कष्ट करणार्या " तिला "

दत्ता काळे's picture
दत्ता काळे in जे न देखे रवी...
25 Nov 2008 - 11:51 am

दाटले डोळ्यांत अश्रू, ते ही कां विकणार तू ?
कष्टाची ना इथे ग किंमत, कां मरेमरेतो जगणार तू ?

कर्तव्याची देऊन दाने, अशी किती उरणार तू ?
पुण्यासाठी करुनी पुण्ये, उरता उरता विरणार तू.

जागजागुनी असंख्य रात्री, वाढविले जरी तू त्यांना
जाण येऊनी उडुनी गेले, सांग किती धरणार तू ?

कठोर कर्तव्याची केवळ कांस कां धरणार तू ?
ध्यास घेऊनी वसंतऋतूचा सांग कधी झुरणार तू ?

मागणारे मागतच असतात, सांग किती पुरणार तू ?
याचकांचे विश्व सारे, हात किती देणार तू ?

प्रेमकाव्यकवितावाङ्मय

प्रतिक्रिया

राघव's picture

25 Nov 2008 - 12:49 pm | राघव

चांगले आहे. थोडे लयीत खटकले तरी कल्पना उत्तम!

जागजागुनी असंख्य रात्री, वाढविले जरी तू त्यांना
जाण येऊनी उडुनी गेले, सांग किती धरणार तू ?

येथे "सांग कसे धरणार तू?" हे जास्त योग्य वाटले असते.. नाही?
मुमुक्षु

दत्ता काळे's picture

25 Nov 2008 - 1:03 pm | दत्ता काळे

मुमुक्षुराव,

अगदी योग्य आणि चपखल बसेल अशी ओळ सुचवली त्याबद्दल धन्यवाद.

हि कवितादेखील मी कॉलेजमध्ये असताना केली होती आणि आत्ता पहिल्यांदाच प्रकाशित केली आहे.
योग्य ते बदल वेळोवेळी मला सुचवत चला, म्हणजे काव्यरचनेतील परिपक्वता यायला मदत होईल.