आंतरधर्मीय विवाह करताना : स्त्री दृष्टिकोन
महत्वाची सूचना :
लेखिका स्वतः वकील नाही आणि त्यामुळे खालील लेख निव्वळ मनोरंजनात्मक माहिती म्हणून वाचावा. ह्या लेखांत कायदेशीर सल्ला देण्याचा प्रयत्न केला गेलेला नाही. तुम्ही अश्या प्रकारच्या एखाद्या परिस्थितींत असाल तर तुम्ही एखाद्या योग्य वकिलाचा कायदेशीर सल्ला घ्यावा.
इंग्रजी भाषेंतून एक छान लेख खऱ्या वकिलांनी लिहिला आहे तो तुम्ही वाचू शकता : https://www.esamskriti.com/e/National-Affairs/Ideas-ad-Policy/What-Every-Hindu-Girl-Marrying-A-Muslim-Should-Know,-Marriage-Laws-In-India-1.aspx
गाडी कोणती घ्यावी ह्यावर लोक हजार सल्ले देतील. स्वदेशी म्हणून टाटा घ्यावी इथपासून, सायकल चालवणे केंव्हाही उत्तम अश्या प्रकारचे सल्ले ऐकायला मिळतील पण शेवटी पैसे तुमचे, गाडी पार्किंग जागा तुमची, पेट्रोल तुमच्या पैश्यांचे आणि सर्व्हिसिंग चे पैसे सुद्धा तुमचेच असल्याने गाडी नेहमी आपल्याला पाहिजे तीच घ्यावी. त्याच वेळी इतरांचे अनुभव, खरी किंमत, इत्यादी गोष्टी समजून घेण्याची जबाबदारी सुद्धा तुमचीच आहे.
विवाह हे प्रकरण सुद्धा असेच आहे, राजकीयमी धार्मिक किंवा जातीय दृष्टिकोनातून लोक सल्ले देत असतील तरी, जीवन तुमचे असल्याने निर्णय घेण्याचा १००% अधिकार सुद्धा तुमचाच आहे. हा अधिकार नैसर्गिक अधिकार असून कायदा काय किंवा समाज काय कोणीही तुम्हाला इथे जबरदस्ती करू शकत नाही. पण एकदा विवाह केला कि समाज आणि कायद्याचे नियम तुम्हाला लागू होतात त्यामुळे हे सर्व समजून घेऊनच आपला निर्णय घ्यावा. अंडी शाकाहारी आहेत कि मांसाहारी हा विचार आम्लेट करण्याच्या आधी करावा लागतो, नंतर नाही.
हा लेख स्त्रियांसाठी आहे. पुरुषांनी वाचले तरी चालेल. वाचणे सोपे व्हावे ह्यासाठी प्रश्नोत्तराच्या स्वरूपांत इथे मांडले आहे.
अनुष्का आधुनिक स्त्री आहे. इंजिनीअरिंग आणि MBA करून पुणे इथे मोठ्या कंपनीत चांगल्या कामाला आहे. ब्राह्मण हिंदू परिवारांत वाढलेली असली तरी पुढारलेल्या विचारांची युवती आहे. आई वडील लग्नासाठी मागे लागले आहेत पण अनुष्काला आपल्या कंपनीतील झाएद पसंद आहे. घराच्या लोकांच्या विरोधांत जाऊन झाएद शी लग्न करायची तिची तयारी आहे. झाएद च्या अम्मी अब्बूना सुद्धा अनुष्का पसंद असून ते सुद्धा पुढारलेल्या विचारांचे आहेत. अम्मी बुरखा वगैरे घालत असली तरी अनुष्काला आपला धर्म पालन करण्याची त्यांची संपूर्ण मुभा आहे. फक्त नातेवाईकांच्या समाधानासाठी लग्न निकाह पद्धतीने करावे असे त्यांचे मत आहे.
अनुष्का बुद्धिवान आहे त्यामुळे काहीही निर्णय घाईत घेण्याच्या आधी तिने ऍडव्होकेट पेन्सिलवाला ह्यांच्याशी कायदेशीर सल्ला मसलत करण्याचा निर्णय घेतला. पेन्सिलवाला हे पारसी असून धार्मिक किंवा जातीय पूर्वग्रह नसताना योग्य तो कायदेशीर सल्ला देतील असे तिला वाटले.
अनुष्का : वकील साहेब , झाएद शी मला लग्न करायचे आहे. पण ह्याला घरच्यांचा विरोध आहे. लग्न झाल्यानंतर झाएद चा मुस्लिम परिवार मला योग्य पद्धतीने वागवणार नाही, असे त्यांचे म्हणणे आहे तसेच भारतातील लग्नविषयक कायदा मुस्लिम लोकांच्या महिलांसाठी चांगला नाही असे माझे वडील म्हणाले. मला सत्य जाणून घ्यायचे आहे. तुम्ही मला सांगा कि झाएद शी लग्न करण्यासाठी कायद्याच्या दृष्टीने काही अडचण आहे का ?
पेन्सिलवाला :
तू हिंदू आहेस आणि झाएद मुस्लिम. अश्या सिच्युएशन मध्ये तुम्ही तीन प्रकारे लग्न करू शकता. (गोवा सोडून इतर कुठेही भारतांत).
१. SMA (स्पेशल मॅरेज ऍक्ट) द्वारे जिथे तुला आणि झाएदला सामान अधिकार असतील. SMA द्वारे लग्न करण्यासाठी तुम्हाला एक वकील घेऊन आपले लग्न रजिस्टर करावे लागेल. त्यानंतर तुम्ही कायदेशीर दृष्टीने पती पत्नी बनाल. त्याशिवाय तुम्ही औपचारिक स्वरूपांत काहीही लग्नसमारंभ केला तरी फरक पडत नाही. कायदेशीर दृष्ट्या तू हिंदू आणि झाएद मुस्लिम म्हणून आपले जीवन व्यतीत करू शकाल.
२. तू इस्लाम कबुल केलास तर तू मुस्लिम खाजगी कायद्या नुसार निकाह करू शकतेस. इथे तुला आपला धर्म बदल करावा लागेल, आपले नाव बदलावे लागेल आणि तुमच्या लग्नाला भविष्यांत इस्लामिक कायदा लागू होईल.
३. झाएद हिंदू धर्म कबुल करू शकतो आणि तुम्ही दोघे हिंदू विवाह कायद्याप्रमाणे लग्न करू शकता. भविष्यांत तुमच्या लग्नाला हिंदू विवाह कायदा लागू होईल.
अनुष्का : समजा मी ह्यातील एक पर्याय निवडला पण भविष्यांत मला दुसरा कायद्याप्रमाणे चालायचे असेल तर तसे चालेल का ?
नाही. विवाह ज्या कायद्याप्रमाणे झाला आहे त्याच कायद्याप्रमाणे भविष्यांत तुला न्याय मिळेल. लक्षांत घे कि कायदा आणि लग्न ह्यांचा संबंध खालील गोष्टीं येतो.
- लग्न करून संबंधांना सरकार आणि समाजाची मान्यता मिळवणे.
- मुले जन्माला घालून मुलांवर आपला हक्क सिद्ध करणे.
- दुर्दैवाने कुणाचा मृत्यू झाला तर कायद्याप्रमाणे इन्शुरन्स, वारसा हक्क इत्यादी मिळवणे.
- दुर्दैवाने लग्न टिकले नाही तर कायद्याने घटस्फोट मिळवणे तसेच त्यातून आपले आर्थिक, वैयक्तिक आणि मुलांवरचे हक्क सुरक्षित करणे.
नवीन लग्न करणारे कुठलेही जोडपे आपल्या जोडीदाराचा मृत्यू किंवा घटस्फोट ह्या विषयांवर विचार करू इच्छित नाही. पण स्वानुभवाने सांगतो कि "a stich in time saves nine". निर्णय १००% तुझा असला तरी वकील म्हणून सांगणे माझे कर्तव्य आहे कि सर्व गोष्टींचा विचार करून तू निर्णय घे.
अनुष्का: मला ह्यावर खरेतर विचार करावासा वाटत नाही पण तुम्ही म्हटल्याप्रमाणे भावना बाजूला ठेवून विचारते. समजा मला घटस्फोट घ्यावासा वाटला तर निकाह, हिंदू विवाह आणि SMA ह्यांत काय फरक आहे.
पेन्सिलवाला :
हिंदू विवाह आणि SMA कायदे वेगळे असले तरी घटस्फोटाच्या दृष्टिकोनातून खुपश्या प्रमाणात समान आहेत. विवाह विस्च्छेद करण्यासाठी तुम्हा दोघांना आपआपला वकील निवडून फॅमिली कोर्टांत जावे लागेल.
तिथे कायद्याप्रमाणे न्यायाधीश मुलांचा मालकीहक्क, वारसा हक्क, आर्थिक मोबदला (पोटगी) इत्यादी गोष्टी कायद्याप्रमाणे आणि बहुतेक वेळा पतीच्या आर्थिक स्थितीला पाहून ठरवतील.
३० वर्षांच्या माझ्या अनुभवावरून इथे कायदा आणि न्यायाधीश महिलेला जास्त सहानुभूती दाखवतात.
निकाह पद्धती फार वेगळी आहे. निकाह करताना निकाहनामा ठरवला जातो आणि मौलवी तो वाचतात. हा एक प्रकारचा करार असतो. तुमचा घटस्फोट, मालकी हक्क इत्यादी गोष्टी ह्या करारनामा प्रमाणे असतात.
निव्वळ तात्विक दृष्टिकोनातून झाएद आणि तू आधी करारनामातील विविध कलमे ठरवू शकतात पण नाव दाम्पत्य एका खोलीत बसून एकमेकांच्या मृत्यूनंतर फ्लॅट कुणाचा होईल अश्या प्रकारच्या गोष्टी बोलतील ह्याची शक्यता कमीच आहे.
त्यामुळे करारनामा हा बहुतेक वेळा मौलवी लोक ठरवतात आणि तिथे समाजाच्या दबावाने सर्वाना तो मान्य करावा लागतो.
अनुष्का : म्हणजे SMA मध्ये माझे आणि पतीचे हक्क हे सर्वज्ञात कायद्याप्रमाणे आहेत तर निकाह पद्धतीत हे मौलवींच्या निकाहनामा प्रमाणे ठरतील ?
पेन्सिलवाला : हो, विशेषतः पोटगी, घटस्फोट ह्याविषयांत निकाहनामा महत्वाचा आहे पण त्याशिवाय निकाह हा शरिया पद्धतीने होत असल्याने शरिया कायद्यातील हक्क सुद्धा तुम्हा दोघांना लागू होतात.
अनुष्का : शरिया पद्धतीत माझे आणि माझ्या पतीचे हक्क काय ?
पेन्सिलवाला : शरिया म्हणजे इस्लामिक कायदा. शरिया ची कलमे प्रत्येक इस्लामिक समुदायांत वेगळी असतात आणि विविध फतव्यांवर आधारित असतात. पण सर्वांत महत्वाचे मुद्दे इथे सांगतो. बहुतेक आंतरधर्मीय विवाहांत हेच महत्वाचे आहेत.
- झाएद ला तुझ्या व्यतिरिक्त आणखीन ३ पत्नी करण्याचा अधिकार आहे. झाएद ने आणखीन निकाह केले तर त्याला विरोध करण्याचा अधिकार तुला नाही. अर्थांत तुझा झाएद असे करणार नाही असे तुला वाटेल पण काही वेळा पुरुष ह्या अधिकाराचा वापर करतात. कधी कधी समाजाच्या दबावाखाली सुद्धा पुरुषांना आणखीन लग्नें करावी लागतात उदाहरण म्हणजे समजा नातलगांतील एखादी युवती भरकटली किंवा अकाली विधवा झाली तर काही पुरुष तिला दुसरी पत्नी म्हणून आधार देतात. असे झाले तर तुला त्याचा विरोध करण्याचा कायदेशीर अधिकार नाही.
- The Dissolution of Muslim Marriages Act, 1939 प्रमाणे तुला घटस्फोट मागण्याचा अधिकार आहे. त्यासाठी नक्की कोणती कारणे तू देऊ शकशील हे तू तिथे वाचू शकते. पण त्याच वेळी पुरुष मात्र तुला तलाक अगदी सहज पणे देऊ शकतो. आजकाल तात्काळ तलाक सरकारने बे कायदेशीर ठरवला आहे तरी सुद्धा पुरुष तलाक सहज पणे देऊ शकतो. एकदा पुरुषाने तलाक दिला कि तो ९० दिवसांत किंवा पत्नीच्या तीन मासिक पाळी नंतर लागू होतो. ह्या दरम्यान पुरुष आपले मन बदलू शकतो. त्याशिवाय पत्नी गरोदर असली तर मूल जन्मे पर्यंत तलाक लागू होत नाही.
- एकदा तलाक लागू झाला कि कायदेशीर पद्धतीने विवाह विच्छेद झाला असे आपण समजू शकतो आणि पत्नी दुसरा विवाह करण्यास मोकळी होते. पण समजा तलाक नंतर दोघा पती पत्नींना पुन्हा एकत्र यावे असे वाटले तर मात्र पद्धत थोडी विचित्र आहे. इस्लामिक कायद्याप्रमाणे पत्नीने आणखीन कुणाबरोबर निकाह करून शरीर संबंध ठेवल्याशिवाय पुन्हा जुन्या पतीबरोबर ती निकाह करू शकत नाही. त्यामुळे इथे पत्नीला तात्पुरते का होईना पण कुणा इतर पुरुषाबरोबर निकाह करून शरीर संबंध करावा लागेल.
अनुष्का : आणि वारसा हक्क ?
पेन्सिलवाला : तुम्हाला मुले असतील तर तुला तुझ्या संपत्तीतील १/८ वा भाग मिळेल. मुले नसतील तर १/४ भाग. त्याशिवाय मुलीला मुलाच्या अर्धा भागच मिळतो. पण हे सर्व होण्यासाठी आधी धर्मांतरण करून नंतर निकाह करणे आवश्यक आहे. आधी निकाह आणि नंतर धर्मांतरं केले किंवा धर्मांतरण न करता निकाह केला तर कायद्याने ह्या निकाह ला इस्लामिक निकाह मानला जात नाही.
अनुष्का : तर मग हिंदू किंवा SMA प्रमाणे वारसा हक्क कसा असतो ?
पेन्सिलवाला: हिंदू कायद्याप्रमाणे झाएद जर हिंदू झाला तर तुम्हाला हिंदू वारसाहक्क मिळेल. त्याच्या अंतर्गत पत्नीला पतीच्या सर्व संपत्तीत समान वाटा मिळतो त्याशिवाक एकत्र कुटुंब पद्धतीत घराचा सुद्धा भाग मिळतो. पण इथे झाएदला हिंदू बनावे लागेल.
SMA अंतर्गत लग्न केले तर तुम्हाला धर्मांतरं करायची गरज नाही पण वारसा हक्काच्या दृष्टीने झाएद इथे मुस्लिम ठरत नाही आणि पत्नीला पतीच्या समान अधिकार मिळतो. पतीचा मृत्यू झाला तर पत्नी क्लास १ वारसदार ठरते.
अनुष्का : तर मग वकील साहेब, मी तुमची अशील आहे तर त्या नात्याने मी तुमचा सल्ला विचारला तर तुमचा सल्ला काय असेल ?
पेन्सिलवाला: अनुष्का, निर्णय घेताना ट्रेड ऑफ असर्वांत महत्वाचे. तुझ्यासारख्या आधुनिक स्त्रीने आपले निर्णय नेहमी स्वतःच घ्यावेत आणि जेंव्हा चांगले निर्णय घेतील आणि त्यांचे जीवन सुखाचे होईल तेंव्हा आपोआप पुढील पिढीला सुद्धा योग्य precedent मिळेल. मी तुला ट्रेड ऑफ सांगू शकतो पण निर्णय हा तुझाच असायला पाहिजे. हा प्रश्न तुझ्या संपूर्ण आयुष्याचा असल्याने इथे तू झाएद, तुझे आई वडील, मित्र इत्यादींशी सुद्धा विचार विनिमय केला तर हरकत नाही.
ट्रेड ऑफ खालील प्रकारे आहेत.
- समजा तू जो काही निर्णय घेशील त्याला झाएद संमती देईल असे आपण गृहीत धरले तर हिंदू पद्धतीने लग्न हे तुझ्या दृष्टीने सर्वांत जास्त फायद्याचे आहे. ह्याच्या अंतर्गत झाएद ला हिंदू धर्म पत्करावा लागेल. हे जणू काही दुसऱ्या हिंदू मुलाबरोबर विवाह करण्यासारखेच आहे. इथे SMA पेक्षा जास्त मोठा फायदा म्हणजे देशांतील बहुतेक लागणे हिंदू आहेत आणि घटस्फोट इत्यादी सुद्धा हिंदू आहेत त्यामुळे ह्या विषयांवर प्रचंड precedent उपलब्ध आहे त्यामुळे इथे कायदेशीर सल्ला घेणे किंवा कोर्टानं जाऊन युक्तिवाद करणे सोपे जाते. त्याशिवाय पोटगी, मुलांचे हक्क इत्यादी विषयावर जास्त कॅलॅरिटी आहे.
- समजा झाएदला त्याचा धर्म जास्त पसंद आहे पण तू आपला धर्म पालन करण्यास त्याला काहीही आपत्ती नसेल तर इथे SMA सर्वांत जास्त चांगला उपाय ठरतो.
- पण झाएद ने निकाहच करायचा ठरवला आणि तुला ते मान्य असेल तर तू आधी धर्मांतर करून नंतर निकाह करावा असा माझा कायदेशीर सल्ला असेल. इथे तुझे कायदेशीर हक्क खूप कमी असतील पण तुला झाएद बरोबर विवाह करायला मिळेल.
अनुष्काने इथे काय केले ?
अनुष्का आधुनिक विचारांची मुलगी असल्याने तिने इथे भावना बाजूला ठेवल्या आणि आणखीन एका वकिलाचा सल्ला घेतला. त्यानंतर ती एका मॅरेज सल्लागाराला भेटली. तिथे सुद्धा तिने सर्व बाजूंचा विचार केला आणि निर्णय घेतला कि ती धर्मपरिवर्तन करणार नाही. लग्न केले तर ती समान हक्कांवरच करेल. त्यामुळे ती जर एका नवीन धर्माशी अड्जस्ट होत असेल तर झाएद आणि त्याचा आधुनिक विचारांचा परिवार सुद्धा अड्जस्ट होईल ह्यांत तिला शंका नव्हती.
सल्लागार मंडळींनी अनुष्काची भेट अनेक अश्या व्यक्ती बरोबर घडवून आणली ज्यांनी विविध पद्धतीने आंतरधर्मीय विवाह केला होता. अमेरिकेतील श्री दिलीप अमीन http://interfaithshaadi.org/ हे संकेतस्थळ चालवतात आणि ह्या महत्वाच्या विषयावर सल्ले सुद्धा देतात. अनुष्काने तिथे सुद्धा अनेक लोकांचे अनुभव वाचले.
झाएद बरोबर तिने ह्या सर्व बाबी डिस्कस करून निर्णय घेतला. वाचक तिने नक्की काय निर्णय घेतला ह्याबद्दल उत्सुक असतील. पण निर्णय तिचा असल्याने ती घेईल आम्हाला उगाच चिंता करण्याची गरज नाही. तुम्ही स्त्री असाल आणि अश्या परिस्थितीत असाल तर तुम्ही कोणता निर्णय घ्याल हे महत्वाचे आहे. आम्ही इतर लोकांचे निर्णय घेऊ शकत नाही. पण आम्ही माहिती जास्तीत जास्त लोकांकडे पोचवू शकतो. आमच्या लहान मुलींना योग्य ते संस्कार आणि माहिती देऊन स्वतःचे भले करण्याचे निर्णय घेण्याची क्षमता देऊ शकतो.
वर्गीकरण
वाचने
42304
वाचनखूण
प्रतिक्रिया
97
अतिशय माहितीपुर्ण लेख,
In reply to अतिशय माहितीपुर्ण लेख, by वीणा३
असेच.
बाकि सगळं ठीक. पण...
In reply to बाकि सगळं ठीक. पण... by अर्धवटराव
इथे कसलाही रोख, छुपा मुद्दा
In reply to इथे कसलाही रोख, छुपा मुद्दा by साहना
:)
महत्वाचा आणि माहितीपूर्ण लेख!
छान
.
In reply to . by Gk
तुमच्या लेखाच्या प्रतीक्षेत.
आज सकाळचं मिपा उघडल्याचे
छान लेख.
@साहना
सल्ला घेतला हे बरं केलं.
In reply to सल्ला घेतला हे बरं केलं. by कंजूस
ट्रेड ऑफ म्हणजे पर्याया मधील
अनुष्का आणि झायेद यांचा निकाह
In reply to अनुष्का आणि झायेद यांचा निकाह by भीमराव
हं
In reply to हं by Gk
हिंदू विवाह कायद्याचा लेख कधी
In reply to हिंदू विवाह कायद्याचा लेख कधी by आनन्दा
लिहून झाला की कधीच
In reply to हं by Gk
सैराट मध्ये कोण मुसलमान होतं
In reply to सैराट मध्ये कोण मुसलमान होतं by सुबोध खरे
पचपच महाराज
In reply to पचपच महाराज by Gk
हलाला
पुरोगामी हिंदू कोड बिल आणि सनातनी प्रतिक्रिया
In reply to पुरोगामी हिंदू कोड बिल आणि सनातनी प्रतिक्रिया by सुनील
विरोध तर होणारच.. काहीतरी
In reply to विरोध तर होणारच.. काहीतरी by बाप्पू
वाचकांनी खालील लिंक उघडण्याचे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- India, US to sign landmark defence pact to share high-end military technology, logistics todayIn reply to पुरोगामी हिंदू कोड बिल आणि सनातनी प्रतिक्रिया by सुनील
कळीचा मुद्दा
In reply to कळीचा मुद्दा by सुनील
सॉरी ! ह्याला काडीचाही आधार
In reply to सॉरी ! ह्याला काडीचाही आधार by साहना
चांगला?
In reply to चांगला? by सुनील
सनातन धर्माने इतकी वर्षे समाज चांगला सांभाळला होता...
In reply to सॉरी ! ह्याला काडीचाही आधार by साहना
राजा कालस्य कारणम्
In reply to पुरोगामी हिंदू कोड बिल आणि सनातनी प्रतिक्रिया by सुनील
बर मग?
लेख वाचनिय आहे
In reply to लेख वाचनिय आहे by धर्मराजमुटके
मुटके साहेब,
In reply to मुटके साहेब, by आनन्दा
अवांतर, माझ्य ओळखीतील एका
In reply to अवांतर, माझ्य ओळखीतील एका by आनन्दा
आपला काहीतरी गैरसमज होतोय
In reply to आपला काहीतरी गैरसमज होतोय by धर्मराजमुटके
एक प्रेमात ठार आंधळे होऊन आणि
In reply to एक प्रेमात ठार आंधळे होऊन आणि by मराठी_माणूस
आंधळ्या प्रेमाला आंधळा विरोध
In reply to लेख वाचनिय आहे by धर्मराजमुटके
कुठलाही हिंदू माणूस "बीफ कबाब
In reply to कुठलाही हिंदू माणूस "बीफ कबाब by साहना
छान
In reply to कुठलाही हिंदू माणूस "बीफ कबाब by साहना
कुठलाही हिंदू माणूस "बीफ कबाब
In reply to कुठलाही हिंदू माणूस "बीफ कबाब by टवाळ कार्टा
आणि वर मी प्युअर नॉन
In reply to आणि वर मी प्युअर नॉन by मराठी_माणूस
काय खावे हा वैयक्तीक प्रश्न
In reply to काय खावे हा वैयक्तीक प्रश्न by टवाळ कार्टा
कुणी काय खावे हा नक्कीच
In reply to कुणी काय खावे हा नक्कीच by सुबोध खरे
+1111
In reply to लेख वाचनिय आहे by धर्मराजमुटके
> माझे त्याच्यावर लव आहे
In reply to > माझे त्याच्यावर लव आहे by साहना
प्रतिसादाशी सहमत आहे !
हं
In reply to हं by Gk
आपटे आहे म्हणजे बुद्धीवर व्हिसा मिळतो...
लेख आवडला.
SMA
In reply to SMA by बाप्पू
विकी https://en.m.wikipedia.org/wiki/Special_Marriage_Act,_195
In reply to विकी https://en.m.wikipedia.org/wiki/Special_Marriage_Act,_195 by Gk
https://en.m.wikipedia.org
प्रॉपर्टी चे निकष
In reply to प्रॉपर्टी चे निकष by कंजूस
सारखा नसतो हिस्सा. मुलीना
https://m.timesofindia.com
लग्न कंच्या बी पद्धतीने करा.
लग्न कंच्या बी पद्धतीने करा.
राजा कालस्य कारणं ...
In reply to राजा कालस्य कारणं ... by गामा पैलवान
छान
In reply to छान by Gk
400 संस्थानिक
In reply to 400 संस्थानिक by सुबोध खरे
छान
In reply to छान by Gk
अध्यक्ष असले तर काय होते ?
In reply to अध्यक्ष असले तर काय होते ? by सुबोध खरे
.
In reply to . by Gk
छान
In reply to छान by Gk
आणि हा जुना फ़ंड
In reply to आणि हा जुना फ़ंड by Gk
दाबून पैसे खाता येतात.
तुकाराम, ज्ञानेश्वर, फुले,
In reply to तुकाराम, ज्ञानेश्वर, फुले, by साहना
छान
तुमच्या शारीरिक
In reply to तुमच्या शारीरिक by साहना
छान
In reply to छान by Gk
तुमचे लेखन त्या तोडीचे असते
In reply to तुमचे लेखन त्या तोडीचे असते by साहना
.
40 पैसे
गंभीर लेख
In reply to गंभीर लेख by राजेंद्र मेहेंदळे
त्यामुळे आता ही तारेवरची कसरत
छान लेख.
एका ऊपयूक्त विषयावरील लेखाचा
In reply to एका ऊपयूक्त विषयावरील लेखाचा by माहितगार
धन्यवाद !
जनतेच्या उरावर ?
व्हिसा मिळेल !
अंतर धर्मीय विवाह
In reply to अंतर धर्मीय विवाह by Rajesh188
ज्या एखाद्या गोष्टीस समाज
In reply to ज्या एखाद्या गोष्टीस समाज by माहितगार
उदाहरण आहेत
साधनाजी, अतिशय चांगला आणि
In reply to साधनाजी, अतिशय चांगला आणि by तेजस आठवले
तसेच सततचा मोदीविरोध आणि
In reply to साधनाजी, अतिशय चांगला आणि by तेजस आठवले
अरेरे
In reply to अरेरे by Gk
तुमचा खोटारडेपणा लोचटपणा
In reply to तुमचा खोटारडेपणा लोचटपणा by सुबोध खरे
`खरे` बोललात !
लग्नासाठी धर्मांतर संबंधी एक
केवळ विवाहासाठी धर्मांतरण वैध नाही
उपयुक्त लेख.
In reply to उपयुक्त लेख. by एस
तुमची प्रतिक्रिया वाचून आनंद
In reply to तुमची प्रतिक्रिया वाचून आनंद by आनन्दा
प्रामाणिक नास्तिक
In reply to प्रामाणिक नास्तिक by गामा पैलवान
खरे आहे
शाकाहारि पन तसेच
उपयुक्त माहिती:
उपयुक्त लेख..
आज हे सापडलं