ह्या लाजिरवाण्या घरात....

परिकथेतील राजकुमार's picture
परिकथेतील राजकुमार in जनातलं, मनातलं
25 Nov 2008 - 2:47 pm

२/३ दिवस घरी काही कारणामुळे लवकर जात होतो रात्रीचा, त्यामुळे टि.व्हि. नावाच्या आचरट प्राण्याचा असह्य त्रास हि सहन करावा लागला हो ! परमेश्वरा, अरे काय अर्थहीन आणी महामुर्ख मालीका असतात हो ह्या टि.व्हि. वर.
एक मुलगा अपंग, एका मुलाची बायको माहेरच्या श्रीमंतीचा प्रचंड माज असलेली आणी त्याला कयम चुकीचे सल्ले देणारी, मुलगी वेडी आणी हरवलेली, वडिलांना अर्धांगवायुचा झटका आलेला आहे आणी ते कमी कि काय म्हणुन ते तुरुंगवारी सुद्धा करुन आले आहेत येव्हड्यातच. आणी मालीकेचे नाव काय तर म्हणे 'ह्या गोजिरवाण्या घरात'. डोंबलाचे गोजिरवाणे ? मालिकेचे नाव सोडले तर सगळे लाजिरवाणेच आहे !
आणी एक मालीका, नाव काय तर असंभव. ह्या असल्या मालीका फक्त आपल्याकडेच पाहणे संभव आहे हो ! कवट्या, हाड, पुनर्जन्म, करणी हे अगदी इतक्या सहजपणे दाखवले आहे कि वाटावे, प्रत्येक २ घर सोडुन एका घरात कोणीतरी निलम शिर्के राहाते. आणी तो आनंद अभ्यंकर नी काढलेला म्हातार्‍याचा आवाज ऐकला न कि त्याला पटकन "चालला का काय? नाहि म्हणजे वैकुंठात मोघे गुरुजींना फोन करतो !" असेच म्हणावेसे वाटते.
तुम्हाला सांगतो, आपल्याकडे कशी रोगाची साथ पसरते ना तशी ह्या मालिकात कथाकथनाची साथ पसरते, म्हणजे 'ह्या' मालिकेतल्या नायिकेचा छोटा मुलगा पळवला गेला कि 'त्या' मालीकेतल्या नायिकेचा पण पळवला गेलाच. हिच्या नवर्‍याला अपघात झाला कि तिकडे तिच्या नवर्‍यानी छातीवर हात दाबलाच म्हणुन समजा !
मला तर कधी कधीना हे निर्माता दिग्दर्शक विक्रुत असतात का काय अशी शंका येते ! तुम्हि बघा हि लोक बाईला व्यवस्थीत बाळंत म्हणुन होउन देत नाहित. कुठलीही मालिका बघा, बाईला दिवस गेले रे गेले कि ६ महीन्यात ती जिन्यावरुन पडलीच पाहिजे, नाहितर कोणाला तरी अपघातातुन वाचवताना पोटावर तरी पडली पाहिजे. एक तरी नायिका सुखरूप आणी आजुबाजुला सासु, नवरा काळजी घ्यायला खंबीर असताना बाळंत झालेली दाखवली तर टि. आर. पी. कमी होतो का ? हिला (जर जिना, अपघात, विषप्रयोग ह्यातुन वाचली तर) बाळंत पणाला डॉक्टरनी ऑपरेशन थेटर मध्ये घेतले रे घेतले की तिकडे कोणीतरी गचकलेच म्हणुन समजा. नाविन आत्मा जन्माला आलाच नाहि पाहिजे ! इकडे आत्मा मुक्त झाल्याबरोबर तिकडे "ट्यॅहॅ ट्यॅहॅ " चा आवाज चालु ! तो स्रुष्टिकर्ता सुध्दा हाताची ५ बोट तोंडात घालुन बसत असेल आश्चर्यानी.
मी मध्ये एक मालिका बघत होतो साधारण २ महिन्यापुर्वी ची गोष्ट आहे, त्या दुखी:यारी नयिकेचा नवरा अपेयपान करुन गाडी चालवत असताना अपघातग्रस्त होउन दवखान्यात आता जातो का माग जातो (जा बाबा एकदाचा) अशा अवस्थेत पडलेला असतो. ह्याचा बापुस डॉक्टरला हुकुम सोडतो "पैसे कि चिंता मत करो लेकिन मुझे मेरा बेटा जिंदा चाहिये."
खरे सांगु का, संपुर्ण भागात ह्या एकाच शॉट चे आम्हाला कौतुक वाटले, अशा अवस्थेतही त्या बापानी डॉक्टरच्या चेहर्‍यावरील पैशाची काळजी ओळखली. प्रचंड हसर्‍या चेहर्‍याने डॉक्टर सांगतो "मुझे पता है ठाकुर साहाब, और दुनीया के सबसे डॉक्टर इस वक्त यही मौजुद है." ह्याला म्हणतात नशीब ! आम्ही साधी कधीतरी भेळ खायला म्हणुन प्लॅनींग करुन गेलो कि हमखास आमच्या नशीबात कुलुप ! आणी च्या आईला इकडे लगेच दुनिया का सबसे बडा डॉक्टर मौजुद. बडा डॉक्टर आहे म्हणजे तो ह्रुदया पासुन मुळव्याधी पर्यंत सगळ्याचा इलाज करत असणार अशी आम्ही मनाची समजुत घालुन घेतली. हान तर हा सबसे डॉक्टर मग ह्या हिरोला ऑपरेशन थेटर मध्ये घेतो, बाहेर हिरो कि मॉ आणी बायको भगवान श्रीक्रिष्ण की चरणोमे पडलेल्या. कॅमेरा एकदा थेटर वरच्या लाल दिव्यावर मग एकदम ECG मशीन वर आणी मग एकदम उड्डाण करुन क्रुष्णा च्या हसर्‍या आणी आश्वासक चेहर्‍यावर.
ECG मशीनची लाइन आमच्या आठवी नववी इयत्तेमधल्या आलेखा सारखी वाकडी तिकडी खालती वरती नाचायला लागते, डॉक्टर लोग जमतील तेव्हडे मुर्ख भाव आणुन एकमेकांकडे बघायला लागतात, जणु आन्खो के सामने हे असले काहि पहिल्यांदाच घडत आहे. आणी अचानक भयप्रद संगीत वाजायला लागते आणी ECग़ ची रेषा गप्प होते. येकदम फ्लॅट !
"आय.एम.सॉरी" दुनिया का सबसे बडा डॉक्टर म्हणतो आणी ताडताड दरवाजा उघडुन निघुन जातो ! श्रीक्रुष्णा समोर फडफडणारी ज्योत शांत होते. माता अर्धांगीनी एकत्र किंचळतात "नह्हि !!" ज्यु. डॉक्टर बाहेर येउन सांगतात "बहोत कोशीश कि हमने, लेकीन ऑपरेशन के वक्त हि उन्हे जोर से हार्ट एटॅक आ गया और हार्ट बंद पड गया. हम उन्हे नही बचा पाये."
अर्धांगीनी धावत धावत अर्धांगाच्या रुम कडे धावतात. (येव्हड्या कमी वेळात त्याचे शरीर टाके घालुन परत रुम मध्ये आणुन ठेवणार्‍या वॉर्डबॉय आणी डॉक्टरांना आमचा मानाचा मुजरा) अर्धांगीनी वेळ न घालवता अर्धांगाच्या शरीरावर पडुन त्याला "ऐसे कैसे मुझे अकेला छोर के चले गये ? भूल गये जिवनभर साथ निभाने का वादा किया था आपने ? आब मै किसके सहारे जिउंगी ?" असे प्रश्न विचारु लागते, मग काहि काळ नशिब व देव ह्यांना कोसले जाते. आणी मग संताप आणी रागाच्या भरात ती आपले दोन्ही हाथ नवर्‍याच्या छातीवर आपटुन बांगड्या फोडते, देवा महाराजा ऐका सती सावित्रीची पुण्याई, बांगड्या छातीवर आपटताच ECG मशीनची लाईन परत उड्या मारु लागी, उड्या मारु लागी हो, जी जी जी.
हो तुम्ही वाचताय ते सत्य आहे, डोळे चोळु नका ! तिने हाथ आपटल्या बरोब्बर सत्यवानाचे ह्रुदय कि धडकन लगेच परत चालु. अरे दुनिया का सबसे बडा डॉक्टर गेला तेल लावत, अरे पाहिजे कशाला हे सबसे बडे डॉक्टर आणी त्यांचे महाग इलाज ? मेला हार्ट एटॅक नी माणुन कि न्या हिला तिकडे आणी लावा आपटायला हात छाताडावर ! अरे हाय काय आन न्हाय काय !!

कलामाध्यमवेध

प्रतिक्रिया

जैनाचं कार्ट's picture

25 Nov 2008 - 2:51 pm | जैनाचं कार्ट (not verified)

>>>>तो स्रुष्टिकर्ता सुध्दा हाताची ५ बोट तोंडात घालुन बसत असेल आश्चर्यानी.

=))

मी शांती (ते पण ती होती म्हणून) सोडलं तर कुठेही धारावाहीक पाहिले नाही त्यामुळे तुमच्या दुखःची माहीत नाही आहे.... ;)

जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आपले संकेतस्थळ

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

25 Nov 2008 - 3:13 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

लय भारी रे राजकुमारा! फक्त एवढी फटकेबाजी केल्यावर तू परिकथेतला नाही रे शोभत, एकदम खरा माणूस वाटतोस.

एक तरी नायिका सुखरूप आणी आजुबाजुला सासु, नवरा काळजी घ्यायला खंबीर असताना बाळंत झालेली दाखवली तर टि. आर. पी. कमी होतो का ?
=)) ...

जाऊ दे, किती वाक्य उचलून काढणार, सगळंच भारी.

विनायक प्रभू's picture

25 Nov 2008 - 3:29 pm | विनायक प्रभू

माउथ टू माउथ दाखवता येत नाही.
बंद पड्ल्यावर असा धक्का मिळाला तर कधी कधी चालू होते.
आता किती% म्हणुन किट किट करु नकोस.

टारझन's picture

25 Nov 2008 - 3:35 pm | टारझन

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))

त्या असंभव मधल्या आनंद अभ्यंकराला हाणा रे आधी .. च्यायला

- टारझन

मनस्वी's picture

25 Nov 2008 - 5:39 pm | मनस्वी

'या सुखांनो या' मधल्या सगळ्यांना आवरा.

माउ's picture

25 Nov 2008 - 3:37 pm | माउ

नशिब...एकता कपुर च्या मालिका नाही बघितल्या.. नाहि तर TV set च फोडला असता..

घाशीराम कोतवाल १.२'s picture

25 Nov 2008 - 5:01 pm | घाशीराम कोतवाल १.२

नशिब...केकता कपुर च्या मालिका नाही बघितल्या.. नाहि तर TV set च फोडला असता..
अरे पाहिजे कशाला हे सबसे बडे डॉक्टर आणी त्यांचे महाग इलाज ? मेला हार्ट एटॅक नी माणुन कि न्या हिला तिकडे आणी लावा आपटायला हात छाताडावर ! अरे हाय काय आन न्हाय काय !!

नशीब तिच्याला ती बा मेलि आणी तुलसी विराणी गेलि
पन साला आता नविन मालिका नशीबी आलि
काय नाव साला बहुतेक ते पण क च्या बाराखडी च असणार साला

मागोवा - आमच्या काही उचापत्याचा...

वेताळ's picture

25 Nov 2008 - 5:33 pm | वेताळ

हा ही लेख जबरदस्त लिहला आहेस. अभिनंदन =))
ह्या मालिकेवर खरे तर बंदी घालायला हवी. ह्याच्या आईला..इथे लग्न करुन जीव नकोसा होतो आणि हे साले प्रत्येक आठवड्याला बाजार असल्यासारखे लग्ने करित असतात.फक्त पंराजपे दांपत्य म्हातारे दाखवले आहे म्हणुन. नाहीतर त्याना पण दोन तीनदा मांडवात उभे केले असते.त्यात भरिसभर भगवान श्रीकृष्ण त्या कुंटुबाला पावला आहे आणि तो पण कशा ना कशावर निरर्थक गोष्टीवर चर्चा करत असतो
वेताळ

कपिल काळे's picture

25 Nov 2008 - 7:34 pm | कपिल काळे

लाजिरवाण्या घरातल्या दिक्षाचे सध्या कितवे लग्न सुरु आहे?

किती प्यासेंजर बसतात, उतरतात. वडाप दिसतय.

http://kalekapil.blogspot.com/

धमाल मुलगा's picture

26 Nov 2008 - 11:53 am | धमाल मुलगा

=))

>>किती प्यासेंजर बसतात, उतरतात. वडाप दिसतय.
तेही बिनतिकीटाचं!

आन् च्यायला, त्याचा टॅक्स भरायचा आपण! हड् तिच्याआयला...

रेवती's picture

26 Nov 2008 - 12:51 am | रेवती

खरच ह्या मालिका अश्याच असाव्यात.
मी पहिल्या नाहीयेत आणि आता पाहणारही नाही.

रेवती

प्राजु's picture

26 Nov 2008 - 1:47 am | प्राजु

काल वाचयला नाही मिळालं कामांमुळे. आज निवांत वाचलं.
मस्त लिहिलं आहे. शिरीष कणेकर यांच्या फिल्लमबाजी ची आठवण झाली.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

पाषाणभेद's picture

26 Nov 2008 - 3:59 am | पाषाणभेद

आमी आमच्या धंद्याचच बगतो. त्यानी तुमच्या काय वो पोटात दुकत ?

टुकार मालिका बघुन डोळे का नाहि फुटले माझे?
-( सणकी )पाषाणभेद

विसोबा खेचर's picture

26 Nov 2008 - 11:03 am | विसोबा खेचर

आपण तर बा त्या बेक्कार मालिका पाहतच नाही...

तात्या.

भिंगरि's picture

26 Nov 2008 - 1:27 pm | भिंगरि

मालिका कधि बघितलि नाहि पण तरिहि मालिकेपेक्षा ह्या लेखातच जास्त मनोरंजन क्षमता आहे ह्याचि खात्रि आहे. :) लेख आवडला हे वेगळे सांगायला नकोच.

सोनम's picture

7 Dec 2008 - 2:22 pm | सोनम

=; =; =; =; =; =;

"टि.व्हि. नावाच्या आचरट प्राण्याचा असह्य त्रास हि सहन करावा लागला हो "
बरोबर आहे हे . "घरोघरी मातीच्या चुली."
घरातील स्त्रियाना अशा मालिका बघायला खूप आवडतात. घराच्या काळजीपेक्षा मालिकेत पुढे काय होणार आहे याची त्या॑ना खूप काळजी वाटते.
आणि परिकथेतील राजकुमारा तुम्ही ऐवढे लिहिले आहे त्यामुळे असे वाटते तुम्ही सह दिग्दर्शकाची भूमिका चा॑गली निभावसाल. सगळ्या दिग्दर्शकाना मागे पाडसाल. आणि न॑बर वनचा पुरस्कार मिळवसाल.

(पुण्याची सोनम) राम राम मिपा