देव म्हणजे हवा, नाही अगरबत्तीचा सुगंध
तो अन्नात आहे, उपवासात नाही.
देव दानशूर मोठा, लाचार नाही
न्यायी आहे देव, नवसाचा व्यापारी नाही.
देव आहे सदाचारात, अन्यायाचा शत्रू
देव मुहूर्त नाही, अनंत काळ आहे.
देवही भक्त आहे, भावाचा भुकेला
देव नाही खजिनदार-पुजारी.
देव देवळात नाही फक्त, आहे सगळीकडे
देव दाढीत नाही, शेंडीतही नाही.
जीवन देव आहे, मृत्यूही तोच
प्रचारात देव नाही, तो प्रकांड आहे.
देव म्हणजे गंभीर गोष्ट
माणूस त्याची गंमत करतो.
गुलाबजाम जणू पाकातला
हलवायाची व्याख्या करतो.
देव म्हणजे साधा माणूस
जरा अधिक जरा उणा.
देव म्हणजे तुम्ही-मी
आपल्या आईच्या नजरेतले.
प्रतिक्रिया
14 May 2021 - 5:17 pm | कॉमी
देव मदतीत, देव आहे परदुःखविनाषात
देव नाही फुटीत, देव नाही द्वेषात
देव आहे की नाही नक्की माहीत नाही,
पण असला तर नक्की कॉमी आहे.
ज्योक आहे बरका कॉमी निर्दालकहो. उगाच ईनोदाचा प्रतिवाद नका करत बसू. ;)
कविता आवडली अनुस्वार यांची.
16 May 2021 - 8:39 pm | गॉडजिला
राम हृदय में हैं मेरे, राम ही धड़कन में हैं
राम मेरी आत्मा में, राम ही जीवन में हैं
राम हर पल में हैं मेरे, राम हैं हर श्वास में
राम हर आशा में मेरी, राम ही हर आस में
राम ही तो करुणा में हैं, शान्ति में राम हैं
राम ही हैं एकता में, प्रगती में राम हैं
राम बस भक्तों नहीं, शत्रु की भी चिंतन में हैं
देख तज के पाप रावण, राम तेरे मन में हैं
राम तेरे मन में हैं, राम मेरे मन में हैं
राम तो घर घर में हैं, राम हर आँगन में हैं
मन से रावण जो निकाले, राम उसके मन में हैं
16 May 2021 - 9:14 pm | कॉमी
मी लिहिलेल्या टुकार ओळींचा सुद्धा दोन प्रकारे अर्थ लावता येतो ! भारीये.
15 May 2021 - 9:25 pm | अनुस्वार
आपण सारे विश्वाचे किंवा विश्व-निर्मात्याचे सूक्ष्मरूप आहोत. त्यामुळे तुम्हालाही प्रणाम.
15 May 2021 - 9:46 pm | कॉमी
कॉमी म्हणजे "मी देव आहे" असे म्हणणे नव्हते.
15 May 2021 - 10:43 pm | अनुस्वार
'कॉमी'चा अर्थ आपली वैयक्तिक माहिती पाहून कळला. देव 'कॉमी' ही असेल नक्की.