समाजस्वास्थ्य

प्रकाश घाटपांडे's picture
प्रकाश घाटपांडे in जनातलं, मनातलं
8 Mar 2009 - 2:30 pm

समाजात काही उपक्रम चालु असतात. काही बंद पडतात काहींचे पुनरुज्जीवन होते. अशाच एका उपक्रमाची माहिती देत आहे. समाजस्वास्थ्य या नुकत्याच चालू झालेल्या ट्रस्टचा मी हितचिंतक आहे. माझे मित्र डॉ प्रदीप पाटील या समाजस्वास्थ्य द्वैमासिकाचे संपादक आहेत. काही सुचना असल्यास स्वागतार्ह आहेत. माझ्यापर्यंत पोहोचवल्यास मी त्या ट्रस्टला पोहोचवीन.
समाज स्वास्थ्य
मानव समुहात राहतो. समाज घडवतो. समाज टिकवतो. समाज टिकवताना तो अनेक प्रश्नांना तोंड देत जगतो. त्या त्या प्रश्नांची सोडवणुक करताना आचार- नीती नियम -संस्कृती उदयास येतात. व्यकव्यक्तींमधील संबंध आणि व्यवहार यातुन राजकारण अर्थकारण समाजकारण घडत आहे.. या सर्व प्रश्नातुन वंश सातत्य ही टिकवण्यासाठी माणुस धडपडत असतो. वंशविस्तार आणि आपल्या कुळाचे अस्तित्व ही आदिम आणि मुलभुत अशी प्रेरणा माणुस बाळगतो.त्याचा पाया स्त्री पुरुष संबंधात असतो.
स्त्री पुरुष संबंध आदिम काळात मुक्त होते. ते कधी स्त्रीसत्ताक होते तर कधी पुरुष सत्ताक; पण ते शोषण मुक्त होते असे म्हणणे अवघड आहे. स्त्री पुरुष संबंधांना कामजीवन असे म्हटले जाते. काम जीवन अति खाजगी व्यवहार असल्याने त्यात गुढता गोपनीयता आणि चमत्कारिकपणा प्रचंड वाढला. भारतीय संस्कृतीत ते वात्सायननाने तो भेदायचा प्रयत्न केला तरी अध्यात्मिक प्रवाहाने त्याचा पराभव केला. कामजीवन ही आनंद देणारी आणि जीवन समृद्ध करणारी गोष्ट आहे. कामजीवनाचा समाजावर व समाजाचा कामजीवनावर परिणाम होत आहे.हिंसाचार, अत्याचार ,फसवणुक ,लूट, शोषण हे सारे पैलु कामव्यवहारात दिसतात. पुरुष आणि स्त्री यांच्यात राजकारण आकारास येते. कामव्यवहार व समाज यांच्यात लपवाछपवी येते आणि त्यातुन अनेक गैरसमाजुती अंधश्रद्धा उदयास येतात. 'सेक्स' किंवा 'कामजीवन' याविषयी उघडपणे समाजात बोलणे 'पाप' समजले जाते.र.धो. कर्व्यांनी धाडस करुन समाजाला 'कामव्यवहार' सांगण्यासाठी समाजस्वास्थ्य मासिक काढले होते. पुढे ते थांबले. गोंधळलेल्या तरुणवर्गाला कामजीवनाविषयी योग्य मार्गदर्शन नाही.विवाहितांना प्रौढांना ज्ञान नाही.अशी आजची कामजीवनाविषयीची परिस्थिती आहे. त्यासाठी महाराष्ट्रात एक स्वतंत्र व्यासपीठ उभे राहावे म्हणुन समाजस्वास्थ्य ट्रस्ट स्थापन करण्यात आला आहे.पुर्णत: कामजीवन विषयक सामाजिक प्रश्नांना वाहिलेले असे या ट्रस्ट च स्वरुप आहे. कामजीवन हे अनुवंशशास्त्र , वैद्यकीय शास्त्र, समाजशास्त्र, मानसशास्त्र ,नीतीशास्त्र, राजकारण ,उत्क्रांतीशास्त्र अशा अनेक विज्ञानांना स्पर्श करते. कामजीवनाचे या सर्व बाजू उलगडुन दाखवणे व कामजीवन निकोप राजकारणमुक्त आणि शोषण- अन्याय-हिंसाचारमुक्त करण्यासाठी चळवळ चालवणे हे ट्रस्ट चे प्रमुख उद्धिष्ट आहे.
आपले नम्र
डॊ.प्रदीप पाटील <> मनिषा सबनीस <> आशुतोष शिर्के

From समाज

द्वैमासिक
समाजस्वास्थ्य
कार्यालय: "चार्वाक" शिंदेमळा २६० / १-६, जुना कुपवाड रोड सांगली ४१६४१६
फोन / फॆक्स नं :- ०२३३-२६७२५१२
Email - samajswasthya@yahoo.in
आपण काय करु शकता?
*या कामात सहभागी होउ शकता
*समाजस्वास्थ्य ट्रस्टला देणगी देउ शकता
*समाजस्वास्थ्य चे उपक्रम आपण आयोजित करु शकता
*एखादे मदत केंद्र चालवु शकता
* समाजस्वास्थ्य या द्वैमासिकाचे वर्गणीदार होउ शकता मिळवु शकता आणि जाहिरात देउ शकता.

आपल्या काही समस्या आहेत?
मानवी नाते संबंध गुंतागुंतीचे असतात. अशा नात्यात स्त्री पुरुष पतिपत्नीची मुख्य भुमिका बजावतात. तर पिता -कन्या, माता- पुत्र, बहिण-भाउ अशा रितीने स्त्री पुरुषाची नाती असतातच. अशा नाते संबंधात अनेक समस्या निर्माण होतात. या वेगवेगळ्या समस्या अनेकविध कारणातुन उद्भवतात. त्यातुन अनेक प्रश्न निर्माण होतात. या नात्यापैकी पती -पत्नी प्रियकर प्रेयसीच्या नात्यात कामविषयक प्रश्नांची भर पडते. अशा सर्व प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी समाजस्वास्थ्य हे
व्यासपीठ आहे. आपण फक्त एवढेच करा. आपण टोपण नावाने अथवा ख-यानावाने आपले प्रश्न आम्हास पाठवा आम्ही त्याची उत्तरे देउ.
पत्ता - 'समाजस्वास्थ्य प्रश्नमंच' "चार्वाक" शिंदेमळा २६० / १-६,
जुना कुपवाड रोड, सांगली, ४१६४१६
======================================================================

समाजशिफारसमाहिती

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Mar 2009 - 4:19 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

स्त्री-पुरुष नाते संबंधावर / प्रश्नावर चालवल्या जाणार्‍या 'समाजस्वास्थ्य' संस्थेच्या उपक्रमाला शुभेच्छा !!!

सहज's picture

8 Mar 2009 - 4:35 pm | सहज

अनेकोत्तम शुभेच्छा!

अवलिया's picture

8 Mar 2009 - 6:50 pm | अवलिया

हेच म्हणतो...

--अवलिया

दशानन's picture

9 Mar 2009 - 9:08 am | दशानन

हेच म्हणतो,

आमच्या पण शुभेच्छा !!!!

ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D

अविनाशकुलकर्णी's picture

8 Mar 2009 - 8:21 pm | अविनाशकुलकर्णी

उपक्रम चांगला आहे..पण आज ईंटरनेट च्या जमान्यात ह्या विषयावर विपुल लेखन आहे..तसेच म.टा. व अनेक वर्तमान पत्रे हि हा उपक्रम राबवित आहेत..पुर्वि ह्या विषय ताब्बु होता आता तसा राहिला नाहि..या विषयावर अनेक पुस्तके लिहिलि गेली आअहेत..र.धो.चा जमाना निराळा होता..आता जग या बाबतित खुप हुशार झाले आहे १३-१४ वर्षाच्या मुलाम्नाहि सारे ठावुक असते.

प्रकाश घाटपांडे's picture

8 Mar 2009 - 10:00 pm | प्रकाश घाटपांडे

लैंगिक शिक्षणाचा अंतर्भाव या वर वाद होतात. लैंगिक समस्या तज्ञांकडे २३ -२४ वर्षांच्या मुलांमध्येही अज्ञान असलेल्या केसेस दिसुन येतात. १३ - १४ वर्षाच्या मुलाला जे ठाउक असत ते बर्‍याचदा अर्धसत्य व अवैज्ञानिक असते असे तज्ञांना दिसुन आले आहे. संदर्भ म्हणुन विठठल प्रभु. शशांक सामक लीना मोहाडीकर इ. ची पुस्तके पाहता येतील.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

सावत्या's picture

29 Apr 2013 - 11:23 am | सावत्या

सहमत!!!!!!!

१३-१४ वर्षाच्या मुलांनाच काय ४० -४५ वर्षाच्या माणसाना दोन मुले झाल्यावरही बरेच अज्ञान असते असे सर्व डॉक्टर तुम्हाला सांगतील.१३-१४ वर्षाच्या मुलांना असलेले ज्ञान अर्धवट असते आणि अर्धवटज्ञान हेधोक्याचे असते.लिंग शैथिल्य आणि मुदतपूर्व स्खलन हा १०० टक्के पुरुषांनी एकदातरी अनुभवलेला प्रकार आहे तरीही ९५ टक्के पुरुषांचे( किंवा ९९ %) त्याबद्दल अज्ञान दिसून येते.लोकांनी आत्मपरीक्षण करून पाहावे आणि मग बोलावे हा विषय अतिशय गहन आणि गुप्त आहे त्यातून आपले संस्कृती रक्षक यावर काही बोलले तर संस्कृती बुडेल असा टाहो फोडतात. त्यामुळे हा विषय बासनात गुंडाळून ठेवला गेला आहे. आपला इमेल चा स्पॅम फोल्डर उघडून बघा किती वेगवेगळ्या वाजीकरणच्या जाहिराती दिसतील.मुळात वाजीकरण( घोड्या सारखी कामशक्ती) हेच एक मिथक आहे म्हणजे गैरसमज किती खोलवर रुजला आहे ते कळेल. दुर्दैवाने काम शिक्षण म्हणजे पोर्नोग्राफी हा गैरसमज समाजात सर्वत्र रूढ आहे आणि त्यामुळे शाळात त्याबद्दल शिक्षण देण्याचे नाव काढले तर लगेच सर्व जण टाहो फोडतात. र धो हा एक द्रष्टा पुरुष होता आणि तो काळाच्या १०० वर्षे पुढे होता म्हणून त्यांचे विचार आजच्या काळातही लागू होताना दिसतात.
उपक्रमाला शुभेच्छा

बिपिन कार्यकर्ते's picture

9 Mar 2009 - 1:04 am | बिपिन कार्यकर्ते

कर्व्यांनी चालू केलेलं कार्य आज इतक्या वर्षांनी परत अंगावर घेणार्‍या त्रयीचं मनापासून कौतुक आणि शुभेच्छा!!!

अवांतर: र. धों. सारखा जबरदस्त माणूस होऊन गेल्यावरही जवळ जवळ ८०-९० वर्षांनी अजूनही या कार्याची गरज भासावी हे वाईटच!!!

बिपिन कार्यकर्ते

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

9 Mar 2009 - 10:11 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

अवांतर: र. धों. सारखा जबरदस्त माणूस होऊन गेल्यावरही जवळ जवळ ८०-९० वर्षांनी अजूनही या कार्याची गरज भासावी हे वाईटच!
अगदी सहमत. पण या त्रयीचं मनापासून कौतुक आणि शुभेच्छा.

१३-१४ व्या वर्षापासून काय अगदी जन्मापासून माहित असलं तरी दुसर्‍यांदा शिकलं तर काही फरक पडत नाही. पण अज्ञान आणि अर्धज्ञान घातक आहे.

अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.

प्रकाश घाटपांडे's picture

9 Mar 2009 - 8:32 am | प्रकाश घाटपांडे

विवाहापुर्वी लैंगिक स्वातंत्र्य देणारे आदिवासींचे अनेक समुह भारतात व भारताबाहेर आहेत. वयात आलेल्या व येउ पहाणार्‍या मुलामुलींना लग्नाआधी रात्रीचे एका मध्यवर्ती निवारागृहात (घोटुल) ठेवण्याची व तेथे त्यांना लैंगिक शिक्षणासह जीवनाचे (जगण म्हणतो बाबा ) सगळे व्यवहार शिकवण्याची सगळी व्यवस्था या समुहात आहे. मध्यप्रदेशातील बस्तर व महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात बडा माडिया व माडिया जमातीतील या व्यवस्थांचे अवशेष अजुन टिकुन आहेत. लैंगिक व्यवहारांचे स्वातंत्र्य असतानाही या समाजातील मुलामुलीत अनाचार बोकाळल्याचा पुरावा नाही. त्याचा हा फोटो.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

प्रकाश घाटपांडे's picture

29 Apr 2013 - 10:56 am | प्रकाश घाटपांडे

कालच कोथरुड येथील वसंत व्याखानमालेत डॊ प्रदीप पाटील यांचे स्त्री पुरुष बदलते नाते संबंध यावर व्याखान झाले. विशेषत: किशोर व तरुण वयीन संबंधावर अधिक फोकस होता.

अर्धवटराव's picture

30 Apr 2013 - 8:58 am | अर्धवटराव

किंबहुना केवळ चांगला नाहि, तर अत्यावश्यक उपक्रम आहे. हार्दीक शुभेच्छा.

अवांतरः तसं पाहिलं तर आपल्याला सर्वच शिक्षण क्षेत्रांत रॅडीकल, मूलभूत बदल करणे अनिवार्य आहे. इतक्यात मला (माझ्याच) अडाणीपणाची जाणिव फार तिव्रतेने व्हायला लागलीये.

अर्धवटराव