हिंदू मुस्लीम आंतरधर्मीय विवाह, परस्पर अविश्वासाची कारण मिमांसा, विश्वास प्रक्रियेची पुढील दिशा

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
28 Jun 2018 - 9:59 am
गाभा: 

लेख जरा घाइतच सेव्ह करतोय काही त्रुटी असू शकतात उगाच लगेच तुटून पडू नये. आणि घाइत का सेव्ह केला हा प्रश्न ही विचारु नये. हा केवळ पहिला भाग आहे दुसरा आणि तिसरा भाग लिहून झाल्या नंतरही लेख वाचला तरी चालेल.

अविश्वासाची कारण मिमांसा केल्या शिवाय विश्वासाच्या प्रक्रीयेस गती मिळणे कठीण असावे.
जून चालू घडामोडी धाग्यावर एका मिपा सदस्यने पुन्हा एकदा लव जिहाद या विषयावरची पोस्ट टाकली आहे. तसा हा विषय मिपावर एखाद दोनदा तरी परंपरावादी वि. पुरोगामी असा चघळून झाला असावा. एका बाजूस पुरोगाम्यांना हे कळत नाही की हिंदू मुस्लिम विवाह परंपरावाद्यांसाठी हा एक कल्चरल शॉक आणि प्रतिष्ठेचा विषय का असतो तर , दुसर्‍या बाजूस घटनाकारांनी भारतीय राज्यघटनेत असे आंतरधर्मीय विवाहाचे स्वातंत्र्य दिलेच कसे हे परंपरावाद्यांना कळत नसते. खरेतर मुस्लिम बहुसंख्य आहेत तिथे मुस्लिमेतर आपल्या मुलींच्या आंतरधर्मीय विवाह घडवले जाण्या बाबात काळजीत पडलेत हे समजता येते. पण जिथे मुस्लिमेतर लोकसंख्येने बहुसंख्य आहेत तिथेही मुस्लिमेतरच काळजीत दिसतात असे का होत असावे ? खरे म्हणजे अल्पसंख्य काळजीत असले पाहिजे तिथे बहुसंख्य काळजीत दिसतात हा विरोधाभास का असावा ?

हिंदू परंपरावाद्यांच्या बाजूने त्यांच्या भितीची सुरवात इतिहास काळापासून असल्याचे दिसेल. भारतात अक्रमण करणार्‍या तुरुकांनी आणि त्यांच्या वंशजांनी युद्धात यश मिळाल्या नंतर मुली पळवल्याचे प्रकार केले नसतीच आणि परंपरावाद्यां च्या मनातील बोचणीस काहीच आधार असणार नाही असे नसावे. इराक मधील याझिदी या मुस्लिमेतर अल्पसंख्यांक स्त्रीयांवर लैंगिक गुलामगिरी कशी लादली गेली याचा इतिहास अगदी ताजा म्हण्जे गेल्या दोन-चार वर्षातला आहे, त्यावरुन इतिहास काळाबद्दलचे हिंदू परंपरावादी बोचणीत तथ्य असू शकते की नाही याचा कुणाही सुज्ञ पुरोगाम्याने दुसर्‍या बाजूनेही विचार करुन पहाण्याची गरज असावी. तुम्ही भारतीय फाळणी पूर्व हिंदूत्ववादी संघर्षाचे साहित्य अभ्यासले तर हिंदूंच्या मुली पळवल्या जाताहेत हि उल्लेख पुन्हा पुन्हा दिसून येतात. त्याच वेळी मी जवाहरलाल नेहरुंची जी काही एखाद दोन पुस्तके वाचलीत ते ह्या विषयाला हात घालताना दिसत नाहीत. अशा जबरदस्तीने पळवून नेण्याच्या भिती ब्रिटीशोत्तर काळात कायदा व्यवस्थेची स्थिती सुधारल्या नंतर कमी होणे सहाजिक असावे. अशावेळी जे काही प्रेम विवाह होत त्यांनाही प्रतिष्ठेपोटी पळवून नेण्याच्या व्याख्येत सहजपणे खपवले जाणे सहाजिक असावे. दुसर्‍या बाजूला विधवा , परित्यक्ता पुर्नविवाहास अनुमती नसणे, विवाह करुन गेलेलीस धर्माबाहेर काढणे पण विवाहोत्सूकास धर्मात न स्विकारणे सारख्या अडचणींनी हिंदू धर्मीयांनी स्वतःस बांधून घेतले होते हे हिंदू धर्मीय परंपरावादी का कोण जाणे विसरत रहातात , या विषयावर हिंदू परंपरावाद्यांचे विचार बदलण्यात फार मोठा कालखंड निघून गेला. विधवा , परित्यक्ता पुर्नविवाहास अनुमती नसणे, विवाह करुन गेलेलीस धर्माबाहेर काढणे पण विवाहोत्सूकास धर्मात न स्विकारणे या सारख्या विषयावर गांधी नेहरुंसारख्यांनी आवाहने केली असती तरी अंधश्रद्धा आणि रुढींच्या बेड्यात अडकलेला अंधश्रद्ध समाज बदलण्याच्या स्थितीत होता का याची साशंकता वाटते.

एकीकडे विवाहसंबंधांच्या बाबत परस्पर अविश्वास तरीही भारताची घटना समिती बनताना तत्कालीन अप्रत्यक्ष निवडणूकीत काँग्रेसचा प्रभाव पडल्याने परंपरावादी दृष्टीकोणाचे प्रतिबिंब, घटना समिती आणि भारतीयय राज्यघटनेत पडण्यात अडचणी स्वाभाविक ठरतात. संदर्भ पृष्ठ ९४ परिच्छेद २रा तसे स्त्रीचे विवाहाबद्दलचे निवड-स्वातंत्र्य हिंदू आणि मुस्लीम या दोन्ही संस्कृतीचा आपापला अंतर्गत गाभा असणे अभिप्रेत असल्यामुळे तसेच तत्वतः अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुलभूत आधिकर म्हणून स्विकार केल्या नंतर विवहाबाबतचे स्वातंत्र्य भारतीय राज्यघटनेत नाकारण्यात पॉइंट नव्हता. पण परस्पर अविश्वास आणि असुरक्षिततेची भावना शिल्लक असताना राज्यघटना अंशतः व्यावहारीक (प्रॅग्मॅटीक) असावयास हवी होती का ? कि अविश्वास शिल्लक नसल्याप्रमाणे घटनासमितीने घटना बनवली ते श्रेयस्कर, जेव्हा दोन्ही समाजाची मने या विषयावर व्यवस्थीत जुळून येईल तेव्हा इतिहास बहुतेक घटना समितीने भविष्याचा विचार करुन योग्य घटना बनवली असे म्हणेलही, पण मधल्या काळाचे काय ?

घटनेने स्वातंत्र्य दिले तर मागच्या शतकाच्या उत्तरार्धात स्त्री शिक्षणाचे प्रमाण कमी होते, बाल किंवा तरुण नाबालिक वयातील विवाहाचे आणि पालकांनी विवाह निर्णय घेण्याचे प्रमाण मोठे होते. तरीही तारुण्याच्या उंबरठ्यावर एखाद्या मुलीने परजातीय अथवा परधर्मीय जोडीदारा सोबत निघून जाण्याचा प्रयत्न केलाच तर तीला कागदोपत्राम्च्या अभावी १८ वर्षापेक्षा मोठ्या मुलीसही १८ वर्षाच्या पेक्षा लहान दाखवून वापस आणून समजावले जात असे तरीही हातातून निसटले तर आपल्या घरी अशी स्त्री नव्हतीच असे समजून तीला विसरले जात होते.

इस्वीसन २००० येता येता जातीयतेची धार कमी झाली मुलीला किमान स्वतःच्या जातीतला कुणि आवडलेला नाही ना हे थोडेफार विचारले जायला लागले अर्थात जाती बाहेर आणि प्रेम विवाह अजूनही अवघड होते पण २००० नंतर किमान मोठ्या शहरातून हि बंधने ढिली होऊ लागली असावीत . शक्यतोवर जातीत कर नाही तर किमान धर्मात कर असा परंपरावादी दृष्टीकोणाची प्रगती होत असताना पुरोगामीत्वाने एकदा जात सोडायचा विचार केला की मुला मुली समोर, जात आणि धर्म यात फारसा फरक रहात नाही . २००० च्या काळानंतर मुलीचे वय १८ झालेले नाही हे कागदोपत्री शालेय अ‍ॅडमिशनची कागदपत्रे बर्थसर्टीफीकेटच नव्हे तर वैद्यकीय चाचण्यांनीही वयाची निश्चिती करणे कायद्यास अधिक सुलभ झाले. तसे परंपरेतील पालकांसमोरच्या साशंकता दाट झाल्या आणि त्या लव जिहाद नावाने व्यक्त होऊ लागल्या आहेत. पण पंचाईत अशी की १८ वर्षे वय झालेल्याम्चे कायदेशीर अधिकार डावलताही येत नाहीत.

काठी तुटूही नये आणि समस्याही सुटाव्यात यासाठी दिशा काय असाव्यात ? याची चर्चा पुढच्या भागात करेन . क्रॉस युवर फिंगर्स.

* हिंदू मुस्लीम आंतरधर्मीय विवाह, (२)
* हिंदू मुस्लीम आंतरधर्मीय विवाह, (३)

प्रतिक्रिया

रविकिरण फडके's picture

28 Jun 2018 - 2:23 pm | रविकिरण फडके

This comment is not a comment.
It is my query, why Roman to Devnagari transliteration not working on my laptop. (Ctrl+G does not help.)
Would be grateful for a useful response.
Thank you.

मराठी कथालेखक's picture

28 Jun 2018 - 3:42 pm | मराठी कथालेखक

Control + enter करुन बघा.

रविकिरण फडके's picture

28 Jun 2018 - 4:28 pm | रविकिरण फडके

Does not work.

क्रोम वापरात असाल तर उजवीकडे ऍड्रेस बार मध्ये एक लाल एक्स (क्रॉस) असलेला आयकॉन दिसेल.
त्याला टिचकी मारा, पॉप अप ओपन होईल.
त्यावर 'लोड अनसेफ स्क्रिप्ट' वर टिचकी मारा. मग पान रिफ्रेश होईल अँड यु आर गुड टू गो !!

कपिलमुनी's picture

28 Jun 2018 - 2:27 pm | कपिलमुनी

तुमची लेखनशैली अतिशय रटाळ आहे.

माहितगार's picture

28 Jun 2018 - 3:08 pm | माहितगार

__/|__ . बर्‍याचदा मते पटली तर लेखन शैली जुळवून घेतल्या जातात - मग हजारो वर्षापुर्वीचे ग्रंथ अक्षरही समजले नाही तरी डोक्यावर वाहीले जातात , मतांचे खंडण शक्य नसले तरी ही खुसपटे काढली जातात . कुणाला पटो न पटो मी माझ्या शैलीत परिवर्तन करत नाही. ज्यांना झेपेल त्यांनी घ्यावे बाकीच्यांनी सोडून द्यावे. मनमोकळ्या प्रतिसादासाठी धन्यवाद.

किंचितही त्रासदायक मताला आणि मतकर्त्याला नम्रपणे "कोलण्याची' शैली आवडली.

Rigidity साठी धन्यवाद. फ्लेक्झिबल असणं अवघड जातं हे मान्य आहे.

सिलेक्टिव्ह ऑडियन्ससाठी लिहीत रहा. सिलेक्टिव्ह लोकांच्या प्रतिसादाला प्रमाण मानून अचूक निष्कर्ष काढत रहा. असो.

राही's picture

28 Jun 2018 - 4:05 pm | राही

आपले प्रतिसाद फारच गोग्गोड होत आहेत बुवा. साखरेच्या इतक्या जाड थराखाली कडू गुटी जरी असलीच तरी ती कळावी कशी? पण टाळ्याच.
ता. क. हा प्रतिसाद प्रतिसादाला आहे.

उलट आमचे प्रतिसाद गोग्गोड, डिप्लोमॅटिक, मध्यममार्गी, सावध, कोणाला न दुखावणारे अतएव नॉन इफेक्टिव्ह असतात असं एक जनरल मत आहे. ते तोडायचा प्रयत्न आम्ही स्टेप बाय स्टेप करत असताना तुम्ही असा खोडा घालावा? ऊंह.. आमी नाई ज्जा.

किंचितही त्रासदायक मताला आणि मतकर्त्याला नम्रपणे "कोलण्याची' शैली आवडली.
Rigidity साठी धन्यवाद. फ्लेक्झिबल असणं अवघड जातं हे मान्य आहे.

सिलेक्टिव्ह ऑडियन्ससाठी लिहीत रहा. सिलेक्टिव्ह लोकांच्या प्रतिसादाला प्रमाण मानून अचूक निष्कर्ष काढत रहा. असो.

:) उलट लेख एका बाजू ने कलला कि -टार्गेट केले म्हणून दोन चार रडतात - पण धागा विषयाला धरुन चिक्कार प्रतिसाद येतात . त्यावेळी धागा लेखकाची शैली, लेखाची लांबी काही एक आड येत नाही. याच्या पुढच्या भागावर दुसर्‍या लेखावर प्रतिसाद यावयास लागले बघा. असे का होत असावे ?

हा लेख तसा रिलेटीव्हली समतोल साधतोय. साधा लव्ह जिहाद हा शब्दही वापरलेला नाही. समतोल साधलेले लेखन कदाचित रटाळ तरी होत असेल किंवा धागा लेखातील मुद्दा खोडण्याची सहज संधी गवसत नसेल.

वैचारीक लेखन प्रत्येकाला पटण्यासाठी आणि रंजकतेसाठी केलेले नसते. रटाळ असूही शकते पण ते आपल्यासाठी नाही समजावे आणि नमस्कार करावा.

अशाही मनमोकळ्या प्रतिसादांचे आभार मानतो पण धागा लेखतील एका वाक्यावर चर्चा केली तर अवांतर होत नाही. प्रतिसादातली टिका खटकत नाही. अवांतर अथवा मुद्दे न खोडता आल्याने चर्चेत तर सहभागी व्हायचे नाही , कुठेतरी व्याकरणाची चर्चा करुन टायमपसा करायचा अशासाठी मी लेखन केलेले नसते तेव्हा मी असे प्रतिसाद किती डोक्यावर घ्यावे ? :) असो.

कपिलमुनी's picture

28 Jun 2018 - 6:43 pm | कपिलमुनी

माझा प्रतिसाद केवळ लेखनशैलीबद्दल होता. कंटेंटबद्दल नव्हता.
डोक्यावर घेउ नका , फाट्यावर मारा , काहीपण करा. जे वाटले ते सांगितले.

चला कंटेंटला मारा गोळी, शीर्षक विषय पुरेसा स्पष्ट वाटल्यास तुमची मते मांडा.

मागाजी मुळात मुसलमान, शीवसेना, राज ठाकरे यांचा विषय निघाला की बरेच पोपट (मैनाही)तोंड उघडत नाहीत. लेखकाच्या चुका आवर्जून काढतील. मुसलमानांची भिस्त अजून मुल्ला मौलवींवरच आहे. हिंदूंनी पुरोहितशाही कोलून लावली आहे तसे मुस्लिमांना कधीच शक्य नाही. खाजगीत म्हणजे मुस्लिम व्यक्ति हजर नसताना आपण सर्वजण त्यांचा उल्लेख लांडे म्हणुनच करतो की नाही यातच सर्व आले.

गामा पैलवान's picture

29 Jun 2018 - 12:00 pm | गामा पैलवान

माहितगार,

काही मुद्द्यांवर भाष्य करेन म्हणतो.

१.

.... घटनाकारांनी भारतीय राज्यघटनेत असे आंतरधर्मीय विवाहाचे स्वातंत्र्य दिलेच कसे हे परंपरावाद्यांना कळत नसते.

भारतीय संविधानात अशी कुठलीही तरतूद नाही. किंबहुना घटना विवाहाबद्दल काहीच भाष्य करीत नाही.

२.

जिथे मुस्लिमेतर लोकसंख्येने बहुसंख्य आहेत तिथेही मुस्लिमेतरच काळजीत दिसतात असे का होत असावे ?

कारण की हिंदू मुस्लीम विवाह म्हणजे लव्ह जिहादच आहे. नवरा वा बायको कोणीही मुस्लिम असलं तरीही जोडप्यास व वारसदारास फक्त मुस्लिम कायदाच लागू होतो.

३.

दुसर्‍या बाजूला विधवा , परित्यक्ता पुर्नविवाहास अनुमती नसणे, विवाह करुन गेलेलीस धर्माबाहेर काढणे पण विवाहोत्सूकास धर्मात न स्विकारणे सारख्या अडचणींनी हिंदू धर्मीयांनी स्वतःस बांधून घेतले होते

यांपैकी विधवा व परित्यक्तांवरचे निर्बंध फक्त उच्चवर्णीयांत होते.

आ.न.,
-गा.पै.

माहितगार's picture

29 Jun 2018 - 12:49 pm | माहितगार

सुन्या सुन्या मैफलीत माझ्या आपले स्वागत असो :)

यांपैकी विधवा व परित्यक्तांवरचे निर्बंध फक्त उच्चवर्णीयांत होते.

महिला पळवून नेल्या जाण्याची भितीही उच्चवर्णीयात अधिक आढळते का. ते असू द्या ,विवाह करुन गेलेलीस धर्माबाहेर काढणे पण विवाहोत्सूकास धर्मात न स्विकारणे सारख्या अडचणींनी या दोन अडचणि स्विकाराल कि नाही .

कारण की हिंदू मुस्लीम विवाह म्हणजे लव्ह जिहादच आहे.

शब्दशः ठिकच आहे, एनी वे माझा या मालिकेतील ३ रा लेख लिहितोय त्यात यावर सविस्तर भाष्य करेन. पण विवाहोत्सूकास धर्मात स्विकारणे सारख्या गोष्टी करता येऊ शकतात असे वाटते. आर्य समाजी अशा घरवापसी विवाहास जरुर ते साहाय्य करत असावेत असे वाटते.

नवरा वा बायको कोणीही मुस्लिम असलं तरीही जोडप्यास व वारसदारास फक्त मुस्लिम कायदाच लागू होतो.

मी आपण मांडलेल्या मुद्द्या बाबत अनभिज्ञ आहे. या बाबत शक्यतोवर कायदा आणि न्यायालयीन निकालांचे (वृत्तपत्रीय नसलेले) सम्दर्भ देता येऊ शकतील का ?

पण मला वाटते घर वापसी करवली अथवा स्पेशल मॅरेज अ‍ॅक्ट वापरला तर आपण म्हणता तसे होण्याचे कारण नसावे. चुभूदेघे जाणकारांनी ससंदर्भ अधिक माहिती द्यावी.

भारतीय संविधानात अशी कुठलीही तरतूद नाही. किंबहुना घटना विवाहाबद्दल काहीच भाष्य करीत नाही.

विशेष तरतुदीची आवश्यकता काय, अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हटले कि त्यात बरेच काही आले नाही का ? आता कलम २१ चा विस्तार स्त्रीच्या निवडस्वातंत्र्याबद्दल झालेला अहे त्या बद्दल स्वातंत्र धागा लेख आहे त्यामुळे तुर्तास त्याची पुर्नावृत्ती टाळतो

चर्चा सहभागासाठी अनेक आभार

गामा पैलवान's picture

30 Jun 2018 - 2:03 am | गामा पैलवान

माहितगार,

१.

विवाह करुन गेलेलीस धर्माबाहेर काढणे पण विवाहोत्सूकास धर्मात न स्विकारणे सारख्या अडचणींनी या दोन अडचणि स्विकाराल कि नाही .

ही अडचण आहेच. त्यासाठी देवल स्मृती सारखी चळवळ राबवायला हवी. तिच्यात घरवापसीची प्रक्रिया वर्णिलेली आहे.

२.

या बाबत शक्यतोवर कायदा आणि न्यायालयीन निकालांचे (वृत्तपत्रीय नसलेले) सम्दर्भ देता येऊ शकतील का ?

मला नक्की कायदा माहित नाही, पण मिश्रधर्मीय विवाहांत एकजण मुस्लिम असेल तर वारसाहक्क इस्लामप्रमाणे राबवला जातो. Indian Succession Act वाचून पाहिला पाहिजे.

३.

विशेष तरतुदीची आवश्यकता काय, अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हटले कि त्यात बरेच काही आले नाही का ?

अभिव्यक्तीस्वातंत्र्याखाली विवाहाधिकार येत असेल तरीही हा अधिकार घटनेत स्वतंत्रपणे नमूद नाही. इतकंच सांगायचंय.

आ.न.,
-गा.पै.