हिंदू मुस्लीम आंतरधर्मीय विवाह, (३)

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
29 Jun 2018 - 4:18 pm
गाभा: 

एखादी ख्रिश्चन मुलगी प्रेमात पडून दुसर्‍या लग्नाची बायको म्हणून फसवली गेली तर तिला अशा प्रकारचे मार्गदर्शन ख्रिश्चन धर्मीयांनी उपलब्ध केलेले दिसते, असे मार्गद्रशन हिंदू मुलींसाठी उपलब्ध आहे का ?

हिंदू मुलगी आणि मुस्लिम मुलगा विवाह, लेखचर्चा मुख्यत्वे मुलीच्या कुटूंबीयांना समोर ठेऊन लिहिलीतरी मुलींनाही उपयोगी पडावी असा उद्देश्य आहे.

या मालेतील सर्वात आधी चर्चा केली ती हिंदू मुस्लीम आंतरधर्मीय विवाह, परस्पर अविश्वासाची कारण मिमांसा, याची पुढचे पाऊल सहाजिकपणे विश्वास प्रक्रियेची पुढील दिशा असणर. पण प्रत्यक्षात हिंदू मुस्लीम आंतरधर्मीय विवाह, परस्पर अविश्वासाची कारण मिमांसा, या धागाचर्चेत सहभाग कमी राहीला पण मालेतल्या पुढच्या लेखावर याच विषयावर चर्चा फिरली याचा अर्थ ह्या प्रश्नाचा गुंता समाजमनात खोलवर रुतलेला आहे. समाजमनाच्या विवीध बाजूंची दखल न घेताच त्याला नजरे आड करणे श्रेयस्कर वाटत नाही म्हणून हिंदू मुस्लीम आंतरधर्मीय विवाह, (२) मध्ये मुस्लीम मुलींना हिंदू तरुणांशी विवाहाच्या संधी आणि हिंदू कुटूंबात त्यांना सामावून घेण्याची चर्चा केली. सोबतच हिंदू-इस्लामिक सिंथेसिस बद्दल कुराण आणि हदिथ मधील कोणत्या चांगल्या गोष्टी हिंदू आणि भारतीय संस्कृतीस एकमनाने घेता येऊ शकतील ? हा धागा होताच त्याच्या सोबत हिंदोस्लाम, हिंदोस्लीम असा पंथ हिंदू धर्मांतर्गत असू शकतो का याचीही चर्चा केली आहे.

आता चर्चा हिंदू मुलगी आणि मुस्लिम मुलगा ह्या अधिक विवाद्य राहीलेल्या मुद्याकडे येऊ. या विषयावर येणारे आक्षेप/ दबाव दोन बाजूंनी येत असतात एक परंपरावादी सामाजिक दुसरा कौटूंबिक. आजकालचे तथाकथित पुरोगामी या परंपरावादी सामाजिक आणि कौटूंबिक आक्षेपांना मिया बिबी राजी तो क्या करेगा काझी या न्यायाने दुर्लक्षीत करु ईच्छैतात , ते वरवर ठिक वाटले तरी विवाहोत्सुक तरुण तरुणींना लिव्ह-इन असो वा विवाह करुन त्याच समाजात जगायचे असते. रोजच्या जगण्यासाठी दिवसा आड कौटूंबिक आणि सामाजिक आधार आणि स्विकार्यता लागते. शिवाय सामाजिक कौतूंबिक जमिनि खाली लाव्हा खदखदत राहीला तर केव्हा उसळी मारुन अंग भाजेल याची खात्री देता येत नाही. तेव्हा प्रत्येक पाऊल काळजी पुर्वक टाकणे श्रेयस्कर ठरावे.

मुस्लिम मुलाचा प्रस्ताव मुलीने पालकांकडे घेऊन येणे माझ्या प्रत्यक्ष पहाण्यात नाही पण जाती बाहेरही विवाहास संमती मिळणे/देणे कठीण असता सरळ धर्माबाहेरचा प्रस्ताव उर्वरीत कुटूंबीयांसाठी आश्चर्याचा धक्काही ठरु शकतो याची कल्पना करता येते. जर मुलगी कागदोपत्री १८ वर्षाची समजदार असेल आणि मुलगाही कायदेशीरर्‍ष्ट्या विवाहास पात्र असेल तर काही अपवाद सोडता सहसा मुस्लीम कुटूंबीयांना हिंदू मुलगी स्विकारण्यात फार मोठ्या अडचणी नसतात. लग्न करुन घरी आली आणि तिचे व्यवहार त्यांच्या धर्माशी लगेच जुळले नाही तरी तिचे घरातील व्यवहार तात्पुरते पडद्या आड ठेवणे पडदा पद्धतम्मुळे सहाजिक सोपे जाते. त्यात सहसा हिंदू समाज आणि मुलीचे कुटूंब ती परधर्मात विवाह करुन गेली की ती नसल्यात गृहीत धरण्याचेही प्रमाण बरेच असते त्यामुळे अशा मुलींना एकदा माहेरुन सपोर्ट मिळणे कठीण असणार आहे म्हटले की काळाच्या ओघात मुस्लिम सामाजिक दबावांपुढे शरण जाण्या शिवाय तिला मार्ग नसतो . मागे फिरण्याचे मार्ग सहसा बंद झालेले असतात. परिस्थिती अशी एकतर्फी हाताळता येणे जेव्हा मुस्लिम समुदायाला सोपे जात असते त्याच वेळी बहुसंख्य हिंदू समाजात अशा विवहांच्या अप्रियतेस वाढ होत असते. काल पर्यंत हसती बागडती मुलगी अचानक पडद्या आड गायब झालेली असते. तिने पडदा स्वेच्छेने स्विकारला तरीही तिचे सामाजिक पर्यावरणातून असे अचानक गायब होणे उर्वरीत हिंदू समाजास खुपणे स्वाभाविक असते, त्याचे रुपांतरण कुटूंबाच्या दुख्खात आणि प्रतिष्ठेच्या प्रश्नात होते. त्यामुळे असे प्रस्ताव मुलगी घेऊन आली तर तिचे कुटूंब पॅनिक मोड मध्ये जात असेल हे स्वाभाविक असले तरी पॅनिक मोड मध्ये जाणे सर्वोत्तम मार्ग आहे का या बद्दल साशंकता वाटते. कारण आजच्या काळात १८ वर्षेवयाच्या झालेल्या मुलींना थांबवण्यासाठी कायद्याचा आधार नाही , जो काही निर्णय आहे तो संवाद साधून गोडी गुलाबीने करावा हे अधिक श्रेयस्कर असे माझे व्यक्तिगत मत.

एखादे प्रेम खरोखरही प्रेम असू शकते त्यावर लव्ह जिहदचा शिक्का मारण्याची अथवा प्रतिष्ठेचा प्रश्न बनवण्या पेक्षा, जर पॅनिक न होता क्लिअरपणे पहाता आले तर अशा मुलींच्या भविष्याची काळजी अधिक नेमकेपणाने घेता येऊ शकेल तिला अधिक व्यवस्थीत मार्गदर्शन करता येऊ शकेल असे वाटते. तुम्ही एका हिंदू मुलाच्या योग्या योग्यतेचा माहिती काढण्यची खात्री करण्याची जशी काळजी घेता - आरोग्य चाचण्या करवून घेता - तशीच माहिती काढणे आणि खात्री करण्याची काळजी मुस्लीम मुलांबाबतही घेतली पाहीजे तशीच काळजी तुम्ही मुस्लीम मुलांसोबत घेत आहात हे मुलीच्या लक्षात आणून देणे श्रेयस्कर.

आजच्या काळात मुलाचा धर्म कोणताही असो मुलीच्या दिर्घकालीन आर्थीक स्थैर्यासाठी नौकरी करण्याची परवानगी देणारे संशयी स्वभावाचे नसलेले पती आणि कुटूंब बघून देणे श्रेयस्कर असावे. खास करुन परजातीय / पर धर्मीय विवाह होत असेल तर दीर्घकालीन पुरेशा आर्थीक स्वायत्ततेची काळजी आधी पासून घेतलेली चांगली.

त्या नंतर धर्म विषयक प्रश्नाची चिकित्सा करुन घ्यावी. आजकलच्या तरुणांना स्वतःच्या धर्मातीलही पुरेशी माहिती नसते अथवा केवळ उदार बाजूची माहिती असते. कोणताही धर्म त्याची सोज्वळ बाजू मांडण्याचे काम उदार मतवाद्यांनी व्यवस्थीत बजावलेले असते पण सामाजिक व्यवहारांवर संकुचित मते बाळगणार्‍या परंपरावाद्यांचा प्रत्यक्ष प्रभाव फार मोठा असू शकतो. मुलिस मुंबई पुण्यासारख्या मेट्रोपॉलीटन शहरात पॉश कॉस्मोपॉलीटन एरीयात स्वतःच्या स्वतंत्र फ्लॅटची व्यवस्था होत असेल तर फारश्या अडचणी यावयास नको. पण वरीलप्रमाणे निवासाची व्यवस्था नसेल तर सर्व साधारण मध्यमवर्गीय किंवा निम्नस्तरीय वस्त्यांमधून कधी गंभीर न वाटणार्र्या गोष्टीत धर्म हा विषय मध्ये येऊ शकतो. तुमची मुलगी तिच्या स्वतःसाठी अथवा तिच्या भावी मुलींसाठी खेळ , अभिनय, नाट्य, चित्रकला, मुर्तीकला, नृत्यकला संगित गायन, असे कला गुण जोपासू इच्छित असेल तर किंवा मुर्तीपुजेत आणि भारतीय सणातील परंपरा पाळू इच्छित असेल तर मध्यमवर्गीय अथवा निम्नस्तरीय मुस्लिम वस्तीतील जिवन निरस आणि कठीण ठरू शकते. आधी एकदम वेस्टर्न वळणाची मॉडर्न मुस्लीम सोसायटी काळाच्या ओघात अचानक परंपरावादी विचाराम्नी गुरफटली जाऊ शकते आणि त्याचे मुलीच्या स्वत :च्या आणि तिच्या भावी पिढीच्या जिवनावर परिणाम होऊ शकतात हे लक्शात आणून देणे श्रेयस्कर असावे.

तुमच्यासाठी पालक म्हणून तिचे आणि तिच्या भावी पिढीचे भवितव्यच तुमच्या व्यक्तिगत प्रतिष्ठेपेक्षा मोठे आहे असे तिला जाणवले पाहीजे. त्यामुळे धर्माचा किंवा सांस्कृतिक मुद्दा मुख्य नसला तरी महत्वाचा असू शकतो हे तिच्या लक्षात आणून दिले पाहिजे. त्याही पुर्वी 'तो मी नव्हेच' नाटकातल्या सारखे केवळ आर्थीक फसवणूक करण्यासाठी प्रेमाची नाटके करणारी 'तो मी नव्हेच' वाली उदाहरणे जशी हिंदू धर्मीयात असू शकतात तसे फसवणारे मुस्लिमातही असू शकतात (आणि अशा काही फसवणूक करणार्‍यांमुळे सुद्धा धार्मिक विवाद मागच्या बाजूने नंताच्या काळात चिघळत राहू शकतात) .

शिक्षण नौकरी बद्दल चौकशीची काळजी घ्यालच पण त्या सोबत त्याचा आधी विवाह झालेला आहे कि नाही हे ठरवणे कठीण असते. त्या दृष्टीने काही इंग्रजी वृत्तपत्रंसोबतच तो राहिलेल्या भागातील मोठ्या वृत्तपत्रातूनही जाहीराती देऊन मुलगा अविवाहीत असल्याची खात्री करुन घेतली पाहिजे , मुस्लिम विवाहांची नोंद करणार्‍या काझींकडून तुमचा वकील सर्च रिपोर्ट आणू शकतो का ते ही पहावे. विवाहीताशी विवाह करण्याचा तुमच्या मुलीचा हट्ट असेल तर -मला वाटत नाहि सहसा कोणी हिंदू मुलगी यास तयार होईल- त्याच्या प्लस आणि मायनस बाजू लक्षात आणून दिल्या पाहिजेत. जगात आज भारत वगळता कोणत्याही मुस्लीम देशात सुद्धा पहिल्या पत्नीची लेखी अनुमती घेतल्या शिवाय दुसर्‍या स्त्रीशी विवाह करता येत नाही मग आधीच्या पत्नीची भारतात तुम्ही सुद्धा लेखी अनुमतीची मागणी करण्यास हरकत नसावी.

मुलगा हिंदू धर्म स्विकारण्यास तयार झाला तर तुमची अर्धी चिंता तशी ही मिटते, आर्य समाज सहसा घरवापसीत आणि सुटसुटीत हिंदू विवाहात सहसा सहज मदत करतो असे ऐकुन आहे चुभूदेघे. दुसरा मार्ग म्हणजे स्पेशल मॅरेज अ‍ॅक्टचा सहारा घेणे हे कायदे वकीलाकडून माहित करुन घेणे आणि वापरणे श्रेयस्कर असावे. पण आजही धर्म बदलण्याचे दबाव सहसा मुलींनाच झेलावे लागतात . प्रेमात आंधळे झाल्या नंतर बर्‍याचदा बर्‍या सोबत वाईटही स्विकारण्याची मानसिक तयारी झालेली असते. त्यामुळे विवाहपूर्व मुस्लिम धर्म स्विकारण्याचा मुलगी विचार करत असेल तर मुस्लिम विवाह कायदा आणि प्रॉपर्टी कायदे निटसमजून घेणे अत्यंत गरजेचे असावे.

मुस्लिम विवाह मुख्यतः काँट्रॅक्ट आहे त्यात मुलीकडच्यांना आणि मुलिस हव्या त्या अटी लग्ना आधीच अती दिर्घकालीन विचार करुन टाकाव्या लागतात . हे काँट्रॅक्ट बनवताना चुकले किंवा काही राहून गेले तर मोठे नुकसान होऊ शकते. प्रगतीशील मुस्लिम महिलांनी काही मॅरेज काँट्रॅक्टचे प्रकार मुस्लिम स्त्रीयांसाठी उपलब्ध करुन ठेवले आहेत, मुळच्या हिंदू स्त्रीयांच्या गरजा लक्षात घेऊन असे तयार आदर्श करार उपलब्ध असण्याची गरज असावी. या काँट्रॅक्ट्स मध्ये लग्न करतानाच मुलास प्रॉपर्टी राईट्स मागता येतात आणि मागितलेले चांगची, मुलगा कट्टर असेल तर इंश्युरन्ससाठी तयार होणार नाही (कट्टरतेच्या अडचणी अशा ठिकानी येऊ शकतात) पण भावी इंश्युरन्स पॉलीसी विवाहावेळी काढून मुलांच्या शिक्षणाची तरतूद करणारा आणि विनिमय आधिकार मुलीकडे देण्यास तयार आहे का पहावे म्हणजे चुकून घटस्फोट झालेच तर भावी पिढिस इंश्युरन्स आणि प्रॉपर्टीचे संरक्षण आहे हे पहाणे उत्तम त्या शिवाय घटस्फोट झाल्यास मुस्लीम मुलाम्नी एकरकमी विवाहकरारात ठरवलेले पैसे देणे अभिप्रेत असते त्यासाठी बर्‍या पैकी मोठी रक्कम करारात असावी, मुस्लीम धर्मातील विवाह करारार भावना नाही शुद्ध व्यवहार पहायचा असतो तसा तो पहाण्यास माए पुढे न पहाणे श्रेयस्कर. माझी हि माहिती चुकीची असू शकते त्यासाठी करार अनुभवी वकिलाच्या साहाय्याने करावा. आणि कराराची व्यवस्थीत रजिस्ट्रीत नोंद करावी. (चुभूदेघे उत्तरदायीत्वास नकार लागू)

त्या नंतर मुली साठी पुर्नविवाहात पुढाकार घेणारी मंडळे विवाहापुर्वीच पाहून ठेवावीत. तलाक कायद्यात भारत सरकार काही बदल करणार असले तरी बदल झाल्यावरही मुस्लिमात कायदेशी दृष्ट्या तलाक प्रकरण अत्यंत फ्रॅजाईल असते. येती काही दशके तरी ते तसेच रहाण्याची शक्यता गृहीत धरणे श्रेयस्कर असावे. त्यांच्याकडे तलाकपिडीतेस माहेरी जावे लागते अथवा वार्‍यावर हेच वास्तव असावे, त्यामुळे तलाक झाला तर तिला तिची नौकरी असणे आणि पुर्नविवाहाची आधीपासून मानसिक तयारी असणे उत्तम असे माझे ऐकिव व्यक्तिगत मत आहे.

या सर्वाचा अर्थ मी मुस्लीम कायद्याने विवाहाचे समर्थन करतो असा मुळीच नाही . दहा मुस्लीम मुलींनी हिंदू मुलांशी हिंदू मुलांचा धर्म न बदलता विवाह केले तर एका हिंदू मुलीने मुस्लिम मुलाशी विवाह करणे लोकसंख्येच्या प्रोपोर्शन मध्ये बसते अन्य स्थिती म्हनजे सद्य स्थितीत अन इक्वल ट्रीटमेम्टच्या हिंदुत्ववादी चिंता पुर्णतः अनाठायी नाहीत हे अश्या विवाहास तयार होणार्‍या जोडप्यांनी लक्षात घेऊन मुस्लीम मुलीं नाही हिंदू मुलांशी -हिंदू मुलाम्चे धर्म न बदलता - विवाहाच्या संधी मोठ्या प्रमाणात मिळाल्या पाहिजेत ह्या भावनेशी मला सहमत व्हावेसे वाटते.

सत्य सांगायचे तर मुस्लिम समर्थक पुरोगाम्यांनी मुस्लिम धर्म आणि विवाह पद्धतीचे किती गोडवे गायले तरी सांस्कृतीक स्वातंत्र्याच्या आणि संपन्नतेच्या बाबतीत सध्याच्या स्थितीतला मुस्लिम धर्म हिंदू संस्कृतीशी कोणतीही बरोबरी करू शकत नाही हे नक्की, स्वातंत्र्य हे बर्‍याचदा नोशनल असते आपण रोजच स्वातंत्र्य वापरत असतो असे नाही पण जेव्हा हवे असते तेव्हाची मानसिक घुसमट शारिरीक गुदमरण्या पेक्षा वेदना दायी असू शकते. ज्यांनी आकाशात भरारी घेण्याचा अनुभव घेतलाच नाही त्यांना सोन्याच्या पिंजर्‍याचेही कौतुक वाटू शकते पण ज्यांना अवकाशात मुक्त भरारी घ्यायची सवय आहे त्यांनी आपले आणि आपल्या भवी पिढ्यांचे सांस्कृतिक स्वातंत्र्य अंधःकाराच्या दावणीला न बांधता डोळसपणे निर्णय घेणे उत्तम.

काही हजार वर्षे उत्क्रांत होऊत तयर झालेल्या संस्कृतीची जागा दिडएक हजारवर्षापुर्वी तयार झालेली ट्रायबल संस्कृती निर्मित धर्म घेऊ शकत नाही या बद्दल पूर्ण विश्वास आहेच तरीही हिंदू धर्म मुलतः उदार आहे तेव्हा मुस्लिम धर्मातील चांगल्या गोष्टी हिंदू धर्मातही वापरण्यास मिळाल्यास मुस्लिम धर्माचे आकर्षण शिल्लक रहावयास नको म्हणून कुराण आणि हदिथ मधील कोणत्या चांगल्या गोष्टी हिंदू आणि भारतीय संस्कृतीस एकमनाने घेता येऊ शकतील ? हा धागा आहेच पण तरीही जरासे अधिक मुस्लिम व्हावे वाटले तर हिंदोस्लाम, हिंदोस्लीम पंथ चर्चा केली आहे ज्या मार्गे तुमच्या भावी पिढ्या संस्कृती आणि देशप्रेमी म्हणून गौरवल्या जाऊ शकतील.

सर्व लोक सुखी होवोत , सर्वांचे कल्याण होवो हिच शुभेच्छा.

*** *** ***
* धर्मांतरे का होतात ? या एका धागा चर्चेतील माझे दोन प्रतिसाद ,

* आंतरधर्मीय विवाहांना सबसिडी धाग्यातील माझे काही प्रतिसाद :