काल सोमवार म्हणून सहपरीवार शिवमंदिरात गेलो होतो. त्याच वेळी एक सुशीक्षीत कुटुंब मंदिरात आले आणि त्यांच्यापाठोपाठ त्या मंदीराचि पुजारीन धावत आली. आली तशी त्यांच्यावर ओरडायला सुरवात, "तांब्यात काय हाय तुमच्या, दुध आसल तं पिंडीवर वतु नका". तो (कुटुंबप्रमूख) पडला हिंदी, बावळ्यासारखा त्या बाईच्या तोंडाकडं बघू लागला. परत पुजारीन ओरडली "तांब्यात काय हाय तुमच्या, दुध आसल तं पिंडीवर वतु नका. सातच्या नंतर पिंडीवर काय वतायचं नाय. आताच सगळं नीट धून घेतलय". हा आपला परत तीला वीचारअतोय, "क्या हूंऑ". "क्या हूआ क्या राती सात नंतर काय वतायचं नाही देवावर". त्याने शेजारी उभारलेल्या व्यक्तीला विचारलं "क्या बोल रहि है ये". शेजार्याने त्याला निट समजाऊन सांगीतले तर याचा प्रश्न "अब लेके आये है तो क्या करेंगे". "नहि नहि! काय वतु नका, किसी गरीब को दो". तो, " क्या बोली वो". शेजारी "बोल रही है, भगवान पे मत डालो, किसी गरीब को दो ". तो "क्यों?". शेजारी, "रात को सात के बाद कुछ डालना नही पिंडीपर". तो, "सात बजे तक तो हम ऑफीससेही नही आते". ति, "वो कुछ नहि, डालना नही मतलब नही". त्याला समजेना काय बोलावते म्हनून तो तसाच ऊभा राहीला. पुजारीनीला वाटलं हा थांबला म्हनजे आता काय हा ओतणार नाही म्हणून ति तिथुन निघुन गेली. ती गेल्याची खात्री होताच त्याने दुधाचा तांब्या पिंडीवर पालथा केला पटकन वरून पाणी ओतून, दर्शन घेऊन बाजुला. जवळ जवळ दोन लीटर दूध तर वाया गेलेच पन एवढी चकाचक करून ठेवलेली महादेवाची पिंड देखील परत खराब झाली.
मला दूधाची नासाडी करणे तर आवडले नाहीच पन मंदिराला वेळेच्या बंधनात अड्कवने पन पटले नाही (सदर मंदीर रात्री ९ नंतर बंद केले जाते. आमच्या गावाकडे मंदीराला दार पन नसते ईथे, मंदीराला कुलूप लावून ठेवतात.). एवढ्या सगळ्या प्रसंगात एक गोष्ट मात्र फार चांगली ऐकायला (पहायला मीळाली असती तर......असो, हेही नसे थोडके.) मीळाली, त्राग्यात का असेना पन त्या पुजारीन बाईने ' दूध एखाद्या गरीब माणसाला द्या ' म्हणून दीलेला सल्ला.
प्रतिक्रिया
17 Jan 2009 - 9:08 am | llपुण्याचे पेशवेll
हा हा हा.
वरील घटनेतून ३ बोध मिळाले.
१. मंदीर बंद झाल्यानंतर जर आपण मंदीरात पोचलो तर देवाच्या नैवेद्यासाठी नेलेली वस्तू गरीबाला दान करून पुण्य मिळवावे.
२. भैय्ये लोक कितीही दिवस महाराष्ट्रात राहिले तरी ते मराठी शिकणार नाहीत हे सत्य महाराष्ट्राने स्वीकारावे आणि उदार मनाने सर्वानी मराठी भाषा न बोलता हींदीचा वापर सुरू करावा.(जमल्यास महाराष्ट्राची राजभाषाही हिंदी करावी)
३. आपलं तेच खरं करण्यात भैय्ये पटाईत असतात ह्याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला.
कोणत्याही ठिकाणची सुव्यवस्था राखायची असेल तर बंधन हे हवेच. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे मंदीराचा गाभारा अगदी धुवून स्वच्छ केलेला होता. आणि अशी साफसफाई करण्यासाठि वेळ हा लागतो नाहीतर एखादे मंदीर स्वच्छ नसेल तर त्याला अस्वच्छ बाजारू म्हणायला आपणच लोक पुढे असतो. त्यामुळे मंदिराला वेळ असली तर त्याचे काही वाईट वाटत नाही मला.
(स्वेटरच्या उबेत बसलेला)
पुण्याचे पेशवे
Since 1984
17 Jan 2009 - 7:15 am | गोरख
मुळात असे करणे चुक आहे...
आनि वेळ होउन गेल्यवर दरवाजा बन्द केल पहिजे..
खुप ठिकाणि असेच कर्अतात..
उदा. गोवा येथिल मन्दिरे...जाउन बघा महन्जे कळेल.