मैलाचा दगड

सुनील's picture
सुनील in काथ्याकूट
19 Dec 2008 - 3:32 pm
गाभा: 

मिपावर बरेच काथ्याकूट होतात. त्यात बर्‍याच शाब्दिक मारामार्‍याही होतात. त्यात गैर काही नाही. परंतु, नुकतीच "बंगालच्या वाघीणी" ही चर्चा झाली. मला ती बर्‍याच दृष्टीने मैलाचा दगड ठरली अशी वाटते. इतरांची मते जाणून घ्यायला आवडेल.

पूर्वी साधारणतः असा एक क्रम होता-

स्वातंत्र्यलढ्यातील एखाद्या क्रांतीकारकावर अथवा एखाद्या घटनेवर लेख येणार. लेखात वा कुठल्यातरी प्रतिसादात संबंध असो वा नसो, गांधीजींचा उल्लेख येणार. गांधींवर तोंडसुख घेतले जाणार. उर्वरीत प्रतिसाद हे बव्हंशी "सादर प्रणाम", "तुमच्यामुळेच आम्ही आहोत" या छापाचे.

ह्याला छेद गेला तो वर उल्लेख केलेल्या लेखाने.

म्हणजे सुरुवात नेहेमीप्रमणेच झाली. लेख आला. प्रथेप्रमाणे गांधींनाही आणले गेले. सर्व काही BAU चालू होते. पण त्यात एक प्रतिसाद असा आला की ज्यात त्या क्रांतीकारकांनी वापरलेल्या मार्गावर प्रश्नचिन्ह केले गेले.

रिवाज असा की, सशत्र क्रांतीकारकांनी केलेल्या कृत्याबद्दल, वापरलेल्या मार्गाबद्दल प्रश्न विचारणे, हे महद्पाप. निशःस्त्र क्रांतीकारक म्हणजे सॉफ्ट टार्गेट. कुणीही यावे आणि टपली मारावी पण सशस्त्र क्रांतीकारकांबद्दल मात्र "ब्र"देखिल काढायचा नाही.

हा रीवाज वरील चर्चेत प्रथमच मोडला गेला. बरेच प्रश्न विचारले गेले. काहींची उत्तरे दिली गेली काहींची नाही. अर्थात हे चर्वितचर्वण तेथे झालेले असल्यामुळे, येथे पुन्हा करण्याचे प्रयोजन नाही. माझा मुद्दा वेगळा आहे.

ह्या नंतर लेख आला तो दादा कोंडके ह्यांच्यावर. खरे तर, हा लेख म्हणजे आचरटपणाचा नमूना होता. परंतु, असा लेख कधीना कधी येणारच होता. कायम पंचा फेटत राहिले तर हाफ पँट फेटणारा उपटणारच.

मुद्दा असा आहे की, हाफ पँटीचा सन्मान राखायचा तर पंचाचाही सन्मान राखावा की दोघांनीही एकमेकांची फेटत रहावी - होऊन जाऊदे?

प्रतिक्रिया

विनायक प्रभू's picture

19 Dec 2008 - 3:36 pm | विनायक प्रभू

आपला लेख पण मैलाचा दगड ठरावा ही ईश्वर चरणी(असला तर) नम्र प्रार्थना.

अवलिया's picture

19 Dec 2008 - 3:43 pm | अवलिया

तसे कपड्यांच्या आत सगळे सारखेच असतात. त्यामुळे फेटले काय नाही फेटले काय .. सारखेच असते.
फार डोकावुन पाहण्याची गरज नाही.. आपले आपले पाहिले की कळते बाकिच्यांचे कसे असेल ते.
आता भुमिका घेण्याबद्दल बोलाल तर आपण विशिष्ट परिस्थितीत जी भुमिका अनुकुल, सर्वमान्य, सर्वांच्या हिताची असेल ती घ्यावी.
बाकी वाद विवाद हा वेळ घालवण्याचा एक चांगला उपाय आहे याबद्दल काही शंका नाही.

चालु द्या.

-- अवलिया

अवलियाची अनुदिनी

टारझन's picture

19 Dec 2008 - 3:46 pm | टारझन

फारच मार्मिक लिहीलंय , खोल विचार करायला लावणारा काथ्याकुट !!
तज्ञांची मते जाणून घ्यायला आवडेल !

- (कट्टर) टा.र.सावरकर

बाकी काहीही म्हणा आं, आपण आपल्या बाजूचा सपोर्ट करताना दुसर्‍या बाजूचा विरोध अगदी स्वाभाविक आहे , आणि ही गोष्ट सुद्धा मैलाचा दगड ठरून जाते !

शंकरराव's picture

19 Dec 2008 - 3:55 pm | शंकरराव

किती वेळ भिजत ठेवणार.. आता हाफ पँट अन पंचा स्वच्छ धुवून वाळ्त घातले आहेत
ह्या लेखाच्या मध्यमातू विचारधारा, धारणा, धोरण ई. ई. चा वारा लागावा हा हेतू
जेणेकरून हाफ पँट अन पंचा निट वाळेल ..

नंतर कड्क ईस्त्री मारुन हाफ पँट अन पंचा ची आदला बदल करावी का ह्यावर कथ्याकूट करता येईल

सखाराम_गटणे™'s picture

19 Dec 2008 - 4:01 pm | सखाराम_गटणे™

मस्तच,
अगदी मनातील भावना उतरवल्या आहेत. असेच लिहीत रहा. अशीच तुमची प्रतिभा आम्हाला बघायला मिळुद्यात.

फुले शु

----
सखाराम गटणे

परिकथेतील राजकुमार's picture

19 Dec 2008 - 5:55 pm | परिकथेतील राजकुमार

रिवाज असा की, सशत्र क्रांतीकारकांनी केलेल्या कृत्याबद्दल, वापरलेल्या मार्गाबद्दल प्रश्न विचारणे, हे महद्पाप. निशःस्त्र क्रांतीकारक म्हणजे सॉफ्ट टार्गेट. कुणीही यावे आणि टपली मारावी पण सशस्त्र क्रांतीकारकांबद्दल मात्र "ब्र"देखिल काढायचा नाही.

अनेक वर्ष चालत आलेल्या अत्याचाराला तुम्ही लेखणी रुपी शस्त्राच्या साह्हायानी अहिंसक मर्गानी जी वाचा फोडली आहे तिला माझे शतषः प्रणाम. त्रिवार सहावार नउवार सहमत आहे मी तुमच्याशी ! तुमचा हा लेख मैल्याचा दगड ठरो हिच सदीच्छा !

|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य

विनायक प्रभू's picture

19 Dec 2008 - 5:59 pm | विनायक प्रभू

अरे शब्दाची अशी हिंसा का करतो आहेस रे. मैलाचा च्या ठीकाणी मैला. शीव शिव.

आजानुकर्ण's picture

19 Dec 2008 - 6:57 pm | आजानुकर्ण

आ. सुनीलराव,

कायम पंचा फेडत राहिले तर हाफ पँट फेडणारा उपटणारच.
अगदी सहमत आहे.

तसाही गांधी नंगा फकीरच होता. त्याला काही फरक पडत नाही. पण हाफप्यांट फेडल्यामुळे लज्जारक्षण अंमळ अवघड होते हा मुद्दा विचार करण्यासारखा आहे.

क्रांतीकारकांच्या हेतूंबाबत कोणालाही आक्षेप नाही. असा आक्षेप घेणारे बावळट.

मात्र आक्षेप होता तो त्या मार्गाला आणि त्याचे उदात्तीकरण करण्याला. केवळ दुसरा पर्याय नसल्यामुळे नाईलाजाने असे करावे लागले हा सूर उमटण्यापेक्षा, हाणा, मारा, फोडा, ठोका हाच एकमेव मार्ग आहे हे सूचित करण्याला.

आपला
(सत्याग्रही) आजानुकर्ण

प्रियाली's picture

19 Dec 2008 - 7:12 pm | प्रियाली

गांधीजी हा विनोदाचाच प्रकार आहे. कोणीही यावं आणि बरळून जावं. गांधींना दोन लाथा घातल्या की सर्व ऑथेंटिक वाटू लागतं. क्रांतिकारकांना काही बोललात तर खबरदार. तुमची किव करू, तुम्हाला आचरट म्हणू, तुमच्यावर इतके व्यक्तिगत आरोप करू की तुम्ही ठारच व्हायला हवे. :)

ह्या नंतर लेख आला तो दादा कोंडके ह्यांच्यावर. खरे तर, हा लेख म्हणजे आचरटपणाचा नमूना होता. परंतु, असा लेख कधीना कधी येणारच होता. कायम पंचा फेटत राहिले तर हाफ पँट फेटणारा उपटणारच.

मला तो लेख अजिबात आचरट वाटला नाही. धम्मकलाडू यांच्या कल्पनाशक्तीची दाद द्यावीशी वाटली. संघाच्या प्रार्थनेचे कनेक्शन दादांच्या""ढगाला लागली कळ"शी जोडायचा टारगटपणा मला आयुष्यात जमणार नाही.

लिखाळ's picture

19 Dec 2008 - 7:53 pm | लिखाळ

संघ - गांधी - गांधीद्वेष - क्रांतिकारकांवर लिहिणारे यांतील नातेसंबंधांवरचे लिखाण आणि ज्यांमुळे असे लिखाण होते त्या व्यक्ती या प्रातिनिधिक आहेत असे म्हणणे आहे की हा मामला फक्त मनोगत-मिपा यांवर वावरणार्‍यांपुरता मर्यादित आहे ?

लिहिणार्या व्यक्तींची व्यक्तिगत माहिती आणि मते माहित असल्याने संघ-गांधी-क्रांतिकारक यांबद्दलच्या मतांवर चर्चा होत आहे की संघाचा गांधींना विरोध आहे..इत्यादी मते खरी मानुन या चर्चा होत आहेत ते समजत नाहिये.
-- लिखाळ.

शंकरराव's picture

19 Dec 2008 - 8:40 pm | शंकरराव

संघाचा गांधींना विरोध आहे
किंवा संघ-गांधी-क्रांतिकारक यांबद्दलच्या मतांवर चर्चा अश्या कोणत्याही मर्यादा नाहीत
मुद्दा असा आहे की, हाफ पँटीचा सन्मान राखायचा तर पंचाचाही सन्मान राखावा की दोघांनीही एकमेकांची फेटत रहावी - होऊन जाऊदे?

टग्या's picture

20 Dec 2008 - 12:32 am | टग्या (not verified)

गांधींना दोन लाथा घातल्या की सर्व ऑथेंटिक वाटू लागतं.

अर्थात! गांधींना एका ढुंगणावर लाथ घातली की त्यांनी दुसरे ढुंगण पुढे करावे ही अपेक्षा रास्त आहे. नाहीतर गांधीवाद ऑथेंटिक कसला?

दोन लाथांचा हिशेब अगदी बरोबर आहे.

(एक प्रतिसाद एकदा उडवला की तो पुन्हा चिकटवावा, दुसर्‍यांदा उडवला की तिसर्‍यांदा चिकटवावा, हेच गांधीवाद आम्हाला शिकवतो. हाच आमचा सत्याग्रह.)

अवांतर: 'ढुंगण' हा एक अतिशय सभ्य आणि सुंदर शब्द असून सभ्य बोलण्याचालण्यातून हद्दपार असू नये, तसे करणे हा 'भंपक सोवळेपणा' आहे, तसेच काही मराठी संस्थळांवरील 'भंपक सोवळेपणा' हे मिपाच्या जन्मामागील एक कारण असून मिपा या संस्थळावर कोठल्याही प्रकारच्या भंपक सोवळेपणाला मज्जाव आहे अशी ग्वाही खुद्द मिसळपाव मालक संत तात्याबांनी दिलेली असतासुद्धा प्रस्तुत प्रतिसाद आतापर्यंत दोनदा उडवला गेला आहे. याचे कारण
१. संबंधित संपादकाचे मिपाच्या संपादकीय धोरणांबद्दलचे घोर अज्ञान अथवा
२. मिपाची धोरणे फक्त काही विशिष्ट विचारांच्याच सदस्यांनाच लागू असणे अथवा
३. अन्य काही कारण
यांपैकी कोणते (एक किंवा एकाहून अधिक) आहे हे कळावयास मार्ग नाही.

असो. संबंधित संपादकाच्या अतिरेकी, दांभिक, अत्याचारी आणि अन्याय्य वागणुकीस सत्याग्रह हेच सडेतोड उत्तर आहे असे आम्ही मानतो.

आजानुकर्ण's picture

20 Dec 2008 - 12:42 am | आजानुकर्ण

बरे झाले देवा सदस्य झालो
नाही तर दंभेचि असतो मेलो

आपला,
(माजी संपादक) आजानुकर्ण तुकाराम

(ह.घ्या.हे.वे.सां.न.ल.)

प्रियाली's picture

20 Dec 2008 - 12:45 am | प्रियाली

गांधींना एका ढुंगणावर लाथ घातली की त्यांनी दुसरे ढुंगण पुढे करावे ही अपेक्षा रास्त आहे. नाहीतर गांधीवाद ऑथेंटिक कसला?

टग्यादादा, आपला गांधीवाद यशस्वी होणार की नाही माहित नाही पण सत्याग्रहापायी हुतात्मा होण्याचे स्पष्ट संकेत दिसत आहेत. :)

लगे रहो!

आपला गांधीवाद यशस्वी होणार की नाही माहित नाही पण सत्याग्रहापायी हुतात्मा होण्याचे स्पष्ट संकेत दिसत आहेत.

दांभिकतेचा सर्वनाश हीच माझी पहिली व अखेरची इच्छा आणि तिच्याखातर मी आणि माझे प्रतिसाद पुन्हा पुन्हा पुन्हा जन्म घेतील आणि पुन्हा पुन्हा उडवले जातील. (प्रेरणा: हुतात्मा रामप्रसाद बिस्मिल.)

(आता याला गांधीवाद/सत्याग्रह म्हणा किंवा क्रांतिवाद म्हणा. दोन्ही एकत्र, एकाच ठायी नांदू शकतात असे आमचे प्रामाणिक मत आहे. पण लक्षात कोण घेतो?)

llपुण्याचे पेशवेll's picture

20 Dec 2008 - 1:53 am | llपुण्याचे पेशवेll

दुसर्‍याने आग्रह केला तर तो दुराग्रह आणि मी स्वतः केला तर सत्याग्रह. . :)

बाकी चालूदे.
पुण्याचे पेशवे

कोलबेर's picture

20 Dec 2008 - 1:25 am | कोलबेर

तसेच काही मराठी संस्थळांवरील 'भंपक सोवळेपणा' हे मिपाच्या जन्मामागील एक कारण असून मिपा या संस्थळावर कोठल्याही प्रकारच्या भंपक सोवळेपणाला मज्जाव आहे

सहमत आहे. मागे आम्ही टाकलेला 'खरं खरं सांगा २' हा कौल देखिल असाच कोणतेही कारण न देता उडवुन टाकला होता. भाग १ पेक्षा वेगळे (अश्लिल) त्यात काहीच नव्हते, मालक तात्यांनी देखिल हे मान्य केले होते.

असो... आले संपादकाच्या मना त्यापुढे काही चालेना!

विसोबा खेचर's picture

20 Dec 2008 - 1:31 am | विसोबा खेचर

अर्थात! गांधींना एका ढुंगणावर लाथ घातली की त्यांनी दुसरे ढुंगण पुढे करावे ही अपेक्षा रास्त आहे. नाहीतर गांधीवाद ऑथेंटिक कसला?

अगदी खरं!

(एक प्रतिसाद एकदा उडवला की तो पुन्हा चिकटवावा, दुसर्‍यांदा उडवला की तिसर्‍यांदा चिकटवावा, हेच गांधीवाद आम्हाला शिकवतो. हाच आमचा सत्याग्रह.)

आम्ही इतका वेळ कामधंद्यानिमित्त मुंबईला गेल्तो! टग्याचा प्रतिसाद दोनदोनदा उडवणारा कोण रे तो सन्माननीय संपादक? :)

यांपैकी कोणते (एक किंवा एकाहून अधिक) आहे हे कळावयास मार्ग नाही.

सगळे लॉग्जस् तपासून पहावे लागतील म्हणजे लगेच समजेल, परंतु तेवढा उत्साह नाही..असो.

असो. संबंधित संपादकाच्या अतिरेकी, दांभिक, अत्याचारी आणि अन्याय्य वागणुकीस सत्याग्रह हेच सडेतोड उत्तर आहे असे आम्ही मानतो.

लगे रहो..! संपादकांना सगळे हक्क दिलेले आहेत व आम्ही त्यांच्या कामात काही ढवळाढवळ करत नाही. खुद्द आमचेही प्रतिसाद काही वेळेला संपादित केले गेले आहेत..!

असो, आपण कॉपीपेस्ट करत रहा, आणि कोण तो संपादक आहे तो डिलीट करत राहील.. चालू द्या! :)

माझी आता प्रार्थनेची वेळ झाली, मी जातो.. :)

तात्या.

विनायक प्रभू's picture

20 Dec 2008 - 8:44 am | विनायक प्रभू

तात्या फार प्रार्थना करताहेत बॉ. कुणाच्या मानसिक आणि शाररिक स्वास्थ्यासाठी कुणास ठाउक. शेळीची जखम बरी आहे ना?

अघळ पघळ's picture

21 Dec 2008 - 3:26 am | अघळ पघळ

तात्या मालक म्हणून तू घेतलेली भूमिका आवडली.

पण 'ढुंगण' शब्दाचे सोवळे असणारा हा संपादक कोण ते कळेल का? लपुन छपुन संपादकगिरी करायला हे काय मनोगत आहे तिच्याआयला?

अघळ पघळ

बगाराम's picture

21 Dec 2008 - 1:22 am | बगाराम

गांधीजी हा विनोदाचाच प्रकार आहे. कोणीही यावं आणि बरळून जावं. गांधींना दोन लाथा घातल्या की सर्व ऑथेंटिक वाटू लागतं. क्रांतिकारकांना काही बोललात तर खबरदार. तुमची किव करू, तुम्हाला आचरट म्हणू, तुमच्यावर इतके व्यक्तिगत आरोप करू की तुम्ही ठारच व्हायला हवे.

अगदी मनातले बोललात प्रियालीजी! काही जणांचे सातत्याने केलेले कलुषीत लेखन वाचले की ह्याचा प्रत्यय येतोच.

बगाराम

अरुण मनोहर's picture

19 Dec 2008 - 9:06 pm | अरुण मनोहर

कायम पंचा फेटत राहिले तर हाफ पँट फेटणारा उपटणारच.
मुद्दा असा आहे की, हाफ पँटीचा सन्मान राखायचा तर पंचाचाही सन्मान राखावा की दोघांनीही एकमेकांची फेटत रहावी - होऊन जाऊदे?

फेटत रहाण्याचे जंगल राज सर्वत्रच सुरु आहे. मिपावरील धुमडीत जनमानसाचे प्रतिबिंब दिसले नाही तरच नवल.

जंगलातून आम्ही खेड्यात व खेड्यातून शहरात आलो. आता वाटचाल वर्तुळाच्या दुसर्या अर्धातून सुरु असावी.
मागे एकदा मिपावरच्या एका लेखावर वाद प्रतिवादांची धुमडी सुरू होती. (कोणी म्हणेल, त्यात काय? काही नवीन सांगा!). त्यावेळेस खरडफळ्यावर एकाने ह्या गुथ्थमगुथ्थीची बातमी अशी काहीतरी दिली होती---
"तिकडे जंगलाच्या "शहरी "भागात लोक एकमेकांच्या धोतरात हात घालून काही मिळते आहे का ते बघत आहेत"

हे लिहीणार्याच्या प्रतिभेची दाद द्यावी का मानव जात कोठे जात आहे असे कण्हून स्वतःचेच डोके आपटून घ्यावे हे न कळून, मी सोपा मर्ग स्विकारला होता. "शटर डाऊन डाउन डाउन!"

एकलव्य's picture

20 Dec 2008 - 6:47 am | एकलव्य

ह्या नंतर लेख आला तो दादा कोंडके ह्यांच्यावर. खरे तर, हा लेख म्हणजे आचरटपणाचा नमूना होता.

काही जणांना स्वतःचीच बळंच फेडून घ्यायची भलतीच हौस असते त्याचा हा नमुना असे म्हणता येईल.

असो... नंगे से खुदा भी डरता है!

आजानुकर्ण's picture

20 Dec 2008 - 7:02 pm | आजानुकर्ण


काही जणांना स्वतःचीच बळंच फेडून घ्यायची भलतीच हौस असते त्याचा हा नमुना असे म्हणता येईल.

अगदी मनातले बोललात एकलव्यराव. त्यामुळेच पूर्ण फेडण्यापूर्वी हवामानाचा अंदाज घेण्यासाठी, सवय होण्यासाठी आम्ही हाफपँट वापरतो. अन्यथा हुडहुडी भरेल.

आपला
(दक्ष) आजानुकर्ण

धम्मकलाडू's picture

21 Dec 2008 - 3:36 am | धम्मकलाडू

नंगे से खुदा भी डरता है!

आम्हाला दोनच नंगे फकीर माहीत, जिनसे खुदा भी डरता है|

१. गांधीजी
२. आपला तात्या

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

अघळ पघळ's picture

21 Dec 2008 - 3:41 am | अघळ पघळ

आम्हाला दोनच नंगे फकीर माहीत, जिनसे खुदा भी डरता है|

१. गांधीजी
२. आपला तात्या

=)) =))

धम्मकलाडू's picture

21 Dec 2008 - 4:21 am | धम्मकलाडू

हाफ पँट फेटणारा उपटणारच

फेटण्यापेक्षा हाफ प्यांटीला धरून खाली ओढावे. जोरदार हिसका द्यावा. मज्जाच मज्जा. असे करणे अधिक शास्त्रीय आहे.

(धोबीपछाडू) धम्मकलाडू

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

कलंत्री's picture

1 Jan 2009 - 9:25 pm | कलंत्री

या लेखाला प्रतिसाद देण्याचे राहुनच गेले होते.

खर्‍या अर्थाने बंगालच्या वाघिणी हा मैलाचा दगड ठरावा. अनेक तटस्थ लेखकाचे प्रतिसाद इतके सुंदर आणि मुद्देसुद होते की प्रत्यक्ष एखाद्या गांधीवाद्यालाही त्याचे उत्तर असे देणे जमले नसते.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे, एखादा दुसरा प्रतिसाद वगळता सध्या गांधीवादावर मिपावर इतके साहित्य, विचार, पैलु निर्माण झाले आहे की एखाद्या अभ्यासकाला इकडे तिकडे फारसे फिरावे लागणार नाही.