तो आणी ती

मराठमोळा's picture
मराठमोळा in जनातलं, मनातलं
10 Mar 2009 - 7:25 pm

ही कथा माझ्या एका जवळच्या मित्राची..आणी त्याच्या प्रेयसीची. कथेत "तो" आणी "ती"

लहानपणापासूनच तो एकदम चंचल वृत्तीचा. नविन गोष्टी करुन पाहण्यात त्याला फार मजा वाटायची. अभ्यासातही फार हुशार आणी चाणाक्ष. सर्वांचा लाडका. एकदा त्याने तिला कुठेतरी पाहिली आणी तिच्याबद्दल कुतुहल निर्माण झाले आणी तिला भेटायची ओढ लागली. आता तिला भेट्णार कसे आणी भेट घलुन कोण देणार हा विचार त्याच्या मनात घोळु लागला. हळुहळु दिवस सरत होते आणी तिला भेटायची ईच्छा सुद्धा तीव्र होत होती.

एक दिवस त्याच्या एका मित्राच्या वाढदिवस पार्टीमधे ती त्याला दिसली आणी त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. मित्राकरवी त्याने तिची ओळख करुन घेतली. पहिल्या भेटीत तिचा स्वभाव काहीसा त्याला आवडला नाही पण पुनःभेटीची ओढ त्याच्या मनात निर्माण झाली. आता तिला एकट्यात कसे भेटणार आणी कोणी पाहिले तर? या भितीने तिच्या मित्रमैत्रिणींच्या ग्रुप मधे सामील झाला आणी हळुहळु तिचा ठार दिवाना झाला. कळत न कळत तो तिच्यावर प्रेम करायला लागला होता आणी तिला भेटल्याशिवाय त्याला चैन पडत नव्हती हे आम्हा सर्व मित्रांच्या ध्यानात आले. त्याचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होउ लागले होते. आम्ही सर्वानी "तिला विसरुन जा" असा सल्ला त्याला दिला पण त्याच्यावर काहीही फरक पड्णार नव्हता हे ध्यानात आले.

वारंवार होणार्‍या भेटीमुळे तिने स्वतःहुन च त्याला विचारले "तु माझ्या प्रेमात तर पडलास नाही ना? असे काही असेल तर साफ विसरुन जा. हे अशक्य आहे आणी मी तुझी होऊ शकत नाही. उगाचच माझ्यावर प्रेम करीत राहशील आणी स्वत:चे आयुष्य बरबाद करुन घेशील. आपण चांगले मित्र आहोत आणी मी तुला भेटायला, मदत करायला कधीही तयार आहे, पण तु प्रेम वगैरे भानगड विसरुन जा" यावर तो म्हणाला "मी तुझ्यावर प्रेम केले आणी तुला विसरणे मला आता शक्य नाही. सगळीकडे मला आता फक्त तुच तु दिसते आणी तुझ्यावाचुन मला जगणे अशक्य आहे आणी मला तुझी साथ हवी आहे. जेव्हा जेव्हा मला तुझी गरज असेल तेव्हा तेव्हा तु मला भेटायला येशील एवढेच फक्त वचन दे. आणखी मला काहीही नको." तिने त्याने मागितल्याप्रमाणे वचन दिले.

दिवस सरत होते, हळुहळु तो तिला विसरुन जाईल असे आम्हा सर्वाना वाटत होते पण तसे काही झाले नाही. आम्ही बर्‍याच वेळा त्याला समजावण्याचा प्रयत्न केला पण सर्व व्यर्थ. कसबसे त्याने कॉलेज पुर्ण केले आणी एकाठिकाणी नोकरीला लागला. तिला भेटणे अर्थातच त्याने बंद केले नव्हते, कामातही त्याचे लक्ष नसे. त्याच्या घरच्यानी अनेक वेळा त्याला लग्नाबद्दल विचारले पण तो नकार देत राहीला, शेवटी जबरदस्तीने त्याचे लग्न लावण्यात आले. लग्न झाले, सोन्यासारखी बायको मिळाली आणी आता तो तिला नक्की विसरेन असे आम्हाला वाटले. पण किस्सा काही औरच होता. आता तर तो तिला रोजच भेटु लागला होता आणी त्याच्या बायकोलाही या सर्वांची जाणीव झाली होती. त्याच्या घरात भांडणे वाढु लागली होती आणी आम्हा सर्वाच्या मनात निराशा. ह्या सगळ्याचा अंत काय होणार हे सर्वाना माहीतच होते.

आम्ही तिला एकदा भेटुन ह्या प्रकरणाचा तोडगा काढायचे ठरवले. अर्थात तिच्याशी आमचीही ओळख होतीच.
तिला भेटलो आणी विचारले "का अशी त्याच्या आयुष्याशी आणी सुखी संसाराशी खेळत आहेस? काय मिळणार तुला यातुन?"

ती म्हणाली "मी कोणाच्याही आयुष्याशी खेळत नाही. मी कोणाचीही नाही. जो कोणी माझ्याकडे मदत मागेल मी त्याला नकी मदत करते, कोणी सुखाच्या प्रसंगी बोलवते तर कोणी दु:खाच्या. पण जर कोणी माझ्या प्रेमात पडला तर मी त्याला माफ करु शकत नाही. तो माझा गुणस्वभाव आहे. इतिहास कालापासुन असंख्य उदहरणे आहेत कि ज्याने माझ्यावर प्रेम केले त्याला आयुष्यात फक्त बरबादी मिळालेली आहे. सतयुगापासुन कलयुगापर्यत मला मदिरा, सुरा,मद्य, सोमरस, दारु अशी नावे मिळालेली आहेत आणी मी सर्वव्यापी आहे.
कलयुगातली चंगळवादी माणसे फार लवकर माझ्या प्रेमात पडतात आणी बर्‍याच सुखांचा माझ्या चरणी बळी देतात यात माझा काय दोष?
एखाद्या गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक आहे, तिचा कर्करोग होऊ देऊ नये माणसाने
हे लक्षात ठेवले तर आयुष्य नक्की सुखी होईल."

तिच्या या उत्तरावर आम्ही सर्व मुक झालो.

(कथा काल्पनिक आहे याची नोंद घ्यावी)

तात्पर्यः (विनोदी)
संसाराला उध्वस्त करी दारु
म्हणुनच संसार मुळीच नका करु

आपला मराठमोळा.

कथाप्रकटनविचार

प्रतिक्रिया

नरेश_'s picture

10 Mar 2009 - 10:42 pm | नरेश_

सतयुगापासुन कलयुगापर्यत मला मदिरा, सुरा,मद्य, सोमरस, दारु अशी नावे मिळालेली आहेत आणी मी सर्वव्यापी आहे.
कलयुगातली चंगळवादी माणसे फार लवकर माझ्या प्रेमात पडतात आणी बर्‍याच सुखांचा माझ्या चरणी बळी देतात यात माझा काय दोष?

छान रुपक !!

ऍडीजोशी's picture

11 Mar 2009 - 1:12 pm | ऍडीजोशी (not verified)

(|:

परिकथेतील राजकुमार's picture

11 Mar 2009 - 1:20 pm | परिकथेतील राजकुमार

हे असले आमच्या प्रेमाच्या आड येणारे लेख आम्ही वाचत नाही ! पुन्हा असले काहि लिहिल्यास आपल्याला बाटलीच्या खाली चिरडण्याची सजा देण्यात येइल !!
हुकुमावरुन
तळीराम
©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
मी आस्तिक मोजत पुण्याईची खोली,नवसांची ठेऊन लाच लावतो बोली
तो मुळात येतो इच्छा अर्पुन सार्‍या,अन् धन्यवाद देवाचे घेऊन जातो..
आमचे राज्य

मराठमोळा's picture

11 Mar 2009 - 1:43 pm | मराठमोळा

हा हा
हे असले आमच्या प्रेमाच्या आड येणारे लेख आम्ही वाचत नाही ! पुन्हा असले काहि लिहिल्यास आपल्याला बाटलीच्या खाली चिरडण्याची सजा देण्यात येइल !!

सजा मान्य आहे.. पण ती बाटली मीच संपवणार याची परवानगी हवी... :>

सहज's picture

11 Mar 2009 - 1:23 pm | सहज

आवडली :-)

इसी बात पे हो जाये एक एक!!

अनिल हटेला's picture

11 Mar 2009 - 1:52 pm | अनिल हटेला

सहमत !!!

इसी बात पे हो जाये एक एक!!

एकच व्हय ? ;-)

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

अवलिया's picture

11 Mar 2009 - 1:44 pm | अवलिया

म्हणुनच संसार मुळीच नका करु

++++१
योग्य सल्ला!!!

--अवलिया

अडाणि's picture

11 Mar 2009 - 1:52 pm | अडाणि

असे मुक नका होवु हो... त्याला समजावून टाका आणि तिला आमच्याकडे पाठवा म्हणजे झालं....
-
अफाट जगातील एक अडाणि.

सँडी's picture

11 Mar 2009 - 2:27 pm | सँडी

खुपच छान!

-निर्व्यसनी बेवडा

चिरोटा's picture

11 Mar 2009 - 3:12 pm | चिरोटा

कथा मस्त आहे.शासनाच्या समाजकल्याण विभागाच्या अधिकारी लोकाना आवडण्यासारखी.(गैरसमज करुन घेवु नये)

बे एरिया,लन्डन्,सिडनि सह विशाल महाराष्ट्र झाला पाहिजे.

प्रकाश घाटपांडे's picture

11 Mar 2009 - 3:21 pm | प्रकाश घाटपांडे

इथे सीमारेषा पुसट असतात म्हणुन त्या ठळक करण्याची गरज असते.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

बिपिन कार्यकर्ते's picture

11 Mar 2009 - 3:40 pm | बिपिन कार्यकर्ते

सहमत.

बिपिन कार्यकर्ते

दशानन's picture

12 Mar 2009 - 9:41 am | दशानन

सुंदर वाक्य !

ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D

सूहास's picture

11 Mar 2009 - 7:07 pm | सूहास (not verified)

बाकी काय

"नही छोडे॑गे हम,कभी 'व्हिस्की'कभी 'रम'

दारु ही एक वाईट गोष्ट आहे, आपण तिचा नायनाट केलाच पाहीजे,एक बाटली तु स॑पव व एक बाटली मी स॑पवतो.

सुहास..

"व्यथा असो आनंद असू दे, प्रकाश किंवा तिमिर असू दे,"
"वाट दिसो अथवा न दिसू दे, गांत पुढे मज जाणे, माझे जीवनगाणे। "

जागु's picture

12 Mar 2009 - 1:08 pm | जागु

कथा आवडली.