<--->

दशानन's picture
दशानन in जे न देखे रवी...
12 Mar 2009 - 4:00 pm

येतो एक आवाज गुत्यातून
चीरुन दारुड्यांचा पडदा..
अन रम, आपली व्हिसकी
दंग पिण्यात बेवडा...!!

अन इथे...
पुन्हा पिण्याची उबाळ येथे
पडले हो बेवारस...
बेवडा एक परि, करुनी तंगडी वरी
हसले सगळे त्यावरी, खी खी खी... !

बियर मध्ये स्नानं करिश्ये..
बेंजोचा आवाज जबर
बेवड्यांच्या मुखा वरती
दारु, व्हिसकी ची संतत धार..

इथे..
घोंगावती तोंडावरती
असंख्य माशा किती
खिदळतं उभी माणसे.
दुरुनच जरा बघती...

बारबालेची मिठी गळा
जर गेला माझा हात कमरे वर
मला ती जागा आवडे निरंतर
ती वाजवे थप्पड मला तर

हेची ध्यान..
गुत्यात चाले
डान्स बार..

आली आली पोलीसाची,
गाडी आली कुठुन
करुनी बंद गुत्ता, बेवड्यांचा
नेले तंगडी पकडून... !!

मदिरेचे शिरोमणी
गाती अम्रुत वाणी..
नवीन पोपट हा:
लागला विटु विटु बोलाया:...

रात्र संपली त्याची माझी
अन गुत्येवाला ही झोपला
ॐ शांती : शाती: शांती:

********

चन्द्रशेखर गोखले ह्यांची क्षमा मागून त्यांच्या ह्या कवितेचे विडंबन !
* नाव नाय सुचलं .. सुचवा.

विडंबनमौजमजाविरंगुळा

प्रतिक्रिया

अवलिया's picture

12 Mar 2009 - 4:03 pm | अवलिया

अरे काय चाललेय काय?

=))

--अवलिया

दशानन's picture

12 Mar 2009 - 4:05 pm | दशानन

:D सध्या कविता करणे शिकतो आहे ;)

अवलिया's picture

12 Mar 2009 - 4:11 pm | अवलिया

कुठल्या मायाजालात तर नाही ना फसलेला ?
मालक! काळजी घ्या!
रात्रच काय हल्ली दिवसादेखील वैरी फिरत असतात.

--अवलिया

निखिल देशपांडे's picture

12 Mar 2009 - 5:17 pm | निखिल देशपांडे

असेच म्हणतो....
मालक! काळजी घ्या!

लिखाळ's picture

12 Mar 2009 - 4:10 pm | लिखाळ

आंतरिक समानता असलेल्या पण भिन्न ठिकाणी घडलेल्या दोन घटनांचा मेळ चांगला जमलाय.

दारुड्यांचा पडदा हा शब्दवापर वेगळीच खुमारी आणतो. तंगडी वर करणारा बेवडा, भलतीकडेच जाणारा हात अशी प्रतिके वातावरण निर्मिती करण्यात यशस्वी होतात तर गालावरची थप्पड आपल्या कवितेला नादमय बनवते.

केलेल्या कृत्यांचे संदर्भ अर्थिक विषमता कसे बदलते यावर भाष्य करण्यात आपली कविता यशस्वी झाली आहे. :)
-- लिखाळ.

अवलिया's picture

12 Mar 2009 - 4:10 pm | अवलिया

=))

--अवलिया

दशानन's picture

12 Mar 2009 - 4:12 pm | दशानन

धन्यवाद, लिखाळ साहेब.
तुम्ही कवितेचा भावार्थ योग्य रितीने समजून घेतला व त्यावर तुम्ही एकदम मार्मिक टिपणी केली ह्या बद्दल बेवडा समाज आपला आभारी आहे, जरा आपले 'वजन' वापरुन पोलिस वाल्यांना जरा दम देता का :? नाय लै रात्री त्रास देत्यात ओ.. ती लोक !

लिखाळ's picture

12 Mar 2009 - 4:16 pm | लिखाळ

माझे वजन कमी आहे हो ! कुठेच विशेष छाप पडत नसल्याने मराठी जालावर समिक्षणे करतो आहे ;)
-- लिखाळ.

दशानन's picture

12 Mar 2009 - 4:17 pm | दशानन

अच्छा !!

बरं बरं !

मग या रातच्याला गुत्यात तुम्ही पण ;)

वाहीदा's picture

13 Mar 2009 - 12:45 pm | वाहीदा

दारुड्यांचा पडदा हा शब्दवापर वेगळीच खुमारी आणतो. तंगडी वर करणारा बेवडा, भलतीकडेच जाणारा हात अशी प्रतिके वातावरण निर्मिती करण्यात यशस्वी होतात तर गालावरची थप्पड आपल्या कवितेला नादमय बनवते
=))
गालावरची थप्पडेचा नाद , लिखाळ साहेबांच्या काना पर्यंत पोहचला !!
यह क्या हो रहा है ?? :-)

शिप्रा's picture

12 Mar 2009 - 4:25 pm | शिप्रा

राजे मस्त लिहिले आहे..फक्त
>>बेवडा एक परि, करुनी तंगडी वर
हे मी चुकुन
बेवडा परि, करुनी एक तंगडि वर असे वाचले..=))

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

12 Mar 2009 - 4:36 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

हाहाहा ... राजेंची कविता भारीच, पण लिखाळची समीक्षा अगदी हुच्च आहे. =))

अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.

बिपिन कार्यकर्ते's picture

12 Mar 2009 - 4:40 pm | बिपिन कार्यकर्ते

सहमत!!!

बिपिन कार्यकर्ते

शेखर's picture

12 Mar 2009 - 4:59 pm | शेखर

सहमत

दशानन's picture

13 Mar 2009 - 9:16 am | दशानन

>>लिखाळची समीक्षा अगदी हुच्च आहे.

हु(उ)च्च लोकंच कसे करु / लिहू शकतात.

ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D

जयवी's picture

12 Mar 2009 - 5:11 pm | जयवी

भारी हो राजेसाहेब :)

निखिल देशपांडे's picture

12 Mar 2009 - 5:16 pm | निखिल देशपांडे

मदिरेचे शिरोमणी
गाती अम्रुत वाणी..
नवीन पोपट हा:
लागला विटु विटु बोलाया:...

राजे काय चाललय काय??? विडंबना मागुन विडंबने...... बाकि मस्तच जमले आहे तर...

सहज's picture

13 Mar 2009 - 10:28 am | सहज

तुम्हाला खरच एलीयन युएफओवाला भेटला होता तर. :-) कविता/विडंबन, बौद्धीक, पर्यटन काही काही सोडणार नाही तुम्ही.

बाकी लिखाळरावांचा चंद्र-शुक्र युतीमुळे समिक्षा ग्रह हुच्चीचा झाला आहे. :-)