माय व्हॅलंटाईन

दशानन's picture
दशानन in जनातलं, मनातलं
12 Feb 2009 - 5:19 pm

माय लास्ट व्हॅलंटाईन !

कशी आहेस तु ? आनंदात आहेस ना ? मला विसरली आहेस ना आता नक्कीच ? असे अनेक प्रश्न मला विचारायचे आहेत गं. पण त्या प्रश्नांना तुझ्या पर्यंत कसे पोहचवू ! चल हरकत नाही मी पाहतो आहे ना तुला ह्यातच आनंद आहे ! तुला जाणवत नसेल की मी तुझ्या आसपास आहे.. माझं मन तुझ्याच आसपास घुटमळत आहे... !

कित्येक वर्ष झाली मला तुला काही गिफ्ट देऊन पण.. तुला आठवतं का ? आपला लास्ट व्हॅलंटाईन डे ? नेहमी प्रमाणेच मी आलो होतो तुझ्या जवळ... पण आपल्या बाबांना आसपास पाहून नजरेच खुणवले होते... नंतर .. कसं विसरु ते मी ! तु दिलेले एकएक गिफ्ट माझ्या घरी अजून ही असेल. ... ती कोमजलेली फुलं.. तो माझ्या नावाचा काचेचा गोलक.. ते तु दिलेला.. पेन .... ती ग्रिटिंग कार्डस... सर्व काही आहे अजुन ही माझ्या बॆगेत.. ! मी दिलेले गिफ्ट तु असेच जपुन ठेवले आहेस का ? ह्म्म.. नसावी.. तु नाही ठेवणार मला माहीत आहे... ! हरकत नाही..!

तु नेहमी म्हणायचीस .. आपलं प्रेम कसं नजर लागण्यासारखं आहे नाही... लोकांना तर नवल वाटत असे... ही विचित्र जोडी पाहून... तु परी सारखी रेखीव व मी असाच नमुना ! तरी ही आपलं प्रेम फुललं पण न जाने कुनाची नजर लागली... असल्याचं नसलेले झालं ! हरकत नाही यार हे सगळे माझं नशीब खोटं ... त्यामुळे !

तुझ्या प्रत्येक शब्दांना मी जपावं व तुझ्या साठीच शेवट पर्यंत श्वास घ्यावा, हा असला विचार मी खुप वेळा केला.... व्हॅलंटाईन डे आला परत.. दर वर्षी येतो... ह्यावेळी पण आला ! तुझी आठवण आली... ! येऊ नये ह्यासाठी खुप प्रयत्न केला.. पण मी वेडा.. !
तुझ्याच आठवणीमध्ये झुरतो.. आहे.. असाच.. वेड्यासारखा ! कधी तरी जाईन ही हे जग सोडून.. तेव्हा मात्र मला खरोखर आनंद मिळेल.. मुक्त झाल्याचा आनंद !

तसं पाहता ह्या दिवसाचं मला काहीच अप्रुप नाही गं .... असे अनेक दिवस येतात जाता.. प्रेमी-प्रेमिका आपले मनातील प्रेम व्यक्त करण्यासाठी हाच दिवस वापरतात... सगळेच वापरतात म्हणून मी देखील वापरत होतो बस्स ! पण आज तु जवळ नसल्यावर मला खरंच ह्या दिवसाचं महत्व कळालं गं ! कधीच आठवण येऊ देत नाही मी तुझी... पण ह्या दिवशी मी मात्र असाह्य होतो... अगनिक एसएमएस.. मेल... मित्रांचे संदेश.. व प्रत्येकामध्ये.. प्रेमाचा इजहार ! कसं गुदमरल्या सारखं होतं मला हे तुला नाही समजणार कधी ! तु कधी आपलं कोणीतरी हरवलं आहे.. दुर गेलं आहे... असा विचारचं केला नसशील त्यामुळे तुला काहीच वाटत नसेल ... त्यामुळेच तुला कळनार नाही विरहाचं दुख: काय.. आहे... माझ्या मनाची उलाघाल समजणं तुला जमणारच नाही... शक्यतो हे सगळे माझ्या मनाचे खेळ आहेत हे मला ही माहीत आहे.. .. तु आता माझी नाहीस हे देखील.. पण कधी तरी... कुठल्यातरी जन्मामध्ये तु फक्त माझीच होण्यासाठी नक्कीच ये ...

******************

काही नाती... कधीच जुळत नाही ! पण त्या नात्यांच्या मुळे होणा-या अगणिक जखम घेऊन कोणी तर असाच माझ्या सारखां अश्वथामा वावरत असेल... कुठे तरी... बाबा रे... हे दुख:.. प्रेम... नशा... काहीच नाही रे ! उगाच झुरत नको बसू.... कुठल्यातरी... कोप-यावर.. जिवनाच्या अनोळखी वळणावर... कोणी ना कोणी तर आपलं भेटेल... त्याचा हात पकड ! जगण्यातला आनंद तुला नक्कीच सापडेल रे भावा ! आम्ही काय रे ! आलो काय गेलो काय.... आता संपलोच आहे... असाच एखादा क्षण मला मुक्त करुन जाईल !

त्या दिवशी... माझा व्हॅलंटाईन पण माझ्या ऋणातून व मी त्याच्या ऋणातून मुक्त होईन.

*******************
दिल-ए-नादान अजब जुस्तजू में क्यूँ है
तुझसे शौक-ए-गुफ्तगु में क्यूँ है
मैंने चाहा है बहुत तुझ को
तु मेरी हर एक आरजू में है
तु मेरे साथ है तो लगता है ऐसे
एक उजाला सा मेरी रूह में है
जुदा खुद से करूं तो कैसे करूं
तेरी चाहत तो गर्दिश-ए-लहू में है। - अनाम कवी

जीवनमानलेखविरंगुळा

प्रतिक्रिया

Dhananjay Borgaonkar's picture

12 Feb 2009 - 5:28 pm | Dhananjay Borgaonkar

तौबा तेरा जलवा तौबा तेरा प्यार|
तेर इमोशनल अत्याचार||

चालायचच मित्रा...भेतेल तुला कधितरी तुझि..

आनंदयात्री's picture

12 Feb 2009 - 5:45 pm | आनंदयात्री

मस्त लिहलं आहेस राज.

शेखर's picture

12 Feb 2009 - 5:50 pm | शेखर

असेच म्हणतो....

बिपिन कार्यकर्ते's picture

13 Feb 2009 - 2:46 pm | बिपिन कार्यकर्ते

सहमत. सुंदर.

बिपिन कार्यकर्ते

घासू's picture

12 Feb 2009 - 5:46 pm | घासू

प्रेमात हरणं म्हणजे.......... छे! ऋण वैगरे सोडा आणि मजेत जीवन जगा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Feb 2009 - 5:55 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

व्हॅलंटाईनच्या आठवणी भारीच लिव्हल्यात.

आम्ही काय रे ! आलो काय गेलो काय.... आता संपलोच आहे... असाच एखादा क्षण मला मुक्त करुन जाईल !

अशी अवस्था लै बेक्कार रे ! दुश्मनावर नको असा प्रसंग. लिव्हीत राव्हा.

मिंटी's picture

12 Feb 2009 - 5:57 pm | मिंटी

राज......अरे काय हे........ छ्या ..... माझ्याकडे शब्दच नाहीत काही लिहायला...... पण मस्त आहे जे लिहिलं आहेस ते......

अवांतर : आज काय तु आणि आंद्यानी असं इमोशनल लिहायचं असं ठरवलं आहे का ? सकाळी सकाळी आंद्याचा हळवा लेख आणि आत्ता घरी निघताना तुझा एवढा हळवा लेख.......

परिकथेतील राजकुमार's picture

12 Feb 2009 - 5:58 pm | परिकथेतील राजकुमार

तोडलस मित्रा !!

|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य

टारझन's picture

12 Feb 2009 - 8:39 pm | टारझन

फोडलंस मित्रा .. अगदी चेंदामेंदा केलास ..

शितल's picture

12 Feb 2009 - 6:33 pm | शितल

राजे,
साजंर लिवल पण कशाला मिपाकरांसनी रडावतासा. :)

दशानन's picture

12 Feb 2009 - 6:59 pm | दशानन

>>मिपाकरांसनी रडावतासा.

नाय वं !
कुणाच्यातरी डोळ्यातलं पाणी पुसतो आहे फक्त !

कपाट रिकामं करतोय... नाना सारखं .. काय पण घेऊन जायला नको तीकडं !

*******

शब्दांच्या पलिकडे सुध्दा जग असतं,
काही गोष्टी नजरेने बोलल्या जातात !
फक्त होकार च नाही तर,
प्रेमाला नकारांची सुध्दा झालर असते !

टारझन's picture

12 Feb 2009 - 11:06 pm | टारझन

साल्या ... म्हणूनच तु मिपाचा "अकला बुकल" आहेस ...

अवलिया's picture

12 Feb 2009 - 7:02 pm | अवलिया

हम्म

चालु द्या खपल्या काढणे... परवा रात्री बसु आपण ...

--अवलिया

दशानन's picture

12 Feb 2009 - 7:03 pm | दशानन

नक्कीच !

:)

*******

शब्दांच्या पलिकडे सुध्दा जग असतं,
काही गोष्टी नजरेने बोलल्या जातात !
फक्त होकार च नाही तर,
प्रेमाला नकारांची सुध्दा झालर असते !

ब्रिटिश's picture

12 Feb 2009 - 11:04 pm | ब्रिटिश

मास्तरकड जा रं परत

अच्छी पीओ खराब पीओ, जब भी पीओ शराब पीओ.
मिथुन काशिनाथ भोईर

विनायक प्रभू's picture

14 Feb 2009 - 11:42 am | विनायक प्रभू

मी कुठे जाउ?

आपलाभाउ's picture

12 Feb 2009 - 8:41 pm | आपलाभाउ

आम्हाला पन बोल्वा म्हन्गे झाल

प्राजु's picture

12 Feb 2009 - 7:48 pm | प्राजु

तुमचा कितीवेळा प्रेमभंग झाला आहे हो?? ;)
नाही.. म्हणजे इतकं लिहिण्यासाठी अनुभव भरपूर लागतो म्हणून विचारलं..(ह. घ्या.)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Feb 2009 - 7:49 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तुमचा कितीवेळा प्रेमभंग झाला आहे हो??
सहमत आहे ! असेच विचारतो.

दशानन's picture

13 Feb 2009 - 6:46 am | दशानन

>>>तुमचा कितीवेळा प्रेमभंग झाला आहे हो??

=))

प्राजु बेस्ट प्रतिसाद !!!!!

* सगळीच प्रेमप्रकरणं माझीच आहेत असं नाही ;) काही अश्वथामा आमच्या पार्टीला बसतात कधी कधी... !

*******

शब्दांच्या पलिकडे सुध्दा जग असतं,
काही गोष्टी नजरेने बोलल्या जातात !
फक्त होकार च नाही तर,
प्रेमाला नकारांची सुध्दा झालर असते !

शंकरराव's picture

13 Feb 2009 - 3:33 am | शंकरराव

राजे लई नाजुक लिवलय.. मन हळ्व झाल...
प्रत्येक वोळीला यक शेर सुचला काय सांगू लई आर्तता हाये .. लिहीत राहा. लाजवाब..

: : सध्या माझां बोड जाग्यावर नाय असां... मधेच उर्दूचां भूत मनांत घुसलांसा...
मी कोकणी माणूस आसंय, वेंगुर्लां माझो गाव...
माका खराटो विकत घेवचो आंसा, ह्या उर्दूचो झाडू बांधूक.....
मराठीचा उतारा पाहीजे असा....

शंकरराव देसाई (५,सावेंची वाडी, वेंगुर्ले)

आपलाभाउ's picture

12 Feb 2009 - 8:38 pm | आपलाभाउ

आरे माझा भावा काळजि करु नको,भेटेल कोनितति तुला आनि माला पन्...............ओके मगtenshion kay ko leneka

विसोबा खेचर's picture

12 Feb 2009 - 10:38 pm | विसोबा खेचर

लै भारी!

टारझन's picture

12 Feb 2009 - 11:07 pm | टारझन

लै भारी!

वा ! लै भारी ;)

गरम मसाला's picture

13 Feb 2009 - 3:44 am | गरम मसाला

काही नाती... कधीच जुळत नाही ! पण त्या नात्यांच्या मुळे होणा-या अगणिक जखम घेऊन कोणी तर असाच माझ्या सारखां अश्वथामा वावरत असेल... कुठे तरी... बाबा रे... हे दुख:.. प्रेम... नशा... काहीच नाही रे ! उगाच झुरत नको बसू.... कुठल्यातरी... कोप-यावर.. जिवनाच्या अनोळखी वळणावर... कोणी ना कोणी तर आपलं भेटेल... त्याचा हात पकड !

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
पण या नविन नात्याची ताकद जुन्या (न जुळ्लेल्या ) नात्याचा ठसा मिटवु शकेल का नाही याबाबत अजुनही मनात शंका उभी करते...

जख्मा कशा सुगन्धी झाल्यात काळजाला
जख्मा कशा सुगन्धी झाल्यात काळजाला

केलेत वार ज्याने तो मोगरा असावा....!

दशानन's picture

13 Feb 2009 - 6:45 am | दशानन

>>पण या नविन नात्याची ताकद जुन्या (न जुळ्लेल्या ) नात्याचा ठसा मिटवु शकेल का नाही याबाबत अजुनही मनात शंका उभी करते...

सहमत. पण तीच्या प्रेमामध्ये ती ताकत असेल तर नक्कीच मागचे सर्व ठस्से पुसले जातील मित्रा !

*******

शब्दांच्या पलिकडे सुध्दा जग असतं,
काही गोष्टी नजरेने बोलल्या जातात !
फक्त होकार च नाही तर,
प्रेमाला नकारांची सुध्दा झालर असते !

अनिल हटेला's picture

13 Feb 2009 - 12:30 pm | अनिल हटेला

लाजवाब शेर मसाल्याचा !!!

राजे ,
अश्वत्थाम्याची भेट आवडली !!!

:-)
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

दशानन's picture

13 Feb 2009 - 12:54 pm | दशानन

अजून खुप आहेत... भेट घालू का :?

भिरभिर फिरलो उन्हातानात मी !
चकरा मारल्या अनंत मी !
तुला पाहण्यासाठी...
यमालाही थोपवलं मी !

पण आता बाय-बाय =))

अनिल हटेला's picture

13 Feb 2009 - 1:01 pm | अनिल हटेला

नक्कीच !!

(वन & ओन्ली )
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

वाहीदा's picture

13 Feb 2009 - 1:48 pm | वाहीदा

बंदे कुछ कर हिंमत ,
और हिला दे हिमालय को .... (यानी तुम्हारे प्यार को ...)
या तो फिर थोडी पी ले,
और हिलता दे़ख हिमालय को ;-)

दशानन's picture

13 Feb 2009 - 4:31 pm | दशानन

:)

छान !
***

दिल-ए-नादान अजब जुस्तजू में क्यूँ है
तुझसे शौक-ए-गुफ्तगु में क्यूँ है
मैंने चाहा है बहुत तुझ को
तु मेरी हर एक आरजू में है
तु मेरे साथ है तो लगता है ऐसे
एक उजाला सा मेरी रूह में है
जुदा खुद से करूं तो कैसे करूं
तेरी चाहत तो गर्दिश-ए-लहू में है।

असाच कुठला तरी कवी लिहून गेला आहे ;)

प्रभाकर पेठकर's picture

13 Feb 2009 - 3:06 pm | प्रभाकर पेठकर

तू नही तो और सही,
और कहीं और नही?
इस दुनियामें सनम,
तू अकेली ही नही....|

दारूने प्रश्न सुटत नाहीत, पण दुधाने तरी कुठे सुटतात?

राघव's picture

13 Feb 2009 - 5:33 pm | राघव

छान लिहिलंय. लिहित रहा.
बाकी, जगातली दु:खं पाहिल्यानं आपल्या दु:खांची जाणिव कमी होते. जगातली सुखं पाहिल्यानं आपण सुखी होतो. नाही?
मुमुक्षु

त्रास's picture

14 Feb 2009 - 12:33 pm | त्रास

तुमच्या कालिजाचा आळूमिनी डे कधी आहे? तवा भेटेल ती तुम्हाला. काय सॅन्टी होवुन राहिला राव.

विनायक प्रभू's picture

14 Feb 2009 - 12:49 pm | विनायक प्रभू

अहो भेटली तरी काय उपयोग? त्रास वाढेल. आकारमानातला फरक बघुन.

दशानन's picture

14 Feb 2009 - 12:50 pm | दशानन

=))

धन्य आहात मास्तर !

:) Keep Smiling !!!!!!
It Is The Second
Best Thing U Can Do
With Your Lips! ;)