<तूच आहेस तो!!>

पिवळा डांबिस's picture
पिवळा डांबिस in जे न देखे रवी...
3 Mar 2009 - 4:32 am

(प्रेरणा: शरदिनी यांची याच नांवाची कविता! कृपया ह. घ्या!)

शिजत जाणारे लुसलुशीत तुकडे
मोगलाई रश्श्यात रटरटतांना....

कुणी धाडलंय तुला
अन्वर खाटकाच्या दुकानी
माझ्या सुखावलेल्या देहसावलीवर
आणखी मस्ती चढवायला....

पण चालेल,
मुखात विरघळणारा तुझा तो स्पर्श
आणि ती रुचकर देणगी पचवतांना
तृप्त समाधानाचा चोरटा ढेकर...

(गेल्या रविवारी आमच्यासाठी बलिदान करणार्‍या त्या अनामिक बोकडास अर्पण!!!!)

गुंतवणूकविडंबनआस्वाद

प्रतिक्रिया

नाटक्या's picture

3 Mar 2009 - 4:50 am | नाटक्या

तृप्त समाधानाचा चोरटा ढेकर...

वा!! पिडाकाका जियो.. आमच्या घरी पण रविवारी बोकडच होता. आठवणीने पाणी आले (तोंडात)... :-)

- नाटक्या

घाटावरचे भट's picture

3 Mar 2009 - 4:57 am | घाटावरचे भट

कडक!!

चतुरंग's picture

3 Mar 2009 - 5:19 am | चतुरंग

ज ह ब ह र्‍या हा!!
आमचे मनोरथ इतक्या डांबीसपणे पूर्णत्त्वास नेल्याबद्दल अभिनंदन!! ;)

(खुद के साथ बातां : चला रंगा, अजून एक विडंबक सामिल झाला बघ गोतावळ्यात! ;) )

चतुरंग

विनायक प्रभू's picture

3 Mar 2009 - 6:52 am | विनायक प्रभू

भारी विडंबन

प्राजु's picture

3 Mar 2009 - 9:38 am | प्राजु

हे वाचलच नव्हतं..
मस्तच!!!
मला वाटलं ते वस्तुनिष्ठ तुम्ही आहात.
माफ करा.. पण हा हलाल मस्त जमला आहे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

पिवळा डांबिस's picture

3 Mar 2009 - 9:57 am | पिवळा डांबिस

मला वाटलं ते वस्तुनिष्ठ तुम्ही आहात.
नाही!
आमचा मिपावर एकमेव आय्डी आहे...
पिवळा डांबिस!

विसोबा खेचर's picture

4 Mar 2009 - 10:44 am | विसोबा खेचर

डांबिसा,

तुला साक्षात दंडवत रे बाबा! :)

लै म्हण्जे लैच भारी इडंबन..

आपला,
(मटणप्रेमी) तात्या.