Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by प्राजु on Tue, 01/15/2008 - 03:54

Submitted by ऋषिकेश on Tue, 01/15/2008 - 03:59

Permalink

पुढे चालू

धागा ३ मधील विनायकचा शेवटचा धागा: मिटणं म्हणजे प्रेम असंही म्हणता येतं... प्रेमाशिवाय तरी कुठे जिवन हे जगता येतं... : : : पुढे चालू..... प्रेमाचा प्रत्येक रंग मला तुझ्यामधे दिसतोय तुझ्यातील रंगांमुळेच मी प्रेम करायल शिकतोय
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on Tue, 01/15/2008 - 04:09

Permalink

रंगात

रंगात रंगूनी तुझीया जाहले मी बावरी कान्हाच्या ओठातील जाहले मी पावरी - प्राजु.
  • Log in or register to post comments

Submitted by ऋषिकेश on Tue, 01/15/2008 - 06:18

Permalink

जाहलो मी

जाहलो मी पावरी ... जी वाजे तुझ्याच फुंकरीने सितारही होतो मी... झंकारते मात्र तुझ्याच स्पर्शाने
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on Tue, 01/15/2008 - 20:08

Permalink

स्पर्श

स्पर्श तुझ्या ओठांचा अलगद माझ्या ओठी गुलाब माझ्या मनीचा बहरला तुझ्याच साठी.. - प्राजु
  • Log in or register to post comments

Submitted by इनोबा म्हणे on Wed, 01/16/2008 - 00:35

In reply to स्पर्श by प्राजु

Permalink

धन्य मी झालो...

तूझ्या ओठांची मदिरा अलगद मी प्यालो, बहरला प्रेमाचा फुलोरा धन्य मी झालो... (......) -इनोबा
  • Log in or register to post comments

Submitted by ऋषिकेश on Tue, 01/15/2008 - 20:17

Permalink

सोहळा

बहरला तुझ्याच साठी हा फुलोरा माझिया स्वप्नांचा स्पर्शाने रोचक जाहला सोहळा स्वप्न नव्हे सत्याचा
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Tue, 01/15/2008 - 20:39

Permalink

साला आपलाही एक प्रयत्न! :)

मनोगत ते मिसळपाव via उपक्रम, उगीच नका लागू नादी तात्या आहे चक्रम! :)
  • Log in or register to post comments

Submitted by ऋषिकेश on Tue, 01/15/2008 - 20:40

In reply to साला आपलाही एक प्रयत्न! :) by विसोबा खेचर

Permalink

:)

सहि आहे की.. जमल रे जमलं!! :))
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Tue, 01/15/2008 - 20:55

Permalink

ही घ्या अजून एक..

लोकशाहीवादी संकेतस्थळ ठरली एक वदंता आणिबाणीमुळे अता मिपावर नांदते शांतता!! :)) आपला, मुशर्रफ तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Tue, 01/15/2008 - 21:05

Permalink

घ्या लेको..

मराठी संस्थळांच्या मांदियाळीत आहेत दिग्गज दिग्गज स्थळं मिपाने आत्ता कुठे सारवायला घेतलंय खळं! :) तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by अघळ पघळ on Sat, 01/19/2008 - 06:11

In reply to घ्या लेको.. by विसोबा खेचर

Permalink

चारोळ्या

चारोळ्या म्हणजे लग्नातले उखाणे असल्याच्या ठेक्यात बांधल्या आहेत तुम्ही तात्या :)))
  • Log in or register to post comments

Submitted by राजे (verified= न पडताळणी केलेला) on Tue, 01/15/2008 - 21:13

Permalink

ज्याने

ज्याने केला ह्या संकेतस्थळाचा नाद तो झाला बाद ज्याने केला ह्या संकेतस्थळाचा उपयोग त्याच्या माथी मार फलयोग जो लिहता झाला मिसळीवर त्याच्या नशिबी राज योग राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Tue, 01/15/2008 - 21:26

Permalink

रुसूबाई रुसू..:)

मिसळीत रमले ते लिहिते झाले रुसू बाई रुसूवाले मन उडून निघून गेले! :)
  • Log in or register to post comments

Submitted by इनोबा म्हणे on Wed, 01/16/2008 - 00:30

In reply to रुसूबाई रुसू..:) by विसोबा खेचर

Permalink

क्या बात है...

"आम्हाला काव्यात्मक लिहिता आले तर शप्पथ" म्हणाणारे तात्या तुम्हीच का? चालू दे,तुमच्यासारख्या दिग्गजांची साथ मिळाली तर आमच्यासारख्यांना आणखी चेव येतो. (तात्याचा मावळा) -इनोबा
  • Log in or register to post comments

Submitted by इनोबा म्हणे on Wed, 01/16/2008 - 00:53

Permalink

का रुसतेस

का रुसतेस तू माझ्यावर, अशी का तू मूक झाली? 'आपलं' म्हणून हक्काने बोललो, हीच का माझी चूक झाली? (रुसवा सोड सखे...) -इनोबा
  • Log in or register to post comments

Submitted by ऋषिकेश on Wed, 01/16/2008 - 01:35

Permalink

मुका!!!!

हीच का माझी चूक झाली? की मी अचानक जाहलो मुका आता हा जिवघेणा अबोला सोडशील का देऊन एक मुका? ;) (प्राची ..गच्ची हे यमक आहे असे मानणारा :) ) ऋषिकेश
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on Wed, 01/16/2008 - 08:33

Permalink

वा वा..

तात्या, ऋषिकेश, विनायक.. आपण तर एकदम भरारीच मारलित.. जरा कामात होते आज म्हणून नाही जमलं यायला मिपावर. तात्या, तुम्ही उत्तम खोटंही बोलू शकता हे कळंल मला. इतक्या छान चारोळ्या लिहिल्यात इथे आणि पद्यातलं मला कळंत नाही हे असं म्हणंण म्हणजे चारोळी लिहिण्याचा कंटाळा.. असंच आहे ना? असो.. आठवणींचा खेळ हा जीवघेणा असतो.. विचारांचा मेळ तो कधी , का जुळत असतो?? - प्राजु
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on Fri, 01/18/2008 - 01:30

Permalink

खेळ खेळत

खेळ खेळत चारोळींचा मिपावर कवींची मांदियाळी उभा स्वर्ग मैत्रीचा इथे लिहित एकमेकासाठी चारोळी.. - प्राजु.
  • Log in or register to post comments

Submitted by इनोबा म्हणे on Fri, 01/18/2008 - 01:38

In reply to खेळ खेळत by प्राजु

Permalink

मैत्र

चारोळी फक्त निमीत्त आहे, हितगूज करण्यासाठी इतक्या दूरूनही तुझी मैत्री जपण्यासाठी... (मैत्र...जपणारा) -इनोबा
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on Fri, 01/18/2008 - 01:40

Permalink

दूर दूर

दूर दूर अथांग दुनिया तरी मैत्रीचा धागा जुळतो विद्युत पानात मन हरवतं आणि छंद जिवाला मिळतो - प्राजु
  • Log in or register to post comments

Submitted by इनोबा म्हणे on Fri, 01/18/2008 - 01:50

In reply to दूर दूर by प्राजु

Permalink

मैत्री की मृगजळ?

मैत्री म्हणतात ती हीच का? की नुसतेच हे मृगजळ, क्षणभर सुखाचा ओलावा आणि नंतर अखंड होरपळ... (चातक) -इनोबा
  • Log in or register to post comments

Submitted by इनोबा म्हणे on Fri, 01/18/2008 - 01:52

Permalink

विश्वास

काही असले तरीही मैत्रीच जगणे शिकवते नवा विश्वास नवी उमेद मनात या जागवते... (खरंच...) -इनोबा
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on Fri, 01/18/2008 - 01:54

Permalink

मैत्री ही

मैत्री ही मैत्रीच असते तिला दुसरे नाव नाही होरपळ जरी असे यात आप्-पर भाव नाही.. - प्राजु
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on Fri, 01/18/2008 - 02:00

Permalink

विश्वासाच

विश्वासाच्या पायावर उभी असतात नाती प्रेम असो वा मैत्री घट्ट होते माती.. - प्राजु
  • Log in or register to post comments

Submitted by इनोबा म्हणे on Fri, 01/18/2008 - 02:05

In reply to विश्वासाच by प्राजु

Permalink

.....

विश्वास असतो तोपर्यंत आयुष्याला अर्थ असतो, विश्वास एकदा ढळला की श्वास ही व्यर्थ असतो... (....) -इनोबा
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on Fri, 01/18/2008 - 02:08

Permalink

कवितेत

कवितेत दडलेला अर्थ तू मला सांगितलास का म्हणून कसे विचारू तू जगण्याचा अर्थ सांगितलास.. - प्राजु
  • Log in or register to post comments

Submitted by इनोबा म्हणे on Fri, 01/18/2008 - 02:16

In reply to कवितेत by प्राजु

Permalink

इठोबा ठरवेल...

श्वास आहे तोपर्यंत आपण प्रयत्न करायचे बाकी इठोबा ठरवेल... आपण कसे जगायचे (ईश्वराचा निस्सिम भक्त) -इनोबा
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on Fri, 01/18/2008 - 02:23

Permalink

नतमस्तक

नतमस्तक मी विठ्ठलाचे द्वारी कृपा राहो अशीच त्याची आम्हावरी.. - प्राजु
  • Log in or register to post comments

Submitted by इनोबा म्हणे on Fri, 01/18/2008 - 02:33

Permalink

विठू सावळा...

विठू अंतरी जाणावा विठू अंतरी पहावा पंढरपूरी असे पाषाण विठू अंतरी पुजावा.
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on Fri, 01/18/2008 - 02:44

Permalink

अंतरी उमटे

अंतरी उमटे भाव तरंग मनीचे गूज नयन बोलती ही पाखरे उडून जाऊनी तुझ्या मनी रूंजी घालती.. - प्राजु
  • Log in or register to post comments

Submitted by इनोबा म्हणे on Fri, 01/18/2008 - 02:49

In reply to अंतरी उमटे by प्राजु

Permalink

इंद्रधनूष्य...

पाखरांची भरारी पाहिली की वाटते आपण ही संग करावा ढगाळ आपल्या आकाशाला इंद्रधनूषी रंग भरावा
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on Fri, 01/18/2008 - 02:54

Permalink

घे भरारी

घे भरारी आकाशी नभ हे व्यापून जाऊदे पाखरण अस्तित्वाची विश्वरूप होऊन राहूदे - प्राजु
  • Log in or register to post comments

Submitted by इनोबा म्हणे on Fri, 01/18/2008 - 03:05

In reply to घे भरारी by प्राजु

Permalink

साथ

राहू दे आठवण या मैत्रीची जरी असे आस संसाराची अशी अमूल्य ही नाती-गोती साथ लाभू दे जन्मो-जन्माची (मित्र) -इनोबा
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on Fri, 01/18/2008 - 09:38

Permalink

जन्म आणि

जन्म आणि मृत्यू या दोन अवस्था आहेत मैत्री आणि मित्र त्यामधील आनंदाची व्यवस्था आहे.. - प्राजु. ( फारच फालतू झाली ही चारोळी)
  • Log in or register to post comments

Submitted by इनोबा म्हणे on Fri, 01/18/2008 - 11:13

In reply to जन्म आणि by प्राजु

Permalink

वाह!

खरे आहे... सुंदर आहे चारोळी -इनोबा
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on Fri, 01/18/2008 - 21:01

Permalink

विनोबाच्य "सुंदर" या शब्दाने..

तूच सुंदरा, तूच चंचला प्रित बावरी राधा तू कमल नयना, लज्जीत वदना नदी काठची संध्या तू - प्राजु
  • Log in or register to post comments

Submitted by इनोबा म्हणे on Sat, 01/19/2008 - 00:27

In reply to विनोबाच्य "सुंदर" या शब्दाने.. by प्राजु

Permalink

का गे मीरा?

मीरा कान्हा तूझा नाही तरी प्रित ही निराली तो गे राधेचा दिवाना तरी तू का येडी झाली... -इनोबा
  • Log in or register to post comments

Submitted by ऋषिकेश on Fri, 01/18/2008 - 21:25

Permalink

तू

नदी काठची संध्या तू संध्येचा आनंदही तू आनंदाची राणी तू संध्येची आनंदवाणी तू
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on Sat, 01/19/2008 - 00:46

Permalink

प्रेमात

प्रेमात गीत गाते राधा होऊनी बावरी वृंदावनी धुंद कान्हा राधा त्याला सावरी.. - प्राजु.
  • Log in or register to post comments

Submitted by इनोबा म्हणे on Sat, 01/19/2008 - 01:03

In reply to प्रेमात by प्राजु

Permalink

मीरा....पुन्हा एकदा

राधेची प्रित खरी परी मीरा का न स्मरावी राधा कान्हासवे मंदीरी मीरा नामात का न उरावी... (मीरेचा कान्हा) -इनोबा
  • Log in or register to post comments

Submitted by सुनील on Sat, 01/19/2008 - 01:06

Permalink

च्यामारी

जमतं कसं तुम्हाला फक्त चार ओळीत सांगायला? (अचंबित) सुनील Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

Submitted by इनोबा म्हणे on Sat, 01/19/2008 - 01:13

In reply to च्यामारी by सुनील

Permalink

सुन्या,अरे

सुन्या,अरे खोलवर विचार केल्यास कधी कधी असे आढळते की,ज्या गोष्टी आपण चार ओळीत सांगू शकत होतो त्या साठी आपण विनाकारण शंभर ओळी वाया घालवल्या. इंग्रजीत एक म्हण आहे की, "व्हेन अ वर्ड इस इनफ्,डोंट युज दि अनदर वर्ड." (चारोळीत रमलेला) -इनोबा
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on Sat, 01/19/2008 - 01:15

Permalink

रंग बरसूनी

रंग बरसूनी ती गेली पण हा रंग वेगळा राधेचा रंग गोरा कान्हाचाच हा सावळा.. - प्राजु.
  • Log in or register to post comments

Submitted by इनोबा म्हणे on Sat, 01/19/2008 - 01:26

In reply to रंग बरसूनी by प्राजु

Permalink

राधा असे

राधा असे जरी गोरी अन कान्हा हा सावळा मीरा असे ही दिवानी अन गोपीकांचा सोहळा
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Sat, 01/19/2008 - 01:30

Permalink

अरे जरा बर्‍या चारोळ्या लिहा रे! :)

अरे जरा बर्‍या चारोळ्या लिहा रे! :) नाही, चारोळ्यांचा उपक्रम छानच आहे, परंतु जरा बर्‍या चारोळ्या लिहा रे. वरील बर्‍याचश्या चारोळ्या उगीच आपल्या पाडायच्या म्हणून पाडल्यासारख्या वाटतात! :) छ्या...! आपला, (कामचलाऊ चारोळ्यांनी हैराण!) तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by ब्रिटिश टिंग्या on Sat, 01/19/2008 - 01:50

In reply to अरे जरा बर्‍या चारोळ्या लिहा रे! :) by विसोबा खेचर

Permalink

म्हणूनच.....

मी चारोळ्या लिहीन बंद केलय्....नाहीतर 'अतिपरिचयात अवज्ञा' होण्याचा संभव आहे...कसे? आपला, (जरासा बोअर झालेला) छोटी टिंगी
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 22991 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com