कला - चित्रकला प्रदर्शने

चौथा कोनाडा's picture
चौथा कोनाडा in जनातलं, मनातलं
29 Aug 2022 - 1:03 pm

आपल्या आजूबाजूस बरेच सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात. त्याची माहिती, समाजमाध्यमे वृत्तपत्रे याद्वारे आपणापर्यंत येत असते. काही कारणांमुळे कधी कधी ही माहिती आपणा पर्यंत पोहोचत नाही, किंवा काही उशिरा पोहोचते, नंतर हळहळ वाटते की आधी कळले असते तर उपस्थित राहून याचा आस्वाद घेऊ शकलो असतो की !

अशीच चर्चा कांजूस सरांच्या या धाग्यावर झाली होती. म्हणून अशा कार्यक्रमांची माहिती मिपा वर पोस्ट करून देण्याचे या धाग्याचे प्रयोजन आहे.
सुरुवात चित्रकला प्रदर्शनाच्या माहितीने करत आहे.

गणेशोत्सव २०२२ निमित्त "माझा बाप्पा" हे कलाकृतींचे प्रदर्शन

आयोजक : संस्कार भारती, पिंपरी चिंचवड
कालावधी : ३० ऑगस्ट २०२२ (मंगळवार) ते ११ सप्टेंबर २०२२ (रविवार) साप्ताहिक सुट्टी - सोमवार
वेळ : सकाळी ११ ते रात्री ८ पर्यन्त
स्थळ : पी. एन. गाडगीळ कलादालन, चाफेकर चौक, चिंचवडगाव
(कलादालन गाडगीळ शोरूमच्या आतल्या बाजूसच आहे, काउंटरवर चौकशी करणे)

प्रदर्शनात सुंदर सुंदर कलाकृती असणार आहेत, तरी रसिकांनी प्रदर्शनाचा जरुर आस्वाद घ्यावा !

PNGAE2354

या धाग्यावर इतर सांस्कृतिक कार्यक्रम उदा: नृत्य, नाट्य, संगीत, साहित्य, हस्त-शिल्प-चित्र अशा विविध कलांची प्रदर्शने, प्रात्यक्षिके, मैफिली, बैठकी इ संबधी कार्यक्रम यांची माहिती मिपाकरांनी जरूर द्यावी म्हणजे कार्यक्रमांचा आस्वाद घेता येईल.

(मिपाकरांच्या सुचवणी नुसार धाग्याचे योग्य ते नाव बदण्याचा मानस आहे)

कलाप्रकटन

प्रतिक्रिया

कर्नलतपस्वी's picture

29 Aug 2022 - 2:23 pm | कर्नलतपस्वी

भेट देण्याचा नक्कीच प्रयत्न करणार. हार्दिक शुभेच्छा.

कुमार१'s picture

29 Aug 2022 - 4:05 pm | कुमार१

धाग्याला 'कलादर्पण' असे नाव सुचवतो.

कंजूस's picture

29 Aug 2022 - 6:07 pm | कंजूस

चिंचवड,पिंपरी पुणे परिसर कार्यक्रम.

प्रचेतस's picture

30 Aug 2022 - 9:03 am | प्रचेतस

मस्त.
या निमित्ताने पिंपरी चिंचवड ह्या स्वतंत्र अस्मिता असलेल्या पण पुण्यामुळे झाकोळलेल्या शहराची दखल घेतली गेली याचा आनंद झाला.

प्रदर्शन तर नक्कीच बघेन मात्र ह्या निमित्ताने चौथा कोनाडा यांनी एक कट्टा आयोजित केल्यास अधिक मिपाकरांना भेटता येईल असे वाटते.

चौथा कोनाडा's picture

2 Sep 2022 - 6:06 pm | चौथा कोनाडा

धन्यवाद प्रचेतस !
ठरवून नक्की भेटूयात.

नि३सोलपुरकर's picture

30 Aug 2022 - 1:46 pm | नि३सोलपुरकर

शुभेच्छा आणी चौथा कोनाडा साहेबांचे हार्दिक अभिनंदन .
बाकी प्रचेतस ह्यांच्या प्रतिसादाशी बाडीस .
प्रदर्शन तर नक्कीच बघेन.

चौथा कोनाडा's picture

2 Sep 2022 - 6:03 pm | चौथा कोनाडा

सर्व प्रतिसादकांचे मनापासुन आभार.

"माझा बाप्पा" प्रदर्शनाच्या उद्घटनाची क्षणचित्रे :

dpf123ewrm007

आणखी काही फोटोज खालील लिंकमध्ये:
https://photos.app.goo.gl/aewRR6HPY3xbmpAx5

या संबंधीचे वृत्त खालील लिंकमध्ये:
http://chikhalipimprinews.com/?p=5800

गेल्या वर्षभरात आणखी काय काय झाले त्याचा वृत्तांत तसेच आगामी काळात होऊ घातलेले कार्यक्रम, प्रदर्शने वगैरे देत राहून हा धागा चालता ठेवावा ही विनंती.

चौथा कोनाडा's picture

8 Aug 2023 - 10:20 pm | चौथा कोनाडा

कळवण्यास आनंद होत आहे की गेल्या वर्षभरात ३० प्रदर्शने झाली. या संबंधीचे वृत्तपत्रातील कात्रण :

SB1234rtdvsc

स्मृतिरंग ७५ मालिकेतील प्रदर्शनांपैकी २५ प्रदर्शनांसाठी संयोजन सहाय्य आणि प्रदर्शन उद्घाटन समारंभाचे सुत्रसंचालन करण्याची संधी मला मिळाली हे आनंददायक होते. विविध नामवंत कलाकारांशी परिचय आणि त्यांची कला बघता आली हा एक छान योग म्हणायचा.

चिन्ह आर्ट न्युज अर्थात चिन्ह या कलाविषयक मासिकाने उपक्रमाचे कौतुक करून त्यांच्या वेबपेज वर या संबंधी वृत्त दिले :
(पुढील लिंक क्लिक करणे)
https://chinha.in/features/smrutirang-exhibition-concluded/

फेसबुकवर "स्मृतिरंग ७५" अथवा "संस्कार भारती - पिंपरी चिंचवड" असा सर्च केल्यास सर्व पुष्पांचे (सर्व प्रदर्शनांचे ) फोटो, सहभागी कलाकार , प्रमुख पाहुणे ई सह वृत्तांत मिळून जाईल.

चित्रगुप्तजी मनापासून धन्यवाद.

'चिन्ह' च्या दुव्याबद्दल अनेक आभार. या दुव्यावरील सगळे बघीनच, परंतु विशेषतः प्रभाकर कोलते यांची मुलाखत. माझ्याकडे 'चिन्ह' चे काही विशेषांक होते, परंतु 'आम्ही जातो आमुच्या गावा' मधे लिहील्याप्रमाणे ते सगळे शेवटी कुणाला तरी दिले गेले.
असे काही बघितले-वाचले, की आपले वास्तव्य नेहमी पुणे-मुंबई पेक्षा खूप दूरच घडले, याचा थोडासा विषाद वाटतो.

चौथा कोनाडा's picture

10 Aug 2023 - 12:00 pm | चौथा कोनाडा

'चिन्ह' मध्ये बरेच काही वाचण्यासारखे आहे/ असते. मी जेव्हा २०-३० वर्षांपुर्वी चिन्हचे छापील अंक पाहिले होते तेव्हा प्रचंड आनंदी झालो होतो ! वारली कलेला जगप्रसिद्धी मिळवून देणारे चित्रकार भास्कर कुलकर्णी यांच्या बद्दल प्रथमच चिन्ह मध्ये वाचले होते, मला आठवतेय की त्यांच्या बद्दलचे अनेक सुंदर सुंदर लेख, त्यांच्या स्केचबुकचे फोटो असा बहुमुल्य ऐवज त्यात होता. नंतर अनेक उत्तमोत्तम लेख वाचले ... छापील अंक बंद झाल्यावर चिन्ह ऑनलाईन झाला तेथे ही बरेच वाचले, कोविड१९ पश्चात चिन्हचे " CHINHA Art News च्या यू ट्युब वरील "गच्चीवरील गप्पा, काय चाललंय ? जे जे दिसले ते ते, पॅलेट असे अनेक सुंदर मुलाखती, चर्चा असे कार्यक्रम पहिलेम ऐकले !
चिन्ह मुळे मी बराच श्रीमंत झालोय !

जवळचा ठेवा दुसर्‍या कुणाला देणे हे दु:खदच, पण त्याला ईलाज नसतो ... देऊन टाकल्या की निकडीच्या होऊन बसतात आठवणी वारंवार येत राहतात !
'चिन्ह'चे जुने छापील अंक कुणाकडे आहेत याची चौकशी श्री सतिश नाईक अधूनमधून करत असतात त्याची आठवण झाली !
पुणे-मुंबई सारख्या कलेच्या सांस्कॄतिक केंद्रापासुन दुर राहायला लागणे याला आपला इलाज नसतो. आज काल ऑनलाईन मुळे बर्‍याच गोष्टी मिळून जातात !

चित्रगुप्त़जी, खुप खुप धन्यवाद !

कंजूस's picture

9 Aug 2023 - 7:47 am | कंजूस

पिंपरी चिंचवड भागातील चित्ररसिकांसाठी चांगली सोय झाली या दालनामुळे.
मुंबईत जहांगीर हे एक.

चौथा कोनाडा's picture

9 Aug 2023 - 5:53 pm | चौथा कोनाडा

पिंपरी चिंचवड भागातील चित्ररसिकांसाठी चांगली सोय झाली या दालनामुळे.

अगदी.

मुंबईत जहांगीर हे एक

जहांगीर तर जुने आणि मोठी कलासंकृती, इतिहास असलेली थोर परंपरा असलेली आर्ट गॅलरी आहे ! त्या मानाने चिंचवड येथील बाल्यावस्थेत आहेत !

नव्या वाढत्या शहरांत अगोदरच भाव कमी असतांनाच जागा घ्यावी लागते. मग शहर वाढले की ती 'मोक्याची' होते.
कॅम्लिन कंपनीच्या माध्यमातून जहांगिरच्या बाहेरचा फुटपाथ नंतर मिळवून थोड्या कलाकारांची सोय झाली.

कंजूस's picture

9 Aug 2023 - 7:46 pm | कंजूस

पनवेलचं उदाहरण.
पंचवीस वर्षांपूर्वी मुंबईतील काही कलाकारांनी पनवेलमध्ये मोठ्या जागा विकत घेऊन खाजगी स्टुडिओ थाटले. दूरदृष्टी. मुंबई,पुणे,कोकण तीन ठिकाणी जाण्यासाठी पनवेलमधूनच जावे लागते. पनवेल-नवीन पनवेल- माथेरान रस्ता (म्हणजे इथून माथेरानच्या सनसेट पॉईंटच्या खाली असलेल्या धोधाणी गावात जाता येते.)
(इथून वर रोपवे करण्याचा प्रयत्न वनखात्याने बंद पाडला.)

रम्य निसर्ग.

चौथा कोनाडा's picture

17 Aug 2023 - 6:04 pm | चौथा कोनाडा

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त संस्कार भारती - पिंपरी चिंचवड" कला विभाग "स्मृतिरंग ७५" ही प्रदर्शन मालिका आयोजित केली होती.
"स्मृतिरंग ७५" या अंतर्गत ३० प्रदर्शने (पुष्पे) पी. एन. गाडगीळ कलादालन, चाफेकर चौक, चिंचवडगाव येथे भरवण्यात आली होती.
प्रदर्शनांना कलाकार आणि रसिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आणि प्रदर्शनांची नामवंतांनी वाखाणणी केली !

"स्मृतिरंग ७५" या उपक्रमाचा सांगता समारंभ :

प्रमुख पाहुणे : मा. श्री वासुदेवजी कामत (प्रख्यात चित्रकार आणि राष्ट्रीय अध्यक्ष, संस्कार भारती )

दिनांक : रविवार २० ऑगस्ट २०२३

वेळ : सकाळी ९:३० ते दु. १:३० पर्यंत सन्मान सोहळा, मार्गदर्शन, मनोगत इ.

स्थळ : झपुर्झा आर्ट म्युझियम, कुडजे ( एनडीए, पी-कॉक बे च्या पुढे, खडकवासला जलाशय परिसर ) पुणे
( पुण्यापासून २५ किमी / दीड तास अंतरावर )

गुगल लोकेशन : https://goo.gl/maps/ZjWPvXtcHyUndzym9

दु. २: ३० ते सं ५:३० पर्यंत नामवंत शिल्पकार, चित्रकार यांची प्रात्यक्षिके होणार आहेत.

सर्व रसिकांनी आवर्जून उपस्थित रहावे.

PCSBSR75ZAPURZA

चित्रगुप्त's picture

17 Aug 2023 - 9:09 pm | चित्रगुप्त

"स्मृतिरंग ७५" प्रदर्शन मालिका हा उत्तम उपक्रम आहेच, शिवाय इथे अशी माहितीदेत रहाण्याचा उपक्रमही स्तुत्य. अनेक आभार.

मिपाचे दिग्गज कलाकार श्री चित्रगुप्त ( चित्रकार ) यांच्या कलाकृतीचे प्रदर्शन

सेव्हन आर्टिस्ट फ्रॉम इंदोर

आयोजक : इंदूरचे सप्तर्षि चित्रकार
कालावधी : २० फेब्रुवारी २०२४ (मंगळवार) ते २५ फेब्रुवारी २०२४ (रविवार) असे ६ दिवस
वेळ : दुपारी ४ ते रात्री ८ पर्यन्त
स्थळ : अमदावद नी गुफा, नवरंगपुरा, अहमदाबाद.

आसपास असणर्‍या मिपाकरांनी (कुटुंबीय, मित्रमंडळी यांच्यासह) आवर्जून भेट द्यावी !
श्री चित्रगुप्त यांच्या कलाकृतीचे प्रदर्शन

चित्रगुप्त यांची या आधीची पेंटींग्ज पूढील लिंकवर पाहता येतील:

१) रिसेंट पेंटिंग्ज
२) लँडस्केप्स
३) अ‍ॅब्सट्रॅक्ट / नियर अ‍ॅब्सट्रॅक्ट
४) एन्शियण्ट इंडिया

चित्रगुप्त's picture

20 Feb 2024 - 12:56 pm | चित्रगुप्त

प्रतिसादाबद्दल अनेक आभार. आजपासून प्रदर्शन सुरु आहे. वेळ संध्याकाळी चार ते आठ. या प्रदर्शनाच्या निमित्ताने कलाप्रदर्शनांबद्दल एकंदरित माहिती लिहिण्याचा विचार आहे.