मूळचे केरळचे रहिवासी असलेले रेनिल्सन आणि निशा आपल्या तीन वर्षे वयाच्या मुलीबरोबर घरी परत जात होते.प्रवासात त्यांच्या गाडीला अपघात झाला त्यात निशा जागीच ठार झाल्या. रेनिल्सन यांना अनेक फ्रॅक्चर्स झाली. छोट्या तमन्नाला जबर दुखापत झाली. डॉक्टरांनी तमन्नाला ब्रेन डेड घोषित केले. ही घटना 20 जानेवारीची.
पत्नी अपघातात गेलेली, स्वत: मणिपाल येथील हॉस्पिटल मधे जखमी अवस्थेत अशा परिस्थितीत देखील रेनिल्सन यांनी अपूर्व मनोधैर्य दाखवत स्वत:चे दु:ख बाजूला ठेवून तमन्नाचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. आणि तिचे हृदय, यकृत,आणि मूत्रपिंड दान करण्यासाठीच्या कागदपत्रांवर सह्या केल्या.
ह्यामुळे तीन जणांना जीवनदान मिळाले आहे. अहमदाबाद येथील 21 महिन्याच्या एका बालकाला तमन्नाचे हृदय बसवण्यात आले आहे. अडीच वर्षाच्या एका मुलीला तमन्नाचे यकृत तर साठ वर्षे वयाच्या एकाला मूत्रपिंड बसवण्यात आले आहे.
सकाळटाइम्स मध्ये ही बातमी वाचल्यानंतर असं नक्कीच मनात येऊन गेलं की देव करो आणि असा प्रसंग आपल्यावर न येवो. पण आलाच तर असं अतुलनीय धैर्य आणि दात्रुत्व मला दाखवता आले असते ?
उत्तर नाही असंच आलं असतं बहुधा.
तमन्ना आणि तिचे वडील रेनिल्सन यांना माझे लाख प्रणाम.
प्रतिक्रिया
26 Jan 2009 - 12:30 pm | दशानन
माझे ही प्रणाम !
त्यांना !
अश्या बातम्या... प्रथम पानावरचं यायला हव्यात.. !
पण
स्वत: मणिपाल येथील हॉस्पिटल
काही समजले नाही व्यवस्थीत.. जरा पुन्हा बघता का ? काही चुकलं आहे शक्यतो.
देहदानाचा संकल्प केलेला !
राज जैन
*******
सध्या आम्ही ... ह्यावर नाचतो आहोत !!!
अफलातून गाणं आहे... ए.आर. रहमान जबरदस्त !
26 Jan 2009 - 12:40 pm | ढ
रेनिल्सन हे मणिपाल हॉस्पिटल मधे सर्जरीतून रिकव्हर होत असताना त्यांनी सही केली
असं हवं होतं.
धन्यवाद चूक दाखवून दिल्याबद्दल.
26 Jan 2009 - 12:42 pm | नीलकांत
आपलं आयुष्य उध्वस्त झालेलं असल्यावर सुध्दा इतरांचा विचार करणार्या रेनिल्सन यांना प्रणाम.
नीलकांत
27 Jan 2009 - 9:46 am | छोटा डॉन
>>आपलं आयुष्य उध्वस्त झालेलं असल्यावर सुध्दा इतरांचा विचार करणार्या रेनिल्सन यांना प्रणाम.
सहमत आहे ...
एकदम प्रशंसनीय कार्य. आमचा सलाम रेनिल्सनला ...!
------
छोटा डॉन
27 Jan 2009 - 9:06 am | शाहरुख
माझेही लक्ष लक्ष प्रणाम !!
27 Jan 2009 - 9:19 am | सहज
सलाम!!!
अश्या बातम्या... प्रथम पानावरचं यायला हव्यात.. !
राजेंशी सहमत.
27 Jan 2009 - 9:45 am | आचरट कार्टा
रेनिल्सन सरांना लाख प्रणाम...
>>>अश्या बातम्या... प्रथम पानावरचं यायला हव्यात.. !
अगदी खरं.
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या एका भाषणात हा मुद्दा आला होता. त्यांनी एक उदाहरण दिलं होतं. जेव्हा इस्राईल वर प्रचंड बॉम्बहल्ले झाले होते, सगळं विस्कळीत व्हायला आलं होतं, त्या दिवशी ही वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर एका यशस्वी प्रयोगशील शेतकर्याची माहिती होती!
त्यांच्याच शब्दात सांगायचं, तर "It was the picture whole Israil woke up to..."
----------------------------------------------------------------------
अपन को क्या...? दिल बोले, तो डन !
29 Jan 2009 - 12:15 am | भास्कर केन्डे
अश्या बातम्या... प्रथम पानावरचं यायला हव्यात.. !
सहजरावांचा प्रतिसाद वाचून माझ्याही मनात डॉ कलामांनी मांडलेला हाच मुद्दा मनात आला होता. अगदी सहमत.
रेनिल्सन यांना लक्ष-लक्ष प्रणाम!
आपला,
(नम्र) भास्कर
27 Jan 2009 - 10:12 am | दिपक
अतुलनिय कार्याला आमचाही सलाम ! समर्पक शिर्षक ’तेथे कर माझे जुळती’.
--दिपक
28 Jan 2009 - 11:25 pm | विसोबा खेचर
तमन्ना आणि तिचे वडील रेनिल्सन यांना माझे लाख प्रणाम.
माझाही सलाम.!
तात्या.
28 Jan 2009 - 11:38 pm | शितल
>>तमन्ना आणि तिचे वडील रेनिल्सन यांना माझे लाख प्रणाम.
हेच म्हणते.
पण नुसते त्यांना प्रणाम न करता आपण ही आपल्या शरीराचे अवयव आपण मृत झाल्यावर एखाद्याला दान करून शकतो त्यासाठी तसा अर्ज भरून ठेवावा लागतो आणी आपल्या जवळच्या व्यक्तींना त्याची कल्पना द्यावी लागते.
मी स्वतः माझ्या आणि माझी आई आम्ही दोघींनी अशी तयारी दर्शवली आहे.
28 Jan 2009 - 11:53 pm | वेताळ
खरोखर खुप अतुलनिय व मानवतेचे काम रेनिल्सन ह्यानी केले आहे.
वेताळ
29 Jan 2009 - 12:10 am | विकास
"तेथे कर माझे जुळती.." हेच योग्य शब्द आहेत!
ही बातमी येथे सांगितल्याबद्दल आपलेही आभार!