गांधीजींची अहिंसा-उपयुक्तता आणि मर्यादा

चिन्या१९८५'s picture
चिन्या१९८५ in जनातलं, मनातलं
8 Jan 2009 - 8:02 am

There are many causes that I am prepared to die for but no causes that I am prepared to kill for."
महात्मा गांधी
"

केदार जोशीनी अहींसा म्हणजे काय असा प्रश्न विचारला त्यानंतर गांधीजींची अहिंसा म्हणजे काय याचा मी शोध घेतला.गांधीजी म्हणतात की त्यांना एकच मार्ग माहीत आहे आणि तो म्हणजे अहिंसेचा(passive resistance).गांधीजींनी अहिंसेची प्रेरणा कस्तुरबा गांधींकडुन घेतलेली होती.गांधीजींची एखादी गोष्ट कस्तुरबांना पटत नसली तर त्या गांधीजींनी दिलेल्या त्रासाला सहन करत पण विरोधही करत.यातुन गांधीजींचे मन बदलले आणि बायकोवर हुकुम चालवायची त्यांची विचारसरणि कशी चुक होती हे त्यांना कळुन चुकले.पुढे विविध प्रकारच्या परीस्थितींमधुन गेल्यानंतर गांधीजींनी अहिंसा हाच एकमेव मार्ग आहे हे पक्के केले.गांधीजींच्या मते अहिंसा हा मनुष्याचा स्थायीभाव आहे.जे देश आणि समाज अहिंसेच्या मार्गाचा अवलंब करतात त्यांनी आत्मसन्मान सोडुन बाकी सगळ्याचा त्याग करायला शिकायला हवे.त्यामुळेच अहिंसा हे कुठल्या भित्र्या माणसाचे नाही तर उलट धाडसी माणसाचे लक्षण आहे असे गांधीजी म्हणतात.शिवाय गांधीजींची अहिंसेची शिकवणुक सर्वांनाच पाळणे शक्य असते.त्यासाठी शरीरयष्टी,हत्यारे,साधनसामग्री यांची कशाचीच आवश्यकता नसते.त्यामूळे गांधीजींची ही अहिंसात्माक चळवळ भारतातील सामान्य जनतेत प्रचंड लोकप्रिय झाली.त्याचबरोबर गांधीजींनी सत्याला पण खुप महत्व दिले.ते म्हणतात की इतर सर्व गोष्टींपेक्षा माझे प्रेम अहिंसेच्या तत्वावर आहे.जर अहिंसेच्या तत्वाइतके कशावर माझे प्रेम असेल तर ते आहे सत्यावर.गांधीजी अहिंसा आणि सत्यामध्ये फ़रक बघत नसत.तर अहिंसा हे साधन आहे व सत्य हे साध्य आहे.त्यामुळे जर आपण साधनांची काळजी घेतली तर आपण साध्यापर्यंत पोहोचणारच यात काही शंका नाही असे गांधीजींचे मत होते.

आता मुख्य प्रश्न असा आहे की गांधीजींना कुठल्या परीस्थितीमध्ये हिंसा मान्य होती?म्हणजे एखाद्या ठिकाणी अन्याय होत आहे तिथे जर हिंसेशिवाय अन्याय रोखताच येत नाही तर हिंसा केलेली ठिक आहे का?यावर गांधीजींचे उत्तर आहे की हिंसा कुठल्याच ठिकाणी बरोबर नाही.गांधीजी फ़क्त एकाच परीस्थितीत हिंसा ठिक आहे ते सांगतात.ती परीस्थिती म्हणजे जर भित्रटपणा किंवा हिंसेतील एकाची निवड करायची असल्यास.गांधीजी म्हणतात अहिंसा हे धैयवान माणसाच लक्षण आहे ,भित्र्या माणसाचे नाही.भित्रटपणापेक्षा हिंसा बरी.पण कुठल्याही इतर ठिकाणि हिंसा त्यांना मान्य नाही.गांधीजींचा विरोध करताना त्यांची हिंसा हिटलर,स्टॅलिन यांच्यासमोर चालणार नाही असे म्हणतात पण गांधीजी म्हणतात की त्याही ठिकाणी अहिंसा हाच मार्ग आहे.गांधीजींनी ज्यु लोकांचा नाझी नरसंहार करत होती तेंव्हा सांगितले होते की ज्युंनी पण अहिंसात्मक मार्गानेच प्रतिकार करावा.ज्युंनी जर्मनीला सोडुन जाण्यास नकार द्यावा आणि त्यांच्याविरुध्द होणाया अन्यायासही विरोध करावा.वेळ पडल्यास स्वत:चा जीवही त्यांना अर्पण करावा.त्यामुळे कुठल्याही परीस्थितीत हिंसा गांधीजींना मान्य नव्हती.'यंग इंडीया’ मधील एका प्रकाशनात गांधीजींनी गुरु गोविंद सिंग,शिवाजी महाराज,राणा प्रताप,रणजित सिंग,लेनिन,डे वालेरा,केमालपाशा या सर्वांना 'misguided patriot' म्हटले होते.गांधीजींची हीच विचारसरणी भगत सिंग व इतर क्रांतिकारकांबद्दल होती.ते म्हणत की "भगत सिंगने हिंसेचा मार्ग देशभक्तीतुन घेतला.त्याच्या शौयापुढे आपण हजार वेळा नतमस्तक व्हावे पण त्याचा मार्ग चुकीचा होता.आपल्या देशात लाखो लोक दुर्बल आहेत.अशा ठिकाणी जर आपण न्याय खुनाच्या तत्वावर करणार असु तर आपली परीस्थिती फ़ार भयानक होईल.हिंसेचा धर्म आपण बनवल्यास आपलेच लोक आपल्याच अन्यायाचे लक्ष्य होतील."गांधीजींचा क्रांतीकार्याला विरोध एका अजुन कारणाने होता जो म्हणजे आपल्या देशाची मानसिकता.गांधीजी म्हणत की आपला देश म्हणजे तुर्की,आयरलंड किंवा रशिया नाहीये.त्यामुळे तिथल्या परीस्थितीत आणि आपल्या परिस्थितीत खुप फ़रक आहे.शिवाय क्रांतिकार्याला मास बेस नव्हता त्यामुळे ही क्रांति मासेस साठी काय करु शकेल असाही गांधीजींचा प्रश्न होता. याबाबत विचार केल्यास असे कळते की गांधीजी आपल्या अहिंसेच्या तत्वाबद्दल प्रमाणिक होते.हल्ली गांधीजींच नाव घेउन चालणारी माणसे त्यांच्या विचारांबरोबर प्रामाणिक नसतात.पण गांधीजी आपल्या पुर्ण अहिंसेच्या तत्वाशी प्रामाणिक होते.त्यासाठी इतर ऐतिहासिक नायकांच्या तत्वांना विरोध करणे गांधीजींनी टाळले नाही.पंजाबमध्ये शिख समुदायामध्ये गांधीजींनी व्यक्त केलेल्या गुरु गोविंद सिंगांच्या मताबद्दल नाराजी होती.गांधीजींना शिखांनी किर्पाण धारण करणेही आवडत नसे.

गांधीजींच्या मते अहिंसा हा मनुष्याचा स्थायीभाव असल्याने त्याने प्रश्न सुटतात तर हिंसेने प्रश्न अधिक बिकट होत रहातात्.त्याचबरोबर अहिंसेने मनुष्यात बदल होतो,मनुष्याचा आजार(हिंसा,अन्याय करण्याचा) बरा होतो व तो अन्याय करणे सोडतो.अहिंसा मनुष्यामनुष्यामधले परस्परप्रेमाचे नाते पक्के करते.त्यामुळे ब्रिटीशांविरुध्द लढतानाही गांधीजींचे ब्रिटीश जनतेवर तितकेच प्रेम होते जितके भारतीय जनतेवर होते.या दृष्टीने विचार केल्यास गांधीजींची अहिंसेची विचारसरणी संपुर्ण जगासाठी आदर्श ठरते.सध्याचे असणारे अनेक जागतिक बिकट प्रश्न परस्पर सहकार्याने व परस्पर प्रेमाने सुटु शकतील असे वाटते.शिवाय गांधीजींचा अहिंसात्मकरीत्या सत्याग्रह करण्याचा मार्ग त्या काळातील परीस्थितीनुसार भारतीय जनतेस रुचणारा होता.त्यामुळे गांधीजींनी स्वातंत्र्याची चळवळ सामान्य जनतेपर्यंत नेली व त्या चळवळीला उदंड प्रतिसाद मिळवुन दिला.सशस्त्र लढ्याचा मार्ग आपल्या भारतीय जनतेला रुचणारा नव्हता असे आपण म्हणु शकतो.कारण त्याला आवश्यक असणारी त्यागाची भावना त्या काळातील सर्वसामान्य भारतीय जनतेत नव्हती.सावरकर म्हणतात की मातॄभुमिसाठीची लढाई म्हणजे सतीचे वाण आहे.पण गांधीजींचा मार्ग सोपा होता.कायद्याला विरोध करत २-४ लाठ्या खाण आणि जेलमध्ये जाण त्या काळातील सामान्य जनतेला जास्त सोप होतं. गांधीजींच्या अहिंसेबद्दल अजुन एक महत्वाची गोष्ट अशी आहे की निर्बल आणि हतबल माणसाला त्या पध्दतीने अन्यायाचा प्रतिकार करण्याशिवाय दुसरा कुठला पर्यायच नाही.त्याचमुळे भगत सिंग्,स्वातंत्र्यवीर सावरकर व इतर क्रांतिकारकांनीही आपल्या तुरुंगवासात होणार्‍या अन्यायाविरुध्द अहिंसात्मक सत्याग्रहाचा व उपोषणाच्या मार्गाचा अवलंब केलेला दिसतो.म्हणजे गांधीजींच्या मार्गाचे जे कट्टर विरोधक होते तेसुध्दा दुसरा कुठला उपाय नसल्यावर त्याच गांधीजींच्या मार्गाचा अवलंब करतात.

गांधीजींच्या मार्गाचा एक मुद्दा हा की जर सरकार अन्याय करत असेल ,सरकारकडे कितीही मोठी शस्त्र असु देत पण जर संपुर्ण जनतेनीच सविनय कायदेभंग केल्यास सरकारला अन्यायी राज्य करणे अशक्य आहे. हे म्हणजे सरकारची शक्तीच काढुन घेतल्यासारखे आहे.तुम्ही काहीही कायदे करा पण आम्ही ते अन्याय्य कायदे पाळणारच नाही पण आम्ही तुमच्यावर हल्लाही करणार नाही.अशा परीस्थितीत सरकार काय करेल?पण जेंव्हा समाजच आपापसात रक्तपात करायला उठतो तेंव्हा अहिंसेची चळवळ कितपत यशस्वी ठरु शकते हाही प्रश्नच आहे.दुसरी गोष्ट म्हणजे हिटलर्,स्टॅलिन,लादेन यांच्यासारख्या कृर राज्यकर्त्यांसमोर हा मार्ग फारसा प्रभावी ठरेल असे वाटत नाही.कारण हे आपल्या मार्गावर एका मोठ्या विचाराने आलेले असतात्.त्यांच्या हिंसेमध्ये त्यांना अन्यायाचा लवलेशही दिसत नसतो.शिवाय अहिंसेचा मार्ग एखाद्या व्यक्तीमध्ये परीवर्तन नक्कीच घडवु शकतो पण पुर्ण समुहात परीवर्तन घडवु शकतो काय्?मला वाटत एकाच वेळी नाही घडवु शकत्.मग दहशतवादासारखी समस्या यातुन सुटु शकते काय?याचेही उत्तर बर्‍यापैकी नकारात्मकच आहे.कारण तुम्ही एका कसाबला बदलाल तर दुसरा निर्माण होईल आणि तो रक्तपात घडवील्.त्याला बदलाल तर अजुन एक उभा राहील.म्हणजे ज्या समाजावर अन्याय होतोय त्याला सतत रक्तपातच सहन करावा लागेल्.शिवाय तुम्हाला तुमचा शत्रु माहीत असल्यास त्याचे मनपरीवर्तन तुम्ही करु शकता पण तुम्हाला तुमचा शत्रुच माहीत नाही तर तुम्ही काय कराल?

परीस्थितीच्या अनुसार हिंसा
आता आपण एखाद्या परीस्थितीमध्ये हिंसा बरोबर आहे का याचा विचार करु.स्वातंत्र्यवीर सावरकर याच्याबद्दल आग्रही आहेत्.ते म्हणतात की 'सापेक्ष अहिंसा हा सद्गुण आहे तर पुर्णपणे अहिंसा हा गुन्हा आहे'.सावरकरांचे मत स्पष्ट होते.तुम्ही जोपर्यंत हिंसा करता आहात तोपर्यंत आम्ही त्याचा प्रतिकार हिंसेनेच करणार.ते म्हणतात की सद्गुण अथवा दुर्गुण हे मुलतः फक्त गुण असतात्.परिस्थिती त्यांना सद्गुण अथवा दुर्गुण ठरवते.त्यामुळे परिस्थितीनुसार ठरवा.सगळ जग शस्त्र टाकुन परस्परप्रेमास तयार असेल तर आम्हीही आमची राष्ट्रभक्ती टाकुन देउ व त्यांना मिठी मारु.पण जर सगळे जग लढाईसाठी तयार होत असेल तर आम्हीही स्वतःची तयारी करु.आम्हीच अन्याय सहन का करावा?तो होउ नये म्हणुन आम्ही शस्त्रास्त्रांची नक्कीच मदत घेउ.ते जेंव्हा आक्रमक आहेत तेंव्हा आम्ही आक्रमक न बनल्यास ती आत्महत्या ठरेल असे सावरकरांचे मत होते.आततायी बळ हा अत्याचार आहे तर आततायांचा प्रतिकार करणारे बळ हा नक्कीच सदाचार आहे.आता पुढे विचार करताना आपण शिवाजी महाराजांचा विचार करु.शिवाजी महाराजांनीही सशस्त्र मार्गानेच स्वराज्य उभारले व जनतेवरचा अन्याय दुर केला.शिवाजी महाराजांनी तलवार उचलली नसती तर औरंगजेबाविरुध्द स्वराज्य निर्माण करता आले असते का?मला वाटते की ते शक्य नव्हते.शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करुन एका आदर्श राज्याचे उदाहरण दिले.सामान्य जनतेचे जमिनदारीसारख्या अन्याय्य पध्दतीपासुन सुटका केली.परधर्माबद्दल आचार कसा असला पाहीजे,स्त्रीया,वृध्द्,धर्मपुरुष यांच्याशी आदर्श व्यवहार कसा असला पाहीजे हे ही दाखवले.मग अशा प्रकारचे स्वराज्य व सुराज्य निर्माण करण्यास शस्त्राची मदत घेतल्यास काय चुकले?माझ्यामते तो मार्ग बरोबरच होता.गुरु गोविंद सिंग पण परिस्थितीला अनुसरुन हिंसा करण्याचा पुरस्कार करतात.ते झफरनामामध्ये म्हणतात की 'जेंव्हा इतर सर्व मार्ग बंद होतात तेंव्हा शस्त्र हातात घेणे बरोबर आहे.'त्यामुळेच तलवारीलाच ते दुर्गा म्हणतात व तीच आपल्याला विजय प्राप्त करुन देईल असेही सांगतात्.

गुरु गोविंद सिंग तलवारीचा वापर आक्रमणासाठी करायचा नाही तर स्वसंरक्षणासाठी करायचा असे सांगतात.किर्पाण जे शिखांचा पाच ककारांसाठी आहे ते अहिंसेचे साधन मानले गेलेले आहे.कारण हिंसा थांबवणे हे अहिंसेचे सुत्र शिख धर्म मानतो.त्यामुळे दुर्बलावर होणारी हिंसा रोखण्यासाठी जेंव्हा इतर सर्व मार्ग असफल होतात तेंव्हा किर्पाणचा वापर शस्त्र म्हणुन करणे हीच अहिंसा आहे असे शिख मानतात.त्यामुळे सत्य व तलवार हे एकत्र असल्यास ते न्याय्य आहे व ती अहींसाच आहे .अन्यायाविरुध्द लढण्यासाठी तलवार वापरणे फक्त बरोबरच नाही तर तेच न्याय्य आहे असे गुरु गोविंद सिंग सांगतात.कृर व्यक्तींच्या अन्यायापासुन निर्बल जनतेचे शस्त्राच्या सहाय्याने रक्षण न केल्यास हिंसा वाढण्याची शक्यता जास्त असते.त्यामुळे तेथे शस्त्र उचलणे आवश्यकच आहे असेही गुरु गोविंद सिंग सांगतात.

निष्कर्ष??
दोन्ही बाजुंचा वस्तुनिष्ठ विचार केल्यास नक्की बरोबर काय आहे हे ठरवणे अवघड होते.कारण गांधीजींचे "An eye for an eye makes the whole world blind."हे मतही बरोबर आहे.शिवाय कुठली हिंसा न्याय्य व कुठली अन्याय्य यातील सीमारेशा वास्तविक हिंसाचाराचा विचार करताना पुसट होतात्.शिवाय आपल्याबरोबर आता ते धर्मगुरुही नाहीत.त्याचबरोबर एकच गोष्ट वेगवेगळ्या लोकांना न्याय्य अथवा अन्याय्य वाटु शकते.आता अमेरीकेने इराकवर हल्ला केला हे अमेरीकन्सना न्याय्य वाटते तर इराक्यांना अन्याय्य वाटते.एका जनसमुहाचा क्रांतिकारक दुसर्‍या जनसमुहाचा दहशतवादी असतो.शिवाय आधुनिक संहारक शस्त्रास्त्रांचा विचार केल्यास शस्त्रांचा प्रयोग हा कुणाना कुणावर तरी अन्याय करतच असतो.कारण या शस्त्रास्त्रांमुळे होणारी मनुष्यहानी अनेकदा सामान्य्,निर्बल जनतेचेच जीव घेताना दिसते.त्यामुळे तो हिंसाचार आपोआपच अन्याय्य ठरतो.सर्वच राष्ट्रांचे सम्हारक शस्त्र एक दिवस संपुर्ण मनुष्यजातीलाच संपवतील का??का उलट ही संहारक शस्त्रे युध्द रोखण्यासाठी उपयोगी ठरतील्.उदा.भारत्-पाक युध्द व्हायची परिस्थिती बर्‍याचदा आली पण दोघांनीही अण्वस्त्र वापरली जातील म्हणुन युध्द टाळले.मग असे असेल तर अण्वस्त्रांमुळे अहिंसेला मदत झाली असे म्हणावे का??आणि जर जगातले सर्वच राष्ट्र युध्दाची तयारी करत असतील तर आपणच युध्दविरोधी भुमिका घेउन असे काय साध्य होणार आहे??याने हिंसा तर थांबणार नाहीच पण आपला तोटाही होईल्.जर असे असेल तर आपणच ही वाट का धरावी??ओशो म्हणतात की युध्द हा मनुष्याचा स्थायीभाव आहे.युध्द हे नेहमीच मनुष्याबरोबर राहिलेले आहे.त्यामुळे युध्द चुकीचे आहे म्हणनेच चुक आहे.त्यामुळे न्याय -अन्याय याचा फारसा विचार न करता आपण युध्दाकडे सकारात्मक दृष्ट्या पहावे का??मला वैयक्तिक दृष्ट्या सर्व गोष्टींचा विचार केल्यास सावरकरांचे प्रतिकार म्हणुन हिंसेचे तत्व योग्य वाटते.वाचकांनी या शेवटच्या परीच्छेदामधील प्रश्नांची त्यांची उत्तरे जरुर कळवावीत.

चिन्मय कुलकर्णी

इतिहासविचार

प्रतिक्रिया

एकलव्य's picture

8 Jan 2009 - 8:20 am | एकलव्य

म्हणजे गांधीजींच्या मार्गाचे जे कट्टर विरोधक होते तेसुध्दा दुसरा कुठला उपाय नसल्यावर त्याच गांधीजींच्या मार्गाचा अवलंब करतात.

हे विधान थोडे ताणल्यासारखे वाटते... आणि आकसही दाखविते असे आम्हाला वाटते.

अहिंसेची मक्तेदारी फक्त गांधीवादाची नाही. गांधीजींचेही तसे म्हणणे नव्हते. भगतसिंग, सावरकर यांचा अहिंसेला विरोध नव्हता... भाबड्या अहिंसेला होता. (अर्थात चिन्यासाहेबांनी इतरत्र क्रांतिकारकांनी अहिंसेच्या केलेल्या प्रयोगांचे दाखलेही दिलेले आहेत हे मान्य आहे.)

आग्रह सत्याचा आहे की नाही ही काय ती कसोटी. हा आग्रह अहिंसेच्याच मार्गाने धरायचा हा हट्टाग्रह आणि सत्याचा आग्रह तरी का धरायचा या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत अशी भगसिंग प्रभृतीची भूमिका होती असे दिसते.

- एकलव्य

(दुवे शोधत बसलो नाही... हवे असल्यास सवडीने देईन. तोवर हवेत विधाने केली आहेत असा सोयीस्कर तर्क कोणाला काढायचा असेल तर खुशाल काढावा.)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

8 Jan 2009 - 10:56 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

चिन्यासाहेब, आत्ता वेळ कमी असल्यामुळे वरवर लेख चाळला. पण नीट लक्ष देऊन लेख वाचायला लागेल एवढा गृहपाठ करून तुम्ही (बर्‍याच दिवसांनी मिपावर अवतरून) लिहिलं आहेत, त्याबद्दल मनापासून आभार.

महेश हतोळकर's picture

8 Jan 2009 - 12:44 pm | महेश हतोळकर

+१. नीट लक्ष देऊन किमान २ वेळातरी वाचावा लागेल.

कोलबेर's picture

8 Jan 2009 - 9:20 pm | कोलबेर

अभ्यासपूर्ण लेख. आत्ता वेळ कमी असल्यामुळे वरवर लेख चाळला. पण नीट लक्ष देऊन लेख वाचायला लागेल .

असेच म्हणतो.

अवांतर: गांधीजींचे नाव ऐकले की तळपायाची आग मस्तकात जाणार्‍यांसाठी उत्तम लेख.

सुनील's picture

8 Jan 2009 - 9:23 pm | सुनील

गांधीजींचे नाव ऐकले की तळपायाची आग मस्तकात जाणार्‍यांसाठी उत्तम लेख.
सहमत.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

चेतन's picture

9 Jan 2009 - 11:38 am | चेतन

चिन्मय एक संयमीत आणी उत्तम लेख झालाय.

गांधीजींचे नाव ऐकले की तळपायाची आग मस्तकात जाणार्‍यांसाठी उत्तम लेख.

हे उलटेही लागु होते.

गांधिजींचा स्वातंत्र्य मिळवण्यात खूप मोठा वाटा होता पण त्यामुळे क्रांतिकार्‍यांचा मार्ग चुकीचा होता व त्यांना कमी लेखावे असे नाही. जर गांधीजी क्रांतिकार्‍यांवर टिका करु शकतात तर इतरांनी गांधीवर टिका केली तर काय बिघडते.

मी गांधी विरोधी बिलकुल नाही पण मी क्रांतिकार्‍यांचाही तेव्हढाच आदर करतो.
गांधीजी हयात असतानाही भारत पाकिस्तान फाळणी झाली हे सत्य आहे आणि गांधी फाळणी टाळु शकले नाहित.

त्याचमुळे भगत सिंग्,स्वातंत्र्यवीर सावरकर व इतर क्रांतिकारकांनीही आपल्या तुरुंगवासात होणार्‍या अन्यायाविरुध्द अहिंसात्मक सत्याग्रहाचा व उपोषणाच्या मार्गाचा अवलंब केलेला दिसतो.म्हणजे गांधीजींच्या मार्गाचे जे कट्टर विरोधक होते तेसुध्दा दुसरा कुठला उपाय नसल्यावर त्याच गांधीजींच्या मार्गाचा अवलंब करतात.

नाइलाज म्हणुन. क्रांतिकार्‍यांना कोणत्याही प्रकाराचि अलर्जी नव्हती असेही म्हणता येइल.

माझे काही प्रश्नः

मुंबई मधील ताजमध्ये घुसलेल्या किंवा छत्रपती शिवाजी टर्मीनन्स वर गोळीबार करणार्‍या अतिरेक्याविरुध्द अहिंसा कशी उपयुक्त ठरली असती हे मला तरी समजत नाही.

पाकिस्तानचे मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न भारताने कितिवेळा केला आणि त्याचा काय फायदा झाला.

चिनने किंवा पाकिस्तानने जेव्हा हल्ला केला तेव्हा आहिंसेने हा प्रश्न कसा सोडवता आला असता?

चेतन

अवांतरः गांधीना मोठे करण्यासाठी क्रांतिकार्‍यांची हेटाळणी करायची आणी क्रांतिकार्‍यांना मोठे करण्यासाठी गांधीची हेटाळणी करायची हा यशस्वी लेखाचा फॉर्म्युला असावा. पण त्यानेच द्वेष वाढत जातो.
अतिअवांतरः गांधिवाद्यांना वरिल फॉर्म्युला मान्य आहे का?

सुनील's picture

9 Jan 2009 - 12:49 pm | सुनील

अवांतरः गांधीना मोठे करण्यासाठी क्रांतिकार्‍यांची हेटाळणी करायची आणी क्रांतिकार्‍यांना मोठे करण्यासाठी गांधीची हेटाळणी करायची हा यशस्वी लेखाचा फॉर्म्युला असावा. पण त्यानेच द्वेष वाढत जातो.
सहमत. अगदी हेच म्हणतो.

अतिअवांतरः गांधिवाद्यांना वरिल फॉर्म्युला मान्य आहे का?
इथे प्रश्न किंचित चुकला! ह्याचे कारण क्रांतीकारकांची हेटाळणी करणारे लिखाण मी अद्यापतरी येथे वाचले नाही. गांघींची हेटाळणी करणारे लिखाण मात्र मुबलक आहे!!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

चेतन's picture

9 Jan 2009 - 2:11 pm | चेतन

सहमत. अगदी हेच म्हणतो.
+२

अतिअवांतरः गांधिवाद्यांना वरिल फॉर्म्युला मान्य आहे का?
इथे प्रश्न किंचित चुकला! ह्याचे कारण क्रांतीकारकांची हेटाळणी करणारे लिखाण मी अद्यापतरी येथे वाचले नाही. गांघींची हेटाळणी करणारे लिखाण मात्र मुबलक आहे!!
-२
क्रांतीकारकांची हेटाळणी करणारे प्रतिसाद मी मात्र येथेच बरेच वाचलेत. (१४ वर्षाचा अतिरेकी वगैरे)

चेतन

सुनील's picture

9 Jan 2009 - 2:23 pm | सुनील

त्यात क्रांतीकारकांची नक्की काय हेटाळणी होती? त्यांच्या मार्गाविषयी दुमत व्यक्त झाले असेल फार तर. पण गांधींच्याबाबत????

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

चिन्या१९८५'s picture

9 Jan 2009 - 3:40 pm | चिन्या१९८५

धन्यवाद चेतन!!
नाइलाज म्हणुन. क्रांतिकार्‍यांना कोणत्याही प्रकाराचि अलर्जी नव्हती असेही म्हणता येइल.
बरोबर आहे.पण मला त्यात विरोधाभास दिसतो.

मुंबई मधील ताजमध्ये घुसलेल्या किंवा छत्रपती शिवाजी टर्मीनन्स वर गोळीबार करणार्‍या अतिरेक्याविरुध्द अहिंसा कशी उपयुक्त ठरली असती हे मला तरी समजत नाही.
अशा वेळेला तेथील जनतेने पॅसिव्ह रेसिस्टंस करायला हवा होता असे गांधीवादी म्हणतील.

पाकिस्तानचे मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न भारताने कितिवेळा केला आणि त्याचा काय फायदा झाला.चिनने किंवा पाकिस्तानने जेव्हा हल्ला केला तेव्हा आहिंसेने हा प्रश्न कसा सोडवता आला असता?
माझे मत आहे की अहिंसेचा इथे फारसा उपयोग झाला नसता.

गांधीना मोठे करण्यासाठी क्रांतिकार्‍यांची हेटाळणी करायची आणी क्रांतिकार्‍यांना मोठे करण्यासाठी गांधीची हेटाळणी करायची हा यशस्वी लेखाचा फॉर्म्युला असावा.
हे माझ्या लेखाबद्दल आहे का??
बघा- http://gandharvablog.blogspot.com/

गांधिजींचा स्वातंत्र्य मिळवण्यात खूप मोठा वाटा होता पण त्यामुळे क्रांतिकार्‍यांचा मार्ग चुकीचा होता व त्यांना कमी लेखावे असे नाही. जर गांधीजी क्रांतिकार्‍यांवर टिका करु शकतात तर इतरांनी गांधीवर टिका केली तर काय बिघडते.

गांधीजींनी क्रांतिकारकांवर टिका केली असेल तर क्रांतिकारकांनी गांधीजींवर टिका करायची. इतरांनी उठसूठ कशाला तारे तोडायचे?

गांधीजी हयात असतानाही भारत पाकिस्तान फाळणी झाली हे सत्य आहे आणि गांधी फाळणी टाळु शकले नाहित.

तेव्हा क्रांतिकारकांनी टाळायची ना.

क्रांतिकार्‍यांना कोणत्याही प्रकाराचि अलर्जी नव्हती असेही म्हणता येइल.

जर क्रांतिकारकांना ऍलर्जी नव्हती तर बाकीच्यांना इतकी ऍलर्जी का? उगीचच काहीतरी बोलायचं म्हणून बोलतात लोक.

प्रतिकार आणि हिंसा यांतला फरकही कळत नाही लोकांना की मुद्दाम करतात.

क्लिंटन's picture

9 Jan 2009 - 4:08 pm | क्लिंटन

हा लेख अभ्यासू आणि मिसळपाववरील मी वाचलेल्या लेखांपैकी सर्वोत्तम लेखांमध्ये एक आहे. असा लेख लिहिल्याबद्दल चिन्यासाहेबांचे आभारी आहोत.

>>गांधीजींचे नाव ऐकले की तळपायाची आग मस्तकात जाणार्‍यांसाठी उत्तम लेख

गांधी महान होते याविषयी वाद नाही. किंबहुना खुद्द नथुराम गोडसेने सुध्दा गांधीजींची महानता मान्य केली आहे.

तरी तळपायाची आग मस्तकात का जाते यामागची कारणे (जी पूर्वी लिहिली नव्हती) इथे विषद करत आहे.

१) मी ad nauseam मांडलेला मुद्दा म्हणजे १९४६ च्या निवडणुका. त्या निवडणुका मुस्लीम लीगने पाकिस्तान या एक कलमी कार्यक्रमावर लढविल्या होत्या. त्यात अगदी दक्षिणेतील मद्रास प्रांतातूनही (जो पाकिस्तानात सामील व्हायची जराही शक्यता नव्हती) मुस्लीमांसाठी राखून ठेवलेल्या जागांमधून काँग्रेसच्या उमेदवारांचा पराभव करून लीगचे उमेदवार का निवडुन यावेत? (संदर्भः रामचंद्र गुहांचे 'India After Gandhi' हे पुस्तक)
याचा अर्थ तेथील मुस्लिमांनी लीगला (म्हणजे भारताच्या फाळणीला) समर्थन दिले असा होत नाही का? आणि तसे असेल तर ज्यांनी लीगला मते दिली त्यांना त्यांच्या देशात हाकलून द्यावे अशी मागणी करण्यात चूक काय? आणि तरीही गांधींनी त्यांच्याविरूध्द चकार शब्द न उच्चारता हिंदूंना शांततेचे डोस पाजत राहणे कसे समर्थनीय ठरते?

२) गांधींनी कलकत्यातील लीगच्या प्रत्यक्ष कृती दिनात हिंदूंची कत्तल झाल्यावर फारसे काही न बोलणारे गांधी हिंदू प्रत्युत्तर द्यायला लागल्यावर उपोषणाला का बसले? सुर्‍हावर्दींनी हिंदूंच्या प्रत्युत्तरापासून मुस्लिमांचे संरक्षण करण्यासाठी गांधींची मदत मागितली आणि ती गांधींनी दिली. ते का?

३) ५५ कोटींच्या मुद्द्याबद्दल तर काय बोलावे? भारत सरकार पाकिस्तानला ५५ कोटी रुपये देणे लागत होते हे सत्य आहे. पण त्यापूर्वी पाकिस्तानने काश्मीरवरील आक्रमण मागे घ्यावे असे भारत सरकारचे म्हणणे होते. पाकिस्तानला दक्षिणा देऊन त्यांचे मनपरिवर्तन करता येईल अशी अत्यंत भाबडी आशा बाळगून गांधी उपोषणाला बसले आणि त्यांनी भारत सरकारला झुकायला भाग पाडले. पुढे ५५ कोटींचा उपयोग भारताविरूध्दच्या आक्रमणात झाला पाकिस्तानातील विकासकार्यांसाठी नाही! मग शत्रूला बलिष्ठ करून आपल्या देशाच्या हितसंबंधांचे नुकसान करण्यात गांधींनी महत्वाची भूमिका बजावली असे म्हटले तर त्यात चूक काय?

बरं मुस्लिमांचे इतके लांगूलचालन करून ते त्यांना आपले मानत होते का? तर तसेही नाही. गांधीहत्येनंतर जीनांची प्रतिक्रिया काय तर हिंदूंचा महत्वाचा नेता गेला आणि त्या समाजाचे नुकसान झाले (संदर्भः परत एकदा रामचंद्र गुहांचे वर उल्लेख केलेले पुस्तक)

गांधींची तत्वनिष्ठा आणि त्यांनी सामान्य जनतेला स्वातंत्र्यलढ्यात सहभागी करून घेतले आणि सामाजिक क्षेत्रातील कार्याबद्दल सर्वांनाच आदर आहे. पण वर उल्लेख केलेल्या कारणांमुळे माझे तरी मत आहे की गांधींनी भाबडा विश्वास दाखवला, जनतेतील आपल्या स्थानाचा वापर केला आणि उपोषणे करून देशाच्या हितसंबंधांविरूध्द भूमिका घ्यायला भाग पाडले. आणि म्हणून गांधींचे नाव ऐकताच माझ्या तळपायाची आग मस्तकात जाते आणि त्याविषयी मला जराही खेद वाटत नाही.

अवांतरः अहिंसा हे एक महान तत्व आहे. प्रतिसादांमध्ये उल्लेख केलेले अहिंसेचे फायदे १००% मान्य. पण आपला शत्रू थोडातरी सुसंस्कृत असेल तरच त्या अहिंसेचा उपयोग असतो. इंग्रज राज्यकर्त्यांनी जालियनवाला बागेत शेकडो भारतीयांची कत्तल केली, भारतीय कुटिरोद्योगाचे प्रचंड नुकसान केले आणि इतर अनेक दुष्परिणाम इंग्रज राजवटीमुळे भारताला सहन करावे लागले. पण तरीही इंग्रज हिटलर, तालिबान किंवा अल-कायदापेक्षा अनंत पटींनी सुसंस्कृत होते.इंग्रजांऐवजी तालिबानी किंवा गझनीच्या महंमदाची राजवट असेल तर सरसहा कत्तली हा एकच न्याय आणि हा एकच पुरावा असेल. अशा ठिकाणी अहिंसेचा काय उपयोग झाला असता?

---विल्यम जेफरसन क्लिंटन

कोलबेर's picture

9 Jan 2009 - 8:53 pm | कोलबेर

५५ कोटींच्या मुद्द्याबद्दल तर काय बोलावे?

ज्याची त्याची विचारसरणी. उद्या समजा माझ्या मित्राचे माझ्याकडे उसने घेतलेले १००० रुपये आहेत, आणि त्याचे माझे भांडण झाले. तर निदान मी तरी आधी त्याचे १००० रुपये तोंडावर फेकेन आणि मग वाट्टेल तितके भांडेन. त्याचवेळेस अजुन कुणाला 'नाहीतरी भांडण झालेच आहे कशाला द्या त्याचे पैसे परत' असा विचार देखिल येऊ शकतो. ज्याची त्याची विचारसरणी.

पाकिस्तानने (उघड उघड)कळ काढली तर त्याचे उत्तर द्यायला भारत समर्थ होता/आहे. त्यामुळे त्यांचे ५५ कोटी आधी तोंडावर फेकुन मगच त्यांना जवाब द्यावा, ह्यात मला तरी काही गैर वाटले नाही . शत्रुला बलवान केले वगैरे तर अजीबात वाटले नाही. उलट माझ्या देशाने कुणाचे (विशेष्तः भांडकुदळ शेजार्‍याचे) नस्ते देणे ठेवले नाही ह्याचा अभिमान वाटतो.

llपुण्याचे पेशवेll's picture

9 Jan 2009 - 8:56 pm | llपुण्याचे पेशवेll

बाचाबाची होत असेल तर मी ही तसेच करेन.
पण मारामारी करायला आला तर त्याला मी नक्की असे सांगेन अंगाला हात नाय लावायचा नायतर तुझी असली तरी फुटकी कवडी सुधा नाही देणार परत.

असो ज्याची त्याची विचारसरणी.

पुण्याचे पेशवे
Since 1984

कोलबेर's picture

9 Jan 2009 - 9:09 pm | कोलबेर

चालायचंच!
मी तरी त्याला 'आधी तुझे हजार रुपये उचल आणि मग अंगाला हात लावुन दाखव!' असंच म्हणेन

बट्टू's picture

9 Jan 2009 - 9:02 pm | बट्टू

त्याचे पैसे त्याच्या तोंडावर फेकेन आणि मग त्याला हाकलेन. बरोबर बोललात कोलबेर.

चिन्या१९८५'s picture

9 Jan 2009 - 9:32 pm | चिन्या१९८५

धन्यवाद क्लिंटन!!!
गांधीजींनी मुस्लिमांचे तुष्टीकरण केले हे मात्र नक्की.त्याच्याबद्दल त्यांना हिंदुंनी नक्कीच दोष द्यावा.पण मुस्लिमच काय कुणाबरोबरही गांधीजींनी तेच वर्तन केले असते.गांधीजींचा मनपरीवर्तनावर विश्वास होता.जीना बदलतील असे त्यांना अनेक वर्ष वाटत होते.गांधीजी हिंदु नसते तर त्यांनी मुस्लिमांबरोबर केले तसेच वर्तन हिंदुंबरोबर केले असते असे मला तरी वाटते. पण गांधीजी आजच्या सेक्युलर लोकांपेक्षा १००%पटीने बरे होते कारण 'मी हिंदु आहे ,त्याचा मला अभिमान' आहे असे ते सरळसरळ म्हणत्. हिंदु धर्माने मला अहिंसा शिकवली हे ही ते म्हणत्.आजच्या सेक्युलर्सप्रमाणे 'हिंदु' शब्दाची त्यांना ऍलर्जी नव्हती.बाकी मुस्लिमांसाठी इतके करुनही त्यांनी गांधीजींना महत्व दिल नाही.बहुतेक गांधीजींची महानता समजण्याची त्यांची क्षमताच नाही.दोन वर्षापुर्वी गुलाम नबी आझाद यांनी लहान मुलांना काश्मिरमध्ये 'गांधीजींच्या शिकवणीवर चाला' असे गांधी जयंतीला सांगितले.तर मुस्लिम धर्मगुरुंनी त्याचा निषेद केला.म्हणे असे करणे इस्लामच्या विरुध्द आहे.माझ्या मनात आल अरे ते (गांधीजी ) नसते तर तुमच्यातला एक तरी जिवंत राहिला असता का काय इस्लामिक आहे आणि काय अनैस्लामिक आहे हे ठरवायला???

बघा- http://gandharvablog.blogspot.com/

प्रियाली's picture

8 Jan 2009 - 9:47 pm | प्रियाली

वरील प्रतिसादांशी सहमत आहे.

गांधीजींनी सामान्य जनतेला ज्या प्रकारे मुख्य प्रवाहात सामील करून घेतले तसे क्रांतीकार्याला जमणे कठिण आहे. जी कामे/ गुन्हे लपून छपून चालतात तिथेच फंदफितुरी, गद्दारी संभवते आणि याचा परिणाम त्या संघटनेला भोगावा लागतो.

चिन्या१९८५'s picture

8 Jan 2009 - 10:01 pm | चिन्या१९८५

कोलबेर्,सुनिल्,प्रियाली आपल्या सविस्तर प्रतिसादांची अपेक्षा आहे
बघा- http://gandharvablog.blogspot.com/

चिन्या१९८५'s picture

8 Jan 2009 - 4:20 pm | चिन्या१९८५

धन्यवाद एकलव्य.मला नाही वाटत की त्या वाक्यात काही आकस आहे.मी गांधीजी आणि क्रांतिकार्यापैकी क्रांतिकार्याचाच स्विकार केला असता.त्यामुळे त्यांच्याबद्दल कणभरही आकस नाही.माझे म्हणने इतकेच आहे की उपासानी काही होणार नाही म्हणनारेच नंतर उपासही करु लागले हा नक्कीच विरोधाभास आहे.याचा अर्थ त्यांछे म्हणने चुक होते असा होत नाही.बाकि हा आग्रह अहिंसेच्याच मार्गाने धरायचा हा हट्टाग्रह आणि सत्याचा आग्रह तरी का धरायचा या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत अशी भगसिंग प्रभृतीची भूमिका होती असे दिसते. या वाक्याचा अर्थ मला कळला नाही.कृपया याबद्द्ल अजुन सांगा.
अदिती आणि मी,आपल्या प्रतिक्रियांची वाट पहातोय.

बघा- http://gandharvablog.blogspot.com/

एकलव्य's picture

8 Jan 2009 - 11:02 pm | एकलव्य

माझे म्हणने इतकेच आहे की उपासानी काही होणार नाही म्हणनारेच नंतर उपासही करु लागले हा नक्कीच विरोधाभास आहे.

माझे म्हणणे आहे की नंतर उपास करू लागले असे ज्या क्रांतिकारकांविषयी आपण म्हणता आहात ते उपासानी काही होणार असे म्हणत होते असे नाही. फक्त उपासानी काहीही होणार नाही असे त्यांचे म्हणणे होते.
तसेच नंतर उपास करू लागले हेही पूर्वग्रहदूषित आहे. बरेचसे (सगळे कदाचित नसावेत) क्रांतिकारक आधी उपासाने आणि निदर्शनांनी काही साध्य होईल यासाठी स्वातंत्र्य आंदोलनात उतरले. भ्रमनिरासानंतर त्यांनी शस्त्र किंवा जहाल वाटही चोखाळली.

बाकि हा आग्रह अहिंसेच्याच मार्गाने धरायचा हा हट्टाग्रह आणि सत्याचा आग्रह तरी का धरायचा या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत अशी भगसिंग प्रभृतीची भूमिका होती असे दिसते.

सवडीने लिहिन... होऊ घातलेल्या विलंबाबद्दल क्षमस्व!

चिन्या१९८५'s picture

8 Jan 2009 - 11:19 pm | चिन्या१९८५

फक्त उपासानी काहीही होणार नाही असे त्यांचे म्हणणे होते.

पण नंतर त्यांनीही फक्त उपासच केला होता ना????नंतर याचा अर्थ आहे की विरोध केल्यानंतर.
बघा- http://gandharvablog.blogspot.com/

नितिन थत्ते's picture

8 Jan 2009 - 7:47 pm | नितिन थत्ते

मी गांधींच्या अहिंसेचा समर्थक आहे (म्हणजे क्रान्तिकारकान्च्या मार्गाने स्वातन्त्र्य मिळाले असते असे मला वाटत नाही. गांधींनी चळ्वळ केली नसती तरी स्वातंत्र्य मिळाले असते असे अनेकांचे मत असेल त्याविषयी मला काही म्हणायचे नाही.) परंतु सशस्त्र लढ्याच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळाले नसते यात मला काही शंका नाही. कारण अश्या मार्गाने कोणत्याही देशाला (की राष्ट्राला) स्वातन्त्र्य मिळाल्याचे उदाहरण मला ज्ञात नाही. जेव्हा दुसर्‍या देशाचा सशस्त्र पाठिंबा असेल तरच ते शक्य असते (उदा. इस्रायल, बांगला देश ). सशस्त्र क्रान्तीला मोठ्या प्रमाणात समाजाचा पाठिंबा मिळणे अवघड असते.

स्वातन्त्र्याची सार्वत्रिक आस गांधींच्या चळवळीमुळे निर्माण झाली. ब्रिटिश साम्राज्य कमकुवत तर झालेच होते. परंतु अशा मोबिलाइज्ड समाजाकडून असलेली हिंसेची गर्भित धमकी नाविकांच्य बंडाच्या स्वरूपात प्रत्यक्षात येवू लागल्याचे ब्रिटिशांनी ओळखले. ही गर्भित धमकी निर्माण करण्याचे काम गांधींच्या चळवळीने झाले असे मी मानतो.

गांधींची इतर मते मला मान्य नाहीत (ब्रह्मचर्य, निसर्गोपचार वगैरे). परंतु त्यामुळे माझ त्यांच्याविषयीचा आदर कमी होत नाही.

सर्वसाधारणपणे असे म्हट्ले जाते की १९३० ते १९७० च्या दरम्यान जवळ जवळ ७५ देशांना स्वातंत्र्य मिळाले. ( ब्रिटिश आणि फ्रेंच यांच्या साम्राज्यातून हे देश स्वतंत्र झाले.). गांधी नसतेच तर स्वांतत्र्य लांबले असते अथवा कोणीतरी दुसरा नेता झाला असता.

फारतर असे म्हणता भारतीयांच्या आणि तत्कालिन सर्वच घटकांना गांधींनी आपल्या परीने विचार करण्यास आणि कृती करण्यास भाग पाडले.

नितिन थत्ते's picture

8 Jan 2009 - 9:12 pm | नितिन थत्ते

ब्रिटिश राज्य कमकुवत झाले होते म्हणून स्वातंत्र्य मिळाले असे म्हणणे हे ही पूर्ण खरे नाही. भारत स्वतंत्र झाल्यावरही कित्येक वर्षे पुष्कळ देश पारतंत्र्यातच होते.

गांधींच्या आधीही स्वातन्त्र्य चळवळ होतीच परंतु, तिला सार्वत्रिक करण्याचे मुख्य काम गांधींनी केले.

कोलबेर's picture

8 Jan 2009 - 9:17 pm | कोलबेर

प्रतिसाद आवडला. थत्ते साहेबांच्या सर्वच मुद्यांशी सहमत.

विशेषतः

गांधींची इतर मते मला मान्य नाहीत (ब्रह्मचर्य, निसर्गोपचार वगैरे). परंतु त्यामुळे माझ त्यांच्याविषयीचा आदर कमी होत नाही.

चापलूस's picture

9 Jan 2009 - 12:30 pm | चापलूस

थत्ते महान प्रतिसाद.

आजानुकर्ण's picture

8 Jan 2009 - 8:07 pm | आजानुकर्ण

विषयांतराबद्दल माफ करा पण चिन्या१९८५ यांच्या ब्लॉगवर जात्युच्छेदन आणि शिवसेना यांबद्दल एक लेख वाचला. तो लेख मिपावर दिसला नाही म्हणून येथे प्रतिसाद लिहित आहे. त्या लेखात शिवसेनेने जात्युच्छेदनाचे कार्य पुढे चालवले आहे असा सूर दिसला.

मात्र मराठवाडा विद्यापीठ नामांतरावेळची शिवसेनेची भूमिका (जी जात्युच्छेदनाऐवजी जातिवाल्यांचेच उच्छेदन करणारी होती) आणि मुंबईतील पोलीस चाळींमध्ये दलितांवर महिनोंन्महिने फरशी, विटा अशी दगडफेक करणारे शिवसैनिक (ज्याचा विस्तार व अंगावर काटा आणणारे वर्णन अवचटांच्या एका पुस्तकात वाचता येईल. त्याचे नाव हवे असल्यास मी मिळवू शकतो.) याबाबत लेखकाने लिहावे असे सुचवावेसे वाटते.

आपला
(पददलित) आजानुकर्ण

चिन्या१९८५'s picture

8 Jan 2009 - 10:09 pm | चिन्या१९८५

आजानुकर्ण तो लेख मी येथे परत काही दिवसांनी टाकीन्.मग त्यावर चर्चा करु.बाकी तो लेख जात्युच्छेदन व हिंदुत्व असा होता,शिवसेना हा त्यातला एक भाग होता.तोपर्यण्त उत्तर असे की मला ती कृती जातीभेद वाढीस लावणारी आहे असे वाटत नाही.माझा वैयक्तिकरीत्या नामांतराला पाठीम्बा आहे पण तरीही नामांतराला विरोध केला याचा अर्थ लगेच ते जातिवादी झाले असा अर्थ नाही.शिवसेनेची कार्यपध्दती बघितल्यास तिथे जातपात चालत नाही हे तुम्हाला कळुन येईलंआहीतर फुले,आंबेडकरांचे नाव घेणार्‍या राष्ट्रवादीत जातीभेद सर्वात जास्त आहे.शिवसेनेचा आर्थिक मागासांना आरक्षण हा मुद्दा होता त्यामुळे त्यांनी काही काळ विरोधाचे धोरण ठेवले होते.बाकी ही चर्चा आपण माझ्या खरडफळ्ञावर करु अथवा इथे लेख टाकल्यावर करु
बघा- http://gandharvablog.blogspot.com/

चिन्या१९८५'s picture

8 Jan 2009 - 8:13 pm | चिन्या१९८५

प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद नितिन आणि कलंबी!!
माझ्यामते सशस्त्र क्रांत्या अमेरिका,फ्रान्स्,रशिया व इतर ठिकाणी झालेल्या आहेत्.त्यामुळे अशा पध्दतीने स्वातंत्र्य मिळवणे नक्कीच शक्य होते.भारतातही शक्य होते.फक्त गांधीजींसआरखा लोकप्रिय नेता त्या काळात निर्मान झाला नाही.

बघा- http://gandharvablog.blog

सुनील's picture

8 Jan 2009 - 8:17 pm | सुनील

माझ्यामते सशस्त्र क्रांत्या अमेरिका,फ्रान्स्,रशिया व इतर ठिकाणी झालेल्या आहेत्
फ्रान्स आणि रशियात परकीय सत्ता नव्हती आणि अमेरिकेला फ्रान्सची सक्रीय मदत मिळाली होती.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

चिन्या१९८५'s picture

8 Jan 2009 - 10:14 pm | चिन्या१९८५

बरोबर आहे.पण त्याने फारसा फरक पडत नाही. regime change करण्याबाबत मी बोलत होतो.शिवाय independence आणि freedom यात फरक आहे काय्??मला वाटते की क्रांतिकारकांच्या मार्गानी ब्रिटीशांपासुन मुक्तता झाली असती पण तरीही व्यक्तिगत स्वातंत्र्यावर गदा आली असती कारण त्यांना कम्युनिस्ट क्रांती अपेक्षित होती.
बघा- http://gandharvablog.blogspot.com/

नितिन थत्ते's picture

8 Jan 2009 - 9:26 pm | नितिन थत्ते

गांधीप्रणित अहिंसक चळवळीची अजून एक चांगली बाजू :
जेव्हा चळवळ (किंवा लढा) समाप्त होतो तेव्हा लढ्यातील सैनिक मोकळे होतात त्यावेळी त्यांचे काय करायचे हा प्रश्न सोडवावा लागतो. नाहीतर ते तालिबान्यांप्रमाणे उच्छाद मांडू शकतात. सशस्त्र लढ्यातील सैनिकांकडे शस्त्रास्त्रे ही असतात. हा प्रश्न अहिंसक लढ्यातून निर्माण होत नाही.

तसेच कार्यकर्त्यांना (बिपिन कार्यकर्ते नव्हे) विधायक कार्यात गुंतवून गांधींनी उरला सुरला प्रश्न ही सोडवायचा मार्ग शोधला होता.

कलंत्री's picture

8 Jan 2009 - 9:37 pm | कलंत्री

आपला हाही प्रतिसाद महत्त्वाचाच आहे. गांधींनी आपल्या कार्यकर्त्यांना खर्‍या अर्थाने कामाला लावले होते. दारुबंदी, हिंदू-मुस्लिम ऐक्य, खादी, खेड्याकडे चला, ग्रामस्वराज्य, हरिजन मुक्ति, प्रभातफेरी अश्या एकापेक्षा एक योजना त्यांनी मांडल्या होत्या. एकतर तुरुंगात जायचे अथवा अशा विधायक कामात गुंतवुन घ्यायचे असा सक्रिय कार्यक्रम असताना कोणता कार्यकर्ता मोकळा राहील आणि सैतानाला आपल्या मनात मुक्काम करायला परवानगी देईल.

गांधींनी खर्‍याअर्थाने महासभेला प्रत्येक घरात नेले होते.

कधी कधी एक शंका मनात येते की गांधींचा खरा प्रभाव भारतात कोठे कोठे पडला होता? आजच्या पाकिस्तानात त्यांचे काही कार्यकर्ते होते काय? खर्‍या अर्थाने गांधी भारताचे नेते होते काय?

चिन्या१९८५'s picture

8 Jan 2009 - 10:22 pm | चिन्या१९८५

नितिन्,तुम्ही मांडलेला मुद्दा गांधीजींनीही मांडला होता.त्यांनी म्हटले होते की ही क्रांती मासेस नी केलेली नसेल त्यामुळे मासेससाठी क्रांती फारस काही देउ शकणार नाही.त्यामुळे या क्रांतीने देशात अराजक माजेल व ब्रिटीश जाउन एक दुसरी अन्याय करणारी राज्यव्यवस्था येईल अशी भिती गांधीजींना होती.बाकी मनुष्यपरीवर्तनाच्या मुद्द्यावर तर अहिंसेचा पुर्ण डोलारा उभा आहे.तुम्हाला अहिंसेचा मार्ग मान्य आहे पण मनुष्यपरीवर्तन मान्य नाही हे आश्चर्यच आहे.

कलंबी,गांधीजींनी स्वातंत्र्याची चळवळ खर्‍या अर्थाने मास मुव्हमेंट बनवली.ती चळवळ अतिशय सोपी बनवली.तु लाठ्या खा की झाला तु स्वातंत्र्यसैनिक्,जेलमध्ये जा की झाला तु स्वातंत्र्यसैनिक्,चरखा चालव की झाला तु स्वातंत्र्यसैनिक्.इथे मरेंगे,मारेंगे ,मग त्याच्यासाठी कष्ट ,टेन्शन्स वगैरे नव्हते.
बघा- http://gandharvablog.blogspot.com/

प्रियाली's picture

8 Jan 2009 - 10:31 pm | प्रियाली

तु लाठ्या खा की झाला तु स्वातंत्र्यसैनिक्,जेलमध्ये जा की झाला तु स्वातंत्र्यसैनिक्,चरखा चालव की झाला तु स्वातंत्र्यसैनिक्.इथे मरेंगे,मारेंगे ,मग त्याच्यासाठी कष्ट ,टेन्शन्स वगैरे नव्हते.

खरं आहे पण जरा आणखी चांगल्या शब्दांत यायला हवे.

गांधींच्या धोरणांनुसार ८-१० वर्षांच्या मुलापासून ८० वर्षांच्या म्हातार्‍यांपर्यंत सर्व सहज चालू शकत होते. त्यांचा लढा हा सर्वसामान्य जनतेला कोणत्याही अतिरिक्त कौशल्यांखेरीज लढता येण्यासारखा होता. बंदुका चालवणे, बॉम्ब बनवणे, वेषांतर करणे, भूमिगत होणे, कट रचणे, तो अंमलात आणणे, मरण स्वीकारणे वगैरे गोष्टींची आवश्यकता नव्हती. घरसंसार सांभाळणारी एखादी सामान्य व्यक्तिही या लढ्यात सामील होऊ शकत होती. म्हणूनच गांधीजी सामान्यांपर्यंत पोहोचू शकले.

स्वदेशी, खादी, उपास, जाहीर सभा अशा सर्व कार्यक्रमांतून ते राज्यकर्त्यांपर्यंत आणि जनतेपर्यंत बिनदिक्कत पोहोचू शकले.

तूर्तास इतकेच. घाईत आहे.

लिखाळ's picture

8 Jan 2009 - 11:10 pm | लिखाळ

गांधींच्या धोरणांनुसार ८-१० वर्षांच्या मुलापासून ८० वर्षांच्या म्हातार्‍यांपर्यंत सर्व सहज चालू शकत होते.
हम्म .. सशस्त्र क्रांतीमध्ये १४ वर्षांच्या मुलांचा सहभाग तालीबानी वाटतो तो ब्रेनवॉशिंग या धोरणाने. तर इथे सुद्धा तसेच नाही का?
हा प्रतिसाद विषयांतर करणारा असेल तर खव मध्ये बोलू.
-- लिखाळ.
माझी अनुदिनी
'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.

प्रियाली's picture

8 Jan 2009 - 11:21 pm | प्रियाली

जाण्याचा प्रयत्न तर नाही ना. तिकिट काढून देते हवं तर पेडगावचं. :)

लहान मुले खादी वापरणे, चरखा चालवणे शिकणे, झालंच तर शेळीच्या पायाला पाला लावणे करू शकत होती. ;) गांधी त्यांना फार वेगळे करायला सांगत नव्हते. गुन्हेच करायला हवेत असे सांगत नव्हते. त्या पोरांनी हातात बंदुका धरत नव्हती की लाठीही आणि चरखा किंवा तिरंगा पकडणे हा गुन्हा नव्हे.

खरडवहीत कशाला इथेच सांगते प्रतिसादातील मुख्य वाक्य त्यांचा लढा हा सर्वसामान्य जनतेला कोणत्याही अतिरिक्त कौशल्यांखेरीज लढता येण्यासारखा होता. हे आहे.

झुमाक्ष's picture

8 Jan 2009 - 11:55 pm | झुमाक्ष (not verified)

तिकिट काढून देते हवं तर पेडगावचं.

ते शक्य नाही.

तिकीट कंदाहारपर्यंतचेच मिळू शकते. तेथून पुढील प्रवास उंटावरून करावा लागतो.

उंटाचे आगाऊ तिकीट मिळत नाही. उंटवाल्याला आयत्या वेळी पटवावे लागते.

पांघरण्यासाठी लागणारी वस्तू बरोबर आणण्याची जबाबदारी सर्वस्वी प्रवाशांची आहे. ती पुरवण्यास प्रवासएजंट अथवा उंटवाला बांधील नाही.

टीप: उंटाऐवजी जुने रशियन रणगाडे मिळू शकतात असे वाटते. प्रवाशांनी अधिक माहिती स्वतःच्या जबाबदारीवर काढावी.

(ऐकीव माहितीवरून.)

- झुरळ मारणारा क्षत्रिय.

लिखाळ's picture

9 Jan 2009 - 12:32 am | लिखाळ

नको तिकिट नको. उलट नव्या वर्षाचा काही संकल्प करावा म्हणतो :)
-- लिखाळ.

नितिन थत्ते's picture

8 Jan 2009 - 10:39 pm | नितिन थत्ते

१. त्यांचे नांव कलंबी नसून कलंत्री (कलन्त्री) आहे.

२. तु लाठ्या खा की झाला तु स्वातंत्र्यसैनिक्,जेलमध्ये जा की झाला तु स्वातंत्र्यसैनिक्,चरखा चालव की झाला तु स्वातंत्र्यसैनिक्.इथे मरेंगे,मारेंगे ,मग त्याच्यासाठी कष्ट ,टेन्शन्स वगैरे नव्हते.

हे अगदीच काहीतरी.
सत्याग्रहात भाग घेताना अनेक लोकांनी आपापले व्यवसाय / शिक्षण सोडले होते. त्यातून होणारा त्रास भोगलाच होता.
सत्याग्रहात भाग घेतल्यावर मारेंगे नसले तरी मरेंगे हे होतेच.
लाठ्या खाल्ल्यावर स्वातंत्र्यसैनिक .... वगैरे स्वातन्त्र्यानंतर उपटलेल्या संधीसाधू गोष्टी आहेत.
चरखा चालवण्याचे महत्त्व माझ्या आधीच्या एका प्रतिसादात सांगितले आहेच.

मनुष्यपरिवर्तन मान्य आहे. माणसाचा आजार बरा होतो हे मान्य नाही.

चिन्या१९८५'s picture

8 Jan 2009 - 10:51 pm | चिन्या१९८५

प्रियाली,बरोबर आहे.
थत्ते,ते वाक्य गांधीजींनी लढ्याचे सरलीकरण केले हे सांगण्यासाठी केले होते.त्रास भोगावा लागला नाही असे मी म्हटलेले नाहीये.पण क्रांतिकारकांचा त्रास याहुन नक्कीच जास्त होता.शिवाय त्यांचा मार्गही अवघड होता.माणसाचा आजार बरा होतो म्हणजे शारीरीक आजार नाही तर हिंसा ,अन्याय करण्याचा 'आजार' बरा होतो
बघा- http://gandharvablog.blogspot.com/

नितिन थत्ते's picture

8 Jan 2009 - 10:43 pm | नितिन थत्ते

कलंत्री, तुम्ही काँग्रेसला महासभा म्हणू नका बुवा. आमचा पामरांचा नामसाधर्म्यामुळे गोन्धळ होतो.

घाटावरचे भट's picture

9 Jan 2009 - 7:39 am | घाटावरचे भट

सशस्त्र लढ्यातील सैनिकांकडे शस्त्रास्त्रे ही असतात. हा प्रश्न अहिंसक लढ्यातून निर्माण होत नाही.

बरोबर आहे. फक्त, स्वातंत्र्य मिळेपर्यंत गांधीजींच्या विचाराने चालणार्‍या तथाकथित अनुयायांनी गांधीजींचे कार्य आणि विचाराची पर्वा न करता सत्तेच्या रिंगणात उड्या घेतल्या आणि आजकाल जो भ्रष्टाचार बोकाळलाय वगैरे म्हणतात ना त्याला जन्म दिला.

प्रियाली's picture

9 Jan 2009 - 4:17 pm | प्रियाली

स्वातंत्र्य मिळेपर्यंत गांधीजींच्या विचाराने चालणार्‍या तथाकथित अनुयायांनी गांधीजींचे कार्य आणि विचाराची पर्वा न करता सत्तेच्या रिंगणात उड्या घेतल्या आणि आजकाल जो भ्रष्टाचार बोकाळलाय वगैरे म्हणतात ना त्याला जन्म दिला.

वाक्यात चुकीचे काहीच नाही पण हे सर्व आफ्टरमॅथ आहे. केवळ बंदुकीच्या तालावर स्वातंत्र्य मिळत असेल तर सर्व आलबेल होतं अशी खात्री देता आली असती तर उपयोगाचे नाहीतर अहिंसेने भ्रष्टाचार आला तसाच सशस्त्र क्रांतीने भारतातही हिटलर तयार झाला असता असे विधान कोणी केले तर वावगे ठरू नये.

कोणताही धर्म, संस्था हे त्याचे संस्थापक असताना जे कार्य करतात त्याच्या विपरित कार्य बरेचदा अनुयायांकडून होते हे सर्वत्रच पाहिले गेले आहे.

नितिन थत्ते's picture

8 Jan 2009 - 9:28 pm | नितिन थत्ते

अहिंसेने मनुष्यात बदल होतो,मनुष्याचा आजार बरा होतो

हे मात्र मान्य नाही.

विनायक पाचलग's picture

8 Jan 2009 - 10:54 pm | विनायक पाचलग

या विशयावर प्रतिक्रिया देण्यासाठी अभ्यासाची गरज आहे जो व्यासंग आमचा नाही
एक नजर टाकल्यावर लेख चांगला वाटला
शुभेच्छा

विनायक पाचलग
माझ्या भावना येथे उतरतात.
आणि हो सर्वात महत्वाचे म्हणजे
छानसे वाचलेले

चिन्या१९८५'s picture

8 Jan 2009 - 11:20 pm | चिन्या१९८५

धन्यवाद विनायक!!!!!!!

बघा- http://gandharvablog.blogspot.com/

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Jan 2009 - 10:49 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गांधीजी कोणालाच कळले नाही म्हणतात, अतिशय चतरा माणूस. गांधीजी, गांधीजींना तरी कळले होते का ? त्यांचे अहिंसा, ब्रम्हचर्य या प्रयोगाची तर लैच गम्मत वाटते. (माझे वयक्तिक मत आहे ) असो,लेखातील गांधीजींचे अहिंसेबद्दलचे मते निवांत वाचून प्रतिक्रिया लिहिन. अहिंसेने 'मनुष्याचा आजार बरा होतो ' हे काहीच्या काही वाटले.

अवांतर : असे म्हणतात की, गांधीजींनी मनात आणले असते तर स्वातंत्र्यविरांना फाशीच्या शिक्षेला सामोरे जावे लागले नसते. त्याबद्दल गांधीजींचे काय धोरण असावे बरे ?

चिन्या१९८५'s picture

8 Jan 2009 - 11:27 pm | चिन्या१९८५

गांधीजींच्या ब्रह्मचर्याच्या प्रयोगाबद्दल मलाही आश्चर्यच वाटले.अस म्हणतात की त्यांचे ब्रह्मचर्यही त्या काळात अहिंसेनंतर सगळ्यात जास्त चर्चिले गेले होते.मला तरी तो भाग विचित्रच वाटतो.ब्रह्मचर्याचे पालन जसे संन्यासी करतात तसे करण्याचे सोडुन गांधीजींनी वेगळाच मार्ग घेतला.मनुष्याच्या मनातील हिंसा करण्याचा अथवा अन्याय करण्याचा आजार बरा होतो असा अर्थ घ्यावा.बाकी भगतसिंगची फाशी गांधीजींना वाचवता आली असती असे म्हणतात पण मला काही त्याच्यात तथ्य वाटत नाही.

बघा- http://gandharvablog.blogspot.com/

लिखाळ's picture

8 Jan 2009 - 11:12 pm | लिखाळ

'यंग इंडीया’ मधील एका प्रकाशनात गांधीजींनी गुरु गोविंद सिंग,शिवाजी महाराज,राणा प्रताप,रणजित सिंग,लेनिन,डे वालेरा,केमालपाशा या सर्वांना 'misguided patriot' म्हटले होते.गांधीजींची हीच विचारसरणी भगत सिंग व इतर क्रांतिकारकांबद्दल होती.
बापरे त्यांनी शिवाजी आणि इतरांना वाटचुकलेले म्हटले आहे? बरं !
एकदम हेच दिसले ठळक असल्याने. आता लेख वाचतो.
-- लिखाळ.
माझी अनुदिनी

चिन्या१९८५'s picture

8 Jan 2009 - 11:22 pm | चिन्या१९८५

लिखाळ्,त्यांनी म्हटल होत की 'जर मी या लोकांच्या काळात जन्म घेतला असता तर त्यांना मी मिसगाईडेड पॅट्रीऑट्सच म्हटले असते.पण माझी इतिहासाकडे बघण्याची पध्दत वेगळी आहे.मी माझे निष्कर्ष मांडतो' असेही ते पुढे म्हणतात.

बघा- http://gandharvablog.blogspot.com/

लिखाळ's picture

9 Jan 2009 - 12:33 am | लिखाळ

असूदे. मी एक वाक्य वाचून माझे मत बनवणार नाही.
-- लिखाळ.
माझी अनुदिनी
'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.

लिखाळ's picture

9 Jan 2009 - 4:53 pm | लिखाळ

चिन्मय,
आपला सविस्तर लेख शांतपणे वाचला.
फार छान आहे. बर्‍याच बाजूंची मते विचार घेऊन त्यांचा आपण उल्लेख केला आहे. तसेच शेवटच्या परिच्छेदातले प्रश्न चांगले आणि मह्त्त्वाचे आहेत. समारोपात तुम्ही तुमची मतेही मांडली आहेत. अश्या विवाद्य विषयावरचा चांगला लेख वाचून आनंद झाला. आपले अभिनंदन.

स्वरक्षणासाठी प्रतिकारासाठी हिंसा मान्य हे मत मलाही योग्य वाटते. 'नॅशनल डिफेन्स ऍकॅडमी' हे नाव तेच सुचवत असावे.

गांधी बरोबर की सशस्त्र क्रांतीकारक बरोबर हे ठरवण्यासाठी
१.गांधींची मते-त्यांची योजना-त्यांचा प्रभाव याचबरोबर
२.सशस्त्र क्रांतीकारकांची मते-त्यांची स्वातंत्र्य मिळवण्याची योजना- स्वातंत्र्यानंतर राज्य चालवण्याबाबतची योजना - त्यांचा त्याकाळच्या जनमानसावरील पकड आणि प्रभाव या बाजूंची माहिती मिळवणे गरजेचे आहे. जे मी स्वतः केलेले नाही. नुसता तर्क या ठिकाणी काम करणार नाही तर अभ्यास करणे गरजेचे आहे असे मला वाटते. त्यामुळे या बद्दल माझे काही स्पष्ट मत नाही.

लो. टिळक, सुभाषचंद्र, योगी अरविंद, सावरकर असे लोकमान्य प्रसिद्ध विचारवंत सशस्त्र क्रांतीच्या बाजूने होते. त्यामुळे स्वातंत्र्यानंतरच्या राज्य चालवण्याच्या योजने बाबत काही विचार नक्कीच त्यांचेकडे असतील. ते विचार स्वातंत्र्यानंतरच्या प्रसिद्धीतंत्रज्ञांनी बाजूला सारले असतील. पण याचा अर्थ त्यांची मते अभ्यासण्यासाठी उपलब्धच नाहित असे नसावे. कोणी अभ्यासकाने याबद्दल लेख लिहिला तर वाचायला आवडेल.
-- लिखाळ.
'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.

चिन्या१९८५'s picture

9 Jan 2009 - 9:37 pm | चिन्या१९८५

लिखाळ प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
सावरकरांनी तुम्ही म्हणता त्याप्रमाणे राज्य कसे असावे यावर खुप विचार केला होता.त्यांनी सर्व गोष्टी लिहुन ठेवलेल्या आहेत्.आपण 'अप्-टु-डेट' असल पाहीजे.आपले लष्कर सक्षम असले पाहीजे,अंधश्रध्दांचे निर्मुलन झाले पाहि़जे या सर्वांवर त्यांनी विचार केला होता
बघा- http://gandharvablog.blogspot.com/

विसुनाना's picture

9 Jan 2009 - 6:26 pm | विसुनाना

गांधीजींनी अहिंसेची प्रेरणा कस्तुरबा गांधींकडुन घेतलेली होती.गांधीजींची एखादी गोष्ट कस्तुरबांना पटत नसली तर त्या गांधीजींनी दिलेल्या त्रासाला सहन करत पण विरोधही करत.यातुन गांधीजींचे मन बदलले आणि बायकोवर हुकुम चालवायची त्यांची विचारसरणि कशी चुक होती हे त्यांना कळुन चुकले.
या वाक्यांचा संदर्भ लेखकाकडून मिळू शकेल काय?
स्वतः गांधीजींनी जर तसे कोठे म्हटले असेल तर -
'नवर्‍याला बायकोने केलेला मूक विरोध आणि त्यातून होणारे नवर्‍याचे परिवर्तन' हे चित्र आंतरराष्ट्रीय संघर्षांना लागू करता येते असे मानावे लागेल.

चिन्या१९८५'s picture

9 Jan 2009 - 9:40 pm | चिन्या१९८५

विसुनाना गांधीजी स्वतःच तसे लिहिले आहे 'माझे सत्याचे प्रयोग 'मधे.शिवाय तुम्ही खालची लिंक बघु शकता-
http://mkgandhi.org/nonviolence/index.htm

'नवर्‍याला बायकोने केलेला मूक विरोध आणि त्यातून होणारे नवर्‍याचे परिवर्तन' हे चित्र आंतरराष्ट्रीय संघर्षांना लागू करता येते असे मानावे लागेल.

हे तुम्ही उपहासानी लिहिलेय का खरेच तुम्हाला तसे वाटते???कारण गांधीजींना तसे वाटत होते

बघा- http://gandharvablog.blogspot.com/

विसुनाना's picture

10 Jan 2009 - 4:14 pm | विसुनाना

गांधीजींनी स्वतःच्या आत्मचरित्रात तसे म्हटले असेल तर प्रश्नच मिटला.
त्यांना असे का वाटले त्याचा शोध घेतला पाहिजे. वाचन केले पाहिजे.

मूलतः प्रत्येक माणूस हा चांगलाच असतो यावर त्यांचा विश्वास असावा. त्यामुळे अहिंसात्मक मार्गाने केलेल्या विरोधावर तो अंतर्मुख होऊन विचार करतो आणि त्याचे मन बदलते असे त्यांना म्हणायचे असावे.
याचा कौटुंबिक व्यत्यास म्हणजे - प्रत्येक पतीचे त्याच्या पत्नीवर प्रेम असते.
या प्रेमापोटी पत्नीने केलेला मूक विरोध त्याला असहनीय वाटतो आणि त्याचे मन परिवर्तित होते.

परंतु जिथे माणसातील सारासार विचारशक्तीच नाहीशी झाली आहे तिथे असा अहिंसात्मक विरोध काय करू शकेल? उदा. हिटलरला गांधीजींनी लिहिलेल्या पत्रांमुळे हिटलरने महायुद्ध थांबवले काय?ते थांबवण्यासाठी त्याच्याशी युद्धच करावे लागले.
किंवा कुटुंबात - मद्यपी नवर्‍याच्या मारहाणीला कंटाळलेल्या पत्नीने पतीचा वध केल्याच्या घटना वाचनात येतात.

या कारणांमुळे अहिंसात्मक विरोध हा केवळ मुळात सद्सदविवेकबुद्धी असणार्‍या आणि दुसर्‍या पक्षाच्या म्हणण्याचा विचार करू शकणार्‍या माणसांचे मतपरिवर्तन करण्यासाठी होऊ शकतो. अन्यथा त्याला हिंसात्मक विरोध करून आपले म्हणणे पटवून द्यावे लागते.(जर्मनी/जपान/मद्यपी हे वेगळ्या स्तरांवर)...

बट्टू's picture

9 Jan 2009 - 9:46 pm | बट्टू

मध्येही असे म्हटले आहे पण तो चित्रपट हं.

मिहिर's picture

13 May 2009 - 10:53 pm | मिहिर

शिवाजी महाराज मिसगाइडेड पेट्रिऑट याला पूर्णतः असहमत.
लो. टिळकांचे मत होते की जोपर्यन्त क्रांतीला समाजाचा पाठिंबा मिळत नाही तोपर्यंत ती यशस्वी होत नाही. त्यामुळे ते क्रांतिकारकांना सबुरिचा सल्ला देत होते.

चिन्या१९८५'s picture

7 Jun 2009 - 5:33 pm | चिन्या१९८५

शिवाजी महाराज मिसगाइडेड पेट्रिऑट याला पूर्णतः असहमत.

ते मत चुकीचेच आहे पण गांधीजींनी त्यांच्या तत्वाशी प्रामाणिकता ठेवली हे ही न थोडके.
बघा- http://gandharvablog.blogspot.com/