कला - चित्रकला प्रदर्शने
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
आपल्या आजूबाजूस बरेच सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात. त्याची माहिती, समाजमाध्यमे वृत्तपत्रे याद्वारे आपणापर्यंत येत असते. काही कारणांमुळे कधी कधी ही माहिती आपणा पर्यंत पोहोचत नाही, किंवा काही उशिरा पोहोचते, नंतर हळहळ वाटते की आधी कळले असते तर उपस्थित राहून याचा आस्वाद घेऊ शकलो असतो की !
अशीच चर्चा कांजूस सरांच्या या धाग्यावर झाली होती. म्हणून अशा कार्यक्रमांची माहिती मिपा वर पोस्ट करून देण्याचे या धाग्याचे प्रयोजन आहे.
सुरुवात चित्रकला प्रदर्शनाच्या माहितीने करत आहे.
गणेशोत्सव २०२२ निमित्त "माझा बाप्पा" हे कलाकृतींचे प्रदर्शन
आयोजक : संस्कार भारती, पिंपरी चिंचवड
कालावधी : ३० ऑगस्ट २०२२ (मंगळवार) ते ११ सप्टेंबर २०२२ (रविवार) साप्ताहिक सुट्टी - सोमवार
वेळ : सकाळी ११ ते रात्री ८ पर्यन्त
स्थळ : पी. एन. गाडगीळ कलादालन, चाफेकर चौक, चिंचवडगाव
(कलादालन गाडगीळ शोरूमच्या आतल्या बाजूसच आहे, काउंटरवर चौकशी करणे)
प्रदर्शनात सुंदर सुंदर कलाकृती असणार आहेत, तरी रसिकांनी प्रदर्शनाचा जरुर आस्वाद घ्यावा !
या धाग्यावर इतर सांस्कृतिक कार्यक्रम उदा: नृत्य, नाट्य, संगीत, साहित्य, हस्त-शिल्प-चित्र अशा विविध कलांची प्रदर्शने, प्रात्यक्षिके, मैफिली, बैठकी इ संबधी कार्यक्रम यांची माहिती मिपाकरांनी जरूर द्यावी म्हणजे कार्यक्रमांचा आस्वाद घेता येईल.
(मिपाकरांच्या सुचवणी नुसार धाग्याचे योग्य ते नाव बदण्याचा मानस आहे)
या धाग्यावर इतर सांस्कृतिक कार्यक्रम उदा: नृत्य, नाट्य, संगीत, साहित्य, हस्त-शिल्प-चित्र अशा विविध कलांची प्रदर्शने, प्रात्यक्षिके, मैफिली, बैठकी इ संबधी कार्यक्रम यांची माहिती मिपाकरांनी जरूर द्यावी म्हणजे कार्यक्रमांचा आस्वाद घेता येईल.
(मिपाकरांच्या सुचवणी नुसार धाग्याचे योग्य ते नाव बदण्याचा मानस आहे)
प्रतिक्रिया
हार्दिक शुभेच्छा
हार्दिक शुभेच्छा.
चांगली गोष्ट .
मस्त.
धन्यवाद प्रचेतस !
शुभेच्छा.
सर्व प्रतिसादकांचे मनापासुन
गेल्या वर्षभरात आणखी काय काय झाले, आणि आगामी काळातील
कळवण्यास आनंद होत आहे की
'चिन्ह' च्या दुव्याबद्दल अनेक आभार
'चिन्ह' मध्ये बरेच काही
पिंपरी चिंचवड भागातील
पिंपरी चिंचवड भागातील
नव्या वाढत्या शहरांत अगोदरच
पनवेलचं उदाहरण.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत
"स्मृतिरंग ७५" या उपक्रमाचा सांगता समारंभ :
प्रमुख पाहुणे : मा. श्री वासुदेवजी कामत (प्रख्यात चित्रकार आणि राष्ट्रीय अध्यक्ष, संस्कार भारती ) दिनांक : रविवार २० ऑगस्ट २०२३ वेळ : सकाळी ९:३० ते दु. १:३० पर्यंत सन्मान सोहळा, मार्गदर्शन, मनोगत इ. स्थळ : झपुर्झा आर्ट म्युझियम, कुडजे ( एनडीए, पी-कॉक बे च्या पुढे, खडकवासला जलाशय परिसर ) पुणे ( पुण्यापासून २५ किमी / दीड तास अंतरावर ) गुगल लोकेशन : https://goo.gl/maps/ZjWPvXtcHyUndzym9 दु. २: ३० ते सं ५:३० पर्यंत नामवंत शिल्पकार, चित्रकार यांची प्रात्यक्षिके होणार आहेत.सर्व रसिकांनी आवर्जून उपस्थित रहावे.
छान उपक्रम.
श्री चित्रगुप्त यांच्या कलाकृतीचे प्रदर्शन
सेव्हन आर्टिस्ट फ्रॉम इंदोर
आयोजक : इंदूरचे सप्तर्षि चित्रकार कालावधी : २० फेब्रुवारी २०२४ (मंगळवार) ते २५ फेब्रुवारी २०२४ (रविवार) असे ६ दिवस वेळ : दुपारी ४ ते रात्री ८ पर्यन्त स्थळ : अमदावद नी गुफा, नवरंगपुरा, अहमदाबाद. आसपास असणर्या मिपाकरांनी (कुटुंबीय, मित्रमंडळी यांच्यासह) आवर्जून भेट द्यावी !@ चौथ कोनाडा : आजपासून आहे.