गणपती पुळे सहल

झकासराव's picture
झकासराव in जनातलं, मनातलं
5 Jan 2008 - 11:16 pm

गणपती पुळ्याला जावुन आलो.
त्याचे फोटो लावले आहेत पिकासावर. बघुन घ्या. :)
http://picasaweb.google.co.uk/zakasrao/TripToGanapatiPuleNearRatnagiri

ganesh mandir

हा एक अत्यंत सुंदर (माझ्या मते) असा समुद्राचा फोटो देण्याचा मोह आवरत नाहिये :)

प्रवासभूगोलअनुभव

प्रतिक्रिया

ऋषिकेश's picture

5 Jan 2008 - 11:22 pm | ऋषिकेश

झकासराव.. छायाचित्रे अतिशय सुंदर आली आहेत. त्यातही सूर्यास्ताची आणि फेसाळ सागराची खासच!! फार फार आवडली. आता पुढची ट्रीप कधी :) ;)
-(प्रभावित) ऋषिकेश

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Jan 2008 - 11:32 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

झकासराव.. छायाचित्रे अतिशय सुंदर आली आहेत. त्यातही सूर्यास्ताची आणि फेसाळ सागराची खासच!! फार फार आवडली. आता पुढची ट्रीप कधी :) ;)

हेच म्हणतो !!!

प्राजु's picture

5 Jan 2008 - 11:59 pm | प्राजु

प्रा. दिलीप रावांशी एकदम सहमत आहे... फेसाळ दर्याचं पानी सारं.......

इनोबा म्हणे's picture

6 Jan 2008 - 1:18 am | इनोबा म्हणे

मी काही महिन्यांपुर्वी(आणी प्रथमच)जावून आलो.अप्रतिम आहे.

प्राजूनं सांगीतल्याप्रमाणे...
फेसाळ दर्याचं पानी सारं...
लाजरी वाळू आणी खट्याळ वारं...वाह वाह!

या प्राजूमुळे मी कवी होणार बहूतेक...कुणीतरी वाचवा मला...

(कविताग्रस्त) -इनोबा

विसोबा खेचर's picture

6 Jan 2008 - 11:29 am | विसोबा खेचर

झकासा,

फोटो क्लासच आहेत...

तुझ्या संग्रहामधील मला सर्वात जास्त आवडलेलं छायाचित्र इथे द्यायचा मोह मलाही आवरत नाहीये...

सुर्यास्ताची छायाचित्रेही सुरेख आले आहेत...

तात्या.

नंदन's picture

6 Jan 2008 - 12:17 pm | नंदन

छायाचित्रे, झकासराव. पाहून छान वाटलं.

नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
http://marathisahitya.blogspot.com/)

सुनील's picture

6 Jan 2008 - 7:16 pm | सुनील

अप्रतिम.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

स्वाती राजेश's picture

6 Jan 2008 - 9:36 pm | स्वाती राजेश

फोटो छानच काढले आहेत. Angle खूप मस्त घेतले आहेत.
कॅमेर्या ची करामत कि झकासरावांची? (जोकींग).
पुढच्या ट्रीप च्या फोटोची वाट पाहात आहोत.

झकासराव's picture

7 Jan 2008 - 8:29 am | झकासराव

मित्रानो (ह्यात मिपा भगिनी देखिल सामिल आहेत हो :))
पुढची ट्रिप माहीत नाही कधी होइल ते. सुट्ट्या सारख्या थोडीच असतात :)
असो तरी बरेच फोटो काढलेच नाहीत वेळेच्या आणि अंतराच्या गणितात न बसल्याने.
मुळात माझ तिकडे जाताना गणितच चुकल होत. निघालो उशीरा सकाळी ८ वाजता. अंतर मी समजत होत १२० किमी पण आहे १६० किमी (कोल्हापुर गणपती पुळे) शिवाय जास्त माहिती नसल्याने आम्ही एक रस्ता चुकण्याचा (नेहमीचा) बावळटपणा केला आणि रत्नागिरीत जावुन तिथुन गणपती पुळे गाठले. त्यामुळे जाताना एक तास वेळ जास्तच लागला.
(इथे माझ वेळेच गणित चांगलच चुकल होत. मी फार तर ३ तास समजत होतो पण ५ तास लागले मला. )
असो.
कोकणाच पहिल दर्शन म्हणता येइल हे माझ. आता कोकण सगळच फिरण्याची ईच्छा आहे माझी. बघु जस जमेल तर करत जाइन :)
कोकण खुप सुंदर आहे शिवाय मी दुचाकीवर गेल्याने चहु बाजुने जे पाहिल ते शब्दात व्यक्त करता येणार नाही अस आहे. :)
हिरव्यागार झाडी मुळे ओक्सिजन जरा शरिरात जास्त गेल्याने खुप उत्साही व छान वाटल. :)

ध्रुव's picture

7 Jan 2008 - 11:43 am | ध्रुव

वर जाउन आलात का??
कमाला जात नसाल आणि इतरांचा त्रास फार होणार नसेल तर मलापण सांगा कधितरी. मी पण बघेन जमते का :)
बाकी फोटो एकदम कडक आले आहेत :)

--
ध्रुव

झकासराव's picture

9 Jan 2008 - 8:04 am | झकासराव

मी पुण्यात असतो रे.
मध्ये सुट्टी होती म्हणुन कोल्हापुरला गेलो होतो.
त्यामुळे जायला जमल. बाइक वरच गेलो होतो.