एक विचार... :)

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in जनातलं, मनातलं
6 Mar 2009 - 6:53 pm

एक विचार -

बँकेत खाते उघडायला जशी ओळख लागते तशी ओळख यापुढे एखाद्या व्यक्तिला मिपावर नवीन सभसदात्व देतांना आवश्यक ठेवावी किंवा कसे यावर विचार सुरू आहे!

जर हा विचार अंमलात आणायचा झाल्यास तो कश्या तर्‍हेने आणावा, कार्यपद्धती काय असावी यावरही विचार सुरू आहे!

यामुळे कदाचित मिपावर नवनवीन सभासद होण्याची जी गती आहे, ती कमी होईल. परंतु मिपाने सभासदांची भारंभार खोगीरभरती करण्यापेक्षा ज्यांना खरोखरच 'मराठी आंतरजाल आणि त्याची प्रगती' या विषयात रस आहे, काही चांगलंचुंगलं ललित, वैचारिक लिहिण्यावचण्यात रस आहे, मिपाच्या कलादालन, रसोई अश्या दालनात रस आहे, अश्यांनाच केवळ मिपाचे सभासदत्व द्यावे असाही एक विचार मनात घोळतो आहे..!

सभासदसंख्या अधिक आहे किंवा कमी आहे, या मुद्दा मिपाच्या दृष्टीने गौण आहे!

या विचाराचे चांगले (!) साईड इफेक्टस् - अवचित आणि अनोळखी खरडी आणि व्य निं ना निश्चितच आळा बसेल..! :)

हा विचार लिहितेवेळीचा शेवटचा सभासद - सुजित निकम!

आता हा विचार वाचून काही मिपाद्वेष्टे साप बिळातनं बाहेर येतील आणि या विचाराचा अंमल लागू व्हायच्या आतच भराभ्भर मिपाचे मेम्बर बनतील.. यांच्या वाटचालीकडे आमचे बारीक लक्ष असेल. सभासदत्व घेऊन अवघे २४ तासही झालेले नसतांना बर्‍याच सभासदांना मिपाचा सारा इतिहास ठाऊक असतो असे निदर्शनास आले आहे! :)

सच्च्या मिपाकरांनीही नवीन सभासदांच्या लेखन-वाटचालीकडे लक्ष ठेवावे ही विनंती..!

असो.. सहज काही विचार मनात आले ते इथे खरडले!

बाकी चालू द्या...! :)

आपला,
(पक्क्या गुरुचा चेला नव्हे, तर स्वत:च पक्का गुरू असलेला!) तात्या. :)

--

मिपाच्या धोरणांविषयींच्या कुठल्याही घोषणांचे पडसाद अन्य काही परप्रकाशी संस्थळांवर आणि ब्लॉग्जवर उमटतातच! तेव्हा त्याचे काही विशेष नाही! ;)

हे ठिकाणधोरणप्रकटन

प्रतिक्रिया

परिकथेतील राजकुमार's picture

6 Mar 2009 - 7:25 pm | परिकथेतील राजकुमार

तात्या विचार चांगला आहे.
फक्त एक गोष्ट सांगावीशी वाटते की मी एका सोशल नेटवर्कींग चा सदस्य आहे. तिथे स्पॅमींग / इनव्हायटींग असे प्रकार जेंव्हा वाढले तेव्हा हा उपाय करुन बघण्यात आला होता, त्याचा फायदा नक्कीच झाला पण एक गंमत अशी हि झाली की 'अ' गटातल्या एखाद्या मेंबरच्या ओळखीनी आलेला नविन सभासद हा आल्या आल्या 'ब' गटाच्या शत्रुत सामील झाला कारण अ आणी ब गटातुन विस्तव जात न्हवता. मिपा वर अशी परिस्थीती नाहिये पण काहि सदस्यांच्यात व्यक्तीगत वाद असण्याची शक्यता नाकारता येत नाहि. फक्त येव्हडीच विनंती आहे की नविन आलेला सभासद हा कोणच्या ओळखीनी आला आहे हे जेव्हड्या कमी लोकांना माहिती असेल तेव्हडे चांगले.

©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु
अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी...
आमचे राज्य

विसोबा खेचर's picture

6 Mar 2009 - 7:30 pm | विसोबा खेचर

फक्त येव्हडीच विनंती आहे की नविन आलेला सभासद हा कोणच्या ओळखीनी आला आहे हे जेव्हड्या कमी लोकांना माहिती असेल तेव्हडे चांगले.

चांगला मुद्दा. विचाराधीन...

इतर सूचनांबद्दलही धन्यवाद. जे काही करायचं ते पूर्ण विचार करूनच करू. तरीही काही लूप-होल्स राहतीलच ती अर्थातच पार बुजवली जातील! :)

धन्यवाद..

तात्या.

सखाराम_गटणे™'s picture

6 Mar 2009 - 7:25 pm | सखाराम_गटणे™

अगदी योग्य निर्णय.
ही माझी मते
१. तांत्रिक बाबी पहायला हव्यात.
२. एका पेक्षा जास्त आय. डी. ला बंदी हवी.
३. बनावट आय. डी. शोधायला काही तरी सुविधा हवी.

----
अगदी निकडीची गरज असताना, जो पाठीत खंजीर खुपसतो, तोच खरा मित्र.

यशोधरा's picture

6 Mar 2009 - 7:28 pm | यशोधरा

तात्या, निर्णय आवडला. पूर्ण पाठिंबा.

शितल's picture

6 Mar 2009 - 7:30 pm | शितल

पुर्णतः सहमत. :)

प्राजु's picture

6 Mar 2009 - 7:55 pm | प्राजु

योग्य निर्णय..
:)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

मुक्तसुनीत's picture

6 Mar 2009 - 7:39 pm | मुक्तसुनीत

सहमत !

केशवसुमार's picture

8 Mar 2009 - 10:08 pm | केशवसुमार

सुध्दा पाठिंबा..
(सहमत्)केशवसुमार

विनायक प्रभू's picture

6 Mar 2009 - 7:28 pm | विनायक प्रभू

अगदी योग्य निर्णय. ह्याची कार्यवाही करणे तुम्हाला भागच आहे. त्रास कमी करण्याकरता.

अवलिया's picture

6 Mar 2009 - 10:12 pm | अवलिया

सहमत

--अवलिया

घाटावरचे भट's picture

7 Mar 2009 - 2:09 am | घाटावरचे भट

सहमत.

प्रकाश घाटपांडे's picture

6 Mar 2009 - 7:33 pm | प्रकाश घाटपांडे

सभासदसंख्या अधिक आहे किंवा कमी आहे, या मुद्दा मिपाच्या दृष्टीने गौण आहे!

हे महत्वाचे
नवीन सभासदाने मिपाच्या प्रकृतीचाही विचार करावा. सरसकट प्रवेश नको ही सुचना स्वागतार्ह आहे. पारदर्शी असणार्‍या त्रयस्थ व्यक्तींना प्रवेश असायला हरकत नसावी.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

छोटा डॉन's picture

6 Mar 2009 - 7:36 pm | छोटा डॉन

एकंदर लेख वाचल्यावर पटकन त्याच्याशी सहमत अहे म्हणुन टाकावे वाटले.
चांगला विचार आहे ...

>>सभासदसंख्या अधिक आहे किंवा कमी आहे, या मुद्दा मिपाच्या दृष्टीने गौण आहे!
+१, आमचे अगदी असेच मत आहे.
इनफॅक्ट संस्थळाची लोयप्रियता सदस्यसंख्येवरुन नव्हे तर दररोज येणार्‍या ऍक्टीव्ह सदस्यांवरुन व त्यामुळे होणार्‍या वर्दळीवरुन जोखली पाहिजे असे आम्हाला वाटते.
अजुन एक म्हणजे समजा आपण खरोखरच 'मराठी आंतरजाल आणि त्याची प्रगती' या विषयात रस घेतो, काही चांगलंचुंगलं ललित, वैचारिक लिहिण्यावचण्यात रस दाखवतो, मिपाच्या कलादालन, रसोई अश्या दालनात भर घालतो तेव्हा आपल्याला "सदस्यसंख्येचा" विचार करण्याची गरजच नाही.
शुद्ध भाषेत त्याला फाट्यावर मारले तरी हरकत नाही ...
ऍक्टीव्ह सदस्यांमुळे संस्थळाची व पर्यायाने मराठी भाषेची भरभराट महत्वाची नाही का ?

असो. आमचा पाठिंबा आहे ह्या उदात्त विचाराला ...
जसे सुचेल तसे प्रत्येक्षात शक्य असलेले उपाय सुचवीन, टेक्नीकल बाबींना संभाळुनच उपाय सुचवणे गरजेचे आहे ह्याची आम्हाला जाण आहे.
तुर्तास ह्या विचाराचे स्वागत आहे.

------
(हितचिंतक)छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)

मेघना भुस्कुटे's picture

6 Mar 2009 - 7:47 pm | मेघना भुस्कुटे

फार चांगला मुद्दा. सहमत.

ब्रिटिश टिंग्या's picture

6 Mar 2009 - 7:50 pm | ब्रिटिश टिंग्या

विचार चांगला आहे. यामुळे डुप्लिकेट आयडींना बर्‍यापैकी आळा बसेल.
परंतु सध्या अस्तित्वात असलेले "जुनी दारु नवीन बाटली" टाईप आयडीज स्वत:च्याच रेफरन्सने अधिकाधिक आयडीज बिनबोभाट उघडु शकतील. त्याला आळा कसा बसवता येईल याचाही विचार व्हायला हवा!

सखाराम_गटणे™'s picture

6 Mar 2009 - 8:13 pm | सखाराम_गटणे™

>>यामुळे डुप्लिकेट आयडींना बर्‍यापैकी आळा बसेल.
ही माझी सग'ळ्यात आवडणारी गोष्ट आहे.

----
अगदी निकडीची गरज असताना, जो पाठीत खंजीर खुपसतो, तोच खरा मित्र.

चतुरंग's picture

6 Mar 2009 - 7:50 pm | चतुरंग

आमचे अनुमोदन आहे!! :)
प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी आणखी काही विचार सुचल्यास कळवीनच!

चतुरंग

निखिल देशपांडे's picture

6 Mar 2009 - 7:58 pm | निखिल देशपांडे

हि कल्पना चांगलि आहे..... पण काहि योग्य व्यक्तिंनाहि ह्याचा त्रास होइल असे वाटते.....

विंजिनेर's picture

6 Mar 2009 - 7:58 pm | विंजिनेर

चांगला आहे. पण किमान मला तरी हे निवेदन वाचून काही शंका आल्या आहेत.

कदाचित मिपावर नवनवीन सभासद होण्याची जी गती आहे, ती कमी होईल.

आणि

सभासदसंख्या अधिक आहे किंवा कमी आहे, या मुद्दा मिपाच्या दृष्टीने गौण आहे!

ह्या दोन वाक्यांत परस्पराविरोध जाणवत नाही का?

दुसरे म्हणजे

काही चांगलंचुंगलं ललित, वैचारिक लिहिण्यावचण्यात रस आहे, मिपाच्या कलादालन, रसोई अश्या दालनात रस आहे, अश्यांनाच केवळ मिपाचे सभासदत्व द्यावे असाही एक विचार मनात घोळतो आहे..!

हे मला नीटसे कळाले नाही. एखाद्या होऊ घातलेल्या सदस्याला कुठल्या गोष्टीत आवड आहे हे कसे ठरवणार?
किंवा ह्याचीच दुसरी बाजू म्हणजे एखाद्याला आवड असेल तरीही ती व्यक्ती सदस्य नाही म्हणून तिला ती आवड व्यक्त करता येणार नाही म्हणून सदस्य होता येणार नाही असं दुष्टचक्र नाही का?(ह्याला उपाय ही असु शकतो म्हणा - "संपर्क साधा" असा मिपा मुखपृष्ठावर दुवा देता येइल, ज्याच्या मदतीने सदस्यनामाविना थेट प्रशासकांशी संपर्क साधता येइल...).
अजून एक म्हणजे, पुर्णपणे अनोळखी व्यक्ती जिचा इतर जालीय राजकारणाशी संबंध नाही पण मिपाकर होण्याची मनापासून इच्छा आहे तिच्यात आणि दुष्ट हेतूने सदस्य होउ घातलेल्या व्यक्ती मधे फरक कसा करता येइल?
ह्यात भर म्हणजे मिपाचे हितशत्रू/द्वेष्टे सभासद आत्ताही असतील (एक अंदाज) पण त्यांनी शिफारस केल्यावर येण्यार्‍या ठकांचे सदस्य गैर नाही का?

असो.. हा कदाचित काही जणांना किस पाडल्यासारखा वाटेल, काही जणांना अजून काही पण संपादकांनी हा धागा चर्चा व्हावी म्हणून सुरू केला आहे म्हणून हा लेखन प्रपंच.

-विंजिनेर

सखाराम_गटणे™'s picture

6 Mar 2009 - 8:02 pm | सखाराम_गटणे™

अशी माणसे संपाद काशी संपर्क साधु शकतात.

----
अगदी निकडीची गरज असताना, जो पाठीत खंजीर खुपसतो, तोच खरा मित्र.

'संपाद काशी' हे अगदी संपादकाची काशी झाल्यासारखं वाटतं ना! ;)

चतुरंग

शितल's picture

6 Mar 2009 - 8:10 pm | शितल

=))

प्रभाकर पेठकर's picture

6 Mar 2009 - 8:00 pm | प्रभाकर पेठकर

चांगला विचार आहे. 'कोणी काहिही म्हंटले तरी हरकत नाही' पासून 'ज्यांना खरोखरच 'मराठी आंतरजाल आणि त्याची प्रगती' या विषयात रस आहे, काही चांगलंचुंगलं ललित, वैचारिक लिहिण्यावचण्यात रस आहे, मिपाच्या कलादालन, रसोई अश्या दालनात रस आहे, अश्यांनाच केवळ मिपाचे सभासदत्व द्यावे असाही एक विचार मनात घोळतो आहे..!' इथ पर्यंतचा, वैचारिक प्रवासातला एक महत्त्वाचा टप्पा गाठल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन.

दारूने प्रश्न सुटत नाहीत, पण दुधाने तरी कुठे सुटतात?

शितल's picture

6 Mar 2009 - 8:11 pm | शितल

पेठकर काकांचा
रंगीत प्रतिसाद आवडला. ;)

टारझन's picture

6 Mar 2009 - 8:04 pm | टारझन

तात्या ,
चांगलाच प्रकल्प आहे ! आम्ही पण काही सुचलं तर सुचवू :)

चा॑गल आहे..

आजकाल कोठेही नवीन सदस्य व्हायचे असेल तर जी-मेल कि॑वा आपला मेल आय्.डी द्यावा लागतो(ई-मेल कन्फ्रमेशन)

सुहास..

आता मी "अजुन"काय करू ?

सखाराम_गटणे™'s picture

6 Mar 2009 - 8:18 pm | सखाराम_गटणे™

तात्या, पेपल, खाते वेरीफिकेशन साठी क्रेडीट कार्ड नं घेते आणी ०.०१ डॉलर चार्ज करते, आणि हो, एक नं पोष्टाने पाठवते, तो नं एटर केला की ०.०१ डॉलर परत क्रेडीट कार्ड वर जमा होतात.

तुम्ही क्रेडीट कार्ड नं किंवा डेबिट कार्ड नं घ्या.

----
अगदी निकडीची गरज असताना, जो पाठीत खंजीर खुपसतो, तोच खरा मित्र.

अविनाशकुलकर्णी's picture

6 Mar 2009 - 8:28 pm | अविनाशकुलकर्णी

मला असे वाटते..

मला असे वाटते..

१] गुड फेथ धरुन सा~यांना प्रवेश द्यावा..
२] जर काहि संशया स्पद आढळले तर तात्काळ त्या वर ऍक्शन घ्यावि.
३] ओळख देताना तो सभासद चांगला असेल पण नंतर वाईट वागला तर ज्याने ओळ्ख दिलि त्या बिचा~याचा काय दोष?
४] त्या सभासदाच्या वेड्या वाकड्या वागण्याने ज्याने ओळ्ख दिलि तो पण कारण नसताना गोत्यात येणार..हा भाग हि महत्वाचा

कवटी's picture

6 Mar 2009 - 8:28 pm | कवटी

विचार स्तुत्य (वा खुप दिवसानि आठवला हा शब्द) आहे. नक्कीच अमलात आणावा. लावालाव्या करणारे / एका लायनीचे चर्चा प्रस्ताव टाकणारे / भुछत्रासारखे पटापटा उगवणार्‍या आयडीना आळा बसेल. त्याच बरोबर फालतू मानापमान , वादावादी, चिखलफेक याला ही आळा बसेल. (फारच आशावादी आहे का मी?)

पण...

हे नक्की होणार आहे का? का तात्याने नेहमी प्रमाणे एक मती गुंग करून टाकणारे सरप्राईज अस्त्र भिरकावलय? त्याचा अपेक्षीत (चांगला) परिणामही झालाय. वादावादी / मानापनानाचे धागे एका सटक्यात मागे पडून, लोक सगळे विसरून या प्रस्तावात गुंगून गेलेत. जादूगार जसा आपल्या पोतडीतून एक एक चमत्कृतीपूर्ण गोष्टी बाहेर काढतो आणि बघणारे मागचे विसरून त्या नविन जादून रंगून जातात तसेच काहिसे.

संस्थळ चालवायचे तर अशा नाना कळा अंगी असणे मस्ट... तात्याराव तुम्हाला सलाम!

अवांतर : तात्या तुम्ही राजकारणात का उतरत नाही? पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून आम्ही तुम्हालाच पाठींबा देऊ.

कवटी

विसोबा खेचर's picture

7 Mar 2009 - 12:34 am | विसोबा खेचर

नक्की होणार आहे का? का तात्याने नेहमी प्रमाणे एक मती गुंग करून टाकणारे सरप्राईज अस्त्र भिरकावलय? त्याचा अपेक्षीत (चांगला) परिणामही झालाय. वादावादी / मानापनानाचे धागे एका सटक्यात मागे पडून, लोक सगळे विसरून या प्रस्तावात गुंगून गेलेत. जादूगार जसा आपल्या पोतडीतून एक एक चमत्कृतीपूर्ण गोष्टी बाहेर काढतो आणि बघणारे मागचे विसरून त्या नविन जादून रंगून जातात तसेच काहिसे.

संस्थळ चालवायचे तर अशा नाना कळा अंगी असणे मस्ट... तात्याराव तुम्हाला सलाम!

अवांतर : तात्या तुम्ही राजकारणात का उतरत नाही? पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून आम्ही तुम्हालाच पाठींबा देऊ.

कवटीकाकांनी आमचा बराच अभ्यास केलेला दिसतो..! जपून रहायला पहिजे! :)

आपला,
(पंतप्रधान) तात्यामोहन सिंग.

बिपिन कार्यकर्ते's picture

6 Mar 2009 - 8:28 pm | बिपिन कार्यकर्ते

तात्या,

यामागचा विचार स्तुत्य आहे. माझा पण पाठिंबा आहेच. पण एकच शंका:

मला स्वतःला मराठी आंतरजालाचा शोध अपघातानेच लागला. त्या वेळी मी कोणालाच ओळखत नव्हतो. तरीही मला सदस्य होता आले. नंतर इथलेही सदस्यत्व घेता आले. ओळखी नंतर झाल्या. अशा परिस्थितीत आज एखादा / एखादी असेल तर त्याने / तिने केवळ ओळख नाही म्हणून वंचित व्हावे का?

यावर काही उपाय आहे का? किंवा वर जी उद्दिष्ट्ये मांडली आहेत ती साधायला काही दुसरा मार्ग आहे का? व्हेरिफिकेशन साध्य करायला ओळखीचा सदस्य असणे हाच एकमेव मार्ग आहे काय? जाणकार अजून काही मार्ग सुचवू शकतात.

अजून एक मुद्दा. मी एखाद्या सदस्याला मिपावर आणले तर त्या सदस्याच्या वागणु़कीचा जिम्मा पण मी घेणे आवश्यक आहे का? की फक्त सदस्य होण्यापुरतीच ओळखीची आवश्यकता असेल? उदाहरणार्थ माझ्या ओळखीने आलेल्या एखाद्या सदस्याने इथे नियमभंग केले तर किंवा गंभीर गैरप्रकार केले तर जबाबदारीत माझा हिस्सा काय आणि किती?

परत - विचार चांगलाच आहे पण या पेक्षा अजून काही मार्ग आहेत का आणि ते किती प्रॅक्टिकल आहेत ते बघूनच अंमलात आणावा.

बिपिन कार्यकर्ते

क्लिंटन's picture

6 Mar 2009 - 8:43 pm | क्लिंटन

हा विचार वाचताना क्षणभर मी मराठी संकेतस्थळांवर कसा आलो त्याचा विचार करू लागलो.

महिना होता आँगस्ट २००६. एकदा मराठी असे गुगलल्यावर मनोगत हे संकेतस्थळ सापडले.मला त्याची कल्पना खूपच आवडली आणि मी लगेचच मी त्याचा सभासद झालो. त्यानंतर मिसळपाव कोणत्या परिस्थितीत चालू झाले याची माहिती मला त्याच संकेतस्थळावर आणि ओरकुटावर मिळाली.मिपा सुरू झाल्यावर मी ताबडतोब (एका दिवसातच) त्याचा सभासद झालो. आजही मी इतरांएवढ्या वरचेवर मिपावर लिखाण करत नसलो तरी आंतरजालावर मिपाच मला ’आपले मराठी घर’ वाटते.

माझ्याप्रमाणे अनेक जण मिपा किंवा इतर संकेतस्थळांवर कधीनाकधी नव्याने येत असतीलच.त्यांना त्या संकेतस्थळावरील कोणीच ओळखत नसेल. तसेच मिपावर माझ्यासकट बहुतांश सदस्य टोपणनावाचा वापर करून लिखाण करतात. विसोबा खेचर म्हणजेच तात्या अभ्यंकर हे आधीच माहित असयची शक्यता तशी कमीच. तेव्हा अगदी तात्यांना (किंवा इतर कोणालाही) ओळखणारी मंडळीसुध्दा ते टोपणनाव माहित नसेल तर ’आपण मिपावर कोणालाच ओळखत नाही आणि म्हणून मला मिपाचे सदस्यत्व नाही’ अशा खोट्या समजुतीत वावरतील. जे खरोखरच कोणा मिपाकराला ओळखत नाहीत अशांना तर सदस्यत्व मिळणारच नाही.

मुख्य म्हणजे मी पहिल्यांदा मराठी संकेतस्थळ विश्वाचा पहिल्यांदा सदस्य झालो तेव्हा मी या विश्वावर कोणालाच ओळखत नव्हतो. मी या विश्वाला एकूण किती योगदान दिले आहे याची मला कल्पना नाही. पण मी सर्व संकेतस्थळांवरील ७०-७५ चर्चांमध्ये भाग घेतला आहे.निदान या चर्चांमध्ये तरी मी काहीतरी नवा मुद्दा मांडला आहे आणि त्यातून चर्चेला काहितरी वेगळी दिशा मिळाली आहे हे मात्र नक्की सांगू शकतो. माझ्याहून अनेक पटींनी गुणात्मक आणि संख्यात्मक योगदान दिलेले अनेक सभासद मिपावर आहेत. ते ही कधीनाकधी मिपा किंवा अन्य संकेतस्थळावर पहिल्यांदा आलेच होते आणि सर्वांना पहिल्यांदा येताना कोणीतरी ओळखत होतेच असे वाटत नाही. तेव्हा अशा सदस्यांना केवळ त्यांना मिपावर कोणी ओळखत नाही म्हणून त्यांना सदस्यत्व नाकारणे योग्य ठरेल का?

अनेकांना सदस्य झाल्यानंतर सर्व इतिहास माहित असतो याचे एक कारण म्हणजे ते सदस्य होण्यापूर्वी बराच काळ मिपावर ’पाहुणे’ या स्वरूपात येऊन काहीही न लिहिता वेगवेगळे लेख नुसते वाचून परत जात असतील हे असेल का?

अर्थात संपादक मंडळात नसलेल्या किंवा संकेतस्थळाच्या तांत्रिक बाबी माहित नसलेल्या माझ्यासारख्यांना बाहेरून असे बोलणे खूपच सोपे आहे. गेल्या काही दिवसात मिपाला त्रास व्हावा म्हणून वेगवेगळ्या पध्दतींनी प्रयत्न करण्यात आला होता याची मला कल्पना आहे. आणि मिपाच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे अनेकांच्या पोटात दुखते हे तर उघडच आहे. तेव्हा मिपावर अनिष्ट प्रव्रुत्ती येऊ नयेत याची काळजी सरपंचमंडळास घ्यावी लागणार हे पण उघड आहे.

तरीही सरसकट सर्वांना कोणाचीतरी ओळख द्यायला लावण्यापेक्षा इतर कोणता मार्ग संपादक मंडळास अवलंबता येईल का? कारण मी जेव्हा मराठी संकेतस्थळांचा सदस्य झालो तेव्हा मला या विश्वात कोणी ओळखत नाही या कारणामुळे मला सदस्यत्व नाकारण्यात आले असते तर मी अनेक चांगल्या गोष्टींपासून वंचित राहिलो असतो असे मला वाटते आणि तसे इतरांच्या बाबतीत होऊ नये असेही मला वाटते.

तेव्हा यातून काही मार्ग निघेल का?

---विल्यम जेफरसन क्लिंटन

सुक्या's picture

6 Mar 2009 - 10:54 pm | सुक्या

कार्यकर्ते / क्लिंटन दोघेही अगदी माझ्या मनातले बोलले. इतरांसारखा मराठी आंतरजालाचा शोध मलाही अपघातानेच लागला. आजची कुठल्याही संस्थळाची रचना पाहता सदस्यत्व नसताना फक्त वाचन करता येते. सदस्य झाल्याखेरिज प्रतिसाद देता येत नाहीत. संस्थळावरच्या इतर सभासदांशीही चर्चा किंवा कॉंटक्ट (मराठी प्रतेशब्द सापडला नाही) करण्यासाठी काही सोय नसते. त्यामुळे नवीन सदस्याला वैध सदस्यत्व घेण्यासाठी कुणाला व कसे विचारावे हा किंवा वैध सदस्याने कुठल्या आधारावर एखाद्याला सदस्य करुन घ्यावे हे दोन्ही प्रश्न आहेत.

तांत्रिक बाबींची मलाही काही कल्पना नाही. परंतु फालतु आय डी रोखण्यासाठी अजुन काही दुसरी उपाययोजना करता येउ शकते का? बाकी मालक, तांत्रिक सल्लागार आणि संपादक मंडळ जो निर्णय घेइल तो मान्य असेलच यात दुमत नाही.

सुक्या (बोंबील)
चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो.

केदार_जपान's picture

7 Mar 2009 - 10:03 am | केदार_जपान

माझेही असेच काहिसे झाले आहे.. ओळखीचा उपाय चांगलाच आहे...पण माझ्या मते, मिपा वर खाते खोलण्याची पद्धत खूप सोपी आहे..तेथे जर अजुन काही माहिती वैगेरे विचारुन घेतली..किंवा e-mail verifications असे जर पर्याय वापरले..तर थोड्याफार प्रमणात याला आळा घालता येइल..

-----------------------------
केदार जोशी

भाग्यश्री's picture

7 Mar 2009 - 10:44 am | भाग्यश्री

याला सहमती..

निदान आधी इमेल व्हेरिफिकेशन ठेवावे.. अर्थात ड्यु इमेल आयडीजही येतात्च म्हणा! :(

असो.. स्टेप उचलताय ही चांगली गोष्ट, मात्र नविन खर्‍या खुर्‍या वाचकांवर अन्याय होईल जरा..

http://bhagyashreee.blogspot.com/

माझ्या मते कोणालाही सदस्य म्हणुन रजिस्टर करताना त्याचा मोबाईल नंबर व्हॅलिडेट करुन घेता येइल.
म्हणजे नविन व जुन्या सदस्याना त्यांचा पासवर्ड मोबाईल नंबरवर पाठवावा आणी मोबाईल नंबरची नोंद करुन घ्यावी.
यामुळे नविन सदस्याना मिपाकर म्हणुन सदस्य तर होता येईलच, आणी डुप्लिकेट आयडींना आळा सुद्धा आपसुकच बसेल कारण त्या व्यक्तीचा मोबाईल नंबर मिपावर नोंद केलेला असेल. नविन आयडी साठी त्याला/तिला नविन मोबाईल नंबर रजिस्टर करावा लागेल.
माझा एक प्रामाणिक विचार...

नविन सदस्याना या विषयावर बोलण्याची परवानगी नसेल तर शब्द मागे घेतो व क्षमस्व..

आपला,
मिपावर नविन व मिपाप्रिय मराठमोळा

लंबूटांग's picture

6 Mar 2009 - 10:43 pm | लंबूटांग

मिपा वर केवळ भारतातीलच नव्हे तर सर्व जगातील मंडळी सभासद म्हणून आहेत. सगळीकडेच text message पाठवणे अशक्य नसले तरी खर्चिक आहे (सर्व देशांमध्ये internet through मेसेज पाठवता येतात का मला माहित नाही). इतरही काही issues आहेत.

माझेच उदाहरण द्यायचे झाले तर अमेरिकेत incoming text message ला सुद्धा पैसे पडत असल्यामुळे मी text message disable केले आहेत.

जर एखादा माणूस cell phone वापरत नसेल तर? (हो हो अजूनही आहेत अशी काही माणसे, उदा. माझ्या घरातलेच उदाहरण आहे :P माझे बाबा.)

मराठमोळा's picture

6 Mar 2009 - 10:52 pm | मराठमोळा

सर्व देशांमध्ये internet through मेसेज पाठवता येतात का?
मिपावर कोणाला य गोष्टीची माहिती आहे का? माझ्या मते पाठवता येतात. आणखी माहिती घ्यावी लागेल.

मराठमोळा.

आंबोळी's picture

6 Mar 2009 - 9:59 pm | आंबोळी

ऑनलाईन असणार्‍या सदस्यांचे आयपी ऍड्रेस त्यांच्या त्यांच्या खात्यात झळकवा.... कुणाला जाउन बघायचे असतील तर खरडी बघतात तसे जाउन बघतील.
कोण फेक कोण डुप्लिकेट लगेच जिथल्या तिथे कळेल....

आंबोळी

सखाराम_गटणे™'s picture

6 Mar 2009 - 10:15 pm | सखाराम_गटणे™

प्रॉक्सी आहे ना लोकांना

----
अगदी निकडीची गरज असताना, जो पाठीत खंजीर खुपसतो, तोच खरा मित्र.

श्रीकृष्ण सामंत's picture

6 Mar 2009 - 11:18 pm | श्रीकृष्ण सामंत

लाविले तात्यानी एक रोपटे
वटवृक्ष कधी झाला न कळे
किलबिल करती अनेक पक्षी
संख्या सभासदांची आहे साक्षी

गिधाडे,घुबडे अन कावळे
कोकिळा, साळूंकी अन बगळे
विश्राम करीती मिळून सगळे

बोलले तात्या त्या वडाला
पाहूनी तुला झालास मोठाला
करू का मज्जाव यापुढे गिधाडाला
दूर्गंधाने कष्ट होई तुझ्या देहाला

स्थितप्रज्ञ तो वटवृक्ष म्हणे तात्याला
मज्जाव आणिशी तू कुणाला कशाला
गिधाडे,घुबडे अन तत्सम ते पक्षी
येतात ते क्षणभर ईथे बसायला
जाणार ते उडूनी पकडण्या भक्षाला
शोधतील मग ते दुसर्‍या वटवृक्षाला

www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

अवलिया's picture

6 Mar 2009 - 11:27 pm | अवलिया

सुंदर कविता!!!

--अवलिया

बिपिन कार्यकर्ते's picture

6 Mar 2009 - 11:35 pm | बिपिन कार्यकर्ते

सामंत काका.... अप्रतिम!!!

बिपिन कार्यकर्ते

चतुरंग's picture

6 Mar 2009 - 11:47 pm | चतुरंग

उच्च कविता!!
अनुभव बोलतात ते असे!!! :)

चतुरंग

मराठमोळा's picture

6 Mar 2009 - 11:25 pm | मराठमोळा

अप्रतिम..सामंत साहेब
काय सुंदर भाव आहेत ह्या कवितेला..

विसोबा खेचर's picture

7 Mar 2009 - 12:14 am | विसोबा खेचर

सगळ्यांच्या मोलाच्या सूचनांबद्दल आभारी आहे..

सामंतकाकांची कविता लै भारी! :)

तात्या.

पक्या's picture

7 Mar 2009 - 12:17 am | पक्या

>>मी जेव्हा मराठी संकेतस्थळांचा सदस्य झालो तेव्हा मला या विश्वात कोणी ओळखत नाही या कारणामुळे मला सदस्यत्व नाकारण्यात आले असते तर मी अनेक चांगल्या गोष्टींपासून वंचित राहिलो असतो असे मला वाटते आणि तसे इतरांच्या बाबतीत होऊ नये असेही मला वाटते.
क्लिंटन शी १००% सहमत. मी पण इथे कोणालाच ओळखत नव्हतो. असेच ब्राउझिंग करताना मिपाचा शोध लागला.

केदार's picture

7 Mar 2009 - 12:29 am | केदार

काही चांगलंचुंगलं ललित, वैचारिक लिहिण्यावचण्यात रस आहे, मिपाच्या कलादालन, रसोई अश्या दालनात रस आहे, अश्यांनाच केवळ मिपाचे सभासदत्व द्यावे असाही एक विचार मनात घोळतो आहे..!
>>> हा रस बरेचदा नंतर सवयीने निर्मान होतो. आणी नविन लेखक तयार होतात.
क्लोजड डोअर पॉलीसी ही कधीही कामाची नाही कारण त्यामूळे हे स्थळ फक्त काही लोकांपुरते मर्यादित होउन जाईल. मग जर तसेच करायचे असले असते तर मिपा सुरु करण्याऐवजी सरळ याहू, गुगल ग्रुप सुरू केला असते तरी चालले असते. ( शिवाय भारताच्या क्लोज डोर पॉलीसीला नंतर कशी घरघर लागली ते आपण पाहिलेच असेल. :) )

ड्यू आयडी चा बाऊ करुन घेऊ नका. हे म्हणने सोपे, करणे अवघड हे मला माहित आहे, पण जितके कमी प्रशासन तितके नागरीक चांगले वागतात हा अनुभव आहे.

स्थितप्रज्ञ तो वटवृक्ष म्हणे तात्याला
मज्जाव आणिशी तू कुणाला कशाला
गिधाडे,घुबडे अन तत्सम ते पक्षी
येतात ते क्षणभर ईथे बसायला
जाणार ते उडूनी पकडण्या भक्षाला
शोधतील मग ते दुसर्‍या वटवृक्षाला

ह्या ओळीत मला जे अनेक वाक्यात मांडायचे होते ते आले आहे. त्यामुळे थांबतो. उगीच मज्जाव नका करु. काहीही फायदा होणार नाही. मुख्य म्हणजे ह्या साइटची उदिष्ट्ये काय आहेत, (कट्टा, साहित्य, लेखन वाचक, टाईमपास की सर्व) ह्याचा विचार तुम्ही स्वतः करायला हवा मग मार्ग आपोआप सुचेल. नविन मित्रांना बंदी घातली तर वैचारिक कुंठा मिपावर खूप लवकर निर्मान होईल.

धमाल नावाचा बैल's picture

7 Mar 2009 - 5:50 am | धमाल नावाचा बैल

जर तसेच करायचे असले असते तर मिपा सुरु करण्याऐवजी सरळ याहू, गुगल ग्रुप सुरू केला असते तरी चालले असते. ( शिवाय भारताच्या क्लोज डोर पॉलीसीला नंतर कशी घरघर लागली ते आपण पाहिलेच असेल.)

सहमत आहे. तात्या आधी तुम्ही स्वत:च डुप्लिकेट आयडी काढणे वगेरे बंद करावे वाटते. मालकच करतो म्हटल्याव पब्लिकला चेवच चढतो. असो लहान तोंडी मोठा घास घेतला असल्यास माफी ! :)

बैलोबा

क्रेग्जलिस्ट.ऑर्ग या संकेतस्थळाप्रमाणे सभासदांना इथल्या वाईट/निरुद्देश/कुचाळ/केवळ त्रास देण्याच्या उद्देशानी किंवा व्यापारी जाहिरात करण्याच्या उद्देशानी केलेल्या/विषयाला धरुन नसलेल्या नोंदी बहुसंख्य मतांनी (फ्लॅगिंग) उडवून लावण्याचा अधिकार द्यावा. लोकशाही तत्त्वांनुसार सामान्यपणे ज्या समूहांमधे किमान सुजाण लोक असतात, असा समूह चांगले स्वयंशासन निर्माण करू शकतो. शिवाय स्थळसंचालनाचे, रोजच्या रोज नोंदींवर लक्ष ठेवण्याचे कामही हलके होईल. ज्या सभासदाच्या जास्तीत जास्त नोंदी अशा तर्‍हेने उडवून लावल्या जात असतील तर त्याला/तिला प्रथम समज (वॉर्निंग) देउन पुन्हा तोच प्रकार होत राहिला तर आपोआप त्याचे/तिचे सभासदत्व रद्द करावे. यासाठी स्थळाच्या संगणक प्रणालीमधे बदल करण्यासाठी वेळ आणि पैसा खर्च होईल, पण दूरचा विचार करता, आणि वाढती सभासदसंख्या पाहता अशी उपाययोजना आताच करणे योग्य राहिल.

माझी वैयक्तिक माहिती कुणी मागत असेल. आणि ती ही मोठ्या प्रमाणावर जाहिर होणार असेल तर जरा अवघड वाटतय.
म्हणजे, मी कदाचित प्रथम भेटित माझी कुठलिच माहिती सहसा उघड(डिसक्लोज) करत नाही.
आता मिपा वरुन ज्यांच्याशी परिचय आहे त्यातिल काही थोरा मोठ्यांकडे म्या पामराची माहिती असेलही,(किंवा चेहर्‍यानं ओळखतही असावेत.)
पण मी पुरेसा(मला पुरेसा वाटणारा(भले ही आंतर जालिय असेल)) परिचय असल्याशिवाय ती उघड करु इच्छित नाही.

कुठल्याही कलाकाराला, आणि आपले "हट के" विचार असणार्‍याला मनापासुन सतावणारी शंका:-
एखाद्याची कलाकारी निनावी रुपात अधिक प्रभावी असु शकत नाही का?
एखाद्याला आपण कोण आहोत हे सांगुन मग आपल्याला काय सांगायचं आहे ते सांगायला संकोच वाटत असला तर?
म्हणजे, तेच दर्जेदार लेखन त्यानं बनावट नावानं लिहिलं आणि कित्येकांना ते आवडलं असही होउ शकतं.
कदाचित माझ्या सारखी दीर्घ काळ एका लोअर मिडल क्लास वातावरणात राहिलेली व्यक्ति अंगात भिनलेल्या संकोचामुळं काही विशिष्ट "विषयां"वर लिहु /बोलु शकत नसेल पण तेच दुसर्‍या आय्डी चा आश्रय घेउन एखादी धमाल चावट कथा(हीन दर्जाची नाही.) किंवा आण्खी चार चौघात बोलता न येणारा विषय धाडासानं मांडत असेल तर काय?

इतके दिवस त्यांना जे मिपा-छत्र उपलब्ध होतं आता ते नाहिसं होइल.
त्यांची क्रीएटिविटि किंवा खरे /प्रामाणिक विचार इतरांपर्यंत पोहोचु शकणार नाहित.
कारण सगळ्यांमध्येच धनंजय ("कोणार्क च्या मंदिरातील शिल्पे") इतकी मानसिक कणखरता असेल असे नाही.
तुर्तास इतकच.

काही मुद्दे विस्तारनं नंतर कधी जमल्यास सांगेन.
वेळेअभावी जास्ती काही लिहिता येत नाहिये.
पण बाकी वाचतो सगळं आहे.

आपलाच,
खर्‍या आय डी ने "किंग एडिपस" / " राजा ओयदीपौस" याबद्दल बोलायला संकोचणारा

मनोबा

धनंजय's picture

7 Mar 2009 - 4:24 am | धनंजय

मी म. सं. च्या दुनियेत आलो तेव्हा मला कोणीच ओळखीचे नव्हते. आता इथे खूप मजा वाटते. कित्येक आयड्यांशी ओळखीसारख्या ओळखी झाल्या आहेत.

(त्यावेळच्या) माझ्यासारखे कोणी आता नवीन मि.पा.वर आले, तर बिना ओळखीने त्या नव्याला सदस्य कसा होईल?

असो. मि.पा.ला बनावट किंवा खोडसाळ आयडींच्या वादळातून स्वतःचा बचावही करायचा आहे. म्हणून सूचनेचे स्वागत, अनुमोदन वगैरे करतो आहे.

दशानन's picture

7 Mar 2009 - 1:41 pm | दशानन

अडचण आली आहे.

मला कुणाला खरडी व व्यनी पाठवता येत नाही आहे , माझे अधिकार काढून घेतले आहेत असा मॅसेज येत आहे

You are not allowed to post in this guestbook. हा संदेश येत आहे ?

माझ्या कडून काही चुकले का ?

मलाच कळत नाही आहे काय झालं :(

विसोबा खेचर's picture

7 Mar 2009 - 3:42 pm | विसोबा खेचर

काही काम, काही चाचण्या सुरू आहेत..

तात्या.