महत्वाची सूचना :
लेखिका स्वतः वकील नाही आणि त्यामुळे खालील लेख निव्वळ मनोरंजनात्मक माहिती म्हणून वाचावा. ह्या लेखांत कायदेशीर सल्ला देण्याचा प्रयत्न केला गेलेला नाही. तुम्ही अश्या प्रकारच्या एखाद्या परिस्थितींत असाल तर तुम्ही एखाद्या योग्य वकिलाचा कायदेशीर सल्ला घ्यावा.
इंग्रजी भाषेंतून एक छान लेख खऱ्या वकिलांनी लिहिला आहे तो तुम्ही वाचू शकता : https://www.esamskriti.com/e/National-Affairs/Ideas-ad-Policy/What-Every...
गाडी कोणती घ्यावी ह्यावर लोक हजार सल्ले देतील. स्वदेशी म्हणून टाटा घ्यावी इथपासून, सायकल चालवणे केंव्हाही उत्तम अश्या प्रकारचे सल्ले ऐकायला मिळतील पण शेवटी पैसे तुमचे, गाडी पार्किंग जागा तुमची, पेट्रोल तुमच्या पैश्यांचे आणि सर्व्हिसिंग चे पैसे सुद्धा तुमचेच असल्याने गाडी नेहमी आपल्याला पाहिजे तीच घ्यावी. त्याच वेळी इतरांचे अनुभव, खरी किंमत, इत्यादी गोष्टी समजून घेण्याची जबाबदारी सुद्धा तुमचीच आहे.
विवाह हे प्रकरण सुद्धा असेच आहे, राजकीयमी धार्मिक किंवा जातीय दृष्टिकोनातून लोक सल्ले देत असतील तरी, जीवन तुमचे असल्याने निर्णय घेण्याचा १००% अधिकार सुद्धा तुमचाच आहे. हा अधिकार नैसर्गिक अधिकार असून कायदा काय किंवा समाज काय कोणीही तुम्हाला इथे जबरदस्ती करू शकत नाही. पण एकदा विवाह केला कि समाज आणि कायद्याचे नियम तुम्हाला लागू होतात त्यामुळे हे सर्व समजून घेऊनच आपला निर्णय घ्यावा. अंडी शाकाहारी आहेत कि मांसाहारी हा विचार आम्लेट करण्याच्या आधी करावा लागतो, नंतर नाही.
हा लेख स्त्रियांसाठी आहे. पुरुषांनी वाचले तरी चालेल. वाचणे सोपे व्हावे ह्यासाठी प्रश्नोत्तराच्या स्वरूपांत इथे मांडले आहे.
अनुष्का आधुनिक स्त्री आहे. इंजिनीअरिंग आणि MBA करून पुणे इथे मोठ्या कंपनीत चांगल्या कामाला आहे. ब्राह्मण हिंदू परिवारांत वाढलेली असली तरी पुढारलेल्या विचारांची युवती आहे. आई वडील लग्नासाठी मागे लागले आहेत पण अनुष्काला आपल्या कंपनीतील झाएद पसंद आहे. घराच्या लोकांच्या विरोधांत जाऊन झाएद शी लग्न करायची तिची तयारी आहे. झाएद च्या अम्मी अब्बूना सुद्धा अनुष्का पसंद असून ते सुद्धा पुढारलेल्या विचारांचे आहेत. अम्मी बुरखा वगैरे घालत असली तरी अनुष्काला आपला धर्म पालन करण्याची त्यांची संपूर्ण मुभा आहे. फक्त नातेवाईकांच्या समाधानासाठी लग्न निकाह पद्धतीने करावे असे त्यांचे मत आहे.
अनुष्का बुद्धिवान आहे त्यामुळे काहीही निर्णय घाईत घेण्याच्या आधी तिने ऍडव्होकेट पेन्सिलवाला ह्यांच्याशी कायदेशीर सल्ला मसलत करण्याचा निर्णय घेतला. पेन्सिलवाला हे पारसी असून धार्मिक किंवा जातीय पूर्वग्रह नसताना योग्य तो कायदेशीर सल्ला देतील असे तिला वाटले.
अनुष्का : वकील साहेब , झाएद शी मला लग्न करायचे आहे. पण ह्याला घरच्यांचा विरोध आहे. लग्न झाल्यानंतर झाएद चा मुस्लिम परिवार मला योग्य पद्धतीने वागवणार नाही, असे त्यांचे म्हणणे आहे तसेच भारतातील लग्नविषयक कायदा मुस्लिम लोकांच्या महिलांसाठी चांगला नाही असे माझे वडील म्हणाले. मला सत्य जाणून घ्यायचे आहे. तुम्ही मला सांगा कि झाएद शी लग्न करण्यासाठी कायद्याच्या दृष्टीने काही अडचण आहे का ?
पेन्सिलवाला :
तू हिंदू आहेस आणि झाएद मुस्लिम. अश्या सिच्युएशन मध्ये तुम्ही तीन प्रकारे लग्न करू शकता. (गोवा सोडून इतर कुठेही भारतांत).
१. SMA (स्पेशल मॅरेज ऍक्ट) द्वारे जिथे तुला आणि झाएदला सामान अधिकार असतील. SMA द्वारे लग्न करण्यासाठी तुम्हाला एक वकील घेऊन आपले लग्न रजिस्टर करावे लागेल. त्यानंतर तुम्ही कायदेशीर दृष्टीने पती पत्नी बनाल. त्याशिवाय तुम्ही औपचारिक स्वरूपांत काहीही लग्नसमारंभ केला तरी फरक पडत नाही. कायदेशीर दृष्ट्या तू हिंदू आणि झाएद मुस्लिम म्हणून आपले जीवन व्यतीत करू शकाल.
२. तू इस्लाम कबुल केलास तर तू मुस्लिम खाजगी कायद्या नुसार निकाह करू शकतेस. इथे तुला आपला धर्म बदल करावा लागेल, आपले नाव बदलावे लागेल आणि तुमच्या लग्नाला भविष्यांत इस्लामिक कायदा लागू होईल.
३. झाएद हिंदू धर्म कबुल करू शकतो आणि तुम्ही दोघे हिंदू विवाह कायद्याप्रमाणे लग्न करू शकता. भविष्यांत तुमच्या लग्नाला हिंदू विवाह कायदा लागू होईल.
अनुष्का : समजा मी ह्यातील एक पर्याय निवडला पण भविष्यांत मला दुसरा कायद्याप्रमाणे चालायचे असेल तर तसे चालेल का ?
नाही. विवाह ज्या कायद्याप्रमाणे झाला आहे त्याच कायद्याप्रमाणे भविष्यांत तुला न्याय मिळेल. लक्षांत घे कि कायदा आणि लग्न ह्यांचा संबंध खालील गोष्टीं येतो.
- लग्न करून संबंधांना सरकार आणि समाजाची मान्यता मिळवणे.
- मुले जन्माला घालून मुलांवर आपला हक्क सिद्ध करणे.
- दुर्दैवाने कुणाचा मृत्यू झाला तर कायद्याप्रमाणे इन्शुरन्स, वारसा हक्क इत्यादी मिळवणे.
- दुर्दैवाने लग्न टिकले नाही तर कायद्याने घटस्फोट मिळवणे तसेच त्यातून आपले आर्थिक, वैयक्तिक आणि मुलांवरचे हक्क सुरक्षित करणे.
नवीन लग्न करणारे कुठलेही जोडपे आपल्या जोडीदाराचा मृत्यू किंवा घटस्फोट ह्या विषयांवर विचार करू इच्छित नाही. पण स्वानुभवाने सांगतो कि "a stich in time saves nine". निर्णय १००% तुझा असला तरी वकील म्हणून सांगणे माझे कर्तव्य आहे कि सर्व गोष्टींचा विचार करून तू निर्णय घे.
अनुष्का: मला ह्यावर खरेतर विचार करावासा वाटत नाही पण तुम्ही म्हटल्याप्रमाणे भावना बाजूला ठेवून विचारते. समजा मला घटस्फोट घ्यावासा वाटला तर निकाह, हिंदू विवाह आणि SMA ह्यांत काय फरक आहे.
पेन्सिलवाला :
हिंदू विवाह आणि SMA कायदे वेगळे असले तरी घटस्फोटाच्या दृष्टिकोनातून खुपश्या प्रमाणात समान आहेत. विवाह विस्च्छेद करण्यासाठी तुम्हा दोघांना आपआपला वकील निवडून फॅमिली कोर्टांत जावे लागेल.
तिथे कायद्याप्रमाणे न्यायाधीश मुलांचा मालकीहक्क, वारसा हक्क, आर्थिक मोबदला (पोटगी) इत्यादी गोष्टी कायद्याप्रमाणे आणि बहुतेक वेळा पतीच्या आर्थिक स्थितीला पाहून ठरवतील.
३० वर्षांच्या माझ्या अनुभवावरून इथे कायदा आणि न्यायाधीश महिलेला जास्त सहानुभूती दाखवतात.
निकाह पद्धती फार वेगळी आहे. निकाह करताना निकाहनामा ठरवला जातो आणि मौलवी तो वाचतात. हा एक प्रकारचा करार असतो. तुमचा घटस्फोट, मालकी हक्क इत्यादी गोष्टी ह्या करारनामा प्रमाणे असतात.
निव्वळ तात्विक दृष्टिकोनातून झाएद आणि तू आधी करारनामातील विविध कलमे ठरवू शकतात पण नाव दाम्पत्य एका खोलीत बसून एकमेकांच्या मृत्यूनंतर फ्लॅट कुणाचा होईल अश्या प्रकारच्या गोष्टी बोलतील ह्याची शक्यता कमीच आहे.
त्यामुळे करारनामा हा बहुतेक वेळा मौलवी लोक ठरवतात आणि तिथे समाजाच्या दबावाने सर्वाना तो मान्य करावा लागतो.
अनुष्का : म्हणजे SMA मध्ये माझे आणि पतीचे हक्क हे सर्वज्ञात कायद्याप्रमाणे आहेत तर निकाह पद्धतीत हे मौलवींच्या निकाहनामा प्रमाणे ठरतील ?
पेन्सिलवाला : हो, विशेषतः पोटगी, घटस्फोट ह्याविषयांत निकाहनामा महत्वाचा आहे पण त्याशिवाय निकाह हा शरिया पद्धतीने होत असल्याने शरिया कायद्यातील हक्क सुद्धा तुम्हा दोघांना लागू होतात.
अनुष्का : शरिया पद्धतीत माझे आणि माझ्या पतीचे हक्क काय ?
पेन्सिलवाला : शरिया म्हणजे इस्लामिक कायदा. शरिया ची कलमे प्रत्येक इस्लामिक समुदायांत वेगळी असतात आणि विविध फतव्यांवर आधारित असतात. पण सर्वांत महत्वाचे मुद्दे इथे सांगतो. बहुतेक आंतरधर्मीय विवाहांत हेच महत्वाचे आहेत.
- झाएद ला तुझ्या व्यतिरिक्त आणखीन ३ पत्नी करण्याचा अधिकार आहे. झाएद ने आणखीन निकाह केले तर त्याला विरोध करण्याचा अधिकार तुला नाही. अर्थांत तुझा झाएद असे करणार नाही असे तुला वाटेल पण काही वेळा पुरुष ह्या अधिकाराचा वापर करतात. कधी कधी समाजाच्या दबावाखाली सुद्धा पुरुषांना आणखीन लग्नें करावी लागतात उदाहरण म्हणजे समजा नातलगांतील एखादी युवती भरकटली किंवा अकाली विधवा झाली तर काही पुरुष तिला दुसरी पत्नी म्हणून आधार देतात. असे झाले तर तुला त्याचा विरोध करण्याचा कायदेशीर अधिकार नाही.
- The Dissolution of Muslim Marriages Act, 1939 प्रमाणे तुला घटस्फोट मागण्याचा अधिकार आहे. त्यासाठी नक्की कोणती कारणे तू देऊ शकशील हे तू तिथे वाचू शकते. पण त्याच वेळी पुरुष मात्र तुला तलाक अगदी सहज पणे देऊ शकतो. आजकाल तात्काळ तलाक सरकारने बे कायदेशीर ठरवला आहे तरी सुद्धा पुरुष तलाक सहज पणे देऊ शकतो. एकदा पुरुषाने तलाक दिला कि तो ९० दिवसांत किंवा पत्नीच्या तीन मासिक पाळी नंतर लागू होतो. ह्या दरम्यान पुरुष आपले मन बदलू शकतो. त्याशिवाय पत्नी गरोदर असली तर मूल जन्मे पर्यंत तलाक लागू होत नाही.
- एकदा तलाक लागू झाला कि कायदेशीर पद्धतीने विवाह विच्छेद झाला असे आपण समजू शकतो आणि पत्नी दुसरा विवाह करण्यास मोकळी होते. पण समजा तलाक नंतर दोघा पती पत्नींना पुन्हा एकत्र यावे असे वाटले तर मात्र पद्धत थोडी विचित्र आहे. इस्लामिक कायद्याप्रमाणे पत्नीने आणखीन कुणाबरोबर निकाह करून शरीर संबंध ठेवल्याशिवाय पुन्हा जुन्या पतीबरोबर ती निकाह करू शकत नाही. त्यामुळे इथे पत्नीला तात्पुरते का होईना पण कुणा इतर पुरुषाबरोबर निकाह करून शरीर संबंध करावा लागेल.
अनुष्का : आणि वारसा हक्क ?
पेन्सिलवाला : तुम्हाला मुले असतील तर तुला तुझ्या संपत्तीतील १/८ वा भाग मिळेल. मुले नसतील तर १/४ भाग. त्याशिवाय मुलीला मुलाच्या अर्धा भागच मिळतो. पण हे सर्व होण्यासाठी आधी धर्मांतरण करून नंतर निकाह करणे आवश्यक आहे. आधी निकाह आणि नंतर धर्मांतरं केले किंवा धर्मांतरण न करता निकाह केला तर कायद्याने ह्या निकाह ला इस्लामिक निकाह मानला जात नाही.
अनुष्का : तर मग हिंदू किंवा SMA प्रमाणे वारसा हक्क कसा असतो ?
पेन्सिलवाला: हिंदू कायद्याप्रमाणे झाएद जर हिंदू झाला तर तुम्हाला हिंदू वारसाहक्क मिळेल. त्याच्या अंतर्गत पत्नीला पतीच्या सर्व संपत्तीत समान वाटा मिळतो त्याशिवाक एकत्र कुटुंब पद्धतीत घराचा सुद्धा भाग मिळतो. पण इथे झाएदला हिंदू बनावे लागेल.
SMA अंतर्गत लग्न केले तर तुम्हाला धर्मांतरं करायची गरज नाही पण वारसा हक्काच्या दृष्टीने झाएद इथे मुस्लिम ठरत नाही आणि पत्नीला पतीच्या समान अधिकार मिळतो. पतीचा मृत्यू झाला तर पत्नी क्लास १ वारसदार ठरते.
अनुष्का : तर मग वकील साहेब, मी तुमची अशील आहे तर त्या नात्याने मी तुमचा सल्ला विचारला तर तुमचा सल्ला काय असेल ?
पेन्सिलवाला: अनुष्का, निर्णय घेताना ट्रेड ऑफ असर्वांत महत्वाचे. तुझ्यासारख्या आधुनिक स्त्रीने आपले निर्णय नेहमी स्वतःच घ्यावेत आणि जेंव्हा चांगले निर्णय घेतील आणि त्यांचे जीवन सुखाचे होईल तेंव्हा आपोआप पुढील पिढीला सुद्धा योग्य precedent मिळेल. मी तुला ट्रेड ऑफ सांगू शकतो पण निर्णय हा तुझाच असायला पाहिजे. हा प्रश्न तुझ्या संपूर्ण आयुष्याचा असल्याने इथे तू झाएद, तुझे आई वडील, मित्र इत्यादींशी सुद्धा विचार विनिमय केला तर हरकत नाही.
ट्रेड ऑफ खालील प्रकारे आहेत.
- समजा तू जो काही निर्णय घेशील त्याला झाएद संमती देईल असे आपण गृहीत धरले तर हिंदू पद्धतीने लग्न हे तुझ्या दृष्टीने सर्वांत जास्त फायद्याचे आहे. ह्याच्या अंतर्गत झाएद ला हिंदू धर्म पत्करावा लागेल. हे जणू काही दुसऱ्या हिंदू मुलाबरोबर विवाह करण्यासारखेच आहे. इथे SMA पेक्षा जास्त मोठा फायदा म्हणजे देशांतील बहुतेक लागणे हिंदू आहेत आणि घटस्फोट इत्यादी सुद्धा हिंदू आहेत त्यामुळे ह्या विषयांवर प्रचंड precedent उपलब्ध आहे त्यामुळे इथे कायदेशीर सल्ला घेणे किंवा कोर्टानं जाऊन युक्तिवाद करणे सोपे जाते. त्याशिवाय पोटगी, मुलांचे हक्क इत्यादी विषयावर जास्त कॅलॅरिटी आहे.
- समजा झाएदला त्याचा धर्म जास्त पसंद आहे पण तू आपला धर्म पालन करण्यास त्याला काहीही आपत्ती नसेल तर इथे SMA सर्वांत जास्त चांगला उपाय ठरतो.
- पण झाएद ने निकाहच करायचा ठरवला आणि तुला ते मान्य असेल तर तू आधी धर्मांतर करून नंतर निकाह करावा असा माझा कायदेशीर सल्ला असेल. इथे तुझे कायदेशीर हक्क खूप कमी असतील पण तुला झाएद बरोबर विवाह करायला मिळेल.
अनुष्काने इथे काय केले ?
अनुष्का आधुनिक विचारांची मुलगी असल्याने तिने इथे भावना बाजूला ठेवल्या आणि आणखीन एका वकिलाचा सल्ला घेतला. त्यानंतर ती एका मॅरेज सल्लागाराला भेटली. तिथे सुद्धा तिने सर्व बाजूंचा विचार केला आणि निर्णय घेतला कि ती धर्मपरिवर्तन करणार नाही. लग्न केले तर ती समान हक्कांवरच करेल. त्यामुळे ती जर एका नवीन धर्माशी अड्जस्ट होत असेल तर झाएद आणि त्याचा आधुनिक विचारांचा परिवार सुद्धा अड्जस्ट होईल ह्यांत तिला शंका नव्हती.
सल्लागार मंडळींनी अनुष्काची भेट अनेक अश्या व्यक्ती बरोबर घडवून आणली ज्यांनी विविध पद्धतीने आंतरधर्मीय विवाह केला होता. अमेरिकेतील श्री दिलीप अमीन http://interfaithshaadi.org/ हे संकेतस्थळ चालवतात आणि ह्या महत्वाच्या विषयावर सल्ले सुद्धा देतात. अनुष्काने तिथे सुद्धा अनेक लोकांचे अनुभव वाचले.
झाएद बरोबर तिने ह्या सर्व बाबी डिस्कस करून निर्णय घेतला. वाचक तिने नक्की काय निर्णय घेतला ह्याबद्दल उत्सुक असतील. पण निर्णय तिचा असल्याने ती घेईल आम्हाला उगाच चिंता करण्याची गरज नाही. तुम्ही स्त्री असाल आणि अश्या परिस्थितीत असाल तर तुम्ही कोणता निर्णय घ्याल हे महत्वाचे आहे. आम्ही इतर लोकांचे निर्णय घेऊ शकत नाही. पण आम्ही माहिती जास्तीत जास्त लोकांकडे पोचवू शकतो. आमच्या लहान मुलींना योग्य ते संस्कार आणि माहिती देऊन स्वतःचे भले करण्याचे निर्णय घेण्याची क्षमता देऊ शकतो.
प्रतिक्रिया
27 Oct 2020 - 2:10 am | वीणा३
अतिशय माहितीपुर्ण लेख, बुकमार्क केलाय.
27 Oct 2020 - 8:58 am | शा वि कु
उत्तम लेख.
27 Oct 2020 - 3:42 am | अर्धवटराव
या वाक्याचा रोख काय?
27 Oct 2020 - 5:25 am | साहना
इथे कसलाही रोख, छुपा मुद्दा वगैरे काही नाही. इथे काही रोख वगैरे असण्यापेक्षा रायगडावर कुठेतरी गनीम लपून असण्याची शक्यता जास्त आहे !
27 Oct 2020 - 8:26 am | अर्धवटराव
हे आवडलं
27 Oct 2020 - 4:50 am | सोत्रि
महत्वाचा आणि माहितीपूर्ण लेख!
- (समानतावादी) सोकाजी
27 Oct 2020 - 6:57 am | Gk
छान
27 Oct 2020 - 8:38 am | Gk
असाच लेख हिंदू विवाह कायदा आणि पुरुष ह्यावर लिहिता येईल
27 Oct 2020 - 8:45 am | आनन्दा
तुमच्या लेखाच्या प्रतीक्षेत.
हिंदू विवाह कायद्यात कोणकोणत्या ततुटी आहेत ते पण वाचायला आवडेल आम्हाला
हाकानाका
27 Oct 2020 - 8:44 am | आनन्दा
आज सकाळचं मिपा उघडल्याचे सार्थक झाले!!
27 Oct 2020 - 9:28 am | बाप्पू
छान लेख.
कोणतेही दडपण किंवा फुरोगामी पणा डोक्यात न ठेवता फॅक्टस वर फोकस होऊन लिहिलेला लेख. ज्यामुळे कुठेही ऑब्जेक्शन घेण्याचा प्रश्न नाही.
इथे वर काही लोकांनी डिमांड केल्या प्रमाणे हिंदू मॅरेज बद्दल अशीच माहिती दिली तर बरे होईल. काही जनांचे डोळे उघडतील आणि फोरूगामी पणाचे ढोंग देखील गळून पडेल ( पण त्यानंतरही ते आपला फेक्युलर पणा बदलणार नाहीत हे वे सां न ला )
27 Oct 2020 - 12:46 pm | उपयोजक
सुंदर माहितीपूर्ण लेख!
27 Oct 2020 - 2:58 pm | कंजूस
पुढे काय?
ट्रेड ओफ म्हणजे पुढील शक्यता का?
27 Oct 2020 - 11:35 pm | साहना
ट्रेड ऑफ म्हणजे पर्याया मधील विरोधाभास (नक्की मराठी शब्द ठाऊक नाही). उदाहरणार्थ तुम्हाला चविष्ट मसालेदार खायचे असेल तर ते कदाचित आरोग्यदायी असणार नाही आणि आरोग्यदायी पोषक आहार हवा असेल तर तो मचमचीत असणार नाही. इथे आरोग्य आणि चव हा `ट्रेड ऑफ` आहे.
27 Oct 2020 - 3:44 pm | भीमराव
अनुष्का आणि झायेद यांचा निकाह बिना इस्लाम कबूल करता झाला तर तो दोघांच्या जीवाशी खेळ ठरेल. इस्लाम च्या पायाभूत पुस्तकाच्या आदेशानुसार कुराण न माननाऱ्या स्त्री पेक्षा गुलाम स्त्री शी निकाह करणे वैध आहे. एक वेळ ख्रीस्ती वा यहुदी सुद्धा चालतील पण बुतपरस्त चालनार नाहीत. निकाह करण्याआधी इस्लाम कबूल करुन घेने झायेद जीवंत राहण्यासाठी सुद्धा गरजेचे आहे. कारण जो इस्लाम माननारा नंतर पायभूत पुस्तकाच्या शिकवणी विरूद्ध वर्तन करेल त्याला त्याच क्षणी गळा चिरून मारून टाकण्याचा आदेश पायाभूत पुस्तकात दिला आहे.
27 Oct 2020 - 4:33 pm | Gk
सैराट मध्ये कोण मुसलमान होतं ?
आरची ? का परश्या ?
28 Oct 2020 - 8:29 am | आनन्दा
हिंदू विवाह कायद्याचा लेख कधी लिहिताय?
28 Oct 2020 - 8:54 am | Gk
पण इथल्या लोकांना पचला नाही
लेखही उडाला , आयडीही उडाला
29 Oct 2020 - 9:20 am | सुबोध खरे
सैराट मध्ये कोण मुसलमान होतं ?
आरची ? का परश्या ?
नेहमीप्रमाणे सामाजिक विचारसरणी आणि कायदा यात गल्लत करता आहात.
भारतीय कायद्याच्या दृष्टीने सर्व समान असतात.
मागासलेल्या व्यक्ती अशा नसतात.
त्यांची बुरसटलेली विचारसरणी म्हणजे कायदा नव्हे आणि विषय कायद्याचा चालू आहे.
पचपच करण्याच्या आधी नीट विचार करत जा.
29 Oct 2020 - 9:31 am | Gk
सैराट मध्ये सुद्धा जातीतला नसल्याने खुनच करतात असे दाखवले होते.
30 Oct 2020 - 5:53 am | चौकस२१२
"नेहमीप्रमाणे सामाजिक विचारसरणी आणि कायदा यात गल्लत करता आहात."
बरोबर बोललात
जिके ़..हिंदू हिंदूंवर अन्याय करीत नाहीत असा कोणी दावा केलाय का? उगाच काहीतरी
हिंदू पूर्वगामी असून सुद्धा त्यांच्यात भरपूर प्रश्न आहेत हे १००% मान्य असले तरी म्हणून मुसलमानांवर बोलायचे नाही मुसलमान कायद्यणवर बोलायचे नाही हे काय?
हलाला नावाचाच मराठी चित्रपट जरूर बघावा दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील
https://en.wikipedia.org/wiki/Halal_(film)
27 Oct 2020 - 5:24 pm | सुनील
कट्टर सनातनी मंडळींच्या प्रखर विरोधाला न जुमानता नेहरू-आंबेडकर द्वयींनी पुरोगामी असे हिंदु कोड बिल संसदेत पारीत करून घेतले त्यावेळी वर्तमानपत्रात आलेली काही व्यंगचित्रे.
27 Oct 2020 - 6:26 pm | बाप्पू
विरोध तर होणारच.. काहीतरी नवीन आणायचे म्हणल्यास जुन्या गोष्टी सोडाव्या लागतील.. तर विरोध तर होणारच.. पण
एक हिंदू म्हणून डॉ बाबासाहेब यांचे आभार मानतो कि कालसुसंगत निर्णय घेऊन हिंदू कोड बिल अस्तित्वात आणले.. असाच विरोध जोतिबा फुले यांना देखील झाला. पण ते ते शेवटपर्यंत जिवंत राहिले त्यांनी आपले विचार लोकांपर्यंत पोहचवले आणि त्यांनी कालांतराने लोकांनी देखील ते एक्सेप्ट केले.. त्यांना महात्मा, महामानव अश्या उपाध्या मिळाल्या.
पृथ्वी वर अजूनही अश्या काही जमाती आहेत जे परिवर्तन तर सोडाच.. पण परिवर्तन हा शब्द जरी एखाद्याने उच्चरला तरी चाकू गळ्यावरून फिरवतात.. मग त्यात शिकलेले, अडाणी, अर्धशिक्षित, उचभ्रु, गरीब, मध्यमवर्गीय असा काहीही भेदभाव नाही.. सगळे एका माळेचे मणी.
असो.
27 Oct 2020 - 10:52 pm | मदनबाण
वाचकांनी खालील लिंक उघडण्याचे कष्ट घ्यावेत :-
https://hindi.opindia.com/topics/love-jihad/
अवांतर :- काही लोकांना एका ठराविक जमातीनेच अत्याच्यार केले आहे किंवा तेच लाभार्थी होते असा मोठा भ्रम असतो, अश्या लोकांसाठी २००७ ची एक लिंक देउन ठेवतो :-
Are Brahmins today’s Dalits in India?
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- India, US to sign landmark defence pact to share high-end military technology, logistics today
28 Oct 2020 - 8:08 am | सुनील
कळीचा मुद्दा हा आहे की, आज हिंदू कायदे जे बहुतांशी प्रागतिक दिसतात त्याचे श्रेय हे समाजातील पुरोगामी आणि त्यांना यथायोग्य साथ देणारे राजकारणी याच्यामुळेच आहे.
सनातन्यांचे ऐकले असते तर हिंदू कायदे असे प्रागतिक झाले नसते.
28 Oct 2020 - 8:33 am | साहना
सॉरी ! ह्याला काडीचाही आधार नाही. हा काही तरी न्यूनगंड बोलत आहे. कुठलाही समाज फक्त सनातन्यांचा बनलेला असत नाही तर सनातनी तसेच प्रागतिक मंडळींचा बनलेला असतो. सनातनी त्याला खोलवर मूळे देतात तर प्रागतिक लोक त्याला वाढण्याचा स्कोप. सनातन धर्माने इतकी वर्षे समाज चांगला सांभाळला होता (इतर समाजांच्या तुलनेत).
28 Oct 2020 - 8:39 am | सुनील
सनातन धर्माने इतकी वर्षे समाज चांगला सांभाळला होता.
चालू द्या.......
28 Oct 2020 - 8:14 pm | अर्धवटराव
नक्कीच सांभाळला असेल. ज्या सनातन धर्म व्यवस्थेला समाजसुधारकांनी विरोध केला ति व्यवस्था काहि कालबाह्य, अप्रवाही, प्रसंगी हिडीस म्हणाव्या अशा नियमांनी
वरपांगी दगडासारखी कठोर झालेली दिसत असली तरी ति बर्याच मंथनातुन गुजरली होती. काळाच्या प्रत्येक टप्प्यावर तिच्यामध्ये म्युटेशन्स होत गेले, जे त्या त्या वेळी आधुनीकच भासले असणार. ति म्युटेशनची पद्धत काहि कारणाने मंदावली, व आधुनीक युगाला आवष्यक ते बदल घडवण्याचे, पचवण्याचे कौशल्य गमावुन बसल्यामुळे त्या व्यवस्थेला कायद्याने हादरे द्यावे लागले.
हे असं कुठल्याही प्राचीन व्यवस्थेत होत असतं.
28 Oct 2020 - 9:50 am | सुनील
बरोबर. पण समाज सामाजिकदृष्ट्या प्रगती कडे जातो आहे की अधोगतीकडे हे राज्यकर्ते कुणाला बळ देतात यावर अवलंबून असते.
29 Oct 2020 - 5:59 pm | अनिरुद्ध.वैद्य
त्यांच आभार प्रदर्षन वगैरे कसं कराव म्हण्ता?
27 Oct 2020 - 5:25 pm | धर्मराजमुटके
लेख वाचनिय आहे. मात्र आंतरजातीय / आंतरधर्मिय विवाह करताना "माझे त्याच्यावर लव आहे" हाच विचार जास्त प्रबळ असतो त्यामुळे कायदेशीर बाजू कितपत विचारात घेतल्या जातात त्याबद्धल शंकाच आहे. कायद्याचा कीस लग्न अडचणीत आल्यावरच केला जातो मात्र तोपर्यंत परिस्थिती हाताबाहेर गेलेली असते.
एवढे कायदे विचारात घेऊन लग्न करायचे तर "दाखवून/बघून" केलेले अरेंज्ड मॅरेजचा व्यवहार काय वाईट ?
27 Oct 2020 - 5:37 pm | आनन्दा
मुटके साहेब,
मुलीला आंतरधर्मीय विवाहाला विरोध करण्यपेक्षा तो विवाह कोणत्याही धार्मिक कायद्याच्या कक्षेत न राहता एखाद्या निष्पक्ष कायद्याच्या कक्षेत राहुन विवाह व्हावा अशी इच्छा ठेवणे केव्हाही चांगले.
जो माणूस धर्मापलिकडे जाऊन खरेच प्रेम करत असेल, त्याच्यासाठी रजिस्टर विवाह करणे सहज शक्य असले पाहिजे, आणि जो माणूस समानता नाकारून लग्न करण्याचा प्रयत्न करतोय त्याचे हेतू शुद्ध नाहीत ही भूमिका सामंजस्यवादी आणि पोलिटिकली करेक्ट आहे.
या भूमिकेने समुपदेशन करणे नक्कीच सोपे जाईल. किमान असे विवाह झालेच तरी ते ते निष्पक्ष कायद्याच्या परिघात असल्यामुळे वेळोवेळी कायदेशीर मदत घेणे सोपे जाईल असे वाटते.
27 Oct 2020 - 5:37 pm | आनन्दा
अवांतर, माझ्य ओळखीतील एका मुलीने याच वर्षी एका ख्रिश्चन मुलाबरोबर लग्न केले, त्यांनी देखील रजिस्टर विवाहच केला आहे असे नमूद करू इच्छितो.
27 Oct 2020 - 5:47 pm | धर्मराजमुटके
आपला काहीतरी गैरसमज होतोय ! माझा कोणत्याही प्रकारच्या विवाहाला विरोध नाहिच. मात्र मी केवळ वस्तूस्थिती सांगीतली. प्रेम विवाह दोन प्रकारे होतात. एक प्रेमात ठार आंधळे होऊन आणि दुसरा प्रकार म्हणजे समोरच्याच्या सगळ्या बाजू आपल्याला अनुकूल आहेत असे पाहून ठरवून प्रेमात पडणे. तिसरा प्रकार आपल्या बघण्यात असेल तर नक्की सांगा. मी नेहमीच माझे चुकीचे विचार बदलायला तयार असतो.
28 Oct 2020 - 8:48 am | मराठी_माणूस
अतिशय व्हॅलिड मुद्दा. दुसरा प्रकार गंभीरपणे घेतल्यास बर्याच समस्या आधीच निकालात निघतील.
29 Oct 2020 - 11:37 am | आनन्दा
आंधळ्या प्रेमाला आंधळा विरोध केला तर ते बहिरे पण होते..
तेव्हा डोळस विरोध करणे आणि politically correct असणे केव्हाही महत्वाचे.. त्यामुळे हा लेख खूपच उपयुक्त आहे असे मला वाटते.
27 Oct 2020 - 11:48 pm | साहना
कुठलाही हिंदू माणूस "बीफ कबाब" चविष्ट आहेत हो म्हणून खायला जात नाही. एकदा चव पहिली तरी त्याच्या नादाला पुन्हा जात नाही. गाय हे धन ह्या दृष्टिकोनातून आजकाल पूर्ण निरुपयोगी असले तरी सुद्धा सामान्य आणि अगदी "पुरोगामी" हिंदू मंडळी सुद्धा बीफ शक्यतो खायला जात नाही. ह्यासाठी हिंदू समाजाचे "मेंटल कंडिशनिंग" कारणीभूत आहे. तुम्ही कुठेही गेलात, श्रीमंत, गरीब, घरातील आई वडील, शेजारी, शिक्षक सर्वच मंडळी बीफ ह्या प्रकाराकडे किळसवाण्या नजरेने बघतात त्यामुळे लहान मुलांची मानसिकता सुद्धा त्याप्रमाणे बनते. अर्थांत इथे कुणी मोठा होऊन बीफ खायला लागलाच तर त्याचे व्यैयक्तिक जीवन असल्याने त्यांत करण्याचा आम्हाला अधिकार नाहीच, पण आपल्या मुलांनी मोठे होऊन गोमांस खाऊ नये असे वाटत असेल तर लहानपणापासूनच मुलांवर तसे संस्कार करणे आपल्या हातांत आहे. आपण गोमांस खातो म्हणून कुणी ढोल बडवायला लागलाच तर त्याला राजकीय आणि दृष्टिकोनातून फक्त नुकसान सहन करावे लागते.
मी तीच तीच गोष्ट पुन्हा सांगते असे कुणाला वाटेल पण (फक्त) हिंदू समाजाने आपली मंदिरे आणि विद्यालये सरकारी कोठीत बटीक म्हणून बांधली आहेत. आज ह्या दोन्ही गोष्टीवर सरकारी बाबुंचा ताबा आहे. हे बाबू आणि शाळेची संपूर्ण पाईपलाईन ह्यावर "पुरोगामी" लोकांचा ताबा आहे त्यामुळे आपल्या मुलांना कोणते संस्कार द्यावेत हे त्यांच्या हातांत आहे. हीच मुले मोठी होऊन हिंदू समाजाची एक एक वीट खेचून काढतील.
28 Oct 2020 - 9:33 am | Gk
कंगना बीफ खाते , तिला आवडते बीफ
गोव्यात बीफ पोटभर मिळेल असे तिथले एक भाजपा मंत्री बोलले होते ( आणि 1 वर्षात पोटाचा विकार जडला, गोमातेचा शाप असेल का ?)
1 Nov 2020 - 9:22 pm | टवाळ कार्टा
परदेशात गेलेले हजारो हिन्दू बीफ खातात
2 Nov 2020 - 11:35 am | मराठी_माणूस
आणि वर मी प्युअर नॉन वेजेटेरिअन आहे असे अभिनिवेशात सांगतात.
2 Nov 2020 - 1:44 pm | टवाळ कार्टा
काय खावे हा वैयक्तीक प्रश्न आहे.....मी फक्त वीगन्/शाकाहारी/मांसाहारी खातो म्हणून मी जास्त चांगला हा शुद्ध मूर्खपणा आहे
3 Nov 2020 - 12:01 pm | सुबोध खरे
कुणी काय खावे हा नक्कीच वैयक्तिक प्रश्न आहे.
परंतु मांसाहारी लोक शाकाहारी पदार्थांचा जेंव्हा तेंव्हा "घासफूस" म्हणून जो पाणउतारा करतात तो चूक आहे.
कोणताही मांसाहारी पदार्थ हा चांगलाच असतो अशी काही तरी विचित्र धारणा केलेले लोक डोक्यात जातात.
अशा लोकांना बँकॉक च्या रस्त्यावर कीटक खाण्यासाठी विकले जातात किंवा ओडिशा मध्ये लोक उंदीर खातात ते पाहून काय वाटेल.
मिझोराम मध्ये कुत्र्याला पोटभर भात खायला घातला जातो त्यानंतर त्याला लाठ्याकाठ्यांनी मारले जाते आणि हाच भात त्याच कुत्र्याच्या माणसाबरोबर शिजवून मेजवानी म्हणून दिला जातो. तेही दाखवले पाहिजे.
4 Nov 2020 - 8:44 pm | टवाळ कार्टा
+1111
28 Oct 2020 - 1:04 am | साहना
> माझे त्याच्यावर लव आहे
कायदेशीर बाबींची माहिती म्हणूनच ह्या स्टेज आधीच व्हायला पाहिजे आणि त्यासाठीच हा लेखन प्रपंच आहे.
अनुष्का वकीलसाहेबांकडे गेली तरी प्राचू आणि गौरी जातील असे नाहीच उलट ९९% मुली ह्या भानगडीत पडणार नाहीत. पण किमान आई वडील तरी मुलीला घराबाहेर काढण्याआधी हा फरक समजावून सांगतील अशी अपेक्षा.
इस्लामिक कायद्यातील विवाह आणि हिंदू विवाह पद्धती ह्यातील फरक आमच्या मुलांना वय ८ पासून समजावून सांगितला, आमच्या कथा आणि ललित लेखनातून तो दिसला, आणि संध्याकाळी एकत्र जेवताना अमुक माणसाच्या मुलीने कसा इस्लामिक कायद्याअंतर्गत विवाह केला आणि पुढे तिचे काय झाले हे डिस्कशन झाले कि आपोआप आमच्या मुली मोटारसायकलवरून फर्स्ट कॉपी रेबेन घालून येणाऱ्या आतिफ आणि याकूब वर फिदा होणे बंद करतील. हिंदू मुलांना सुद्धा इथे आत्मविश्वास निर्माण करून देणे महत्वाचे आहे. आपल्या सर्कल मधील कुठल्याही मुलीवर शांतिदूत लाईन मारायला लागले कि त्यांना स्पर्धा म्हणून पाहणे आणि वाट्टेल ते मार्ग वापरून हि स्पर्धा कमी करणे हे काम हिंदू मुलांचे आहे. हा खेळ नैसर्गिक असून कायद्याचे इथे जास्त काम नाही पण प्रौढ पिढीची जबाबदारी आहे कि ह्यांना योग्य ती माहिती सतत उपलब्ध करून देणे. हिंदू समाजाच्या पारंपरिक संस्था हि विद्यालये आणि मंदिरे होती. ह्यावर सध्या सरकारी आणि ख्रिस्ती प्रेरित घुबडांचे राज्य आहे त्यामुळे आम्हाला नवीन संस्था उभाराव्या लागणार आहेत.
माझ्या मते ह्या गोष्टी सध्या होतच आहेत. त्यामुळेच टिंडर वगैरेवर अनेक अस्लम "अभय" आणि याकूब "यशवंत" म्हणून दिसत आहेत. इथे मामला फ्रॉड चा असल्याने मुलीचे मत परिवर्तन करणे खूप सोपे जाते. पण ह्या विषयावर स्त्री दृष्टिकोनातून लेखन जास्त नाही त्यामुळे मी ह्या विषयावर विस्तृत पणे पुढे लिहिणार आहे. आधुनिक प्रणयक्रिडेत (डेटिंग) आधुनिक स्त्रीने 'पुरोगामी' सद्गुणविकृतीला बळी न पडता किंवा अगदीच कालबाह्य न होता कश्या प्रकारे आपला फायदा आणि हक्क पाहावा ह्या विषयावर मी लिहिणार आहे.
28 Oct 2020 - 8:01 am | धर्मराजमुटके
प्रतिसादाशी सहमत आहे !
27 Oct 2020 - 6:10 pm | Gk
ह्याला लव्ह व्हिसा म्हणायचे की लव्ह कृसेड ?
...
लग्न केल्यामुळे व्हिसा मिळवणं सोपं होतं, त्यामुळेच मी बेनेडिक्टशी लग्न केलं, असा अजब खुलासा अभिनेत्री राधिका आपटेनं केला. त्याचप्रमाणे लग्नसंस्थेवर विश्वास नसल्याचंही तिने सांगितलं. अभिनेता विक्रांत मेस्सीने राधिकाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडीओत विक्रांत व राधिकाने चाहत्यांच्या काही प्रश्नांची उत्तरं दिली आहेत.
राधिकाने २०१२ मध्ये ब्रिटीश संगीतकार बेनेडिक्ट टेलरशी लग्न केलं. सध्या ती लंडनमध्येच असून कामापासूनच तिने वर्षभर ब्रेक घेतला आहे. काही महिन्यांपूर्वी ती ‘रात अकेली है’ या चित्रपटात झळकली होती. नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत तिने स्क्रिन शेअर केला होता. नेटफ्लिक्सवर हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.
https://www.loksatta.com/manoranjan-news/radhika-apte-on-why-she-get-mar...
----
आपटे आहे म्हणजे बुद्धीवर व्हिसा मिळतो ना ? की स्वतःच्या बुद्धीवर विश्वास नाही ?
....
मला अजून एक शंका आहे
बाकी लोक आपले क्वालिफिकेशन दाखवतात व व्हिसा मिळवून ते त्याच फिल्ड मध्ये नोकरी करतात , उदा डॉकटर , आयटी कर्मचारी
आता हे शीनिमावाले कसले सर्टिफिकेट दाखवतात व तिकडे व्हिसा मिळवून काय काम करतात ?
5 Nov 2020 - 12:34 pm | mayu4u
आणि कागलकर आहे म्हणजे अक्कल नसते.
27 Oct 2020 - 6:51 pm | अनिंद्य
लेख आवडला.
उत्तरार्ध (असल्यास) वाचायला उत्सुक आहे.
दोन प्रकारचे विवाह एकाच घरात झाल्याचे उदा.
- मंसूर अली खान पटौदी आणि शर्मिला टागोर (तिने धर्म बदलला)
- सैफ अली खान आणि करीना कपूर (SMA)
27 Oct 2020 - 8:00 pm | बाप्पू
SMA
या प्रकारामध्ये लग्नानंतर होणाऱ्या मुलांचा धर्म कोणता?
पुढे त्यांची लग्ने होताना कोणता कायदा लागू होणार? दुर्दैवाने आई किंवा वडील यांच्यापैकी एकाच जर आकस्मिक मृत्यू झाला तर त्यांना मिळणाऱ्या प्रॉपर्टी चे निकष कोणत्या कायद्यानुसार लावले जातील?
27 Oct 2020 - 9:38 pm | Gk
Succession to the property of person married under this Act or customary marriage registered under this Act and that of their children, are governed by Indian Succession Act.[10][11] However, if the parties to the marriage are Hindu, Buddhist, Sikh or Jain religion, the succession to their property will be governed by Hindu succession Act.[12]
The Supreme Court of India, in 2006, made it required to enroll all relational unions. In India, a marriage can either be enlisted under the Hindu Marriage Act, 1955 or under the Special Marriage Act, 1954. The Hindu Marriage Act is pertinent to Hindus, though the Special Marriage Act is appropriate to all residents of India regardless of their religion applicable at Court marriage.
27 Oct 2020 - 9:42 pm | Gk
https://en.m.wikipedia.org/wiki/Special_Marriage_Act,_1954#:~:text=The%2....
27 Oct 2020 - 9:22 pm | कंजूस
मुसलमानांत बहिणी आणि भावांचाही ( वडलोपार्जित नसलेल्या ) प्रापर्टीत हिस्सा असतो म्हणे.
28 Oct 2020 - 8:51 pm | अनुप ढेरे
सारखा नसतो हिस्सा. मुलीना अर्धा/तृतीयांश असतो.
28 Oct 2020 - 9:39 pm | Ujjwal
https://m.timesofindia.com/city/faridabad/mlas-cousin-kills-girl-he-was-...
28 Oct 2020 - 9:40 pm | प्रकाश घाटपांडे
लग्न कंच्या बी पद्धतीने करा. नोंदवा ते SM ने. अनुष्काने तेच कराव.
28 Oct 2020 - 9:40 pm | प्रकाश घाटपांडे
लग्न कंच्या बी पद्धतीने करा. नोंदवा ते SM ने. अनुष्काने तेच कराव.
29 Oct 2020 - 2:32 am | गामा पैलवान
सुनील,
राजा कालस्य कारणं हे अत्यंत समर्पक विधान तुम्ही सांगितलंय. गेल्या सुमारे हजारेक वर्षांपासून एतद्देशीय हिंदू म्हणता येईल असे फार थोडे राजे झालेत. परकीय आक्रमकांच्या राजवटीत हिंदूंमध्ये ज्या विकृती शिरल्या त्यांचा दोष सनातन धर्मास देणं माझ्या मते योग्य नाही.
आ.न.,
-गा.पै.
29 Oct 2020 - 5:28 am | Gk
फार थोडे ?
आणि मग 1947 ला जनतेच्या उरावर बसून पेन्शन खाणारे 400 संस्थानिक कोण होते ? इंग्रज आणि मोघलांच्या ताब्यात 50 % सुद्धा राज्य नव्हते , जिथे इंग्रज मोघल होते तिथेही एतद्देशीय राजे त्यांचे हस्तक होते
देश स्वतंत्र झाल्यावर पेन्शन घेऊन वर आज ते राजकारणातही आहेत
अगदी इक्ष्वाकु पासून गल्लीबोळातून असलेल्या अनेक संस्थानिकांची घराणी जिवन्त आहेत.
29 Oct 2020 - 9:52 am | सुबोध खरे
400 संस्थानिक
४०१ वे संस्थांनिक यांनी आपल्या अति हुशार पणतवाची सुद्धा जहागीरी चालू राहील अशा घटना दुरुस्त्या केल्या होत्या.
काँग्रेस अध्यक्षाने पंतप्रधान मदत निधी मधील विश्वस्त असावे हे याचे उत्तम उदाहरण आहे.
29 Oct 2020 - 2:02 pm | Gk
अध्यक्ष असले तर काय होते ? पगार भत्ता मिळतो का ?
असले तरी ते ऑडिट , आर टी आय च्या अंडर आहे
मोदी केअर फ़ंड तर ऑडिट आणि आर टी आय के दायरे के बाहर है
तुम्ही फक्त चौकीदारकी करायची
30 Oct 2020 - 12:42 pm | सुबोध खरे
अध्यक्ष असले तर काय होते ? पगार भत्ता मिळतो का ?
दाबून पैसे खाता येतात.
विचारणारा कोणी नाही.
नुसता हलकट पणाचा बाजार
Interestingly, the PMNRF is far less transparent than the PM CARES since after PMNRF was deemed a trust, it has functioned without a trust deed. Essentially, giving unbridled power to the Prime Minister with zero accountability.
Till date, nobody knows what the guidelines that govern the PMNRF are.
The lack of transparency in the employment of funds under PMNRF is now apparent with information coming to light about how its funds were misappropriated and transferred to Rajiv Gandhi Foundation by Sonia Gandhi.
https://www.opindia.com/2020/06/rajiv-gandhi-foundation-donation-from-pm...
PM Relief Fund 'Diverted' Money To Rajiv Gandhi Foundation During UPA Years
https://www.thehindu.com/news/national/rajiv-gandhi-foundation-got-funds...
30 Oct 2020 - 12:46 pm | Gk
PM fund आहे म्हणजे पी एम स्वतः जाऊन काम करत नाही , कोणत्या ना कोणत्या यंत्रणा , एन जी ओ ह्यांना मदत देऊन त्यांच्याकडून काम करवले जाते, विविध आपत्तीतही मदत केली जाते, एखादी एन जी ओ घरचीही असेल, म्हणून काय सगळे तेच खात नाहीत
आता तुमच्या मोदी केअर चा हिशोब द्या बघू , तुम्हाला आर टी आय घालायचीही कदाचित मुभा देणार नाहीत
30 Oct 2020 - 2:01 pm | Gk
https://en.m.wikipedia.org/wiki/PM_CARES_Fund
Modi care fund चा उजेड
निकृष्ट व्हेंटिलेतर घेतले
30 Oct 2020 - 2:10 pm | Gk
Pm relief fund , हा आमच्या नेहरूचा फ़ंड
https://pmnrf.gov.in/en/
किती सुंदर वेबसाईट आहे , आकडे इतके सुंदर आणि त्याच्या शेजारी चक्क मोदींजींचा फोटो ! सख्या गटणे आणि पुलं आठवले !!
नेहरू रिलीफ फंडाशी प्रामाणिक रहा आणि मोदी केअरशीही !!
30 Oct 2020 - 3:00 pm | सुबोध खरे
दाबून पैसे खाता येतात.
विचारणारा कोणी नाही.
याचं बोला.
मग बाकीचं
29 Oct 2020 - 5:26 am | साहना
तुकाराम, ज्ञानेश्वर, फुले, कर्वे, आंबेडकर, सावरकर, आगरकर, आमटे (मी फक्त सध्या मराठी माणसांची नावे घेतेय पण संपूर्ण भारतांत अशी अनेक व्यक्तिमत्वे आहेत) असे अनेक बंडखोर, समाजाच्या विरुद्ध जाणारे सुधारक देशांत झाले त्यातील काही लोक सनातनी सुद्धा होते. इतर समाजांत ह्या लोकांना भर चौकांत जाळले गेले असते किंवा पूणर्पणे वाळीत सुद्धा टाकले गेले असते. पण अश्या प्रकारचे सुधारक वारंवार निर्माण करण्याची क्षमता भारतीय समाजाने दाखवली आहे हे सुद्धा भारतीय समाजाचे एक वैशीष्ट्य आहे.
अनेक प्रागतिक लोकांनी समाजाचे भले ह्या पेक्षा सनातनी लोकांना त्रास हे ध्येय ठेवले आहे त्यामुळे वारंवार हि मंडळी माती खातात !
29 Oct 2020 - 5:31 am | Gk
इतर समाजांत ह्या लोकांना भर चौकांत जाळले गेले असते किंवा पूणर्पणे वाळीत सुद्धा टाकले गेले असते
हे लिहून पहिलीच दोन नावे तुकाराम आणि ज्ञानेश्वर लिहिलेत
वाचून हसू आले
29 Oct 2020 - 6:08 am | साहना
तुमच्या शारीरिक प्रतिक्रियांपेक्षा बौद्धिक प्रतिक्रिया दिल्या तर जास्त चांगले ठरेल. कोथिबिरीच्या वड्या च्या रेसिपीवर "वाचून ढेकर" आला किंवा राजमा ची रिसिपि वाचून गॅस झाला वगैरे प्रतिक्रिया कदाचित शोभत असतील पण सगळीकडेच हा प्रकार तर्कसंगत वाटत नाही.
29 Oct 2020 - 7:11 am | Gk
आमची कोथिंबीर आणि राजमा आमच्या पैशाने येतो,
इथे आम्ही लिहायला तुम्ही आम्हाला 40 पैसे स्पॉन्सर नाही करत
29 Oct 2020 - 11:09 pm | साहना
तुमचे लेखन त्या तोडीचे असते तर मी आठ आणे कदाचित दिलेही असते ...
30 Oct 2020 - 12:09 am | Gk
चार अणे आठाणे
उर्मिलाला विधान परिषद म्हणे
29 Oct 2020 - 9:53 am | सुबोध खरे
40 पैसे
४० पैशात राजमा आणि कोथिंबीर येते?
अजून ३० वर्षे मागासलेलेच आहात वाटतं
१५ लाख आले ना खात्यात?
ते वापरा कि
29 Oct 2020 - 12:27 pm | राजेंद्र मेहेंदळे
लेखावर प्रतिसादांची राळ उडणे अपेक्षितच होते, पण काही गोष्टी जवळुन पाहिल्या ऐकल्या असल्याने, लिहितोय
लग्न हा मुळातच गुंतागुंतीचा मामला आहे. करणे सोपे पण टिकवणे अवघड. मग तो प्रेम विवाह असो की पत्रिका,नाडी वगैरे जुळवुन ठरवलेले लग्न असो. नैसर्गिक भावनांना समाजमान्य कोंदण देउन वाट काढुन देणे हा त्याचा मूळ उद्देश. पण परंपरा, रितीभाती,कुलाचार, नात्यांचा लिप्ताळा, शेजार्यापाजार्यांचा गोतावळा,आर्थिक विवंचना,आजारपणे,जोडीदाराशी प्रतारणा यांनी बर्याच वेळा लग्न मूळ उद्देशापासुन भरकटते आणि आपण लग्न का केले किवा याच्याशी/हिच्याशी लग्न का केले? ईथपर्यंत मजल जाउ शकते. जरी कायदेशीर पर्याय उपलब्ध असले तरी वेळेचा / पैशाचा अपव्यय, मनावर आघात आणि सगळ्यात वाईट म्हणजे संतती असेल तर त्याच्या/तिच्यावर होणारे परीणाम टळत नाहीत.
त्यामुळे आता ही तारेवरची कसरत करायची ठरवले तर त्यात जातीधर्माचे गुंते आणावेत का? हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आयुष्यात आपल्याला लग्न सोडुन भरपुर काही करायचे असते. त्यामुळे या एका गोष्टीवर आपण किती गुंतवणुक करावी किवा आपल्या उर्जेचा किती टक्के भाग खर्च करावा हा खरा मुद्दा आहे.
29 Oct 2020 - 1:53 pm | मराठी_माणूस
You said it
29 Oct 2020 - 6:40 pm | शाम भागवत
छान लेख.
29 Oct 2020 - 6:40 pm | माहितगार
एका ऊपयूक्त विषयावरील लेखाचा अनुवाद लेखिकेने उपलब्ध केला हे कौतुकास्पद आहे.
याच विषयाच्या ईतर काही पैलुंची मी माझ्या तीनेक दीर्घ लेखातून चर्चा केली आहे: १, २, ३
30 Oct 2020 - 9:56 pm | साहना
धन्यवाद !
29 Oct 2020 - 6:48 pm | गामा पैलवान
Gk,
कृपया नीट माहिती घ्या. सर्व राजे जनतेच्या उरावर बसून खाणारे नव्हते. बडोद्याचे महाराज सयाजीरावांनी व्यवस्थित प्रजापालन केलं होतं. आजच्या घडीला गुजरात राज्यात सर्वात विस्तृत रेल्वे जाळं आहे.
आंबेडकरांना बडोद्याचे सयाजीमहाराज, कोल्हापूरचे शाहूमहाराज अशा प्रागतिक विचारांच्या राजांनी मदत केली होती.
आ.न.,
-गा.पै.
30 Oct 2020 - 5:37 am | चौकस२१२
आपण "कायम राहण्याचं वीसा बद्दल बोलताय हे गृहीत धरतो ...
नमूद केलेल्या व्यावसायिकांना जसा बरेचद शिक्षण + अनुभव यावर पाश्चिमात्य देशात वीसाआ बऱ्यापकी सुलभतेने मिळू शकतो .. नुसते कलाकार या व्यासावर मिळणे तसे अवघड आहे हे खरे , कानडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड यांची व्हिसा पद्धती साधरण पणे सारखी आहे त्यावरून म्हणतो ... पण यात कलाकारानं दोन प्रकारे वीसा मिळू शकत असणार
१) निर्मात्याने देऊ केलेले पैसे/ एक प्रकारची नोकरी येवढया मोठ्या स्तरावरची असेल तर खास क्षेत्रातील / आपल्या क्षेत्रातील उच्चतम दर्जाची व्यक्ती असे काहीसे दाखवून व्हिसा मिलू शकतो ( पै इरफान खान )
२) जर यात पैसे / स्थानिक नोकऱ्या उपलब्ध होणे शक्य असेल तर सरकार स्वतःहून याला पाठिंबा देते उदाहरणार्थ लॉर्ड ऑफ द रिंग चे बहुतेक काम न्यूझीलंड मध्ये झाले आणि पायरत ऑफ कॅरिबियन चे बरेच काम ऑस्ट्रेलियात झाले .. तेवहा लाखो डॉलर देशात आले मग VISAA मिळणे अवघड नाही
परंतु यातील बरेच कलाकार तात्पुरत्या व्हिसा वर येतात ..(पण काम कायाला परवानगी असलेल्या , नुसत्या "प्रवासी व्हिसा " वर नव्हे )
उदाहरण म्हणून अर्थात हे खरे कि साधारण तंत्रन्याला जेव्हा सहजपणे असा व्हिसा मिळेल तेवढा उदाहरण म्हणून माताही हिंदी नाटक कलाकाराला मिळणार नाही तेवढेच काय अगदी मुंबईतील इंग्लिश भाषिक रंगकर्मीला सुद्धा मिळणार नाही ..
३) स्थानिक नागरिकांशी लग्न करून कायमचा व्हिसा मिळेल याचा आपण कोणत्या व्यसायातील आहेत याचा काह्ही संबंध नाही
30 Oct 2020 - 3:43 pm | Rajesh188
इथे स्त्री चा दृष्टिकोन
पुरुषाचा दृष्टिकोन
समाजाचा दृष्टिकोन
असे वेगळे दृष्टिकोन नसतात.
अंतर धर्मीय विवाह करणारे सामाजिक ,आर्थिक,मनगट शाही मध्ये किती समर्थ आहेत ह्या वर सर्व स्थरतील लोकांचा दृष्टिकोन बदलतो.
बाकी काही नाही.
तुम्ही बलवान असाल तर कोणत्या ही धर्माच्या जातीच्या मुली शी विवाह करा तो समाजमान्य असतो.
दुर्बल व्यक्ती च्या स्वजातीय विवाह पण समाजात मान्य होत नाही.
30 Oct 2020 - 3:53 pm | माहितगार
ज्या एखाद्या गोष्टीस समाज मान्यता असते तिथे मनगटशाहीची गरज तेवढीच कमी भासते हेही तेवढेच खरे नाही का ?
2 Nov 2020 - 3:35 pm | Rajesh188
करीना कपूर नी मुस्लिम व्यक्ती शी लग्न केलं
शाहरुख नी हिंदू स्त्री शी लग्न केले
सलमान खान ची आई मराठी आहे.
रेणुका शहाणे पासून किती तरी अभिनेत्री नी गैर मराठी लोकांशी लग्न केले..
खूप उदाहरणे आहेत.
सक्षम लोकांनी केलेल्या अंतर जातीय ,अंतर धर्मीय,अंतर राष्ट्रीय विवाह ला कोणताच विरोध धार्मिक किंवा सामान्य लोकांकडून होत नाही.
उलट अशा विवाहाचे गौरिवी कारण होते.
30 Oct 2020 - 9:29 pm | तेजस आठवले
साधनाजी, अतिशय चांगला आणि माहितीपर लेख.
+१
गजानन कागलकर नामक मनुष्य हजारोंनी आयडी घेतो आणि प्रत्येक धाग्यावर येऊन वातावरण नासवतो. मिपा व्यवस्थापकांची निष्क्रियता हे त्याला दिलेले अभय आहे.
एकेकाळी चांगले लेख आणि चर्चा होत असणारे संस्थळ हळूहळू मरणपंथाला लागते आहे हे बघणे आता उरले आहे.
अर्थात ह्या गोष्टींचा एक फायदा झाला तो म्हणजे मिपा सोडून गेलेले उत्तम लिहिणारे आयडी तेव्हा मिपावर जाणारा वेळ आता सत्कारणी लावत आहेत. तसेच सततचा मोदीविरोध आणि हिंदुत्वाला शिव्या देणारे प्रतिसाद ह्यामुळे मोदींच्या बाजूने नसणारेआणि कुंपणावरचे पण आता मोदींच्या बाजूने जात आहेत.
31 Oct 2020 - 12:46 am | बाप्पू
अगदी बरोबर. धागा कोणताही असो.. प्रत्येक धाग्यावर येऊन मोदी, गुजरात, शाह, आणि हिंदुत्वाची चेष्टा एवढेच काय ते गजानन कागलकर यांचे कर्तृत्व..
मी मोदीसमर्थक किंवा BJPwala नाही तरीही गजानन कागलकर यांनीं मला तसे होण्यासाठी भाग पाडले आहे. ( फक्त प्रतिसाद देण्याच्या बाबतीत. )
31 Oct 2020 - 6:35 am | Gk
हजारो आयडी होते , हे स्वतःच लिहिताय , म्हणजे काही अनुचित लिहिले तर आयडी डिलीट होतात ,
आयडी जिवन्त आहे , म्हणजे कदाचित काही आक्षेपार्ह लिहिलेले नाही.
असे अनेकांचे आयडी डिलीट झाले आहेत आणि पुन्हा पुन्हा येत आहेत
31 Oct 2020 - 7:10 pm | सुबोध खरे
तुमचा खोटारडेपणा लोचटपणा लुब्रेपणा आणि पचपच करण्याची वृत्ती (लोलुप) तुम्ही सोडणार नाहीच.
इतक्यावेळेस तुमचे आय डी उडाले तरी तुम्हाला लाज वाटत नाही.
खोटारडेपणा उघड केला तरी लुब्रेपणा सोडत नाही.
कोणत्याही धाग्यावर पचपच करणे सोडत नाही.
तुमच्याइतका निगरगट्ट, निर्लज्ज, स्वाभिमान नसलेला आणि खोटारडा माणूस मी जालावर आजतागायत पाहिलेला नाही
1 Nov 2020 - 10:23 am | साहना
`खरे` बोललात !
31 Oct 2020 - 9:40 am | मराठी_माणूस
लग्नासाठी धर्मांतर संबंधी एक बातमी पेपर च्या खालील पानावर
https://epaperdivyamarathi.bhaskar.com/nashik/247/31102020/0/-5/
31 Oct 2020 - 5:58 pm | धर्मराजमुटके
धर्मांतरणाबाबत अलाहाबाद न्यायालयानं एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे. केवळ विवाहासाठी धर्मांतरण वैध नाही, असा निर्णय अलाहाबाद न्यायालयानं शुक्रवारी एका याचिकेच्या सुनावणीदरम्यान दिला आहे. ही बातमी
1 Nov 2020 - 10:14 pm | एस
उपयुक्त लेख.
2 Nov 2020 - 1:28 pm | आनन्दा
तुमची प्रतिक्रिया वाचून आनंद झाला.. म्हणजे काहीवेळा एखाद्या माणसाबद्दल आपला काही पूर्वग्रह असतो, तो दूर झाला तर बरे वाटते, तसे काहीसे झाले.
असो.
2 Nov 2020 - 6:18 pm | गामा पैलवान
आनन्दा,
दिखाऊ आस्तिकापेक्षा प्रामाणिक नास्तिक केव्हाही अधिक स्वीकारार्ह असतो, असं विवेकानंद म्हणून गेलेत.
आ.न.,
-गा.पै.
3 Nov 2020 - 12:04 pm | आनन्दा
खरे आहे
3 Nov 2020 - 7:26 pm | निपा
शाकाहारि पन तसेच
- "तुम लाश खा रहे हो"
- चिकेन असेल तर सोबत बसु नको
- माझ्या मुलाला एग alergy आहे. मग शालेत कुनालच egg allowed नाहि
4 Nov 2020 - 8:18 pm | पिनाक
उपयुक्त माहिती:
Today I was called to help in a love-jihad case. In the last three months, this is the fourth or fifth such case.
I am writing this because it's very necessary to make parents aware of the risks children are facing.
1. Out of the five odd cases that have come to me, only one is what is known to be a 'lower' caste.
2. Girls are trapped at any age. One was a widow with two children. But all other girls were between 14 and 16 when the affair started.
3. In almost all cases, the boys take the girls out on bike rides. Girls are made to feel that this is 'freedom'.
4. The Muslim boys are trained to make the girls sexually aware. They then start by holding hands, giving a friendly hug, touching inappropriate places by 'mistake'. They then move on to kissing and physical relationship when the girl is in 10th or 12th and under educational stress.
Videos of their physical relationship is made secretly.
5. Most parents are unaware till it is too late.
6. Once parents come to know and try to break the relationship, either the girl is pressured to run away, or the girls are blackmailed to continue relationship by blackmailing them with videos of their physical relationship. Till this point, the girl is unaware that a video was made without her knowledge.
7. If the girl insists on breaking up, the boy will get his friends to force physical relationship with the girl with threat or blackmail. All the time, he will keep saying that he will marry the girl.
8. If parents interfere, the boy will stay away temporarily. Once the girl is 18, this starts again and this time the girl is completely trapped.
9. Mostly, marriage takes place. Girl is converted. For about six months, there are no problems. Then starts the torture. Continuous pregnancies and termination of pregnancies take place.
10. After two years, the boy will get married again to some other girl while remaining married to the first girl.
11. Now the first girl will definitely resist. To keep her in the marriage, she is raped by boy's father and brothers. Other women members of the family will beat the girl routinely.
12. Police and other family members (if still on talking terms) will counsel the girl to adjust and continue in the marriage.
13. In many cases, if the girl resists, she will be jailed inside the house without a mobile.
14. If she manages to run away, she will not get custody of the children or get only one child custody. The other child(ren) will remain with husband.
15. Even if court gives monthly maintenance, husband will never pay. It is an unusual marriage because girl will be converted only after marriage, NOT BEFORE. So she cannot claim right to husband's property. But boy can claim right to girl's parent's property as per Hindu customs!
16. Please enlighten your children of this Muslim menace called love jihad before it's too late.
*Share this with all non-Muslim parents.*
*Attention all non-Muslim parents:*
Today I was called to help in a love-jihad case. In the last three months, this is the fourth or fifth such case.
I am writing this because it's very necessary to make parents aware of the risks children are facing.
1. Out of the five odd cases that have come to me, only one is what is known to be a 'lower' caste.
2. Girls are trapped at any age. One was a widow with two children. But all other girls were between 14 and 16 when the affair started.
3. In almost all cases, the boys take the girls out on bike rides. Girls are made to feel that this is 'freedom'.
4. The Muslim boys are trained to make the girls sexually aware. They then start by holding hands, giving a friendly hug, touching inappropriate places by 'mistake'. They then move on to kissing and physical relationship when the girl is in 10th or 12th and under educational stress.
Videos of their physical relationship is made secretly.
5. Most parents are unaware till it is too late.
6. Once parents come to know and try to break the relationship, either the girl is pressured to run away, or the girls are blackmailed to continue relationship by blackmailing them with videos of their physical relationship. Till this point, the girl is unaware that a video was made without her knowledge.
7. If the girl insists on breaking up, the boy will get his friends to force physical relationship with the girl with threat or blackmail. All the time, he will keep saying that he will marry the girl.
8. If parents interfere, the boy will stay away temporarily. Once the girl is 18, this starts again and this time the girl is completely trapped.
9. Mostly, marriage takes place. Girl is converted. For about six months, there are no problems. Then starts the torture. Continuous pregnancies and termination of pregnancies take place.
10. After two years, the boy will get married again to some other girl while remaining married to the first girl.
11. Now the first girl will definitely resist. To keep her in the marriage, she is raped by boy's father and brothers. Other women members of the family will beat the girl routinely.
12. Police and other family members (if still on talking terms) will counsel the girl to adjust and continue in the marriage.
13. In many cases, if the girl resists, she will be jailed inside the house without a mobile.
14. If she manages to run away, she will not get custody of the children or get only one child custody. The other child(ren) will remain with husband.
15. Even if court gives monthly maintenance, husband will never pay. It is an unusual marriage because girl will be converted only after marriage, NOT BEFORE. So she cannot claim right to husband's property. But boy can claim right to girl's parent's property as per Hindu customs!
16. Please enlighten your children of this Muslim menace called love jihad before it's too late.
5 Nov 2020 - 3:05 pm | गणेशा
उपयुक्त लेख..
खुप दिवसांनी मिपावर आलो आणि हा लेख वाचुन छान वाटले..
वाचन खूण साठवली आहे
21 Nov 2020 - 1:06 pm | समीर वैद्य
https://www.esamskriti.com/e/National-Affairs/Ideas-ad-Policy/What-Every...