तात्या, ऋषिकेश, विनायक..
आपण तर एकदम भरारीच मारलित.. जरा कामात होते आज म्हणून नाही जमलं यायला मिपावर.
तात्या,
तुम्ही उत्तम खोटंही बोलू शकता हे कळंल मला. इतक्या छान चारोळ्या लिहिल्यात इथे आणि पद्यातलं मला कळंत नाही हे असं म्हणंण म्हणजे चारोळी लिहिण्याचा कंटाळा.. असंच आहे ना?
असो..
आठवणींचा खेळ हा
जीवघेणा असतो..
विचारांचा मेळ तो
कधी , का जुळत असतो??
सुन्या,अरे खोलवर विचार केल्यास कधी कधी असे आढळते की,ज्या गोष्टी आपण चार ओळीत सांगू शकत होतो त्या साठी आपण विनाकारण शंभर ओळी वाया घालवल्या.
इंग्रजीत एक म्हण आहे की, "व्हेन अ वर्ड इस इनफ्,डोंट युज दि अनदर वर्ड."
प्रतिक्रिया
15 Jan 2008 - 3:59 am | ऋषिकेश
धागा ३ मधील विनायकचा शेवटचा धागा:
मिटणं म्हणजे प्रेम
असंही म्हणता येतं...
प्रेमाशिवाय तरी कुठे
जिवन हे जगता येतं...
:
:
:
पुढे चालू.....
प्रेमाचा प्रत्येक रंग
मला तुझ्यामधे दिसतोय
तुझ्यातील रंगांमुळेच
मी प्रेम करायल शिकतोय
15 Jan 2008 - 4:09 am | प्राजु
रंगात रंगूनी तुझीया
जाहले मी बावरी
कान्हाच्या ओठातील
जाहले मी पावरी
- प्राजु.
15 Jan 2008 - 6:18 am | ऋषिकेश
जाहलो मी पावरी ...
जी वाजे तुझ्याच फुंकरीने
सितारही होतो मी...
झंकारते मात्र तुझ्याच स्पर्शाने
15 Jan 2008 - 8:08 pm | प्राजु
स्पर्श तुझ्या ओठांचा
अलगद माझ्या ओठी
गुलाब माझ्या मनीचा
बहरला तुझ्याच साठी..
- प्राजु
16 Jan 2008 - 12:35 am | इनोबा म्हणे
तूझ्या ओठांची मदिरा
अलगद मी प्यालो,
बहरला प्रेमाचा फुलोरा
धन्य मी झालो...
(......) -इनोबा
15 Jan 2008 - 8:17 pm | ऋषिकेश
बहरला तुझ्याच साठी हा
फुलोरा माझिया स्वप्नांचा
स्पर्शाने रोचक जाहला
सोहळा स्वप्न नव्हे सत्याचा
15 Jan 2008 - 8:39 pm | विसोबा खेचर
मनोगत ते मिसळपाव
via उपक्रम,
उगीच नका लागू नादी
तात्या आहे चक्रम!
:)
15 Jan 2008 - 8:40 pm | ऋषिकेश
सहि आहे की.. जमल रे जमलं!! :))
15 Jan 2008 - 8:55 pm | विसोबा खेचर
लोकशाहीवादी संकेतस्थळ
ठरली एक वदंता
आणिबाणीमुळे अता
मिपावर नांदते शांतता!!
:))
आपला,
मुशर्रफ तात्या.
15 Jan 2008 - 9:05 pm | विसोबा खेचर
मराठी संस्थळांच्या मांदियाळीत
आहेत दिग्गज दिग्गज स्थळं
मिपाने आत्ता कुठे
सारवायला घेतलंय खळं!
:)
तात्या.
19 Jan 2008 - 6:11 am | अघळ पघळ
चारोळ्या म्हणजे लग्नातले उखाणे असल्याच्या ठेक्यात बांधल्या आहेत तुम्ही तात्या :)))
15 Jan 2008 - 9:13 pm | राजे (not verified)
ज्याने केला ह्या संकेतस्थळाचा नाद
तो झाला बाद
ज्याने केला ह्या संकेतस्थळाचा उपयोग
त्याच्या माथी मार फलयोग
जो लिहता झाला मिसळीवर
त्याच्या नशिबी राज योग
राजे
(*हेच राज जैन आहेत)
माझे शब्द....
15 Jan 2008 - 9:26 pm | विसोबा खेचर
मिसळीत रमले
ते लिहिते झाले
रुसू बाई रुसूवाले
मन उडून निघून गेले!
:)
16 Jan 2008 - 12:30 am | इनोबा म्हणे
"आम्हाला काव्यात्मक लिहिता आले तर शप्पथ" म्हणाणारे तात्या तुम्हीच का?
चालू दे,तुमच्यासारख्या दिग्गजांची साथ मिळाली तर आमच्यासारख्यांना आणखी चेव येतो.
(तात्याचा मावळा) -इनोबा
16 Jan 2008 - 12:53 am | इनोबा म्हणे
का रुसतेस तू माझ्यावर,
अशी का तू मूक झाली?
'आपलं' म्हणून हक्काने बोललो,
हीच का माझी चूक झाली?
(रुसवा सोड सखे...) -इनोबा
16 Jan 2008 - 1:35 am | ऋषिकेश
हीच का माझी चूक झाली?
की मी अचानक जाहलो मुका
आता हा जिवघेणा अबोला
सोडशील का देऊन एक मुका?
;)
(प्राची ..गच्ची हे यमक आहे असे मानणारा :) ) ऋषिकेश
16 Jan 2008 - 8:33 am | प्राजु
तात्या, ऋषिकेश, विनायक..
आपण तर एकदम भरारीच मारलित.. जरा कामात होते आज म्हणून नाही जमलं यायला मिपावर.
तात्या,
तुम्ही उत्तम खोटंही बोलू शकता हे कळंल मला. इतक्या छान चारोळ्या लिहिल्यात इथे आणि पद्यातलं मला कळंत नाही हे असं म्हणंण म्हणजे चारोळी लिहिण्याचा कंटाळा.. असंच आहे ना?
असो..
आठवणींचा खेळ हा
जीवघेणा असतो..
विचारांचा मेळ तो
कधी , का जुळत असतो??
- प्राजु
18 Jan 2008 - 1:30 am | प्राजु
खेळ खेळत चारोळींचा
मिपावर कवींची मांदियाळी
उभा स्वर्ग मैत्रीचा इथे
लिहित एकमेकासाठी चारोळी..
- प्राजु.
18 Jan 2008 - 1:38 am | इनोबा म्हणे
चारोळी फक्त निमीत्त आहे,
हितगूज करण्यासाठी
इतक्या दूरूनही तुझी
मैत्री जपण्यासाठी...
(मैत्र...जपणारा) -इनोबा
18 Jan 2008 - 1:40 am | प्राजु
दूर दूर अथांग दुनिया
तरी मैत्रीचा धागा जुळतो
विद्युत पानात मन हरवतं
आणि छंद जिवाला मिळतो
- प्राजु
18 Jan 2008 - 1:50 am | इनोबा म्हणे
मैत्री म्हणतात ती हीच का?
की नुसतेच हे मृगजळ,
क्षणभर सुखाचा ओलावा
आणि नंतर अखंड होरपळ...
(चातक) -इनोबा
18 Jan 2008 - 1:52 am | इनोबा म्हणे
काही असले तरीही
मैत्रीच जगणे शिकवते
नवा विश्वास नवी उमेद
मनात या जागवते...
(खरंच...) -इनोबा
18 Jan 2008 - 1:54 am | प्राजु
मैत्री ही मैत्रीच असते
तिला दुसरे नाव नाही
होरपळ जरी असे यात
आप्-पर भाव नाही..
- प्राजु
18 Jan 2008 - 2:00 am | प्राजु
विश्वासाच्या पायावर
उभी असतात नाती
प्रेम असो वा मैत्री
घट्ट होते माती..
- प्राजु
18 Jan 2008 - 2:05 am | इनोबा म्हणे
विश्वास असतो तोपर्यंत
आयुष्याला अर्थ असतो,
विश्वास एकदा ढळला की
श्वास ही व्यर्थ असतो...
(....) -इनोबा
18 Jan 2008 - 2:08 am | प्राजु
कवितेत दडलेला अर्थ
तू मला सांगितलास
का म्हणून कसे विचारू
तू जगण्याचा अर्थ सांगितलास..
- प्राजु
18 Jan 2008 - 2:16 am | इनोबा म्हणे
श्वास आहे तोपर्यंत
आपण प्रयत्न करायचे
बाकी इठोबा ठरवेल...
आपण कसे जगायचे
(ईश्वराचा निस्सिम भक्त) -इनोबा
18 Jan 2008 - 2:23 am | प्राजु
नतमस्तक मी
विठ्ठलाचे द्वारी
कृपा राहो अशीच
त्याची आम्हावरी..
- प्राजु
18 Jan 2008 - 2:33 am | इनोबा म्हणे
विठू अंतरी जाणावा
विठू अंतरी पहावा
पंढरपूरी असे पाषाण
विठू अंतरी पुजावा.
18 Jan 2008 - 2:44 am | प्राजु
अंतरी उमटे भाव तरंग
मनीचे गूज नयन बोलती
ही पाखरे उडून जाऊनी
तुझ्या मनी रूंजी घालती..
- प्राजु
18 Jan 2008 - 2:49 am | इनोबा म्हणे
पाखरांची भरारी पाहिली की
वाटते आपण ही संग करावा
ढगाळ आपल्या आकाशाला
इंद्रधनूषी रंग भरावा
18 Jan 2008 - 2:54 am | प्राजु
घे भरारी आकाशी
नभ हे व्यापून जाऊदे
पाखरण अस्तित्वाची
विश्वरूप होऊन राहूदे
- प्राजु
18 Jan 2008 - 3:05 am | इनोबा म्हणे
राहू दे आठवण या मैत्रीची
जरी असे आस संसाराची
अशी अमूल्य ही नाती-गोती
साथ लाभू दे जन्मो-जन्माची
(मित्र) -इनोबा
18 Jan 2008 - 9:38 am | प्राजु
जन्म आणि मृत्यू
या दोन अवस्था आहेत
मैत्री आणि मित्र त्यामधील
आनंदाची व्यवस्था आहे..
- प्राजु.
( फारच फालतू झाली ही चारोळी)
18 Jan 2008 - 11:13 am | इनोबा म्हणे
खरे आहे...
सुंदर आहे चारोळी
-इनोबा
18 Jan 2008 - 9:01 pm | प्राजु
तूच सुंदरा, तूच चंचला
प्रित बावरी राधा तू
कमल नयना, लज्जीत वदना
नदी काठची संध्या तू
- प्राजु
19 Jan 2008 - 12:27 am | इनोबा म्हणे
मीरा कान्हा तूझा नाही
तरी प्रित ही निराली
तो गे राधेचा दिवाना
तरी तू का येडी झाली...
-इनोबा
18 Jan 2008 - 9:25 pm | ऋषिकेश
नदी काठची संध्या तू
संध्येचा आनंदही तू
आनंदाची राणी तू
संध्येची आनंदवाणी तू
19 Jan 2008 - 12:46 am | प्राजु
प्रेमात गीत गाते
राधा होऊनी बावरी
वृंदावनी धुंद कान्हा
राधा त्याला सावरी..
- प्राजु.
19 Jan 2008 - 1:03 am | इनोबा म्हणे
राधेची प्रित खरी परी
मीरा का न स्मरावी
राधा कान्हासवे मंदीरी
मीरा नामात का न उरावी...
(मीरेचा कान्हा) -इनोबा
19 Jan 2008 - 1:06 am | सुनील
जमतं कसं तुम्हाला फक्त चार ओळीत सांगायला?
(अचंबित) सुनील
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
19 Jan 2008 - 1:13 am | इनोबा म्हणे
सुन्या,अरे खोलवर विचार केल्यास कधी कधी असे आढळते की,ज्या गोष्टी आपण चार ओळीत सांगू शकत होतो त्या साठी आपण विनाकारण शंभर ओळी वाया घालवल्या.
इंग्रजीत एक म्हण आहे की, "व्हेन अ वर्ड इस इनफ्,डोंट युज दि अनदर वर्ड."
(चारोळीत रमलेला) -इनोबा
19 Jan 2008 - 1:15 am | प्राजु
रंग बरसूनी ती गेली
पण हा रंग वेगळा
राधेचा रंग गोरा
कान्हाचाच हा सावळा..
- प्राजु.
19 Jan 2008 - 1:26 am | इनोबा म्हणे
राधा असे जरी गोरी
अन कान्हा हा सावळा
मीरा असे ही दिवानी
अन गोपीकांचा सोहळा
19 Jan 2008 - 1:30 am | विसोबा खेचर
अरे जरा बर्या चारोळ्या लिहा रे! :)
नाही, चारोळ्यांचा उपक्रम छानच आहे, परंतु जरा बर्या चारोळ्या लिहा रे. वरील बर्याचश्या चारोळ्या उगीच आपल्या पाडायच्या म्हणून पाडल्यासारख्या वाटतात! :)
छ्या...!
आपला,
(कामचलाऊ चारोळ्यांनी हैराण!) तात्या.
19 Jan 2008 - 1:50 am | ब्रिटिश टिंग्या
मी चारोळ्या लिहीन बंद केलय्....नाहीतर 'अतिपरिचयात अवज्ञा' होण्याचा संभव आहे...कसे?
आपला,
(जरासा बोअर झालेला) छोटी टिंगी