प्रेम म्हणजे जणू क्रिकेटचा खेळ
आपली संयमी फलंदाजी
तिचे धारधार तेजतर्रार मादक यॉर्कर
गोलंदाजी नीट समजण्यास द्यावा लागणार वेळ
सर्व मुलींना समजत होतो पाटा खेळपट्टी
सुमार वाटल्या म्हणुनी चालू होती हातभट्टी
त्यातल्या त्यात बरी म्हणावी , शेजारी एक होती
कळलं असतं घरी तिच्या तर झाली असती माती
देउनी तिजला तिलांजली मी बनलो पुन्हा सेहवाग
तय्यार झालो बॅट परजुनी, ज्वानीची शोधण्या आग
ओढ लागली भेटीची , झालो दुखी कष्टी
एक अनामिक यॉर्कर आला आणि उडवली मधली यष्टी
भानावरती येऊनि तिजला डोळेभरून पाहिले
हीच ती शोएब अख्तर जिच्या शोधास मन आसुसले
काय तिची ती अदा वर्णावी, बॉल टाकते गदागदा
सेहवागला मी खिशात घालून द्रविड बनलो साधा
पट्टीवरची हिरवळ पाहून अंदाज आला मला
म्यान करुनि आक्रमक बाणा , संयमाने खेळा
कसेबसे मी चेंडू तटवले, धाव घेतली पहिली
जळजळीत ते नेत्र भेदूनि मैत्री तिच्याशी केली
शतक होईस्तोवर पडणार होती बॅटीला माझ्या भोके
मैत्री होताक्षणी वाढले काळजाचे ठोके
सराव नव्हता मला कदाचित म्हणून अडखळत होतो
चेंडू पुढे सरसावून मारण्या लागणार होते डोके
असाच रंगत गेला सामना , काहीच होत नव्हते
दोघेही कसलेले खेळाडू एकमेका भिडत होते
कसली हिरवळ अन कसली पाटा
खेळ असतो तोच
भोकबळींची संख्या वाढते
बाकी फरक नाही , शाटा
===========================
सिद्धेश्वर विलास पाटणकर
प्रतिक्रिया
6 Jun 2021 - 9:20 pm | तुषार काळभोर
आदरणीय सुनील गावसकर यांनी मागच्या वर्षी समालोचन करताना बोलण्याच्या ओघात केलेल्या वक्तव्याची आठवण झाली.
7 Jun 2021 - 10:39 am | गॉडजिला
आमने सांमने खेळलेले दिसतात..!
फलंदाजी करता करता मधेच आली गुगली
तिच्याच भावानं विकेट घेतली केली कोणी चुगली
मग आला नैराश्याच्या पाऊस थांबवला गेला सामना
तरीही फलंदाजी करत राहिलो होऊन गेला जमाना
7 Jun 2021 - 11:25 am | गॉडजिला
म्हणून म्हणतो गल्ली क्रिकेटच बरे नसतो होमपिचचा धोका
उभे आडवे कसेही हाणा हसत शतक ठोका
तिथे सामना हरला जिंकला फार फरक पडत नाही
खेळ संपवून कामा लागा प्रत्येकालाच घाई
विविध रंगी विविध ढंगी
पण बॉलर असतात भारी
असेल व्यवस्थित सुरक्षाकवच चढवलेले
तर भीती कसलीच नाही
इथेच शोएब इथेच कुंबळे इथेच कपिल देव
इथेच अनुभव सर्वांगीण वर परफॉर्मन्स करावा सेव