मानसिक आरोग्य जागरूकतेसाठी सोलो सायकलिंग

मार्गी's picture
मार्गी in जनातलं, मनातलं
10 Sep 2022 - 5:00 pm

4 राज्ये, 1500 किमी- २० दिवस- सिंधूदुर्ग- गोवा- बेळगांवी- कलबुर्गी- हैद्राबाद- वारंगल- गडचिरोली- नागपूर

नमस्कार. आपण ठीक आहात अशी आशा करतो. सध्याच्या काळात मानसिक आरोग्य, हा अतिशय महत्त्वाचा विषय झाला आहे. अनेकदा आपण बघतो की, लोक अतिशय क्षुल्लक कारणाने आत्महत्या करताना दिसतात (वस्तुत: कोणतंही मोठं सांगितलं जाणारं कारण हे एवढी मोठी गोष्ट करण्यासाठी नेहमीच किरकोळ असतं). कोरोना आणि आर्थिक संकटाच्या काळानंतर मानसिक आरोग्य, तणाव व्यवस्थापन आणि सकारात्मक मानसिक आरोग्य ह्या अतिशय महत्त्वाच्या बाबी झाल्या आहेत. त्यामुळे हा विषय आपण सर्वांचा आहे. केवळ मानसिक आरोग्याचे समस्याग्रस्त नाही तर आपण सर्व. विशेष समस्याग्रस्त (जसे ऑटीझम, मेंटल रिटार्डेड किंवा डाऊन्स सिंड्रोम असलेल्या व्यक्ती) ह्यांच्यापासून अगदी युवा विद्यार्थी आणि प्रत्येकासाठी हा विषय महत्त्वाचा आहे. ह्या सायकल प्रवासामध्ये हा विषय व्यापक समाजापुढे ठेवला जाईल. मानसिक रोग, मानसिक समस्या आणि मानसिक विकलांगता असलेल्यांच्या समस्या ह्याबद्दल जागरूकता असणं गरजेचं आहे जेणेकरून लवकरात लवकर अशा व्यक्तींना आवश्यक ती मदत दिली जाऊ शकते. सर्वसामान्य लोक- शेतकरी, युवा, विद्यार्थी आणि सर्व ह्यांच्यासोबत संवादातून ह्या सायकल प्रवासात ह्याबद्दल जागरूकता करण्याचा प्रयत्न केला जाईल. हा विषय सर्वांचा आहे. सायकलिस्ट सामाजिक संस्था, समूह व लोकांसोबत बोलेल व स्थानिक पातळीवरील परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करेल. तो साधी- सिंगल गेअर एसएलआर सायकल वापरेल. त्यामध्ये हा अर्थ अभिप्रेत आहे की, प्रत्येक जण स्वत:ची क्षमता वापरून उपलब्ध साधनाद्वारे अशी गोष्ट करू शकतो.

मानसिक आरोग्य जागरूकतेसाठी सायकलिंग

मानसिक भलायकेची जागृताय करपा खातीर सायकल चलोवप

ಮಾನಸಿಕ ಆರೋಗ್ಯ ಜಾಗೃತಿಗಾಗಿ ಸೈಕ್ಲಿಂಗ್

మానసిక ఆరోగ్య అవగాహన కోసం సైక్లింగ్

हा रूट का?

कारण मुख्य प्रवाहात नसलेल्यांपर्यंत पोहचणं गरजेचं आहे. सुरुवातीला सायकलिस्टने मुंबईमधील संस्थांसह राईड सुरू करण्याचा विचार केला होता. परंतु महाराष्ट्रातील शहरांमध्ये ह्याबद्दल थोडी तरी जागरूकता आहे. त्यामुळे सर्वाधिक वंचित व दूर राहिलेला प्रदेश का न घ्यावा असा विचार केला. त्यासह ह्यातील मुख्य मॅसेज कम्फर्ट झोनच्या पलीकडे जाणे, आपल्या मानलेल्या मर्यादांच्या पलीकडे जाणे आणि अपरिचिताबद्दल संवेदनशील होणे हा आहे. त्यामुळे हा सायकल प्रवास कोंकणातील कुडाळमध्ये सुरू होईल व नंतर गोवा, कर्नाटक, तेलंगणा व पुन: महाराष्ट्राच्या दुर्गम गडचिरोली जिल्ह्याचा त्यात समावेश असेल.

जर आपल्याला कुडाळ- गोवा- बेळगावी- बागलकोट- कोल्हार- कलबुर्गी- हैद्राबाद- वारंगल- गडचिरोली- नागपूर ह्या रूटवर काम करणारी संस्था माहिती असेल किंवा आपले कोणी परिचित ह्या रूटवर असतील तर हा मॅसेज त्यांच्यासोबत शेअर करू शकता. ह्या प्रवासाची सुरुवात २४ सप्टेंबरला होईल आणि तो साधारण १४ ऑक्टोबरला नागपूरला संपेल.

सायकलिस्टविषयी

निरंजन वेलणकर, ३७ ह्याने लदाख़ आणि स्पीतिसह अनेक सोलो सायकल मोहिमा केल्या आहेत. त्याने महाराष्ट्रामध्ये आरोग्य व एचआयव्हीबद्दल जागरूकतेसाठी आणि योग व ध्यानाच्या प्रसारासाठीही सायकल प्रवास केले आहेत. त्याचा ब्लॉग- http://niranjan-vichar.blogspot.com/2022/09/solo-cycling-for-mental-heal... 09422108376 niranjanwelankar@gmail.com

समाजजीवनमानसद्भावनाआरोग्य

प्रतिक्रिया

कंजूस's picture

11 Sep 2022 - 11:05 am | कंजूस

हमरस्त्यावर अपघाताची धाकधूक असते.

धर्मराजमुटके's picture

11 Sep 2022 - 11:33 am | धर्मराजमुटके

मुंबई / ठाण्यात जुन्या सायकल विकणारे कोणी ओळखीचे आहे काय ? किती खर्च येतो जुनी सायकल घ्यायला ?

MipaPremiYogesh's picture

12 Sep 2022 - 10:41 pm | MipaPremiYogesh

मी एका सायकलिस्ट मित्राला विचारात होतो तेंव्हा त्याने सांगितली कि त्याच्या बायकोची सायकल विकायची आहे मी तात्काळ खरेदी केली , दीड वर्षांपूर्वी ७, ५०० ला घेतली. FB मार्केटप्लेस वर तुम्ही बघू शकता

MipaPremiYogesh's picture

12 Sep 2022 - 10:47 pm | MipaPremiYogesh

स्तुत्य उपक्रम , शुभेच्छा निरंजनजी

मार्गी's picture

21 Sep 2022 - 3:39 pm | मार्गी

सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद आणि नमस्कार! @ कंजुस जी, हो, खरं आहे. पण जीवनात प्रत्येक क्षणी अपघाताची शक्यता आहेच. सायकलिंग तसंच आहे.

@ धर्मराज मुटके जी, ओएलएक्सवर असतात. किंवा काही सायकलिंग ग्रूप्सवरही येतात सूचना. आपल्याला कशा स्वरूपाची सायकल हवी आहे व कशी राईड करू इच्छिता, त्यानुसार अनेक पर्याय समोर येऊ शकतात.

मार्गी's picture

27 Sep 2022 - 3:43 pm | मार्गी

सर्वांना नमस्कार. ह्या मोहीमेचा दिवस 4 पूर्ण झाला. कुडाळ- गोवा (बिचोलिम) 72 किमी, नंतर बिचोलिम- बेळगांव 89 किमी, नंतर बेळगांव- लोकापूर 107 किमी व आज लोकापूर- बागलकोट- कोल्हार 71 किमी राईड झाली. अतिशय जबरदस्त अनुभव मिळतोय. साध्या सायकलीवरही सह्याद्रीतला चोरला घाट बराचसा चढता आला. सायकलीने खूपच छान साथ दिली आहे. वाटेत अनेक संस्था- ग्रूप्स व लोक भेटत आहे. खऱ्या अर्थाने incredible India चा अनुभव येतोय. खूप लोकांशी संवाद साधता येतोय. शक्य होईल तसे अधून मधून अपडेटस देईनच. धन्यवाद.

मार्गी's picture

2 Oct 2022 - 12:57 pm | मार्गी

सर्वांना नमस्कार. ह्या सायकल प्रवासाचे 9 दिवस पूर्ण झाले. 9 दिवसांमध्ये साधारण 785 + किमी झाले. आज हैद्राबादला पोचलो. अनेक ठिकाणी विद्यार्थी, शाळा, वेगवेगळ्या संस्था व अन्य लोकांसोबत भेटी व चर्चा होत आहेत. अजून 9 दिवस बाकी आहेत व 11 ऑक्टोबरला नागपूरला सायकल प्रवास संपेल. सर्वांना धन्यवाद.

मार्गी's picture

14 Oct 2022 - 2:11 pm | मार्गी

सर्वांना नमस्कार. सिंधूदुर्ग- गोवा- कर्नाटक- तेलंगणा- गडचिरोली- नागपूर हा सायकल प्रवास ११ ऑक्टोबर रोजी ठरलेल्या प्लॅननुसार पूर्ण झाला. १८ दिवसांमध्ये साधारण १४४२+ किमी पूर्ण झाले. ह्या प्रवासामध्ये मदत व सोबत करणाऱ्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. ह्या प्रवासात खूप वेगळे अनुभव आले. विद्यार्थी व मुलांसोबत माझा फिटनेसचा आनंद शेअर करता आला व व्यायाम व मानसिक आरोग्याबद्दल त्यांच्यासोबत शेअरिंग करता आलं. ह्या प्रवासात सोबत असलेल्या सर्व संस्थांना धन्यवाद. त्याबरोबर निसर्गालाही धन्यवाद. आणि ज्या सायकलने सर्व खड्डे, धक्के सहन केले व विलक्षण म्हणजे इतक्या अंतरातही तिचं पंक्चर झालं नाही, तिलाही धन्यवाद. लवकरच ब्लॉगमध्ये अनुभव लिहेन. धन्यवाद.