कवी नडू पाही...

चतुरंग's picture
चतुरंग in जे न देखे रवी...
13 Jan 2009 - 9:28 pm

'हंस उडू पाही...' हे काव्य वाचून आमच्या कल्पनेचा हंस विडंबनप्रांती उडू लागला! ;)

'रंग्या'चा पहारा विडंबनी कायदे
कवी नडू पाही अवघड इरादे!

असे कसे शब्द? अर्थ कुणीकडे?
कल्पनेपल्याड झेपावती वेडे

ओळी सैरभैर, बाभळीचे काटे
धिटाईने लिही कुणी एकटे एकटे

लावले कुलुप, बंद केली दारे
असल्या कविता कशाला करा रे!

चतुरंग

कविताविडंबनविरंगुळा

प्रतिक्रिया

अनामिक's picture

13 Jan 2009 - 10:09 pm | अनामिक

लावले कुलुप, बंद केली दारे
असल्या कविता कशाला करा रे!

हा हा हा ... सह्हीच!

अनामिक

संदीप चित्रे's picture

13 Jan 2009 - 11:22 pm | संदीप चित्रे

अजून रंग्या मैदानात कसा आला नाही ?
:)
---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com

बिपिन कार्यकर्ते's picture

13 Jan 2009 - 11:45 pm | बिपिन कार्यकर्ते

अस्वल गुदगुल्या करून हसवून हसवून मारतं, असं ऐकलं होतं. त्यानंतर बहुतेक तुमचाच नंबर लागेल, हसवून मारण्यात. ;)

=))

बिपिन कार्यकर्ते

चतुरंग's picture

14 Jan 2009 - 1:19 am | चतुरंग

जाता जाता अस्वल म्हणून घ्या! :B
मला तर चिमणरावाचे ते वाक्यच आठवले "मार बये मार, पिंजर्‍यामधे व्याघ्र सापडे, बायका मुले मारिती खडे!"
त्याच चालीवर मी म्हणेन "मार बाबा मार, विडंबनात रंगा सापडे 'कार्यकर्ते' मारिती जोडे!" ;)

चतुरंग

प्राजु's picture

14 Jan 2009 - 12:48 am | प्राजु

असे कसे शब्द? अर्थ कुणीकडे?
कल्पनेपल्याड झेपावती वेडे

मस्तच.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

केशवसुमार's picture

14 Jan 2009 - 3:41 am | केशवसुमार

रंगाशेठ,

'रंग्या'चा पहारा विडंबनी कायदे
कवी नडू पाही अवघड इरादे!

हा हा हा हा.. चलू दे..
केशवसुमार

मदनबाण's picture

14 Jan 2009 - 5:20 am | मदनबाण

लयं भारी... :)

मदनबाण.....

"Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations
It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God."

- Indian Armed Forces -

सहज's picture

14 Jan 2009 - 6:41 am | सहज

मस्तच!

श्रावण मोडक's picture

14 Jan 2009 - 1:14 pm | श्रावण मोडक

असल्या कविता कशाला करा रे!
हाहाहाहाहा. भारीच. पण अशा कविता होऊ द्या, त्यानिमित्ताने थोडे हसण्याची संधी मिळते तुम्ही विडंबन केल्याने. :) :) :)

जयवी's picture

14 Jan 2009 - 4:11 pm | जयवी

सही !

राघव's picture

14 Jan 2009 - 5:37 pm | राघव

दादा,
लय भारी.. हे फक्त तुमचेच डोके असे चालू शकते!!
मुमुक्षु

अवलिया's picture

14 Jan 2009 - 11:43 pm | अवलिया

मस्तच हो रंगाशेठ......... :)

(एखाद्या सोवळ्या संपादकाला आवडला नसल्यास हा प्रतिसाद उडवला तरी चालेल)

-- अवलिया
अवलियाची अनुदिनी