१. प्राक्तनात प्राण लाचार
जगण्याचे आंदण मिळते
फांदीच्या ओलाव्याला
नवजात बांडगूळ गिळते . .
२. फळभरल्या झाडावरुनी
पाखरे निघाली जाया
घरट्याचे छत्र गनिम
नजरेत विषारी माया . .
३. देवडी विसावून पायी
परमार्थ असे बसलेला
पानांचे प्राण खुडून
अर्पितो दान देवाला . .
४. सावलीत शांत झाडाच्या
मरणाची केवळ भ्रांत
खंगलेला, खिन्न मनाचा
झोपला देह विश्रांत . .
५. रसशुष्क वाळली फांदी
वाळीत टाकली कोणी ?
डोळ्यात वाळव्यांच्या
मगरीचे भावुक पाणी . . . .
प्रतिक्रिया
12 Mar 2009 - 11:42 am | sanjubaba
देवडी विसावून पायी
परमार्थ असे बसलेला
पानांचे प्राण खुडून
अर्पितो दान देवाला . .
काळेसाहेब, फारच छान कविता
संजूबाबा
12 Mar 2009 - 12:36 pm | जागु
प्राक्तनात प्राण लाचार
जगण्याचे आंदण मिळते
फांदीच्या ओलाव्याला
नवजात बांडगूळ गिळते .
छान आहे.
12 Mar 2009 - 1:17 pm | मदनबाण
प्राक्तनात प्राण लाचार
जगण्याचे आंदण मिळते
फांदीच्या ओलाव्याला
नवजात बांडगूळ गिळते . .
लयं भारी...
मदनबाण.....
"If debugging is the process of removing software bugs, then programming must be the process of putting them in." --- Unknown.
12 Mar 2009 - 4:59 pm | लिखाळ
फार छान..फार छान.. बांडगुळ तर फार मस्त !
दुसर्या कडव्याचा अर्थ समजला नाही.
पुढील लेखनास शुभेच्छा.
-- लिखाळ.
12 Mar 2009 - 5:53 pm | दत्ता काळे
दुसर्या कडव्यात
" घरट्याच्या वरती एक साप अंडी खाण्याच्या मिषाने येतो, म्हणून पाखरे घरटी सोडून निघून जातात" - हे लक्षात घेऊन परत वाचा.
12 Mar 2009 - 8:28 pm | लिखाळ
आता समजले :)
-- लिखाळ.
12 Mar 2009 - 7:14 pm | रामदास
कडवं मला समजलं नव्हतं .आता समजलं.
कविता आवडल्या.
बालकराम मोठे झालेले दिसतायंत.
12 Mar 2009 - 8:28 pm | प्रमोद देव
आहेत चारोळ्या.
आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)
12 Mar 2009 - 8:47 pm | प्राजु
५. रसशुष्क वाळली फांदी
वाळीत टाकली कोणी ?
डोळ्यात वाळव्यांच्या
मगरीचे भावुक पाणी . . . .
क्लास!!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
12 Mar 2009 - 10:26 pm | क्रान्ति
छान आहेत झाडांच्या कविता. वेगळ्या आणि अर्थपूर्ण!
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
13 Mar 2009 - 7:18 am | धनंजय
पुष्कळ अर्थ घट्ट विणलेली कडवी.
(दुसर्या चारोळीतला साप मात्र फारच क्रिप्टिक झाला आहे.)
13 Mar 2009 - 11:24 am | विसोबा खेचर
जबरा कविता..!