(थू)

ज्ञानोबाचे पैजार's picture
ज्ञानोबाचे पैजार in जे न देखे रवी...
29 Apr 2022 - 12:13 pm

पेर्णा पाभे सरांची तू
http://misalpav.com/node/50075

थू -१

तू चालते अशी वटवृक्षाचे जणू खोड ग
अंगावरती भले दांडगे ओंडके जणू ल्याले ग

तू हसते अशी छाती माझी धडधडे ग
गडगडाटाने त्या माझ हासणं सारें लोपते ग

तुझ्या नुसत्या हालचालीनेही वारा वादळी वाहतो ग
येता येता तुझ्या घामाचा गंधही संगे आणतो ग

तू बघते तेव्हा अंगावरती शहारा माझ्या येतो ग
बघून तुला मीच कधीकधी थिजल्यासारखा होतो ग

तू स्वत:ला चंचला सुरेखा चतूरा रेखीव सरिता समजते ग
बलाढ्य तुझ्या पुढे नाजूक माझा जीव घाबरुन जातो ग

-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-

थू -२
तू चालतो असा जणू नागोबाची चाल रं
अंगावरती कळकट कपडे डोक्यावरती टक्कल रं

तू हसतो तेव्हा एका नंबरी मुर्खा सारखा दिसतो रं
काळ्या पिवळ्या दाता मध्ये निळी जांभळी जीभ रं

तुझ्या येण्याबरोबर एक दुर्गंधी भपकाराही येतो रं
त्यात सारखा तू जाता येता पाद्प्रोक्षण करतो रं

तू दिसतो तेव्हाच अंगावरती लाट भीतीची येते रं
तुझी उधारी तुला सांगता मीच लाजूनी जातो रं

तू कोडगेश्वर दारुडा अन निर्लज्जशिरोमणी रं
तुझ्या ठाई सारे दुर्गुण ठासून ठासून भरले रं

-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-

थू -३

तू धावते अशी जणू की नरभक्षक ती वाघीण ग
पाहुनी तुझे ते रौद्र रुपडे अंगावर काटा येई ग

तू भुंकते अशी पाठीवरती घामाच्या धारा वाहती ग
गुरागुराटाने तुझ्या कित्येकांची वसने पिवळी होती ग

तुझ्या येण्यानं मुले आपूला खेळ सोडूनी पळती ग
पाळता पाळता तुझ्या नावाने बोंबा जोरात मारती ग

तू बघते तेव्हा अंगावरती भीतीने शहारा येतो ग
बघून तुला लांबूनच मी थिजल्यासारखा होतो ग

तू सतत भूंकरी चावणारी पिसाळलेली कुत्री ग
तुझ्या पेकाटी संधी मिळता लाथ एकदा घालेन गं

-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-

पैजारबुवा,
६१-६२-६३६४

अनर्थशास्त्रकाणकोणकॉकटेल रेसिपीकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडप्रेमकाव्यइंदुरीकालवणऔषधोपचारकृष्णमुर्ती

प्रतिक्रिया

कॉमी's picture

29 Apr 2022 - 12:41 pm | कॉमी

&#129315
जबरदस्त, खूप हसलो!

माहितगार's picture

29 Apr 2022 - 3:41 pm | माहितगार

शीर्षकात 'थू' असल्याने आवर्जून उघडली नंतर थू च्या जागी कदाचित तू अभिप्रेत आहे असा संशय आल्यानंतर जरा सावधगिरीनेच वाचली :) या निमीत्ताने कोण होतास तू कोण होतीस तू ची आठवण झाली,

प्राची अश्विनी's picture

29 Apr 2022 - 5:36 pm | प्राची अश्विनी

;);)

अत्रुप्त आत्मा's picture

29 Apr 2022 - 5:53 pm | अत्रुप्त आत्मा

=)))))

श्रीगुरुजी's picture

29 Apr 2022 - 6:43 pm | श्रीगुरुजी

भारी! मस्त विडंबने!

Bhakti's picture

29 Apr 2022 - 6:57 pm | Bhakti

लयी डेंजर =))

पाषाणभेद's picture

29 Apr 2022 - 11:55 pm | पाषाणभेद

व्वा! एकावर तिन तिन मजले चढवले की तुम्ही!
पहिले व तिसरे थू मात्र एकदम भावले!

रंगीला रतन's picture

30 Apr 2022 - 1:27 am | रंगीला रतन

थू....थू....थू....
एका कवितेची तीन विडंबने? पहिली नाय पण फूडच्या दोन आवडल्या :)

प्रचेतस's picture

30 Apr 2022 - 6:11 am | प्रचेतस

कहर =))

तुषार काळभोर's picture

4 May 2022 - 8:30 am | तुषार काळभोर

इन मीन अडीच तासात ट्रिप्पल धमाके!
अफाट प्रतिभा!