तूच नव्याने घडशील काय

ऋषिकेश's picture
ऋषिकेश in जे न देखे रवी...
31 Dec 2007 - 7:28 am

गेल्या वर्षातील नवे तराणे येत्या वर्षी उरतील काय?गेल्या वर्षी निसटून गेले क्षण नव्याने मिळतील काय?गेल्या वर्षातील दिवस जे सार्‍यांसाठी झिजलासस्वत:साठी एक दिवस यावर्षी तरी तू उरशील कायजगण्यासाठी पळता पळता रोज नव्याने मरतोसमरण्याआधी जगण्यासाठी मनमोकळे हसशील कायतिला चोरून बघता बघता रोज मुक्याने वाहतोसतिला बोलते करण्यासाठी तूच मनीचे गाशील कायआरशात हे रोज स्वतःला चोरून तू रे पाहतोसमग गर्दीच्या या डोळ्यांना सांग बरे तू दिसशील काय?नूतन वर्षाचे अभीष्टचिंतन प्रत्येक वर्षी तू गातोसनव्या उद्याची नकोच चिंता, तूच नव्याने घडशील काय-ऋषिकेश दाभोळकरसर्व मिसळप्रेमींना व तुमच्या कुटुंबीयांना हे लीप वर्षामुळे मिळणारे हे मोठ्ठे वर्ष अधिक आनंदाचे, आरोग्यपूर्ण आणि प्रगतीचे जावो हीच सदिच्छा!!

कवितागझलप्रतिभा

प्रतिक्रिया

नंदन's picture

31 Dec 2007 - 8:13 am | नंदन

प्रकटन. शेवटची दोन कडवी विशेष आवडली. नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
http://marathisahitya.blogspot.com/)

विसोबा खेचर's picture

31 Dec 2007 - 11:50 am | विसोबा खेचर

नूतन वर्षाचे अभीष्टचिंतन प्रत्येक वर्षी तू गातोस
नव्या उद्याची नकोच चिंता, तूच नव्याने घडशील काय

ऋषिकेशा, छान लिहिलं आहेस रे!

तात्या.

धनंजय's picture

31 Dec 2007 - 4:42 pm | धनंजय

चांगले संकल्प!

शब्दवेडा's picture

31 Dec 2007 - 5:37 pm | शब्दवेडा

या ओळी खास आवडल्या..

जगण्यासाठी पळता पळता रोज नव्याने मरतोस
मरण्याआधी जगण्यासाठी मनमोकळे हसशील काय

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

31 Dec 2007 - 6:44 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

जगण्यासाठी पळता पळता रोज नव्याने मरतोस
मरण्याआधी जगण्यासाठी मनमोकळे हसशील काय

सही !!!

मुक्तसुनीत's picture

31 Dec 2007 - 8:16 pm | मुक्तसुनीत

मित्रा , तुझ्या कवितेच्या प्रयत्नामधे आमच्यापैकी अनेकांच्या भावना सामावलेल्या आहेत. नववर्षाचे स्वागत करताना असणारी गतकालाबद्दलची हुरहूर, येत्या वर्षाबद्द्लच्या आशा आकांक्षा, काळज्या आणि मुख्य म्हणजे या सार्‍याना सामोरे जाण्याची उमेद या सार्‍याचे सुरेख प्रतिबिंब त्यात पडलेय् !

कवितेचा आस्वाद हा केवळ त्यातील काव्यगुणामुळेच घेता येतो याचा असले काही वाचले की विसर पडतो.

(अर्थात , काही गोष्टी वगळता , उदाहरणार्थ :

तिला चोरून बघता बघता रोज मुक्याने वाहतोस
तिला बोलते करण्यासाठी तूच मनीचे गाशील काय )

जिला पहायचे तिला चोरून पाहण्याची आम्हाला गरज नाही... "मुक्या"ने वाहण्याचा अर्थ काहीसा वेगळा आहे आमच्याकरता ;-)

ह.घ्या. !

इनोबा म्हणे's picture

1 Jan 2008 - 7:20 pm | इनोबा म्हणे

शब्द मनाला भिडले!
नुतन वर्षाच्या तुम्हाला आणी तुमच्या आप्तांना हार्दिक शुभेच्छा!