घोरपड

शरदिनी's picture
शरदिनी in जे न देखे रवी...
13 Mar 2009 - 5:46 pm

अज्ञाताच्या अंधारात
प्रतिभेची घोरपड घेऊन
सर करतेस
प्रसिद्धीचा कोंढाणा

गड आला पण घोरपडीचे काय?

काही म्हणतात, घोरपड ही तर दंतकथा
कोणी म्हणतं , ते तर प्रतीक,
चिवट जीवननिष्ठेचे

म्हणून सांभाळ गं
आपापली असलेली आणि नसलेली घोरपड
कारण किल्ले येतील आणि जातील
पण तेवत राहील , फुलत राहील
मनामनात ... एक घोरपड

कविताप्रकटनविचार

प्रतिक्रिया

लिखाळ's picture

13 Mar 2009 - 5:57 pm | लिखाळ

छान.. पण
घोरपड प्रसिद्धीचा किल्ला सर करण्यासाठी वापरली असता ती चिवट जीवननिष्ठेचे प्रतिक कशी असेल?
हे काही पटले नाही. घोरपड ही चिवट प्रसिद्धीलोलूपतेचे प्रतिक ठरेल.

तसेच घोरपड मनामनांत श्वास घेईल, नख्या रुतवून ठाम राहिल हे समजण्यासारखे पण तीचे फुलणे, तेवणे ही निवड सुसंगत वाटली नाही.
प्रामाणिक मत, राग नसावा.
-- लिखाळ.

शरदिनी's picture

13 Mar 2009 - 6:00 pm | शरदिनी

आपल्याला छान वाटली कविता म्हणून धन्यवाद...

निवड सुसंगत वाटली नाही.
तोच प्रयत्न होता..
मला सुसंगतीचाच कंटाळा येतो...
मग जसे विसंगत सुचते तेच फायनल असते...

लिखाळ's picture

13 Mar 2009 - 6:04 pm | लिखाळ

हे उत्तम :)

या कवितेत आधीच्या कवितेतल्या सारखे शब्दवैचित्र्य नाही..
घोरपड असे शीर्षक पाहिल्यावर पटकन पान उघडले म्हटले की बरेच जोडशब्द दिसतील.. :)

या कवितेत दोन शब्दांना जोडणारा दोर शेलारमामाने कापला होता का :)

-- लिखाळ मालूसरे :)

शरदिनी's picture

13 Mar 2009 - 6:06 pm | शरदिनी

या कवितेत दोन शब्दांना जोडणारा दोर शेलारमामाने कापला होता का
=)) =))

धनंजय's picture

13 Mar 2009 - 9:36 pm | धनंजय

कविता आवडली.

पण तेवणार्‍या-फुलणार्‍या घोरपडीच्या विसंगतीने माझ्या आस्वादाचे रसपोषण झाले नाही.

अवलिया's picture

13 Mar 2009 - 6:02 pm | अवलिया

छान !

आम्ही पण जरा धरपकड केली आहे :)

--अवलिया

सुवर्णमयी's picture

18 May 2009 - 2:11 am | सुवर्णमयी

वा! कविता अतिशय आवडली.
घोरपड म्हटले की तिने घट्ट पकडणे इत्यादी हे फार परंपरागत विचार आहेत.. ते चुकीचे नाहीत. नेहमी तशीच अपेक्षा करण्याचे कारण नसावे.
पण त्याच्याकडे एका नव्या दृष्टीने नक्की बघता यावे.