "

विनोदने चॅनेल बदलवले. "मी सिनेमा" नावाचे चॅनेल लागले. त्यात एक आडदांड हिरो व्हिलनला बुक्के लाथा मारत होता. मात्र व्हिलन गुदगुल्या झाल्यासारखा हसत होता. तवढ्यात ब्रेक झाला आणि गुदगुल्या नाशक पावडरीची जाहिरात लागली. कंटाळून विनोदने चॅनेल बदलवले. "लकी खडा, भाग्य बडा" नावाचे एक चॅनेल सुरू झाले.

त्यात एक माणूस सोफ्यावर बसून हातोडीने तुरुंगात खडी फोडल्याचे दाखवत होते. हातोडी खाली पटकून तो म्हणाला,

" मी असाच खडी फोडत होतो, तुरुंगात, तेवढ्यात मला खडी फोडता फोडता, एक खडा सापडला, तो मी बोटात घातला आणि काय चमत्कार मी... तेव्हापासून... "

पुढे ऐकण्याचे धैर्य न झाल्याने विनोदने थोडावेळ टि. व्ही. बंद करायचा निर्णय घेतला. तेवढ्यात चर्चा शुद्धीवर आली आणि दारावरची बेल वाजली... विनोद दार उघडायला उठला....

विनोदविरंगुळा