उन्मुक्त

जयवी's picture
जयवी in जे न देखे रवी...
29 Jan 2009 - 2:32 pm

देहफुले उमलवून
मुक्त तू उन्मुक्त तू
तुफानी प्रीत सरी
उधळूनी रिक्त तू

झेलूनी तुझा प्रपात
नखशिखान्त नाहते
प्रणयाचा मी मरंद
मनमुराद चाखते

दाहक कोसळ तुझा
उतरतो नसानसात
मदहोशी पसरते
गात्रातून अंतरात

वितळते मिठीत मुग्ध
बेहोषी धुंद धुंद
उन्मेषी श्वासांची
लयकारी मंद मंद

जयश्री अंबासकर

प्रेमकाव्यप्रकटन

प्रतिक्रिया

शेखर's picture

29 Jan 2009 - 2:39 pm | शेखर

सुंदररित्या शब्द बद्ध केलय. कुठेही अश्लीलता जाणवत नाही.

झेलूनी तुझा प्रपात
नखशिखान्त नाहते
प्रणयाचा मी मरंद
मनमुराद चाखते

हे तर खासच.

शेखर.

नितिन थत्ते's picture

29 Jan 2009 - 2:45 pm | नितिन थत्ते

सुंदर

आज छोट्या ओळींच्या कवितांचा दिवस दिसतोय. (ह. घ्या)

खराटा
(येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)

नीलकांत's picture

29 Jan 2009 - 2:54 pm | नीलकांत

सपुर्ण कविता आवडली.

नीलकांत

अवलिया's picture

29 Jan 2009 - 2:59 pm | अवलिया

हेच बोलतो

--अवलिया

काय तुम्ही संपर्कासाठी व्यनी वापरता? खव नाही? अरेरे!!! मग मिपाच्या गुढ इतिहासात कशी भर टाकणार?
व्यनी सोडा खव वापरा.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

29 Jan 2009 - 3:29 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

खरंच आवडली (=> कळलीही)

एक शंका: मरंद म्हणजे मकरंदच का?

अदिती
आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.

जयवी's picture

29 Jan 2009 - 9:16 pm | जयवी

अदिती..... मरंद म्हणजेच मकरंद :)

जयवीताई,
नेहमी प्रमाणे खुप सुंदर कविता केली आहेस. :)
संपुर्णच कविता आवडली. :)

लिखाळ's picture

29 Jan 2009 - 10:22 pm | लिखाळ

कविता आवडली.
मरंद हा शब्द प्रथमच वाचला.

उन्मेष म्हणजे अंकूर किंवा असेच काही ना? नवनवोन्मेषशालिनी लेखणी :)
उन्मेषी श्वास म्हणजे काय?
-- लिखाळ.

प्राजु's picture

29 Jan 2009 - 11:24 pm | प्राजु

वेगळी लय आहे..
मरंद, लयकारी.. सुंदर शब्द रचना... खासच.
सुरेखच कविता आहे.

वितळते मिठीत मुग्ध
बेहोषी धुंद धुंद
उन्मेषी श्वासांची
लयकारी मंद मंद

जबरदस्त!

- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

बेसनलाडू's picture

30 Jan 2009 - 12:00 am | बेसनलाडू

आवडली.
(मंद-धुंद)बेसनलाडू

चतुरंग's picture

30 Jan 2009 - 12:23 am | चतुरंग

नादमय कवितेसाठी अभिनंदन! :)

चतुरंग

संदीप चित्रे's picture

30 Jan 2009 - 12:26 am | संदीप चित्रे

'मरंद' हा नवीन शब्द समजला जयश्री ... धन्स...
कविता आवडली(च) हेवेसांन :)

आनंदयात्री's picture

30 Jan 2009 - 11:52 am | आनंदयात्री

आवडली कविता.

अनिल हटेला's picture

30 Jan 2009 - 12:42 pm | अनिल हटेला

सुंदर कविता !!!

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

साती's picture

30 Jan 2009 - 3:05 pm | साती

जयश्री, मस्त कविता.
खूप दिवसांनी आलीस.
साती

विसोबा खेचर's picture

30 Jan 2009 - 6:17 pm | विसोबा खेचर

आयला! कविता लैच मादक आहे! जियो..!

तात्या.

दत्ता काळे's picture

31 Jan 2009 - 6:47 pm | दत्ता काळे

वितळते मिठीत मुग्ध
बेहोषी धुंद धुंद
उन्मेषी श्वासांची
लयकारी मंद मंद

व्वा ! हे तर फार सुंदर . . .

विंजिनेर's picture

31 Jan 2009 - 7:34 pm | विंजिनेर

कविता छानच आहे.
पण मला "उन्मेष" चा अर्थ कळला नाही.
कोणी सांगेल काय?

प्रमोद देव's picture

15 Feb 2009 - 11:09 am | प्रमोद देव

उन्मुक्तची चाल इथे ऐका!

पिवळा डांबिस's picture

15 Feb 2009 - 12:54 pm | पिवळा डांबिस

प्र.का. टा. आ.

विसोबा खेचर's picture

15 Feb 2009 - 12:41 pm | विसोबा खेचर

काका, चाल छान आहे.. :)

काही वेळेला गजाननराव वाटव्यांचा पगडा वाटतो.. :)

आपला,
(वाटवेप्रेमी) तात्या.