निसर्गरम्य शिवथरघळ

मराठमोळा's picture
मराठमोळा in जनातलं, मनातलं
6 Mar 2009 - 7:54 pm

बर्‍याच दिवसापुर्वी शिवथरघळ येथे जाण्याचा योग आला होता. आजकाल होणार्‍या उकाड्यामुळे अचानक या ठिकाणाची आठवण झाली.

तर शिवथरघळ..भोर तालुक्यापासुन थोड्याच अंतरावर असलेले हे छोटेसे ठिकाण. आजुबाजुला रम्य हिरवीगार दाट झाडी आणी अबोल शांतता, पण मधेच तिचा भंग करीत कोसळणारा प्रचंड धबधबा आणी त्यामुळे तयार झालेली घळई. अशा धबधब्याचे तुषार अंगावर उडतात तेव्हा अगदी अमृतवर्षाव झाल्यासारखे वाटते. खळखळ वाहणारे पाणी जणु संगीताचा अपरिचीत रागच छेडते जसे. मुक्तविहार करणारे पक्षी आणी त्यांच्याबरोबर खेळणारी थंड हवा. सुर्यामुळे सोनेरी झिलई मिळालेली रानफुले तर फारच मोहक वाटतात अशा वातावरणात. या सर्व गोष्टींचा मोह झाल्यामुळेच कदाचित रामदासांनी ही जागा दासबोध ग्रंथ रचण्यासाठी निवडली असावी. रडवेलं झालेलं मुल जसे आईच्या कुशीत गेल्यावर सुखावते तसाच आनंद झाला मला या निसर्गाच्या कुशीत. सर्वाचा विसर पडावा अशी ही माया.

हे सर्व अनुभवले कि असे वाटते कि नको तो ईहलोकातला यंत्राचा माणुस. रहाव इथेच आणी घ्यावा आनंद या निसर्गाच्या अनोख्या कलेचा. शहरातल. धावपळीच्या जीवनात गुरफटुन गर्दीच्या चकीत पिसण्यापेक्षा आणी प्रदुषणाचं कोरड विष पिण्यापेक्षा निसर्गाच्या सान्निध्यात जगणे कितीतरी सुखकर. निसर्ग मानवाला इतके काही देऊ करीत आहे आणी करंट्या नशिबाच्या माणसाला त्याच्याकडे ढुंकुनही पहायला वेळ नाही. म्हणुनच अशा ठिकाणी क्षणिकच का होइना पण आनंद उपभोगण्यात जी मजा आहे तिची सर स्वर्गातल्या सुखसोयींनाही येणार नाही कदाचित.

पण आता या सुखाचा मोह त्यागुन पुन्हा यांत्रिक जगात जावे लागणार म्हणुन मन व्यग्र झाले. पण काय करणार? जादुगार दुनियेतली संसाराची माया परत बोलवु लागली आणी त्याबरोबरच परतीचा प्रवास सुरू झाला. मोहक निसर्गाच्या दृश्यात संध्येने वेगवेगळे रंग भरायला सुरूवातच केली होती आणी मी य्ताचा निरोप घेत होतो. पुन्हा सिमेंट काँक्रिट कडे जाणारा रस्ता कापु लागलो, पण त्या दृश्याची, निसर्गाची एक छबी कायमची मनात घेऊन चाललोय हे खरे.

आपला,
निसर्गप्रेमी मराठमोळा

साहित्यिकअनुभव

प्रतिक्रिया

प्रभाकर पेठकर's picture

6 Mar 2009 - 8:04 pm | प्रभाकर पेठकर

एखदे छायाचित्र का नाही टाकले? त्याने, मांडलेल्या विचारांना दृष्य जोड मिळाली असती.
शिवथरघळ पाहायची तर पावसाळ्यात मध्यावर. (जुलै-ऑगस्ट)

दारूने प्रश्न सुटत नाहीत, पण दुधाने तरी कुठे सुटतात?

मराठमोळा's picture

6 Mar 2009 - 8:14 pm | मराठमोळा

मी घेतलेली छायाचित्र नेमकी "हार्ड डिस्क" क्रॅश झाल्यामुळे उपलब्ध नाहीयेत.
क्षमस्व.

क्रान्ति's picture

6 Mar 2009 - 10:29 pm | क्रान्ति

इतक्या सुन्दर पवित्र स्थळाच ओझरत तरीही सुरेख वर्णन वाचून प्रत्यक्ष पहायची ओढ लागली. धन्यवाद.
क्रान्ति

विनोद कोकने's picture

7 Mar 2009 - 1:58 pm | विनोद कोकने

विनोद कोकने

जाण्याचा रस्ता / पता कळवा

शैलेन्द्र's picture

7 Mar 2009 - 3:55 pm | शैलेन्द्र

कुठुन जाणार?

मुंबई- महाड मग वरंधा घाटाचा भोरकडे जाणारा रस्ता पकडा, घाटाच्या थोडे आधी डावीकदे फाटा आहे, तिथुन १८-२० कि मी...

पुणे- भोर- वरंधा घाट, घाट संपायच्या जरा आधी एक रस्ता ऊजवीकडे जातो. रस्ता कच्चा आणि खराब, पण २० कि मी वाचतात, सुमोसारखी गाडी असेल तर बिन्धास्त जा. नाहितर पुढे येवुन अगोदर सांगीतलेला रस्ता..

इथे बघा

http://www.orkut.co.in/Main#AlbumZoom.aspx?uid=1883727304300751715&pid=1...

विसोबा खेचर's picture

7 Mar 2009 - 3:42 pm | विसोबा खेचर

सुंदर छोटेखानी प्रकटन...

तात्या.

सुनील's picture

7 Mar 2009 - 5:35 pm | सुनील

छान वर्णन. फोटो उपलब्ध नाहीत हे वाचून वाईट वाटले कारण प्रवासवर्णन आणि पाकृ यांना फोटोशिवाज मजा नाही!

तिथे मुक्काम करण्यासाठी जवळचे ठिकाण कुठले?

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

धमाल मुलगा's picture

7 Mar 2009 - 5:57 pm | धमाल मुलगा

शिवथरघळ हा एक असा जादुचा प्रदेश आहे, की तिथे गेलेल्या माणसाचं पाऊल परत फिरता फिरत नाही.
छान प्रकटन.

बाकी, फोटो असते तर आणखी मजा आली असती.

ऐन पावसाळ्यात शिवथरघळीचं खरं रुप पहावं, जीव ओवाळून टाकावासा वाटतो :)

----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता

मिंटी's picture

7 Mar 2009 - 6:03 pm | मिंटी

छान माहिती दिलीत तुम्ही. खरचं फार मस्त आहे शिवथरघळ. आणि धमाल मुलगा म्हणल्याप्रमाणे पावसाळ्यात तर फारच सुंदर........ तुम्ही लेखात फोटु नाही देऊ शकलात नाहितर अजुन मजा आली असती.
असो. तुमच्या लेखानी पुन्हा एकदा तिथी जायची इच्छा झाली. यापुर्वी तिथी काढलेले २-३ फोटो इथे टाकते. :)

शिवथरघळी जवळचा धबधबा ( पावसाळ्यातला ) :

शिवथरघळ ( डिसेंबर महिन्यात काढलेला फोटो ) :

मराठमोळा's picture

8 Mar 2009 - 10:06 am | मराठमोळा

छायाचित्र देऊन शिवथरघळ च्या आठवणींना पुर्णपणे उजाळा मिळाला..
मिंटी.. तुमचे आभार.