माझं काय चुकलं..

प्राजु's picture
प्राजु in जे न देखे रवी...
13 Jan 2009 - 8:46 pm

एका छोटीचे मनोगत..

कशाला गं आईनं असं मला माललं..
ललून ललून नाक माझं लाल लाल झालं..
खलं खलं शांग आजी माझं काय चुकलं???

अंगणामध्ये गेले होते बिश्किट खात खात..
टॉमी तिथे बसला होता त्याचा खाऊ खात..
माझ्यातलं थोलं बिश्किट मी त्याला शुद्धा दिलं..
त्याच्या भांड्यातलं थोलं मी ही खाल्लं..
सगल्यांना देऊन खायचं असं आईनीश शांगितलं..
खलं खलं शांग आजी माझं काय चुकलं??

बाबांचा पांधला पांधला रूमाल मला मिलाला
त्याच्यावर केचपचा मी लाल सूर्य काढला..
त्यावर मग मी थोडंसं दूध सुद्धा ओतलं..
सांग आता यात माझं असं काय चुकलं..??
रूमाल सगळा लाल लाल ,होता घाण झाला..
दूध ओतून त्याला मी गोला गोला केला..
कलतंच नाही मला नेमकं काय झालं.
खलं खलं सांग आजी माझं काय चुकलं??

- प्राजु

बालगीतआस्वादविरंगुळा

प्रतिक्रिया

ब्रिटिश टिंग्या's picture

13 Jan 2009 - 9:09 pm | ब्रिटिश टिंग्या

हाहाहा!

- टिंग्या

अंगात 'दम' असणं चांगलं.....पण तो सारखा लागणं वाईट!

यशोधरा's picture

13 Jan 2009 - 9:12 pm | यशोधरा

मस्तच गं प्राजू! :)

सखाराम_गटणे™'s picture

13 Jan 2009 - 9:13 pm | सखाराम_गटणे™

बाबांचा पांधला पांधला रूमाल मला मिलाला
त्याच्यावर केचपचा मी लाल सूर्य काढला..
त्यावर मग मी थोडंसं दूध सुद्धा ओतलं.

=)) =))

----
सखाराम गटणे
© २००९,
लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.

वल्लरी's picture

13 Jan 2009 - 9:16 pm | वल्लरी

हा.. हा.. हा... =)) =)) =))
लहान मुले किती निरागस असतात ना.....

---वल्लरी

भिडू's picture

13 Jan 2009 - 9:26 pm | भिडू

मस्तच

अनामिक's picture

13 Jan 2009 - 9:43 pm | अनामिक

आजीची प्रतिक्रिया:

राणी मा़झी छोटुली तू, आहेस उचापती
हसू येते मला, पाहून तुझ्या करामती

ललू नको बघ तुझे नाक झाले लाल
हस बघू, फुगवू नको गोबले गोबले गाल

हसलीस की तुला देईन गोड गोड खाऊ
संध्याकाळी फिरायला आपण दोघीच जाऊ

फुगे घेऊ, बाग पाहू, करू मस्तं धमाल
बाबांसाठी घेऊन येऊ एक पांधला रुमाल

माललं त मालू दे, आई आहेच वेडी
हसण्या रुसण्यातही अगं गंमत असते थोडी
*************************

(खोडकर) अनामिक

धनंजय's picture

13 Jan 2009 - 9:45 pm | धनंजय

हा हा!

मस्तच!

चतुरंग's picture

13 Jan 2009 - 9:51 pm | चतुरंग

खूपच छान! मजा आली!!

चतुरंग

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

13 Jan 2009 - 9:59 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

खरंच मजा आली दोन्ही कविता वाचून.

अदिती
आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.

अवलिया's picture

13 Jan 2009 - 11:11 pm | अवलिया

मजा आली दोन्ही कविता वाचून.

-- अवलिया
अवलियाची अनुदिनी

पिवळा डांबिस's picture

14 Jan 2009 - 12:57 am | पिवळा डांबिस

दोन्ही कविता मस्तच आहेत!!!!
खूप आवडल्या!!
:)

घाटावरचे भट's picture

14 Jan 2009 - 6:08 am | घाटावरचे भट

असेच म्हणतो.

मनिष's picture

14 Jan 2009 - 11:54 am | मनिष

दोन्ही कविता मस्तच आहे! प्राजु आणि अनामिक सही!!! :)

साक्षी's picture

14 Jan 2009 - 2:29 pm | साक्षी

आणखी काय म्हणू?

केशवसुमार's picture

14 Jan 2009 - 2:47 pm | केशवसुमार

दोन्ही कविता आवडल्या..
केशवसुमार

मैत्र's picture

14 Jan 2009 - 4:12 pm | मैत्र

मस्त आहेत दोन्ही... प्राजुताईची सुरुवात मस्तच...

निखिलराव's picture

14 Jan 2009 - 12:18 pm | निखिलराव

आजीची प्रतिक्रिया खरचं एक नंम्बर.........
अनामिकराव की जय हो........

संदीप चित्रे's picture

13 Jan 2009 - 9:51 pm | संदीप चित्रे

>> सगल्यांना देऊन खायचं असं आईनीश शांगितलं..
एकदम सही
>> केचपचा सूर्य
कल्पना सुरेख आहे सूर्याची :)

अवांतरः गझल आणि एकदम बालगीत... एकाच वेळी डोक्यात,,, आहे...जबरी रेंज आहे कल्पनाशक्तीला :)
---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com

जृंभणश्वान's picture

13 Jan 2009 - 10:57 pm | जृंभणश्वान

हा हा हा...फारच छान :)

लहानपणीची एक गंमत आठवली.
माझ्या बहिणीने रस्त्यावर पडलेला शेंगदाणा पटकन उचलून तोंडात टाकला, आईने धपाटा घातल्यावर म्हणाली- उगाच का गं मारतेस? तूच तर म्हणतेस की अन्न वाया नाही घालवायचं

llपुण्याचे पेशवेll's picture

13 Jan 2009 - 11:14 pm | llपुण्याचे पेशवेll

वाहवा! दोन्ही कविता छानच. :)
पुण्याचे पेशवे
Since 1984

श्रीकृष्ण सामंत's picture

14 Jan 2009 - 12:04 am | श्रीकृष्ण सामंत

आजी शांगशील का ग देवाला
नको कलू मला मोथाला
ठेव अशाच मला बोबलं बोलायला

www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

स्वातीदेव's picture

14 Jan 2009 - 12:42 am | स्वातीदेव

खूप गोड आहे कविता :)

विसोबा खेचर's picture

14 Jan 2009 - 12:48 am | विसोबा खेचर

वा! छोटी अंमळ इनोसंट आहे! :)

छान कविता..

तात्या.

मीनल's picture

14 Jan 2009 - 12:54 am | मीनल

छे छे !
तुझं?
कुठ चुकलं?
चुकल असेल तर ते आईचच!
मीनल.

समिधा's picture

14 Jan 2009 - 1:44 am | समिधा

:) दोन्हि कविता खुपच आवडल्या

रेवती's picture

14 Jan 2009 - 4:34 am | रेवती

किती गोड कविता आहे.
मुलं असच काहीतरी करतात
आणि आपण रागावलो की त्यांना कळत नाही एकदम काय झालं?
फारच छान कविता!

रेवती

सहज's picture

14 Jan 2009 - 5:53 am | सहज

दोन्ही कविता खुप आवडल्या.

पाठ केल्या पाहीजेत. :-)

वृषाली's picture

14 Jan 2009 - 11:13 am | वृषाली

दोन्ही कविता छान आहेत.

झेल्या's picture

14 Jan 2009 - 12:11 pm | झेल्या

छोतीची छोतीशी कविता छान छान...!

रड'कविता' आवडली.. आणि आजीची प्रतिक्रिया देखील...!

छोटं होऊन छोट्यांसाठी छोट्यांसारखं छोटसं लिहिणं म्हणजे काही 'छोटी' गोष्ट नाही...त्यासठी मोठ्ठ्ठ्ठ्ठ्ठ्ठ्ठ्ठ्ठ्ठी कल्पनाशक्ती लागते..!

- (छोतासा) झेल्या
मी लिहिलेलं.. (वाचा आणि कळवा आणि इतरांना वाचवा (वाचायला सांगा..)! )

दिपक's picture

14 Jan 2009 - 12:19 pm | दिपक

बडबडकविता आवडली :)

वेताळ's picture

14 Jan 2009 - 2:34 pm | वेताळ

वाह वाह सहमत आहे
वेताळ

शाल्मली's picture

14 Jan 2009 - 3:24 pm | शाल्मली

प्राजु,
थोडा उशिराच प्रतिसाद देत आहे.
कविता फारच मस्त आहे. एकदम सुंदर.

लहान मुले कधी काय करतील काही सांगता येत नाही. कालच माझ्या पुतणीने कुणाचे लक्ष नसताना रवा, अंगणातली माती आणि चक्क २-३ चिमटी केशर असे पाण्यात कालवून एक नवीन रेसिपी म्हणून एकत्र करून फ्रिज मध्ये सेट करायला ठेवले होते. :O
नशीब त्यानंतर ती रेसिपी तिने फस्त केली नाही!

--शाल्मली.

जयवी's picture

14 Jan 2009 - 4:09 pm | जयवी

बालगीत मस्त होईल :)

स्वाती राजेश's picture

14 Jan 2009 - 4:14 pm | स्वाती राजेश

छान मनोगत व्यक्त झाले आहे कवितेतून....मस्त बालगीत.
अनामिक,
यांचीही कविता मस्त आहे....

राघव's picture

14 Jan 2009 - 5:37 pm | राघव

सहमत!
प्रतिसाद अंमळ उशिराच दिल्या गेला त्याबद्दल क्षमस्व!!
प्राजु अन् अनामिक दोघांच्याही कविता खूप सुंदर :)
मुमुक्षु

कविता आवडलेल्या सर्वांना मनापासून धन्यवाद.
आणि अनामिकचे खास धन्यवाद आणि अभिनंदन!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

शितल's picture

15 Jan 2009 - 8:51 pm | शितल

प्राजु,
बाल कविता सुंदर केली आहेस.:)
कालच माझ्या लेकाने स्कुल मध्ये त्याला पक्षाच्या खाद्याची माळ करायची होती, केली आणि घरी घेऊन आला आणि मला म्हणाला आई त्यातील एक खाऊन बघ, मी एक खाल्ली आहे. :(

लिखाळ's picture

15 Jan 2009 - 9:21 pm | लिखाळ

प्राजु आणि अनामिक दोघांच्याही कविता सुंदर.
-- लिखाळ.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 Jan 2009 - 9:28 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्राजु आणि अनामिक दोघांच्याही कविता सुंदर.

बाळु's picture

20 Jan 2009 - 1:49 am | बाळु

खूपच छान! मजा आली!! चाबुक !!!!!!!!

या दिवसांत ही गोड कविता तर वर यायलच हवी...! प्राजुतै आणि अनामिक.. न म न! :-)