एकदा जंगलात राहाणाऱ्या सरड्याने शहरात जाऊन लोकांना आपले रंग बदलण्याचे कौशल्य दाखवून वाहवा मिळविण्याच्या विचार केला. सरडा जवळच्या शहरात गेला. तिथे त्याला एका सरकारी बंगल्यात डोक्यावर काळी टोपी घातलेला एक माणूस खुर्चीवर बसलेला दिसला. सरडा त्या माणसं जवळ गेला आणि म्हणाला मी जंगलात राहणारा सरडा आहे. मला रंग बदलण्याची कला अवगत आहे. मी ज्या झाडा फुलावर बसतो त्याच रंगात मिसळून जातो.
सरडा म्हणाला मी तुम्हाला आपली कला दाखवतो. सरडा हिरव्या पानांवर बसला तो हिरवा झाला. सरडा लाल फुलावर बसला तो लाल झाला. अश्या रीतीने सरड्याने वेगवेगळे रंग बदलून त्या माणसाला दाखविले. सरड्याने माणसाला विचारले तू माझ्या सारखा रंग बदलून दाखवू शकतो. तो माणूस म्हणाला त्यात काय विशेष आहे. मी या खुर्ची वर बसल्या-बसल्या रंग बदलू शकतो. तू फक्त माझ्या टोपी कडे बघ. सरड्याने त्या माणसाच्या टोपी कडे बघितले. क्षणातच त्या टोपीचा रंग हिरवा झाला, दुसऱ्या क्षणी लाल, नंतर निळा, पांढरा आणि भगवा झाला. अखेर पुन्हा टोपीचा रंग काळा झाला. त्या माणसाची रंग बदलण्याची कला पाहून सरडा आश्चर्यचकित झाला. सरडा त्याला म्हणाला आजगायत मी कोणत्या ही माणसाला रंग बदलताना पाहिले नाही. आपण खरोखर कोण आहात? तो माणूस म्हणाला मी सदा सत्तेच्या खुर्चीत विराजमान राहतो. त्यासाठी ही टोपीचा रंग बदलण्याची कला आत्मसात केली आहे. त्या माणसाची चरण वंदना करत सरडा म्हणाला गुरुदेव तुम्ही ही कला मला शिकवणार का?
प्रतिक्रिया
18 Sep 2024 - 5:32 pm | विवेकपटाईत
AI मदत घेऊन व्हिडिओ बनविला त्याची लिंक
https://youtu.be/arcx3pO9i0s?si=UHQcUZo0dC-yhpLB