तुज्या मिपाला.....

पिवळा डांबिस's picture
पिवळा डांबिस in जनातलं, मनातलं
19 Jan 2009 - 1:06 am

(आमचे मित्र श्री तात्या मिपाकार यांना आमचा आपला एक मैत्रीखातर इशारा.:) ...मूळ चाल, तुज्या ऊसाला....)

फड गप्पांचा रंगात आलाऽऽऽऽऽ
फड गप्पांचा..... रंगात आलाऽऽ
तुझ्या मिपाला लागंल कोल्हा, रं,
तुझ्या मिपाला लागंल कोल्हाऽऽऽ....

तुझ्या मिपाला लागंल कोल्हा, रं, तुझ्या मिपाला लागंल कोल्हाऽऽऽ....

आंतरजाल म्हंजे निख्खळ सोनं,
त्यात म्हराठीचं रुजलं बियाणं,
तुझा फड वाढला जोमानं, तुझा फड वाढला जोमानं.....

सभासदांनी उभारी धरली,
धाग्याधाग्यातून तर्री पेरली,
"अवांतरा"नं पानं भरली!
सडा पिंकांचा तांबडा ओलाऽऽऽ

सडा पिंकांचा, तांबडा ओला, रं..... तुझ्या मिपाला लागंल कोल्हा!!!!
तुझ्या मिपाला लागंल कोल्हा, रं, तुझ्या मिपाला लागंल कोल्हाऽऽऽ....

तुला पदरचं सांगत न्हायी...
स्थळं समांतर पाह्यली काही...
आरं जाळ असल्याविना काही धूर येत न्हायी!!!:)

सार्‍या राती र्‍हाईल कोन जागं?
नको बोलन्याचा धरूस राग,
कोल्हं पटाईत, काढत्यात माग,
अर्ध्या राती सर्व्हर डाऊन क्येलाऽऽऽ

अर्ध्या राती, सर्व्हर डाऊन क्येला रं..... तुझ्या मिपाला लागंल कोल्हा!!!!
तुझ्या मिपाला लागंल कोल्हा, रं, तुझ्या मिपाला लागंल कोल्हाऽऽऽ....

तीन हजार कलमांचा मळा,
सांबाळीन म्हंतोस, येडा का तू खुळा?
आरं जितकी जास्त बैलं, तितकाच मोठा पोळा!!:)

याला फिल्टर घालशील किती?
जात कोल्ह्यांची लई हिकमती,
नीलकांत तरी जागत्याल किती?
शेवटी त्यो बी मानूसच झालाऽऽऽ

शेवटी त्यो बी, मानूसच झाला रं....... तुझ्या मिपाला लागंल कोल्हा!!!!
तुझ्या मिपाला लागंल कोल्हा, रं, तुझ्या मिपाला लागंल कोल्हाऽऽऽ....

संगीतविडंबनविरंगुळा

प्रतिक्रिया

प्राजु's picture

19 Jan 2009 - 1:22 am | प्राजु

पिडां काकांची बहरली मैफिल..
मस्त मस्त मस्तच... एकदम मस्त.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

मदनबाण's picture

19 Jan 2009 - 4:50 am | मदनबाण

आरं जितकी जास्त बैलं, तितकाच मोठा पोळा!!

व्वा.. लय भारी.. :)

मदनबाण.....

"Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations
It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God."

- Indian Armed Forces -

रेवती's picture

19 Jan 2009 - 5:04 am | रेवती

ग्रेट, मस्त लावणी, मस्त विडंबन!

रेवती

विसोबा खेचर's picture

19 Jan 2009 - 6:54 am | विसोबा खेचर

आरं जाळ असल्याविना काही धूर येत न्हायी!!!

हा हा हा! हे सर्वात मस्त! :)

झक्कास लावणी रे डांबिसा, जियो..! :)

तात्या.

अनिल हटेला's picture

19 Jan 2009 - 6:57 am | अनिल हटेला

मस्तच !!

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

मुक्तसुनीत's picture

19 Jan 2009 - 7:05 am | मुक्तसुनीत

हेच म्हणतो. लावणी आवडलीच ; पण त्यामागचा संदेश सुद्धा ऊसाच्या बागाईतदारांनी लक्षांत घ्यावा हे उत्त्तम.

रामदास's picture

19 Jan 2009 - 7:14 am | रामदास

मेसेज लाउड अँड क्लीअर.

घाटावरचे भट's picture

19 Jan 2009 - 12:07 pm | घाटावरचे भट

असेच म्हन्तो....

ऋषिकेश's picture

19 Jan 2009 - 5:33 pm | ऋषिकेश

कडक लावणी :)
आणि

मेसेज लाउड अँड क्लीअर.

असेच म्हणतो
-(गोंधळलेला) ऋषिकेश

विसोबा खेचर's picture

19 Jan 2009 - 8:12 am | विसोबा खेचर

तुझ्या मिपाला लागंल कोल्हा, रं,
तुझ्या मिपाला लागंल कोल्हाऽऽऽ....

बाय द वे डांबिसा, मिपाच्या आसपास अशी कोल्हेकुई नेहमीच सुरू असते! ;)

परंतु इशार्‍याबद्दल धन्यवाद.. तुझ्यासारख्या हितचिंतकांच्या सहकार्यानं हा तात्या तमाम कोल्ह्याकुत्र्यांना पुरून उरेल एवढं निश्चित! :)

तात्या.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Jan 2009 - 8:54 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लै भारी लावणी !

अवलिया's picture

19 Jan 2009 - 9:02 am | अवलिया

सुंदर !! चाबुक!!!!!!!!

--अवलिया

अवलियाची अनुदिनी

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

19 Jan 2009 - 9:57 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

झक्कास!

अदिती
आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.

यशोधरा's picture

19 Jan 2009 - 9:15 am | यशोधरा

मस्त!

विनायक प्रभू's picture

19 Jan 2009 - 10:02 am | विनायक प्रभू

फुल टू मंदे बर का पि.डां सेठ

संदीप चित्रे's picture

19 Jan 2009 - 10:29 am | संदीप चित्रे

पि डा काका,
मस्तच लावणी.... आवडली एकदम
---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com

सुनील's picture

19 Jan 2009 - 10:46 am | सुनील

लावणी लै भारी!!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

मॅन्ड्रेक's picture

19 Jan 2009 - 12:02 pm | मॅन्ड्रेक

अ प्र ति म ..

kinnari
एक क्षण भाळ्ण्याचा - बाकि सारे सांभाळ्ण्याचे.

वृषाली's picture

19 Jan 2009 - 12:18 pm | वृषाली

मस्तच लावणी!!!!!

ब्रिटिश's picture

19 Jan 2009 - 12:27 pm | ब्रिटिश

दादुस क्या बात है !

तात्या नववारी , कंबरपट्टा, नाकात नथ घालुन नाचताईत, तुमी सोता ढोलकीवर ताल धरून लावणी म्हनताय, मास्तर शीटी वाजवित फेटा ऊडीवतान न बाकी सगले मीपाकर फडात लावणी आयकायला जमलेत. वा !

सगला डोल्यासमोर आयला बग.

मिथुन काशिनाथ भोईर
(जल्ला सगला काय नावानच हाय)

केशवसुमार's picture

19 Jan 2009 - 6:08 pm | केशवसुमार

डोळ्यापुढे आले..
भोईरशेठ.. अगदी सहमत..
(फेटे उडवणारा)केशवसुमार
बाकी गोरखनाथ,
मठी एकदम जोरात चालू ठेवलीय..
(अ-निवृत्त)केशवसुमार

चतुरंग's picture

19 Jan 2009 - 6:24 pm | चतुरंग

ढिंग च्याक झालीये लावणी! फेटे उडवले!!
पिडाकाका एकदम झक्कास जमलाय फड! ;)

चतुरंग

छोटा डॉन's picture

19 Jan 2009 - 10:53 pm | छोटा डॉन

एकदम जब्राट जमली आहे लावणी ...!
नाय नाय म्हणता चांगलाच अभ्यास केलेला दिसतोय पिडाकाकांनी एकंदर गोष्टींचा ...
जाम मज्जा आली वाचताना, जर ठेक्यात गुणगुणली ( ऑफीसात नाहीम घरी, आजुबाजुला कोणी नसताना ) तर अजुन मज्जा येते.

बाकी एकदा पिडाकाका ह्या आसामीला भेटायची इच्छा आहे.
मस्त फड उभा करतील जर मुड मध्ये आले तर ...
असो.

------
( ढोलकीवाला) छोटा डॉन

संताजी धनाजी's picture

19 Jan 2009 - 1:38 pm | संताजी धनाजी

तुफानी लिहीले आहे. लय आवडले :)
- संताजी धनाजी

बिपिन कार्यकर्ते's picture

19 Jan 2009 - 2:10 pm | बिपिन कार्यकर्ते

जबरी लावणी. पिडाकाका, क्या बोलनेका?

तात्याची प्रतिक्रिया पण अपेक्षेप्रमाणेच. :)

बिपिन कार्यकर्ते

मृगनयनी's picture

19 Jan 2009 - 3:48 pm | मृगनयनी

पिडां, जी मस्त लावणी!
नीलकान्त जीं चे शतश: ऋण!

हातात उस धरलेली तात्यांची अनुष्का वहिनी ( तात्यांची अनुष्का, आपली वहिनी) च जणु गाणं म्हणत आहे, असा आभास झाला क्षणभर !

:)

अजून येऊ देत.

युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

स्वाती राजेश's picture

19 Jan 2009 - 5:37 pm | स्वाती राजेश

लावणी मस्त झाली आहे...

केवळ_विशेष's picture

19 Jan 2009 - 6:38 pm | केवळ_विशेष

फुल्ल फार्मात! लैच बेष्ट :)

विजुभाऊ's picture

19 Jan 2009 - 6:41 pm | विजुभाऊ

पिडाकाका
एकदम मस्त.
अवांतर :लावणीचा फड आणि उसाचा फड यातील फरक सांगा
आपण एखादा विचार ;एखादी गोष्ट करतो किंवा करायचे टाळतो ते आनन्द मिळवणे किंवा वेदना टाळणे या दोन्ही साठीच

सहज's picture

19 Jan 2009 - 6:45 pm | सहज

पिडा लावणी फक्कडच!

आपला अभिजित's picture

19 Jan 2009 - 7:22 pm | आपला अभिजित

डाम्बिस लावणी झाली आहे!!

चौफुल्याचे जमवायचे का मग??

आपला अभिजित's picture

19 Jan 2009 - 7:23 pm | आपला अभिजित

कोल्हं पटाईत, काढत्यात माग,
अर्ध्या राती सर्व्हर डाऊन क्येलाऽऽऽ

हे एकदम झ्याक!!

कपिल काळे's picture

19 Jan 2009 - 10:13 pm | कपिल काळे

तीन हजार कलमांचा मळा,
सांबाळीन म्हंतोस, येडा का तू खुळा?

आयला, तात्याची देवगडात कलम बाग आहे ते माहिते. पण ३००० कलमं.? तात्या. लय छुपे रुस्त्म की तुम्ही.

बाकी लावणी नेहमीसारखे पिडा स्टाय्ल- नाद नाय कर्राय्यच्चा.
झक्कास्स्स!!

सर्वसाक्षी's picture

19 Jan 2009 - 10:18 pm | सर्वसाक्षी

जबरदस्त लावणी! दिल खुश.