लवंगलता एक प्रयत्न

चेतन's picture
चेतन in जे न देखे रवी...
26 Nov 2008 - 12:44 pm

गुरुवर्य धोंडोपंतांच्या लवंगलता छंदातिल रचना वाचुन खरच येड लागले.

म्हणलं आपण पण एक प्रयत्न करावा (ग्रुहपाठ #:S अनुष्टभ फारच जड आहे)

माझा हा एक प्रयत्न जाणकारांनी चुका किंवा बदल जरुर सुचवावेत.

दर्शनाने गणेशाच्या,
मन होई शांत |
राहो तुझी क्रुपाद्रुष्टी,
अनादि अनंत ||

प्रसन्न ही तुझी मुद्रा,
मन आनंदते |
पाणिदार डोळ्यांमध्ये,
भान हरपते ||

आगमन होता तुझे,
घरी सणवार |
ढोलताशे गजरात,
चैतन्य अपार ||

लाल फुले जास्वंदीची,
माथ्यावर दुर्वा |
विघ्नहर्ता गणेशा तू,
बुध्दी देइ सर्वा ||

आरती तुझी गाईन,
पूर्ण मनोभावे |
सुख येथेही नांदते,
तुझ्या क्रुपाभावे ||

फुल, केवडा अर्पुन,
भजावे वरद |
मोदक व करंजीचा
नारळी प्रसाद ||

टाळ म्रुदुंग भजने,
रात्र जागवती |
निराळेच रुप तुझे
कर जोडवती ||

निरोप तुला देताना,
पाणवती डोळे |
भेट नाही लवकर,
मन कळवळे ||

चैतन्याचा तुच स्त्रोत,
देव गणाधिष |
सुखकर्ता, दु:खहर्ता
ओंकार गणेश ||

(गणेशभक्त) नवशिका चेतन

अवांतर : मिपावर आता छंदशास्त्र नावाचा नवीन साहित्य प्रकार सुरू करण्यात आलेला आहे. कृपया यापुढे छंदबध्द काव्य तेथे प्रकाशीत करावे.
हा पर्याय मला तरी अजुनही कुठेही दिसत नाही आहे

संस्कृतीकवितासद्भावना