मी बिचारा एक म्हातारा

खिलजि's picture
खिलजि in जे न देखे रवी...
3 Jun 2021 - 6:41 pm

मी बिचारा एक म्हातारा

ती गेली देवाघरी

आज बैसलों हसत एकटा

या हास्यकट्ट्यावरी

माती सरत चालली होती

तरी जीव थकला नव्हता

आजही थरथरत्या हातांना

ओला स्पर्श हवा होता

रोज यायची नटून थटुनी

दिसायलाही होती बरी

म्हाताऱ्याला हात पुरे तो

कशाला हवी आता परी

मी देखील नित्यनेमाने

दात काढुनी हसायचो

तिला हसताना बघून मात्र

गुलाबी स्वप्नं बघायचो

कधी कुलू तर कधी मनाली

बेत ठरायचे मनात

हसता हसता तिच्या कवळ्या पडल्या

सर्व बेत गेले मसनात

==========================

सिद्धेश्वर विलास पाटणकर

इतिहाससमाजजीवनमान