आज भांबावला दिस
काही येई ना मनात
अंधार व्यापलं आकाश
उजेड उरे पणतीत
ठरलेल्या अवसरी
रान गेलंच उठून
पक्षी शोधी रानमेवा
पंख जाती हो थकून .
खेळ चुकलेला सारा
मना दुःख्ख देई मोठे
तिथे लावो कोणी लेप
सारे मोठ्ठे खोटे खोटे
कोठे गेली हीरवळ
मन शिडकावे तीला
मोडलेल्या फांदीवर
एक बांधलेला झुला .
सारे खोट्यात खोट्यात
काय शोधू खरे खरे
नशिबाचे तोडून तारे
दगडाला म्हणती हिरे
अंती खरे एक आहे
झाले ते ते स्विकारावे
आयुष्याच्या सरणीला
मोजून ते ते मांडावे .
सारा हिशेबच आहे
आयुष्याचा हाच धंदा
कधी बंदा लागे हाती
कधी पोकळीचा चंदा
काय करू अंत याचा ?
काव्य म्हणू की भावना ?
धरले व्यवहारात तुम्ही
काव्य, नाही तर ? भाव ना !
सारे तूटून तूटून
शब्दानीच मी जोडतो
पुढे जमो पुन्हा डाव
सुटलेला हा सोडतो .
सूटलेला हा सोडतो .
----------------------------
अतृप्त - ५/०१/२४
प्रतिक्रिया
5 Jan 2024 - 2:21 pm | चांदणे संदीप
एकेक कडवे पुन्हापुन्हा वाचले. कविता खूप आवडली.
सं - दी - प
5 Jan 2024 - 3:48 pm | अत्रुप्त आत्मा
मनःपूर्वक धन्यवाद .
5 Jan 2024 - 4:26 pm | कंजूस
अब आयेगा मजा.
5 Jan 2024 - 6:06 pm | तुषार काळभोर
मीटरपण चांगला सांभाळला आहे. मल्टीटॅलेंटेड गुरुजींचं लै कौतुक वाटतं!
5 Jan 2024 - 6:16 pm | विवेकपटाईत
कविता आवडली
5 Jan 2024 - 10:00 pm | अत्रुप्त आत्मा
कंजूस ,विवेकपटाईत , तुषार काळभोर .
धन्यवाद