"णमस्कार्स लोक्स," - टारुची कृपा..ह..च घे रे..:)
बर्याच दिवसापासुन एक करमणुक प्रधान विषय डोक्यात घोळत होता...आज त्याला एक कारण मिळालं ते म्हणजे आमच्या एका मित्राच लग्न झालं आणि जुन्या आठवणी जाग्या झाल्या...
तर आजचा विषय आहे..मित्र/मैत्रीणी आणि त्यांना ठेवलेली गमतीशीर नावं किंवा त्यांच्या नावाचं केलेलं खोबरं..कारणं काहीही असोत जसे..
१. काही सवयी,
२. रहाण्याची / दिसण्याची / खाण्याच्या सवयी/स्टाईल म्हणुया...
३. बोलण्याच्या तर्हा...इ.इ....
हे सगळं एका खास शैलीतुन आलं पाहिजे....म्हणजे मित्राचं/मैत्रीणीचं नाव नसलं तरी चालेल पण गमतीशीर नावं किंवा त्यांच्या नावाचं केलेलं खोबरं आणि ते का आलं त्याचं २-३ वाक्यात कारण (मजेशीर शैलेतुनच अर्थात...टीका नको)...
तर करा सुरुवात...
मी माझ्यापासुन सुरुवात करतो...
लहानपनापासुन मला माझं कट्टा टोळकं "मुसा" म्हणत कारण माझ्या पहिल्या नावात मु आणि आडनावात सा आहे म्हणुन..
असाच एक मित्र ज्याला आम्ही "टोपड्या" म्हणत असु कारण हा कधीही पहा ह्याला एक वेगळ्या प्रकारची गोल टोपी घालायची सवय..यडं स्वतःच्या लग्नातसुद्धा टोपी घालायला निघालं होतं..
असाच एक "चोंग्या" ..त्याला चायनीज पोरी फार म्हणजे फारच आवडायच्या... ह्याला आम्ही "फवारा" पण म्हणायचो...गुटका खायची फार सवय याला...
असाच आमचा एक "नाना" ..त्याचं एकंदर व्यक्तिमत्व एकदम भारदस्त....
अजुन एक "लंगुर" ..ह्याला कुठेही बघा उडीमारायची सवय..गाडीवरुन/गाडीवर उडी मारुनच उतरणार/बसणार...
एक "मारामारी" होता...ह्याला चहा/कॉफी एकत्र करुन प्यायची सवय...
असाच एक "दत्तु" ...हा कायम एका साईडला निवांत बसलेला असायचा..काहीही गंध नसायचा कशाचाच...
असचं एक "गळू" ...ह्याला ज्या त्या मुलीला बघुन प्रेमाचं गळू व्हायचं....
असाच एक "कळकट" ...६-६ महिने कपडे धुवायचे नाहीत..एकदम फेकुन द्यायचे...
असाच एक "लेंगा" होता... ह्याला लेंगा फार आवडायचा...
असाच एक "तोता" ... नुसती बडबड..येड्यासारखी बडबड...ह्याला कधी कधी "कावरे" सुद्धा म्हणत असु
अजुन एक म्हणजे "चंबु".. ह्याला तोंडाचा चंबु करायची लहानपणापासुन सवय...
तर मंडळी तुम्हीही सांगा अशाच गमतीजमती...पण अट एकच...(जर तुमचे मित्र इथे असतील तर) त्यांना लागेल असं नको...टीका नको...मजेशीर/गंमत म्हणुनच चालेल....
तर मंडळी करा सुरुवात..सरत्या वर्षाच्या शेवटी भरपुर हसुया !!!!
प्रतिक्रिया
1 Jan 2009 - 1:57 am | पक्या
' मॉस्क्यूटो '...कॉलेजातील एका मुलीला म्हणायचो...कारण वर्गात तिला नेहमी डास नव्हे तर मॉस्क्यूटो चावत असत.
"ढापण" "चार डोळे" हे तर ठरलेले.
"मंदार" किंवा "मंदाकिनी/ मंदा " ही पण कॉमन नावे..मंदपणा म्हणजे बुद्धूगिरी , बावळटपणा करणार्याला / री ला म्हणत असू.
कॉलेजात असताना माधुरीच्या (दीक्षीतांची हो) नावाचं केलेलं खोबरं म्हणजे - मादी
1 Jan 2009 - 2:04 am | बिपिन कार्यकर्ते
उच्च माणूस असला पाहिजे. मी कधीचा प्रयत्न करतोय. कधीच जमलं नाही. मला शिष्य करून घेईल का तो? ;)
माझ्या एका पूर्वीच्या ऑफिसमधे मी आणि माझा एक मित्र अशीच भंकस करायचो. आमच्या जवळच एक वयस्क माणूस बसायचा. आम्हाला नेहमी त्याचा 'साईडफेस'च दिसायचा. त्याचे नाक बाकदार आणि तेजतर्रार दिसायचे साईडने. त्याचे नाव 'अहमदशहा अब्दाली' कारण लहानपणी इतिहासाच्या पुस्तकात मोठमोठ्या बादशहांची चित्रं अशीच मुघल शैलीत साईडफेस दाखवणारी असत आणि त्यांची नाकं वगैरे पण तशीच दिसत!!! आणि 'अहमदशहा अब्दाली' कसं एकदम भारदस्त वाटतं.
अजून एक मुलगी होती. तिला सवय काय तर ऑफिसमधे चालताना इकडे तिकडे बघत बघत पोरांच्या नजरेला नजर देत ठुमकत चालायची. तिचं नाव 'उनाड मैना' !!!
बिपिन कार्यकर्ते
1 Jan 2009 - 4:13 am | ऍडीजोशी (not verified)
उच्च माणूस असला पाहिजे. मी कधीचा प्रयत्न करतोय. कधीच जमलं नाही. मला शिष्य करून घेईल का तो?
शोधीशी मानवा राऊळी मंदिरी....
वो काय बिमीनभौ, मी असताना तुम्ही ह्या गोष्टी साठी दुसर्याकडे जाणार? पुढल्या वेळी बंगळूरात आलात की डोक्यावर हात ठेवीन मी तुमच्या :)
2 Jan 2009 - 7:14 pm | महेश हतोळकर
उच्च माणूस असला पाहिजे. मी कधीचा प्रयत्न करतोय. कधीच जमलं नाही.
मला पण. लोकांना कसं जमतं माहीत नाही. मलातर २ महिन्यातच वास यायला लागतो!
1 Jan 2009 - 2:45 am | नाटक्या
माझ्या एका मित्राचे नाव तुषार होते. त्याला आम्ही "शिंतोडा" म्हणायचो.
1 Jan 2009 - 3:57 am | प्राजु
त्याला आम्ही "शिंतोडा" म्हणायचो.
=)) =)) =))
आमच्या शाळेत एक कौमुदी होती.. तीला आम्ही कॉमेडी म्हणायचो.
कॉलेजला असताना, कॉम्पुटर शिकवायला एक मॅडम होत्या त्या नेहमी डेंजर रेड ड्रेस घालून यायच्या आणि सर्कस सुंदर्या जशा चालतात तशा चालायच्या त्यांना आम्ही छम्मा छम्मा.. म्हणायचो.
माझं नाव प्राजक्ता तर मला प्रोजेक्टा म्हणायचे सगळे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
1 Jan 2009 - 10:37 am | घाटावरचे भट
माझा एक मित्र जर सुदृढ प्रकृतीचा आहे. त्याला आम्ही 'झाडाचं खोड' किंवा नुसतं 'खोड' म्हणतो.
आणखी एक मित्र आहे तो सारखा भाईगिरीच्या गोष्टी करत असतो, त्याला आम्ही 'मॅटर' म्हणतो...
1 Jan 2009 - 4:12 am | केशवराव
आमचा पण एक 'कळकट' मित्र होता........ एस. पी. [स.प.] कॉलेजला. [१९६८/६९]
1 Jan 2009 - 4:24 am | केशवराव
१] खोत आडनांवाचे एक आजोबा , त्यांचे जावई 'तुंबडे' --- म्हणून हे ' तुंबाडचे खोत'.
२] गोपाळराव लोण्ढे , एक सतत हासरे व्यक्तिमत्व, ' आनंदी गोपाळ'
३] ७८ वर्षांचे एक ग्रहस्थ, आडनांव 'नातु' , आम्ही त्यांना '७८ वर्षांचा नातु' म्हणतो.
४] गळ्यात रुद्राक्ष घालणारा ,आणि त्या बद्दल सतत अभिमानाने बोलणारा . . . 'रुद्रावतार'
1 Jan 2009 - 9:38 am | व्यंकु
आमच्या मित्राना आम्ही ठेवलेली नावे
1) साईड ईफेक्टः याला कसल्याशा ट्रीटमेंटचा साईड ईफक्ट यायचा
2)बदकः चालताना याची मान वेगळीच हलायची
3)घुबडः असंच ठेवलेलं नाव
4)भलतीच जीन्सः याला असं नाव पडलं कारण तो जीन्सवर भलत्याच कॉम्बीनेशनचा शर्ट घालायचा
1 Jan 2009 - 10:12 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
१. आमच्या ओळखीची एक मुलगी प्रचंड जाडी आणि डोकं एकदम छोटं, म्हणून ती पोत्यावरचं शहाळं (किंवा नारळ)
२. एक बहिण भावांची जोडी, बहिण जाडी आणि भाऊ सुकड्या म्हणून त्यांची नावं महाबळेश्वर आणि निर्बळेश्वर
३. आमच्या शेजार्यांच्या घरात (वरच्या "मादी" किंवा "मुसा"सारखे) ... सुलीकाकू-सुका, सोहोनी काका -सोका
४. एक आंतरजालीय मित्र आहे, एलियनच्या गोष्टी करतो आणि आहे एकदम "बलदंड", तो गुरुवरचा गेंडा (आंद्या नाही ना इथे, नाहीतर पळा!)
५. तारे किंवा नक्षत्रांची नावं असणार्या मित्र-मैत्रीणींच्या नावांचं भाषांतर अगदीच सोपं, उदा अभिजीतचं व्हेगा (किंवा झिरो मॅग्नीट्यूड), स्वातीचं स्पायका इ.
६. एक जाडा माणूस पूर्वी खगोल मंडळात यायचा, त्याचं नाव "अर्सा मेजर", त्याचा मुलगाही तसाच, तो "अर्सा मायनर"
माझ्या नावाची गंमतच असते. अदितीचं बर्याचदा अदि/ऍडी होतं, पण संहिताचा उच्चारच अनेकांना जमत नाही, मग सैहिता, संगिता, सुनीता, संजुक्ता, संयोगिता, सहिता, सन्हिता काहीही होतं. वर पुन्हा दोन नावं असल्यामुळे गोंधळ होतो तो वेगळाच.
अदिती
आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.
1 Jan 2009 - 10:34 am | राघव
", त्याचा मुलगाही तसाच, तो "अर्सा मायनर"
=)) =))
मुमुक्षु
1 Jan 2009 - 10:58 am | राघव
-कॉलेजात कुणी जर sleeveless असा शर्ट (किंवा तत्सम काही!) घालून आले तर त्यांना "दंडाधिकारी " म्हणायचो.
-दुसर्या एका सरांचे आडनाव मून असे होते. त्यांना "हाफ मून" असे नाव का पडले त्याचे नीटसे कारण माहित नाही. बहुदा ते खूप दिवस सुट्टीवर गेलेले असतांना त्यांना अर्धचंद्र तर मिळाला नाही ना अशी चर्चा सुरु झाली तेव्हा हे नाव पडले असावे!!
-कॉलेज मधे एका सरांना शिकवतांना सारखे पुढे-मागे हलायची सवय होती, त्यांना "पेंडुलम" म्हणायचो.
-ऑफिस मधे एकाचे नाव प्रकाश होते अन् त्याला पुढे-पुढे करायची/वाढवून-चढवून बोलायची सवय होती. त्याचे नाव "उजेड" पडले होते.
मुमुक्षु
1 Jan 2009 - 11:06 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
शिकवताना सारख्या फेर्या मारणार्या, येरझारा घालणार्या मास्तरांना "पिंजर्यातला वाघ"!
अदिती
आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.
1 Jan 2009 - 11:09 am | राघव
वाघाची उपमा त्यांस""शोभली" नसती!! ;)
1 Jan 2009 - 12:58 pm | मॅन्ड्रेक
आदिति - - आधि-ति मग तो. सारखा प्रश्न विचारणारा.
1 Jan 2009 - 12:02 pm | घाटावरचे भट
आमच्या शाळेत असेच हलणारे एक धिप्पाड मास्तर होते....त्यांना आम्ही 'डुल्या मारुती' म्हणायचो.
1 Jan 2009 - 11:05 am | विनायक प्रभू
माझे शाळेतले नाव वाकडे गुर्जी. का?
7 Jan 2009 - 9:38 am | सर्किट (not verified)
कारण त्यांचे "काय" वाकडे हे तुम्हीच सांगू शकणार.
बाकी, गुर्जींविषयी आम्हाला नेहमीच आदर आहे.
-- सर्किट
1 Jan 2009 - 11:52 am | फ्रॅक्चर बंड्या
माझ्या एका मित्राचा आवाज घोगरा होता..
एकदम बैलासारखा म्हणुन त्याला आम्ही "आन्डील बैल" म्हणायचो.... =))
1 Jan 2009 - 11:55 am | फ्रॅक्चर बंड्या
गरिबान्ची ऐश्वर्या...
गावाकडची बिपाशा
असेहि काही प्रकार होते
1 Jan 2009 - 12:23 pm | परिकथेतील राजकुमार
कधिही स्वतःच्या खिशात हात न घालणारा एक मित्र = भागवत (कायम लोकच्या पैशावर भागवणारा)
रोज स्वतःचा काहितरी पराक्रम सांगत बसणारा एक मित्र = मनाचे श्लोक
ह्याला मारु त्याला मारु, राडा करु अशी बुलंद वाक्ये फेकुन ऐनवेळी पळुन जाणारा एक मित्र = आगाशे ( आयत्यावेळी गां** शेपुट)
भयंकर नखरे करणारी एक मैत्रीण = सुरेखा पुणेकर
सतत बिनकामाची बडबड करत बसणारा एक मित्र = ३२ (बत्तिस नं. ची तंबाखु असते, जी पानात घातली काय आणी नाही घातली काय, काहीच फरक पडत नाही.)
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य
1 Jan 2009 - 12:49 pm | मॅन्ड्रेक
माझि हि एक मैत्रिण होति - सतत भिरभिरत असायचि - भुइचक्र - बरका.
प्रवसात अगदि गप्प बसुन असणारा आणखी एक मैत्र - निशब्द प्रवासी.
आणखि बरेच आहेत - पण थोड्या वेळाने.
1 Jan 2009 - 2:37 pm | योगेश्वर व्ह्टकर
शेंग्य , जिराफ --- आमचा सारंग कारण लय उंच आहे आणि बारीक़ |
फ म ----- योगेश्वर म्हणजे मीच कारण फीनांस बगतो ट्रिप मधे आणि फील आलाच पाहिजे हां आग्रह असतो |
क ५०० ---- अभिजीत कारण त्याला लोउद स्पीकर ची लय आवड आहे कर्णा ५०० |
क स ----- संदीप कारण त्याला काय संबंद म्हानाय्ची सवय आहे |
क स ----- सुरेश कारण सारखा फ़ोन वर गर्लफ्रेंड बरोबर -- कॉल सेंटर |
फाव्दया, राबीट ---- निलेश कारण दोन दात पुढे आहेत |
1 Jan 2009 - 2:27 pm | मॅन्ड्रेक
ढ्ग चे अनेक वचन सांगणारा आणखि एक महाभाग - हेमन्त .- ढ्ग्या
इतिहासातिल राजे असल्याचा समज - शिबि राजा.
1 Jan 2009 - 2:52 pm | सुक्या
मला तरी आमच्या टोळ्क्यात कुनाला नावाने हाका मारल्याचे आठवतच नाही. आज इतक्या वर्षांनी त्यात काहीही बदल नाही . .
माझ्यापासुनच सुरुवात करतो ..
सुक्या : माझ्या गावाचे नाव 'सुकेवाडी' त्यात ते सदा दुष्काळी अहमदनगर जिल्ह्यात. म्हणुन "सुक्या"
कंदीलः ह्याला चांगला जाड चष्मा. सतत काचा साफ करायची सवय.
बोक्या: चांगला जाड्जुड. घारे डोळे. दिवसाला लिटरभर दुध प्यायची सवय.
नार्या: नारखेडे हे आडनाव. अतिशय संथ अन् नाकात बोलायची सवय.
सांडः वेगळी ओळख नको.:-)
गुडघा: नुकताच कुस्ती शिकायला गेला अन डायरेक्ट युनिवर्सिटी लेव्हल च्या कुस्तीगिराशी कुस्ती लावली. त्याने ह्याला धरुन असा आपटला की पायाचा गुडघा फुटला. नंतर डोक्याला मार लागला म्हणत होस्टेल ला आला.
बेंड्या: ह्याला हे नाव का पडले ते कुनालाच माहीती नाही. बहुतेक कधी काळी त्याला बेंड झाले असेल.
सुक्या (बोंबील)
मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)
1 Jan 2009 - 4:10 pm | विनायक पाचलग
आमच एक सर होते
म्हणजे आम्हाला कधीच शिकवायला न्हवते पण ते वर्गात टाइट होवुन यायचे
ते बबन
त्यांची थुंकी इतकी उडायची की पोर पहिल्या बेंचावर बसायला घाबरायची.
(नुकतेच त्याना काढुन टाकल्याचे समजते)
आपला
इतर कोण्त्याही शिक्षकाची टवाळी न केलेला विनायक
1 Jan 2009 - 8:38 pm | नीधप
वर्गात एक मुलगी कायम टिकलीवर कुंकवाचं बोट टेकवून यायची. आणि वेणीत गजरा. तिला आम्ही चैत्रातलं हळदीकुंकू म्हणायचो.
एका मुलीच्या चेहर्यावरचे कायमचे भाव बघून आम्ही तिला 'कडू आंबट खारट तुरट' म्हणायचो.
खूप टापटीपीत आणि व्यवस्थित रहाणार्या एका मुलाला शामा (शाळामास्तर) म्हणायचो.
एक बुटक्या होता. जो हाफ चड्डी घातली तर शाळेतला वाटेल असा दिसायचा त्याला आम्ही 'धाकलं' म्हणायचो.
एक किडकिडीत उंच मुलगा होता. एकदम साधा. त्याला उगाचच भाई म्हणायचो. असं काही म्हणलं की किंवा मुळातच मुली बोलायला आल्या की त्याला लाजायला व्हायचं.
बाकी चौकोन, जबाबदार, भंजाळेश, बिथराउ अशी विशेषणे येता जाता तोंडी लावायचोच.
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
1 Jan 2009 - 10:48 pm | मयुरा गुप्ते
शाळेतले एक सर गढुळ पाण्याला 'ढगुळ पानी' म्हणायचे. त्याना तेच नाव ठेवला होता.
1 Jan 2009 - 11:51 pm | अविनाशकुलकर्णी
आमचा मित्र टकल्या होता पण "विग" घालायचा त्याला "तात्या टोपे"म्हणायचो
2 Jan 2009 - 12:49 am | लवंगी
शाळेतले एक सर बाईकवरुन गटारात पडले होते.. हेल्मेटमूळे वाचले.. त्या दिवसापासून त्याचे नाव "हेल्मेट" पडले.
आमच्या प्रिन्सिपलचा आवाज खूप बारीक होता सारख्या चिवचीवायच्या.. त्यांना आम्ही चिमणी म्हणायचो.
आमच्या टोळ्क्यात एक मुलगा होता, त्याला शिव्या दिल्याशिवाय बोलताच यायच नाहि, त्याला आम्ही गटर म्हणायचो.
2 Jan 2009 - 8:09 am | दीपुर्झा
आमचा एक मित्र जो नेहमी काहीतरी कमिटमेंट देउन ती पाळायचा नाही त्याला आम्ही 'भामटा ' अस नाव दिल होत :) , म्हणजे अजूनही तसच म्हणतो :) . कॉलेजला असताना सगळ्या मुलींना अशीच नावं होती , मिरजकर ला मिरची , एका मुलीला कपाळावर केस कमी होते .. तीला आम्ही 'टक्स' म्हणायचो .
आणि अजून एक किस्सा आठवतो , आमच्या ग्रुप मधे एक साधा भोळा मुलगा होता , गरीब बिचारा टाइप . आम्ही ट्युशन ला जायचो तिथे सगळ्याच्या चपला एकाच ठिकाणी सोडायचो आणि मग ट्युशन सुटली की एकच गलका व्हायचा त्या ठिकाणी आपआपल्या चपला घालण्यासाठी . मुलींच्या ग्रुप मधे एक उंच ,जाडजूड , मजबूत मुलगी होती .. तिचा आवाज मात्र खूप नाजूक होता. ती चप्पल शोधत होती तेंव्हा आमच्या ग्रुप मधुन आवाज आला 'बाजुला व्हा रे ताई ला चप्पल शोधू द्या ' , तिला कळलच नाही की हे कोण बोललं म्हणून . आणि नेमका तिच्या नजरेच तो गरीब बिचारा पडला आणि ती पण नंतर म्हणाली ' नाही भैय्या तुम्हीच घाला आधी चप्पल ' तेंव्हा पासून त्या गरीब बिचार्या मुलाचे नाव पड्ले 'भैय्या ' .सगळे त्याला अजूनही त्याच नावाने ओळखतात . आज तो एका इंजिनियरींग कॉलेजचा प्रिन्सिपल आहे :)
7 Jan 2009 - 9:40 am | सर्किट (not verified)
आज तो एका इंजिनियरींग कॉलेजचा प्रिन्सिपल आहे
आणि तू अजूनही मिसळपावावर दळणे दळतोस ? काहीतरी ठोस कर की !
-- सर्किट
2 Jan 2009 - 9:00 am | अनिल हटेला
तीघांचा उल्लेख (http://www.misalpav.com/node/5221 )इथे झालेलाच आहे..
बाकी चे पूढीलप्रमाणे...
कुत्र पप्या: कुत्र्याचा डीट्टो आवाज काढणारा.
पीट्या पप्या: स्वतःच मालक +चालक असलेली पीठाची गिरणी आणी त्यात हे बेणं पूर्णपीठाने भरलेलं...
चंपकःकायमच केसाना अगदी मारुतीच्या थाटात तेल चोपडण्याची सवय..
मेजरःगुडघ्यात मेंदु असल्याची लक्षणे ..(ह्याला ग्रूपचा सरदार सुद्धा म्हणायचो)
फूटबॉलःफूटबॉल सारखाच गोलमटोल आणी रीयाल माद्रीद चा पंखा..
अजुनही बरेच आहेत ..पण परत कधी तरी..
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
2 Jan 2009 - 9:01 am | अनिल हटेला
तीघांचा उल्लेख (http://www.misalpav.com/node/5221 )इथे झालेलाच आहे..
बाकी चे पूढीलप्रमाणे...
कुत्र पप्या: कुत्र्याचा डीट्टो आवाज काढणारा.
पीट्या पप्या: स्वतःच मालक +चालक असलेली पीठाची गिरणी आणी त्यात हे बेणं पूर्णपीठाने भरलेलं...
चंपकःकायमच केसाना अगदी मारुतीच्या थाटात तेल चोपडण्याची सवय..
मेजरःगुडघ्यात मेंदु असल्याची लक्षणे ..(ह्याला ग्रूपचा सरदार सुद्धा म्हणायचो)
फूटबॉलःफूटबॉल सारखाच गोलमटोल आणी रीयाल माद्रीद चा पंखा..
अजुनही बरेच आहेत ..पण परत कधी तरी..:-)
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
2 Jan 2009 - 11:04 am | मैत्र
मित्रांमध्ये फार व्हरायटी टोपणनावे नव्हती...
पुण्यातली नामवंत शाळा मात्र त्याने भरली होती.
शाळेत एक पर्यवेक्षक होते त्यांना एक मोठा काउंटर होता (केबिन नाही म्हणून एक वेगळी मोठी जागा आणि काउंटर सारखं गोल टेबल). आणि वर्ण सॉलिड काळा, भन्नाट आवाज. एकंदरीत भीती दायक व्यक्तिमत्व होतं. त्यांना - कुंपणातलं घुबड / करपलेला बनपाव अशी नावं होती :)
एक सर विग घालायचे. त्यांना मामा म्हणायचे का ते माहीत नाही पण फार वर्षांची परंपरा होती :)
एका बाइंना गालावर दोन बोटे ठेवून रोखून बघत बोलायची सवय होती. त्या बारीक होत्या आणि भेदक पणे इकडे तिकडे हवेत पहायच्या कायम त्यांना चेटकीण म्हणायचे.
एका अतिउत्साही मास्तरला गोट्या नाव ठेवलं होतं. ते इतकं पॉप्युलर होतं की त्यांच्या खर्या नावाने काही बोलणं झालं तर समजायचंच नाही कोणाबद्दल बोलतायत.
एका अशाच उत्साही सरांना शाळेच्या एका अगदी छोट्या गावातल्या ब्रॅंचमध्ये उपमुख्याध्यापक म्हणून बढती मिळाली तर ते खुप खुश होते. अनुभव घेऊन परत आले जुन्याच पदावर :) तेव्हापासुन त्यांना अंदमानचा राजा नाव पडलं.
2 Jan 2009 - 11:52 am | रम्या
कॉलेजचा एक मित्र राजेश खन्ना सारखा दिसायचा. त्याला सगळे जण 'काका' म्हणतात ! त्याला स्वत:लाच माहीत नव्हतं त्याला 'काका' का म्हणतात ते! पण हे नाव इतकं रुढ झालं होतं बर्याच जणांना त्याचं जयेश हे खरं नाव माहीत नव्हतं. एकदा तर हाईटच झाली, माझा एक मित्र त्याच्या घरी गेला. व्हरांड्यात त्याचे बाबा उभे होते. त्याने बाबांनाच विचारलं घरी काका आहे का म्हणून =))
आम्ही येथे पडीक असतो!
2 Jan 2009 - 12:39 pm | विजुभाऊ
एक मुलगी खूप चापुन वेणी घालुन अती सात्वीक चेहेर्याने यायची. तीला आम्ही " आमटी" म्हणायचो
दुसर्या एकीचे केस सतत फिरायला गेल्यासारखे असायचे तीला "मेड्युसा" म्हणायचो.
आपण एखादा विचार ;एखादी गोष्ट करतो किंवा करायचे टाळतो ते आनन्द मिळवणे किंवा वेदना टाळणे या दोन्ही साठीच
2 Jan 2009 - 9:06 pm | llपुण्याचे पेशवेll
आमच्या शाळेत एक बायल्या मुलगा होता त्याला आम्ही 'अच्युत नलवडे' म्हणायचो. :)
आमच्या वर्गातल्या एका बुटक्या मुलाला सगळेजण टिल्लू म्हणायचे.
एक जाडजूड मुलगा होता त्याला डमरू म्हणायचो.
पुण्याचे पेशवे
Since 1984
3 Jan 2009 - 12:57 am | रेझर रेमॉन
आपले सोहनी काका, रामभाऊ.. ते झाले रॅम्बो सोहनी.
देव काका झाले डेव्ह पामर.
नखरेल नार, नच सुन्दरी- तू चिचुन्दरी!
पान खाणारे वाघ काका, गवत्या वाघ.
विख्यात नट जितेंद्र... जितू पकडके... (मार्केट)
स्पायिंग करणार, काणोशा.
काँग्रेस नेत्याची पोर.. हातचलाखी ने काढली.
अर्धी चड्डी... पॅरॅशूट छाप चड्ड्या.
तुझं नांव काय आणि तू कुठे जाते? य दोन प्रश्नांचे एकच उत्तर-
शीला दाते.
3 Jan 2009 - 8:26 am | विसोबा खेचर
धागा चांगला आहे परंतु ती ती माणसं माहीत असल्याशिवाय त्यांच्या नावातली गंमत कळणार नाही. नाव घेतल्यावर तो तो माणूस डोळ्यासमोर आला पाहिजे तरच मौज वाटते. इथे बरीचशी नावं वाचून काहीच जाणवलं नाही कारण ती माणसंच माहीत नाहीत..
असो,
चंद्रशेखर अभ्यंकर ऊर्फ तात्या.
7 Jan 2009 - 9:44 am | सर्किट (not verified)
चंद्रशेखर अभ्यंकर ऊर्फ तात्या.
एक महत्वाचं नाव गाळलंत तात्या,
चंद्रशेखर रामचंद्र अभ्यंकर (उर्फ सी रामचंद्र)
बाय द वे, बाबांचं नाव रामचंद्र आणी आईचं वैदेही !! तुमच्या आजीआजोबांचं कौतुकच करायला हवं !! जियो !!!
-- सर्किट
3 Jan 2009 - 2:48 pm | मूखदूर्बळ
आमच्या शाळेत एक जाडजूड बाई होत्या त्यांना 'रॅंबो , अस नाव ठेवलेल . शाळेत आणखी एक रँबो टाईप बाई आलेल्या त्या कायनेटीक वरून यायच्या म्हणून त्यांना म्हणायचो कायनेटीक रँबो.
कॉलेजात एक प्रोफेसरांची जोड गोळी यायची. त्यातले एक अगदी धीप्पाड आणि एक एकदम खूजे त्यांना म्हणायचे टॉम आणि जेरी
कॉलेजात एक मुलगी सारखी बडबड करायची तिला म्हणायचे 'चिमणी'
आणि एक मुलगी कायम शंका विचारायची तिला म्हणायचे 'शंकासूर'
एक काळा ढूस्स मुलगा होता त्याला म्हणायचे 'अमावस्येचा चंद्र'
एक मूलगा हलत डूलत चालायचा त्याला म्हणायचे 'डी जे'
अस आणखी बरच काही....
6 Jan 2009 - 8:39 pm | अनंत छंदी
आमच्या परिसरात विठोबा नावाचा तळीराम राहतो. कोणे एके काळी या साहेबांनी कोर्टात काम केले असल्याने तसे कायदेकानू त्याला माहित आहेत. कधी शुद्धीत असला तर मात्र त्याचे वागणे सर्वांशी अगदी अदबशीर असते. या तळीरामाने एक दिवस दारू दुकानात बसून पोटभर दारू ढोसली आणि नीट घट्ट, पूर्ण २८ होऊन स्वारी घरी पोहोचली, तेथे त्याचे काय बिनसले कोणास ठाऊक सरळ घरात गोंधळ घालण्यास सुरुवात केली. घराला आग लावायला निघाला. अगदीच आवरेनासा झाल्यानंतर शेजार्यांनी स्वारीची पोलीस ठाण्यात रवानगी केली. दोन दिवसांनंतर महाराज घरी परतले. त्यांनतर पूर्ण शुध्धीत असताना तो मला भेटला. तेव्हा मी त्याला पोलीसात त्याचा पाहुणचार कसा झाला ते विचारले. त्यावर तो हसत म्हणाला "साहेब, आपण काय रेगुलर कैदी न्हव्हतो! १३ क मदी होतो. त्यामुळं सोय अगदी उत्तम होती बगा, काय बी त्रास झाला नाय" मग मी त्याला विचारले "विठोबा हे १३ क म्हणजे रे काय" त्यावर तो म्हणाला मेंटल लोकांन्ला १३ क मदी टाकतात" तेव्हा माझ्या डोक्यात प्रकाश पडला १३ क म्हणजे वेड्याची पोलीस कस्टडीत रवानगी केल्यावर त्याची नोंद रजिस्टरमध्ये करतात तो कॉलम! मग काय अस्मादिकांच्या हातात आयतेच कोलीत मिळाले. एखादी व्यक्ती सर्कीटसारखी वागत असेल तर त्याला १३ क नांव ठेवणे सुरू झाले. नंतर हा शब्द इतका रुळला की आजूबाजूच्या जिल्ह्यातही सर्कीट म्हणजे १३ क हे समीकरण बनले.
7 Jan 2009 - 1:42 am | नाटक्या
> नंतर हा शब्द इतका रुळला की आजूबाजूच्या जिल्ह्यातही सर्कीट म्हणजे १३ क हे समीकरण बनले.
थोड्क्यात म्हणजे आपल्या मिपावरच्या 'सर्कीट' साहेबांना आजपासुन '१३-क' असे म्हणायला हरकत नाही....
सर्कीटसाहेब: हलकेच घ्या...
7 Jan 2009 - 8:37 am | सर्किट (not verified)
चालेल की !!
आजपासून आम्ही १३-क !!!
-- सर्किट
7 Jan 2009 - 10:28 am | अनंत छंदी
माफ करा हो!, हे तुम्हाला उद्देशून नाही म्हटले.
7 Jan 2009 - 1:38 am | नाटक्या
आम्हाला एक जाडजूड पुरषी आवाजाच्या बाई होत्या त्यांना म्हणायचो शी-मॅन (हिमॅन च्या धर्तीवर). तिच्यावर पोरांनी हि-मॅन च्या धर्तीवर गाणं सुध्दा केलं होतं...
एका मित्राला जवळजवळ टक्कल पडले होते त्याला 'वाळवंट्या'
एक मित्र अतिशय चकचकीत काळा होता त्याला नाव ठेवले होते 'कडप्पा'
मी लहानपणी क्रिकेट खेळताना खुपदा जखमी व्हायचो यामुळे गुढगे, कोपर यांना नेहमी बँडेज लावलेले म्हणून आजी मला म्हणायची 'चिंध्या मारुती'
एक मुलगा खुप बारिक होता, ईतका की त्याने शर्ट घातला की तो हँगर वर लावल्या सारखा दिसायचा म्हणून त्याला म्हणायचो 'हँगर'
एक मुलगा सुटीमध्ये गिटार शिकायला जायचा, वाजवायचा यतातथाच पण भाव खुप खायचा. वाजवायला सांगीतले कि काहीतरी कारणं सांगायचा. त्याला नाव ठेवले होते 'संजोगी' म्हणजे संडासात जोरदार गीटार वाजवणारा...
अजुन काही पुढच्या वेळेला.....
7 Jan 2009 - 9:32 am | सुचेल तसं
समीर नावाच्या मित्राला अंकल सॅम.
एक फटाका मुलगी ग्रुपमधल्या बर्याच जणांना आवडायची म्हणून तिचं नाव ठेवलं होतं - जॉईंट व्हेंचर
एक मित्राची सारखी अफेअर्स चालू असायची म्हणून त्याचं नाव ठेवलं - बाबा कामदेव
एका मुलीचे केस अतिशय कुरळे होते म्हणून तिला सगळे मेंढी म्हणायचे
Finally I will be so matured that I will react to nothing.
अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com