कोण कोम???

सुनील मोहन's picture
सुनील मोहन in जनातलं, मनातलं
3 Dec 2008 - 4:40 pm

चार वेळा महिला मुष्टीयुद्ध विश्वविजेती एम्.सी. मेरी कोम यांच्याबद्दल असे उद्गार काढलेत अर्जुन आणि राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष मिल्खा सिंग यांनी. भारतीय मुष्टियोद्धा संघटनेने मेरी कोम यांची राजीव गांधी खेल रत्न पुरस्कारासाठी शिफारस केली होती. फ्लाईंग सिख या नावाने प्रसिद्ध असलेल्या मिल्खासिंग यांनी ही महिला कोणता खेळ खेळते हेच माहिती नाही असे म्हटले.

मणिपूरच्या मेरी कोमने सलग चारवेळा महिला विश्वविजेती होण्याचा सन्मान मिळविला आहे. मुष्टीयुद्धाची तयारी करण्यासाठी वेळ मिळावा म्हणून जुळ्या मुलांची जबाबदारी माझा पती घेतो हे ती आवर्जून सांगते.

मेरी असेही म्हणते की "आमच्या खेळाच्या महासंघाने माझ्या नावाची पुरस्कारासाठी शिफारस केली होती; मात्र मिल्खा यांनी मी कोणता खेळ खेळते, हे ठाऊक नसल्याचे सांगितल्यामुळे मला फार यातना झाल्या. आज मला त्यांना एक सवाल करायचा आहे. पुरस्कारास लायक असल्याचे पटावे म्हणून त्यांच्यासाठी आणि देशासाठी आणखी किती वेळा मी विश्‍वविजेतेपद मिळविण्याची गरज आहे? मी पात्र नसल्याचे वाटत असेल तर पुरस्कार देऊ नका, पण अशी विधाने करून किमान माझा अपमान तरी करू नका. "

हे वाचल्यानंतर मलाही वाटायला लागलंय की खेळप्रेमी म्हणवणारे माझ्यासारखे अनेक लोक असतील ज्यांना मेरीने इतके उत्तुंग यश मिळविले आहे हे माहितीच नाहीय.

मेरी कोम आपले हार्दिक अभिनंदन!!!!

(क्रिकेट म्हणजेच सर्व काही असे आजपासून न मानणारा) सुनील मोहन.

क्रीडाराजकारणप्रकटनविचार

प्रतिक्रिया

ऋषिकेश's picture

3 Dec 2008 - 6:05 pm | ऋषिकेश

मेरी कोम आपले हार्दिक अभिनंदन!!!!

माझ्या तर्फेही हार्दिक अभिनंदन
आणि मिल्खासिंग यांचा या वक्तव्याबद्दल निषेध..

-(गोंधळलेला) ऋषिकेश

कपिल काळे's picture

3 Dec 2008 - 7:28 pm | कपिल काळे

फक्त क्रिकेट क्रिकेट करणारया देशात बाकीच्या खेळांना प्रोत्साहन मिळत नाही. हेच खरे.
ती चारवेळा विश्वविजेती आहे हे कुणालाच माहित नव्हते. २० ओवरचा एक अंतिम सामना जिंकून धोणी मात्र हिरो आहे.